ह्रुदयातुनि या माझ्या

Submitted by Bhumika on 5 August, 2008 - 16:12

ह्रुदयातुनि या माझ्या
आहे तुझीच साद
तुझे रुप पाहाणे हा
जडला असे मझ नाद

ह्रुदयातुनि या माझ्या
आहे तुझेच ध्यान
भाग्यवान मी अशी रे
मज मिळे तव प्रेम्रुपि ज्ञान

ह्रुदयातुनि या माझ्या
आहे तुझेच प्रतिबिम्ब
मम मानसी असे रे
तव प्रेमपुर्ण स्तम्भ

ह्रुदयातुनि या माझ्या
मी तुझ पाहते आहे
अश्रुरुपि पाण्याने परिपुर्ण
एक नदि वाहाते आहे

गुलमोहर: 

ह्रदयाच्या या खेळात
कधी हार कधी जीत
जिंकण्यात लपुन असते
हरण्याची नवी रीत

|| हरि ओम ||

वा वा मस्तच.

नवी रीत , नवी जीत
नवे सर्व हवे हवे
जिन्कण्या हरण्या च्या या लपन्डावात
प्रिय सख्या तु हवास सवे

|| हरि ओम ||

माझे भारतमातेला नम्र अभिवादन... ही माझी कविता माझ्या मात्रुभुमीला सादर ...

तव चरणी हिंद् माते... पडले किती हुतात्मे
त्या सर्वांस जोडुनी हात.. अमुचा शतकोटी प्रणिपात |

आयुश्यांची जयांची राने
स्वहस्ते केली स्मशाने
ज्यांच्या बलिदानाने आज
शेतकरी पिकवी भात...

त्या सर्वांस जोडुनी हात.. अमुचा शतकोटी प्रणिपात |

स्वातंत्र्याच्या संग्रामात
स्वमने घेऊनि भाग
स्वातंत्र्य मिळवणे हाच
जयांचा निदिध्यास...

त्या सर्वांस जोडुनी हात.. अमुचा शतकोटी प्रणिपात |

मुक्या मनाने
धन मन तनाने
आतर्क्य शुद्ध स्वराने
स्वतंत्रतेच्या देवतेला
घातली ज्यानी साद

त्या सर्वांस जोडुनी हात.. अमुचा शतकोटी प्रणिपात |

फिरन्ग्यांशी करुनि दोन हात
हिन्द मातेशी न केला घात
देशप्रेम कार्यासाठी
झिजति ज्यांचे हात

त्या सर्वांस स्मरुनि आज.. अमुचा शतकोटी प्रणिपात |