शब्दबोध

मुक्तविहारी

Submitted by र।हुल on 26 September, 2017 - 00:04

विश्वाला चिरूनी जातील माझे शब्दबोध
मग कल्पांतालाही कवटाळेल माझी कविता
मुक्तविहारी मी बागडेन चंद्रचांदण्यांत घेत विधात्याचा शोध
अनंत रंग उधळून चौफेर दिशांना मग उगवेल नविन सविता
घनगंभिर गुढ उलगडण्या विसरेन देहभान होऊनी धुंद
छेडत ह्रदयीच्या तारा गुंजेल मग हळूवार अनाहत छंद

―र।हुल /२६.९.१७

Subscribe to RSS - शब्दबोध