ललीत

आपल्याला काय करायचय?

Submitted by आर्च on 8 July, 2017 - 15:48

आज शनिवार. सकाळीच उठून आमच्या इथल्या नदिवरच्या नेचर वॉकवर फिरायला जायच हे मी काल रात्रीच ठरवल होतं. आणि चक्क नवरापण यायला तयार झाला होता. नाहीतर माझी एकटीचीच जायची तयारी होती. हा नदीच्या बाजूने केलेला ग्रीनवे कॉरीडॉर फारच सुंदर आहे. निरनिराळी जवळपासची सबर्ब्ज ह्याने जोडली आहेत. सुरेख झाडित लपलेला हा रस्ता फक्त चालण्यासाठी आणि सायकलस्वारांसाठी ठेवलेला आहे. बाहेर कार पार्कींगची मोफत व्यवस्था आहे. साऊथला रहाण्याचा मोठ्ठा फायदा. दुतर्फा मोठी झाडं आणि त्यांची डोक्यावर झालेली कमान त्यामुळे उन्हाळ्यातही चालताना गारवा जाणवतो. तर आम्ही सकाळीच निघालो. घरापासून १० मिनिटांवर एक ट्रॅक सुरु होतो.

शब्दखुणा: 

तृप्तीचा ढेकर

Submitted by स्वप्नाली on 25 April, 2016 - 16:04

मार्चमधले दुपारचे टळटळीत ऊन हा हा म्हणत होते (मला तरी आज पर्यंत तसे ऐकू आलेले नाही कधी)..जेवणाच्या मोठ्या सुट्टी नंतरचा पहीलाच जीव-शास्त्राचा तास म्हणजे आमच्या जीवाला घोर. त्यात आज आज्जीच्या हातची "सुग्रास" का काय म्हणतात तशी भरली वांगी. मग काय विचारता, मीच नाही तर आम्या-सुम्या, भाल्या सगळेच तुटून पडतात डब्यावर माझ्या..आज्जीला हे माहीत असल्याने ती सुद्धा डब्बा भरताना जरा हात मोकळाच ठेवते..सोबत एका छोट्या डबी मध्ये श्रीखंड दिले असले तर मग "ब्रम्हानन्दी" टाळीच ! ते बोटानीच सगळे चाटून-पुसून खाउन, नळावर हात धुवून रूमालाला पुसून वर्गात येऊन बसलो होतो..

Subscribe to RSS - ललीत