रवा कप केक
Submitted by दिप्ती_३० on 30 March, 2021 - 09:37
आयुष्याचा हिशोब साचा
एक कप तिचा,एक माझा!
दिसायला दोन्ही एकच
फ्लेवरंही सारखाच
फक्त चाखण्याची रित
ज... रा निराळी
म्हणूनच.. एक कप तिचा,एक माझा!
माझा आधी संपेल, तिचा नंतर
चालायचंच हे असं जंतरमंतर! अगदी निरंतर..
त्यातूनच घडते जादू शेवटी
टेस्टी... लज्जतदार... सुरंगी
पण तरिही..
एक कप तिचा,एक माझा!
एकत्र असून थोडं वेगळेपण
वेगळं असूनही थोडस्सं एकत्रपण..!
तिचं सावधपण माझं अंधळेपण
जगण्यातली वागण्यातली
गोडी वाढवणारं..
त्याच कारणानी..
एक कप तिचा,एक माझा!