तू - मी आणि जुन्या आठवणी

Submitted by गणेश पावले on 5 January, 2015 - 23:44

तुला माहित नसेल, कितीतरी रात्री जागलोय तुझ्यासाठी
तुला माहित नसेल, कितीतरी दिवस मी हरवलोय तुझ्यासाठी
तुला माहित नसेल कदाचित, कितीतरी होकार नाकारलेत तुझ्यासाठी
तुला माहित नसेल ग, कितीतरी वेदना हसत हसत झेलल्या मी तुझ्यासाठी

प्रेमाचा असा बाजार मांडता नाही आला मला
नाही सांगता आले कधी मनातील सारं
करत होतो विचार फक्त तुझा आणि तुझाच
म्हणून तर आज उरलोय फक्त एकटाच

तू होतीस बरोबर, जवळ नसलीस म्हणून काय झाल
तू होतीस समोर, मिठीत नसलीस म्हणून काय झाल
सार काही मुक्याने बोलत होतीस, बोलली नाहीस म्हणून काय झाल
न बोलटाच साद ऐकू येत होती, हाक नाही मारलीस म्हणून काय झाल….

चुक झाली माझी, तुझ्यापुढे नाही मागितली कधी प्रेमाची भिक
पण तू तरी समजूतदार होतीस, का नाही दिलीस प्रेमाची कबुली
आता तर खूप उशीर झाला, जखमा तर कधीच वाहून सुकल्या
तरीही त्यावर फुंकर मी मारत असतो, ओल्या होतील कधीतरी त्याचीच वाट पाहत असतो.

तुझा प्रेमवेडा
तुझाच गणेश……

© कवी - गणेश पावले
9619943637
३०/१२/२०१४

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो नक्कीच प्रयत्न करीन

समीर दा….

प्रयत्न म्हणून तुम्ही नक्की काय करणार हा प्रश्न पडला.
असो, मला समीर म्हटले तरी चालेल.