'द थिन यलो लाईन' - 'पिफ'चा उद्घाटनाचा चित्रपट

Submitted by चिनूक्स on 12 January, 2016 - 15:52

यंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सेल्सो आर. गार्शिया यांनी दिग्दर्शन केलेल्या 'द थिन यलो लाईन' या मेक्सिकन चित्रपटानं येत्या १४ तारखेपासून सुरुवात होणार आहे.

शिकागो, मोन्त्रेआल, साओ पाओलो इथल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये 'द थिन यलो लाईन'नं प्रेक्षक आणि समीक्षक यांची वाहवा मिळवली आहे. मोन्त्रेआल, गिजाँ आणि मानहाईम-हायडेलबर्ग इथल्या महोत्सवांमध्ये या चित्रपटानं पुरस्कार मिळवले आहेत.

***

राज्याचे सांस्कृतिक मंत्री श्री. विनोद तावडे यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते आणि कवी सौमित्र चॅटर्जी व प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचा 'जीवनगौरव पुरस्कार' आणि प्रसिद्ध संगीतकार उत्तम सिंग यांना कलेच्या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल 'एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अॅवॉर्ड' हे पुरस्कारही प्रदान करण्यात येणार आहेत.

***

'विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यानमाले'मध्ये यावर्षी श्री. ऋत्विक घटक, श्री. गिरीश कासारवल्ली व श्री. जानू बरुआ या दिग्गजांना ऐकण्याची संधी मिळणार आहे. हे व्याख्यान सोमवार, दिनांक १८ जानेवारी रोजी दुपारी १.१५ वाजता सिटिप्राईड (कोथरूड) इथे होणार आहे.

***

महोत्सवातल्या मराठी स्पर्धाविभागात मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेला 'हायवे - एक सेल्फी आरपार' हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. १५ जानेवारी रोजी सिटिप्राईड (कोथरूड) इथे स्क्रीन १ला सकाळी ११.२५ वाजता व १६ जानेवारी रोजी कॅम्पातल्या आयनॉक्स इथे दुपारी १२ वाजता या चित्रपटाचे खेळ आहेत.

***

जागतिक स्पर्धाविभागात दाखवल्या जाणार्‍या चित्रपटांचं सिटिप्राईड, कोथरूड, इथलं वेळापत्रक पुढीलप्रमाणे -

दि. १५ जानेवारी -

१. सकाळी ११.३० (स्क्रीन २) - Perfect Obedience | Obediencia perfecta | Dir.:Luis Urquiza |Mexico|2014|99'|DCP

२. दुपारी २.१५ (स्क्रीन २) - Immortal | Mamiroo | Dir.:Hadi Mohaghegh |Iran|2015|100'|DCP

३. संध्याकाळी ६ (स्क्रीन १) - Money Buddies | La Buca | Dir.:Daniele Ciprì |Italy|2014|90'|DCP

दि. १६ जानेवारी -

४. सकाळी ११.१५ (स्क्रीन २) - Absolution | Henkesiedestä | Dir.:Petri Kotwica |Finland,|2015|92'|DCP

५. दुपारी २.३० (स्क्रीन २) - The Man in the Wall | HaishShebakir | Dir.:EvgenyRuman |Israel|2015|92'|DCP

६. दुपारी ४.३० (स्क्रीन २) - X+Y | X+Y | Dir.:Morgan Matthews |USA|2014|82'|DCP

दि. १७ जानेवारी -

७. सकाळी ११ (स्क्रीन २) - Pikadero | Dir.: Ben Sharrock | Spain | 2015 | 98' |

८. दुपारी २ (स्क्रीन २) - Dearest | Qin ai de | Dir.:Peter Ho-Sun Chan | CHINA, HONG-KONG|2014|130'|DCP

९. संध्याकाळी ५.३० (स्क्रीन १) - The Plastic Cardboard Sonata | The Plastic Cardboard Sonata
Dir.:Enrico Falcone and Piero Persello |Italy|2015|80'|DCP

दि. १८ जानेवारी -

१०. सकाळी ११ (स्क्रीन २) - Landscape with many moons | Maatikmitmekuuga | Dir.:Jaan Toomik
|Finland | Estonia|2015|76'|DCP

११. दुपारी २.१५ (स्क्रीन १) - Don't Tell Me The Boy Was Mad | Une histoire de fou | Dir.:Robert GUÉDIGUIAN |France|2015|134'|DCP

१२. संध्याकाळी ५.३० (स्क्रीन १) - Enclave | Enklava | Dir.:Gorana Radovanovića |Serbia|2015|92'|DCP

दि. १९ जानेवारी -

१३. दुपारी १२.१५ (स्क्रीन १) - Bopem | Bopem | Dir.:Zhanna Issabayeva |Kazakhstan|2015|77'|DCP

१४. दुपारी २.३० (स्क्रीन १) - Thithi | Thithi | Dir.:Raam Reddy |USA|2015|123'|DCP

***
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users