कवी - गणेश पावले

कोणी नाही वाचल तरी चालेल !

Submitted by गणेश पावले on 6 January, 2015 - 00:56

कोणी नाही वाचल (तुमचं लिखाण) तरी चालेल
पण रोज काहीतरी लिहत रहावं

कोणी दाद (प्रतिक्रिया) नाही दिली तरी चालेल
पण स्वताच नेहमी उत्साहित रहावं

शब्दांची भांडारे (गोदामे) आमच्याकडे
आम्हास सांगा काय कमी?

जिथे खाली (रिकामी) जागा
तिथे नेहमीच उभे आम्ही

गरजेपुरतं गोड (मस्का लावणारे) बोलणारे
बरेच मिळतात आयुष्यात

खोट्याला खरे करणारे (ठग)
रोज मिळतात रस्त्यात (जीवनात)

माझा स्वताचा अनुभव असा आहे
की, खर कधीच बोलू नये (कलियुग आहे मित्रहो)

बोललात खोट (जगाला हेच खर वाटत) तर ठासून बोला
जित्याची खोड ( सत्याने वागून) आता अशीच मोडा

लेखणीची तलवार आमच्याकडे

☼ अफजलखानाचा वध ☼ (लेखक - गणेश पावले)

Submitted by गणेश पावले on 6 January, 2015 - 00:06

शालिवाहन शके १५७७ मध्ये पौष महिन्यात शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यास जिंकून त्याचा जावळी प्रांत काबीज केला. शिवाजी महाराज आता एक एक किल्ला जिंकून आपले राज्य वाढवत होते. पुढे शके १५८० च्या अश्विनात राजे कर्नाटकाकडे कूच करत होते. हळू हळू हि वार्ता विजापूरच्या दरबारात कळू लागली. बादशाहने शहाजी राजेना पत्र लिहून शिवाजीला रोखण्यास सांगितले. पण त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही. तेंव्हा शिवाजी राजांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे विजापूरच्या इभ्रतीस काळिमा होता.

☼ नाते हे तुझे माझे

Submitted by गणेश पावले on 6 January, 2015 - 00:01

गुपित सारे गुपित राहुदे
नाते हे तुझे माझे
भीती वाटते दुनियेची आता
किती शिकारी प्रेमाचे ?
राहू असच हसत खेळत
रोज इशारे डोळ्यांचे
मनात मनातच खोलु सारे
असेच नजारे प्रेमाचे….
मस्त वाटत असाच जगणं
असंच भेटणं हे रोजचं
न सांगताच, न बोलताच
असं पाझरणं डोळयांच
विरह आपला असाच मांडू
न बोलताच मनात भांडू
बागडू, लाडीगोडी असंच गं….
तुझ्यासाठी रोज गाईन…
असंच गाण मनात गं….
गुपित सारे गुपित राहुदे…
रोज भेटू स्वप्नात गं…
. .
रोज भेटू स्वप्नात गं…
तुझा प्रेमवेडा… गणेश.

तू आणि मी प्लस आठवणी

Submitted by गणेश पावले on 5 January, 2015 - 23:51

जेंव्हा पासून तुला "स्वप्नात" पाहिलं…
(नवल वाटतं ना? स्वप्नात पाहणं. पण हे खर आहे)
तेंव्हापासून जीव जडला तुझ्यावर
ते स्वप्न वेडं होतं, कि मीच वेडा होतो…
नाही माहित, ते प्रेम होतं कि आकर्षण?
पण मन मात्र कशात तरी अखंड बुडालं होतं
प्रेमाच्या झोतात उगाच कुठेतरी भरकटत होतं
बर झालं त्यातून तूच मला सावरलंस
अशक्यातलं गणित तूच तेंव्हा सोडवलंस
कदाचित प्रेमदूत होतीस तू….!!
माझ्यासाठी आणि आपल्या भविष्यासाठी.
तुझी वाट वेगळी अन माझीही वाट वेगळी
प्रवास होता फक्त स्वप्नातल्या भेटीगाठीच्या आठवणींचा
जीवाला अजिबात कसलाही घोर नव्हता,
कोणतीही अस्वस्थता न्हवती,

तू - मी आणि जुन्या आठवणी

Submitted by गणेश पावले on 5 January, 2015 - 23:44

तुला माहित नसेल, कितीतरी रात्री जागलोय तुझ्यासाठी
तुला माहित नसेल, कितीतरी दिवस मी हरवलोय तुझ्यासाठी
तुला माहित नसेल कदाचित, कितीतरी होकार नाकारलेत तुझ्यासाठी
तुला माहित नसेल ग, कितीतरी वेदना हसत हसत झेलल्या मी तुझ्यासाठी

प्रेमाचा असा बाजार मांडता नाही आला मला
नाही सांगता आले कधी मनातील सारं
करत होतो विचार फक्त तुझा आणि तुझाच
म्हणून तर आज उरलोय फक्त एकटाच

तू होतीस बरोबर, जवळ नसलीस म्हणून काय झाल
तू होतीस समोर, मिठीत नसलीस म्हणून काय झाल
सार काही मुक्याने बोलत होतीस, बोलली नाहीस म्हणून काय झाल
न बोलटाच साद ऐकू येत होती, हाक नाही मारलीस म्हणून काय झाल….

Pages

Subscribe to RSS - कवी - गणेश पावले