पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - २०१६

'पिफ' - उद्घाटन सोहळा

Submitted by चिनूक्स on 14 January, 2016 - 12:40

चौदाव्या 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'चं आज अतिशय देखण्या समारंभात उद्घाटन झालं. या सोहळ्याला श्री. श्याम बेनेगल, चित्रपट महोत्सवाचे परीक्षक, विविध देशांचे राजदूत व चित्रपटक्षेत्राशी संबंधित अनेक व्यक्ती उपस्थित होते.

विषय: 

'द थिन यलो लाईन' - 'पिफ'चा उद्घाटनाचा चित्रपट

Submitted by चिनूक्स on 12 January, 2016 - 15:52

यंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सेल्सो आर. गार्शिया यांनी दिग्दर्शन केलेल्या 'द थिन यलो लाईन' या मेक्सिकन चित्रपटानं येत्या १४ तारखेपासून सुरुवात होणार आहे.

शिकागो, मोन्त्रेआल, साओ पाओलो इथल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये 'द थिन यलो लाईन'नं प्रेक्षक आणि समीक्षक यांची वाहवा मिळवली आहे. मोन्त्रेआल, गिजाँ आणि मानहाईम-हायडेलबर्ग इथल्या महोत्सवांमध्ये या चित्रपटानं पुरस्कार मिळवले आहेत.

***
विषय: 

श्री. सौमित्र चॅटर्जी आणि श्री. श्याम बेनेगल यांना 'पिफ'चा जीवनगौरव पुरस्कार

Submitted by चिनूक्स on 8 January, 2016 - 12:05

Untitled.jpg

महाराष्ट्र शासन व पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं चौदाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन १४ ते २१ जानेवारी, २०१५ या काळात पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये करण्यात आलं आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा महाराष्ट्र शासनाचा अधिकृत चित्रपट महोत्सव आहे.

विषय: 
Subscribe to RSS - पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - २०१६