नका होऊ नव्या आयडींमुळे बेभान स्थळांनो (विडंबन)

Submitted by भास्कराचार्य on 19 May, 2017 - 15:14

http://www.maayboli.com/node/62618 येथून प्रेरणा घेऊन एक कोणत्याही वृत्तात न बसणारे विडंबन. आम्हांस कोणत्याही वृत्ताची 'मात्रा' लागू पडत नाही, हे वृत्त एव्हाना सर्वांना विदित होण्यास हरकत नसावी. किंबहुना अशा काहीच्या काही कवितेला ते असूही नये. मूळ लेखकाची वैयक्तिक थट्टा करण्याचा ह्यात हेतू नाही. त्यांचे वृत्तकौशल्य व (काही) गजला आम्हांसही फार आवडतात. परंतु तरीही मायबोलीच्या नियमांत हा धागा बसत नसल्यास उडवून टाकावा.

"नका होऊ नव्या आयडींमुळे बेभान स्थळांनो
पुन्हा घालूच आम्ही लाथाळी थैमान स्थळांनो

लेख कथा ललिते विनोद वगैरे ठीक आहे पण
करा राजकीय कलगीतुरा प्लान स्थळांनो"

डुआयच नागवे झालेत तुमच्या धाग्यांवरती
तरी करा कडेने छाटाछाटी बेभान स्थळांनो

खर्‍यांना फुलपाकळ्या, डुआयना देत जा धक्के
हाणामारीचा धागा करा वाहते पान स्थळांनो

प्रतिभा ह्या मायबोलीतच बहराला आली होती
डुआयांच्या संहाराचे करतो इथे गान स्थळांनो

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा!

मूळ कवितेत मागणी घातली होती त्याच्याशी कॉरस्पाँडिंग काही नाही का इकडे विडंबनात?

त्या (सदानकदा ठोकरणार्‍या) प्रतिभेलाच मागणी घालायची होती, पण ते काही सहजासहजी एवढं जमत नव्हतं. Happy