डॉल्बी

नवीन प्रतिज्ञा...

Submitted by अतुल. on 23 September, 2015 - 21:51

(आपल्याकडे घराजवळ पब नसतात. जिथे जोरजोरात वाजवल्या जाणाऱ्या संगीताच्या तालावर बिनधास्त नाचता येते. जिथे आवाज एका बंद हॉल मध्ये असल्याने आजूबाजूच्या लोकांना त्याचा त्रास होऊ शकत नाही.
अशी ठिकाणे आम्ही असंस्कृत मानतो. म्हणून अशा ठिकाणी जाणे आम्हास असभ्यपणाचे वाटते.
पण तीच गाणी भर रस्त्यावर चौकात जोरजोरात वाजवून अंगविक्षेप करत नाच करायला मात्र आम्हाला आवडते.
कारण ती आमची थोर संस्कृती आहे. आणि आम्ही सुसंस्कृत आहोत.
म्हणून, इतरांना त्याचा जर त्रास होत असेल तर ते नक्कीच असंस्कृत व धर्मविरोधी असतील. कारण...)

भारत माझा देश आहे |
सारे भारतीय मला बांधील आहेत |

मंगलप्रसंगी ध्वनिप्रदूषण: एक शोचनीय बाब

Submitted by अतुल. on 14 May, 2015 - 02:34

दिम अवस्थेत समाज होता. पाण्याच्या नदीच्या आसपास छोट्या वस्त्या पाडे करून लोक राहत. दळणवळणाची/संवादाची काहीच साधने नव्हती. त्यामुळे लोक जवळजवळ एकाच ठिकाणी आयुष्य काढत (समाज म्हणजे एक मोठ्ठे "बिग बॉस" चे घरच होते जणू). स्वाभाविकपणे सोयरिकी सुद्धा आसपासच्या भागातच जमवत आणि लग्ने उरकून घेत असत. लग्न म्हणजे बंधन. एकदा ते झाले कि बस्स. त्यानंतर भिन्नलिंगी व्यक्तीबरोबर मैत्री गप्पा म्हणजे सगळीकडे "ब्रेकिंग न्यूज" व्हायची. त्यातून भांडणे तेढ युद्धाचे प्रसंग कौटुंबिक शत्रुत्व सामाजिक कटुता इत्यादी निर्माण व्हायचे.

Subscribe to RSS - डॉल्बी