आई-बाबा

आई-बाबा

Submitted by kavyarshi_16 on 24 June, 2021 - 05:33

ऋण तुमचे कसे फेडू मला कळेना
एवढे कोण कसे प्रेम करू शकते मला वळेना....

एक न पाहता सोसते नऊ महिने त्रास
तर दुसरा पाहतो वाट भरवण्याचा घास

शाळेत सहलीसाठी एक असते परवानगीचे तिकीट
तर दुसरा कधीच कमी पडू देत नाही पैशांचं पाकीट

एक असते वर्षानुवर्षे वाफ चुलीची झेलतं
तर दुसरा असतो शेवटपर्यंत मुलांसाठीच घाम गाळत

एक करिते काटकसर कुटुंबासाठी
तर दुसरा कष्ट च काय रडतो सुद्धा दुसऱ्यांसाठी

थोडक्यात काय ,एक असते संस्कारांची मूर्ती
तर दुसरा पाजत असतो अनुभवांची कीर्ती

लाखमोलाचा कोट्याधीश बाप

Submitted by प्रज्ञा९ on 22 March, 2016 - 08:03

तसे आपण सगळेच गुणदोषयुक्त असतो. माणूस म्हणून परिपूर्ण, आदर्श, सर्वगुणसंपन्न असं या जगात कोणीही नाही. त्यामुळे व्यक्तिपरिचय द्यायचा तरी हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या कामांसाठी परिचय दिला आहे त्यात ती व्यक्ति परिपूर्ण आहे. म्हणूनच मी माझ्या बाबांच्या कार्याचा परिचय देणार आहे. आईबाप हे कायमच लाखमोलाचे- नव्हे पृथ्वीमोलाचेच असतात. कारण 'आईबाप' म्हणून जे जे सर्वोत्तम असतं ते ते द्यायचा त्यांचा प्रयत्न असतो. माझ्याही आईबाबांनी त्यांच्या मते जे जे उत्तम होतं ते द्यायचा प्रयत्न केलाच.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - आई-बाबा