वाटेवरची माती

Submitted by अज्ञात on 8 August, 2008 - 05:37

काल धुवाधार पाऊस होता

हिरवळलेल्या डोंगरमाथ्यावर
मी आणि ओघळणार्‍या थेंबांशिवाय
कोणीच नव्हतं

वाटेवरची माती एक हुळहुळत होती
चिखल गार्‍यात
अंगावरचे ठसे मोजत
गार वार्‍यात

..................अज्ञात
१२९९,नाशिक

गुलमोहर: 

छोट्टीशी पण छान कविता अज्ञात.

दुसर्‍या मिनिटाला मिळालेली प्रतिक्रिया !! काय जादू आहे पहा. मस्त वाटलं अश्विनी. धन्यवाद.