एक कप तिचा...

Submitted by अत्रुप्त आत्मा on 15 April, 2017 - 14:56

आयुष्याचा हिशोब साचा
एक कप तिचा,एक माझा!

दिसायला दोन्ही एकच
फ्लेवरंही सारखाच
फक्त चाखण्याची रित
ज... रा निराळी
म्हणूनच.. एक कप तिचा,एक माझा!

माझा आधी संपेल, तिचा नंतर
चालायचंच हे असं जंतरमंतर! अगदी निरंतर..
त्यातूनच घडते जादू शेवटी
टेस्टी... लज्जतदार... सुरंगी
पण तरिही..
एक कप तिचा,एक माझा!

एकत्र असून थोडं वेगळेपण
वेगळं असूनही थोडस्सं एकत्रपण..!
तिचं सावधपण माझं अंधळेपण
जगण्यातली वागण्यातली
गोडी वाढवणारं..
त्याच कारणानी..
एक कप तिचा,एक माझा!

गोडिच्या बेरजा, अजाणतेपणी केलेल्या वजा-बाक्या!
कधी गुणाकार.. कधी भागाकार
परत त्यांच्याही बेरजा वजाबाक्या!!!
पण गणित तिथेच येऊन थांबतं..
अगदी नेहेमी..

एक कप तिचा....
https://scontent-lax3-2.xx.fbcdn.net/v/t31.0-8/fr/cp0/e15/q65/17880488_1319704728115810_172567209834256293_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=4e396b75284cabf020274632bd197fb3&oe=5953B649
==०==०==०==०==०==०==
अत्रुप्त...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

एकत्र असून थोडं वेगळेपण
वेगळं असूनही थोडस्सं एकत्रपण..! >> मस्तच
अप्रतिम कविता आवडली. पु.ले.शु.

छानच !