हमामा

Submitted by अज्ञात on 2 July, 2008 - 01:53

हरएक शिल्प घडलेच कसे
उत्सुक एकांत सुदामा
जाळ्यात अडकते मन अवघे
संम्मोहित मी रामा

चण निसर्गदत्त लतेसम ही
वात्सल्य उरी मुक्कामा
डोळ्यात मदन कमनीय रती
काळीज विदारे कामा

स्वर हळवा व्याकुळ सुमनविकल
घायाळ इंद्र निजधामा
अस्वस्थ करी चंचल हरिणी
ही व्याध खरी घनश्यामा

रे वेध तुझाही तिने घेतला
अखेर या संग्रामा
मी तर पामर ऋण जन्मावर
पाहतो हमामा !

....................अज्ञात
१२६४,नाशिक

गुलमोहर: 

हे नाही झेपल .. फार अवघड... रामाचा आणि सुदामाचा मेळ नाही कळला..

चण, ज्ञन्मावर, हमामा ह्यांचे अर्थ सागा आधी... किती अवघड लिहीता..

सत्यजीत,
चण-शरीरयष्टी, शरिराची ठेवण.
रामाचा उल्लेख-सुस्कार्‍याचा उद्गार म्हणून आहे.
ज्ञन्मावर- हे चुकून झाले आहे ते "जन्मावर" असे हवे.
सुदामा आणि घनश्याम म्हणजे गरिबात गरिबापासून ऐश्वर्यवान श्रीमंतापर्यंत असा संदर्भ आहे.
हमामा- धिंगाणा, हंगामा, उत्सव.
अजून कांही असल्यास नि:संकोच विचारा. तुम्हाला ते अवघड वाटलं. असो. पण मी ठरवून लिहीत नाही अथवा ते मुद्दाम अवघड व्हावं असं योजत नाही. जे आलं; जसं आलं; तसंच लिहितो. ते शक्यतोवर निरर्थक असत नाही. आपण विचारलेल्याच्या पलिकडे न समजणारं नसावं.
......................................अज्ञात