दात

बत्तिशी!

Submitted by मोहना on 27 November, 2017 - 08:20

भल्या पहाटे कळा सुरु झाल्या. सुमुखी दाते आय ओय करत कुशीवर वळली. नवर्‍याला गदगदा हलवलं तर तो तिच्याहून जोरात ओरडत एकदम दारच उघडायला निघाला. त्याचं हे नेहमीचंच. आधी दाराकडे धावणार काही झालं तरी. पळपुटा कुठला. सुमुखी ’झोप तू’ असं फणकार्‍याने पुटपुटली आणि आय, ओय जोरात आळवत दुसर्‍या खोलीत डोकावली. चिरंजीव आडवे पडलेले. ते ढिम्म हलले नाहीत. सुमुखी तिसर्‍या खोलीत गेली. पलंग रिकामा. पळाली की काय? कुणाबरोबर? कशी? कधी? आता सुमुखी दोन वेगवेगळ्या कारणांसाठी ओरडायला लागली. पलंगाच्या पलीकडच्या बाजूला पडलेली तिची तरुण कन्यका उठून शांतपणे पलंगावर झोपली.

शब्दखुणा: 

दातांची काळजी कशी घ्यावी - मोठ्यांसाठी

Submitted by वेल on 6 January, 2014 - 08:00

लहान मुलांच्या दाताबद्दल अजूनही बोलायचे आहे, पण त्याआधी थोडं मोठ्यांच्या दाताबद्दल,

दातांच्या काळजीबद्दल वाचण्यापूर्वी चला एकदा स्वतःच्याच दाताचं आरशात निरिक्षण करूया.

दात प्रकाश परावर्तित करताना चमकत आहेत का?

दात घासताना दातातून रक्त येते का?

दात हलत आहेत का?

थंड - गरम आंबट ह्याचा ठणका लागतो का? तो खूप वेळ राहातो का?

तोंडाला खूप जास्त वास येतो का?

काही कडक खाल्लं की दाताला ठणका लागतो का?

जर पहिल्या प्रश्नाचे उत्तर नाही आणि बाकी सगळ्या प्रश्नांचे उत्तर हो असे असेल तर.. तर हा लेखवाचून तुम्ही दातांची काळजी व्यवस्थित प्रकारे घेऊ शकाल.

विषय: 

दाताच्या तारांची ट्रीटमेण्ट

Submitted by वेल on 1 January, 2014 - 04:03

chukoon don veLaa posTa zaale dhaagaa uDavaal kaa? hee maahitee dusaRyaa dhaaGyaavar vaachaa.

*****************************************************

विषय: 

दाताच्या तारांची ट्रीटमेण्ट

Submitted by वेल on 1 January, 2014 - 04:03

हा लेख मी प्रश्नाचे उत्तर म्हणून लिहिला होता तो जसाच्या तसा पोस्टते आहे. एखाड्या आठवड्यात त्यात बदल करून अधिक माहिती टाकेन.
*****************************************************

मुळात दातांना तारा लावण्याची प्रक्रिया हे चेहर्‍याची आणि हास्याची सौंदर्य किंमत वाढवणे ह्यासाठी नाही आहे. ही प्रक्रिया आहे तोंडातला बिघडलेला चावा सुधारण्यासाठी.

विषय: 

पुढे असलेले दात तार लावून आत वळवणे - उपचाराबद्दल अधीक माहीती हवी आहे.

Submitted by मेधावि on 16 November, 2013 - 22:07

माझ्या मुलीच्या पुढील दातांमधे बरीच फट होती तसेच दातही थोडे पुढे होते. ती ३ री मधे असताना आम्ही कोथरुडच्या एका सुपर प्रसिद्ध ऑर्थोडोंर्टीस्टकडे उपचाराकरता गेलो. त्यावेळेस ती (मुलगी) ट्रीटमेंटसाठी घाबरत होती कारण ह्या प्रकारात खूप दुखते हे तिला तिच्या मैत्रिणींनी सांगितले होते. आम्ही डॉ. ला दाखवल्यानंतर डॉ ने, हे लहान वयातच केले तर बरे होईल असे सांगितले व त्यावेळची ट्रीटमेंटची किंमत सांगितली. (२००३ साली संपूर्ण ट्रीटामेंटाचे १६हजार, १ ह.

विषय: 
Subscribe to RSS - दात