कथा एका मुलाखतीची

कथा एका मुलाखतीची (भाग -२)

Submitted by _तृप्ती_ on 1 August, 2017 - 23:38

गावातल्या कोपऱ्याकोपऱ्यावर आता ताराबाईच्या मुलाखतीची चर्चा जोर धरू लागली. मास्तर स्वतः जातीने प्रश्न तयार करत होते. ताराबाईचा व्यवसाय समजून घेण्यासाठी ते एकदा प्रत्यक्ष गोवऱ्या बनवून आल्याची अफवा सुद्धा गावात पसरली. मास्तरांनी ताराबाईना प्रश्नाची यादीच दिली आणि त्याची उत्तरं लिहून काढायला सांगितली. काही प्रातिनिधिक प्रश्न.
- शेणाच्या गोवऱ्या कश्या बनवतात? (४-५ वाक्यात माहिती द्या)
- गोवऱ्याचे प्रमुख उपयोग (३-४ कमीत कमी)
- गोवऱ्या बनवण्यासाठी लागणारा वेळ - एका वाक्यात उत्तर द्या.
- गोवऱ्या बनवताना येणाऱ्या अडचणी. उदाहरणासहित स्पष्ट करा.

विषय: 

कथा एका मुलाखतीची

Submitted by _तृप्ती_ on 31 July, 2017 - 00:30

ताराबाई आज सकाळपासून भलत्याच खुश होत्या. स्वतःशीच हसत होत्या. कालचा फोन आठवून आणि त्यानंतर आलेले पत्र, कमीत कमी २० वेळा तरी वाचून झाले असेल. त्यांना कधी एकदा ही बातमी गावातल्या सगळ्या बायकांना सांगते आहे असं झालं होतं. ताराबाई ह्या जरी वावडी नावाच्या छोट्या गावात राहत असल्या तरी स्थळ काळाने फरक न पडणारं व्यक्तिमत्व आहे त्यांचं. त्यांचा स्वतःचा शेणाच्या गोवऱ्या विकण्याचा मोठाच व्यवसाय आहे. आणि त्यावर त्यांचा संपूर्ण एकाधिकार आहे. पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे गावातल्या रिकामटेकड्या बायकांना एकत्र आणून, त्यांना छोटे मोठे उद्योग करण्यास मदत करण्यात यांचा पुढाकार आहे.

Subscribe to RSS - कथा एका मुलाखतीची