नका होऊ नव्या आयडींमुळे बेभान स्थळांनो (विडंबन)
Submitted by भास्कराचार्य on 19 May, 2017 - 15:14
http://www.maayboli.com/node/62618 येथून प्रेरणा घेऊन एक कोणत्याही वृत्तात न बसणारे विडंबन. आम्हांस कोणत्याही वृत्ताची 'मात्रा' लागू पडत नाही, हे वृत्त एव्हाना सर्वांना विदित होण्यास हरकत नसावी. किंबहुना अशा काहीच्या काही कवितेला ते असूही नये. मूळ लेखकाची वैयक्तिक थट्टा करण्याचा ह्यात हेतू नाही. त्यांचे वृत्तकौशल्य व (काही) गजला आम्हांसही फार आवडतात. परंतु तरीही मायबोलीच्या नियमांत हा धागा बसत नसल्यास उडवून टाकावा.
"नका होऊ नव्या आयडींमुळे बेभान स्थळांनो
पुन्हा घालूच आम्ही लाथाळी थैमान स्थळांनो