मानसोपचार

मन सुद्ध तुझं

Submitted by rmd on 20 December, 2021 - 14:28

mansuddhatuza.jpg

एबीपी माझा वर 'मन सुद्ध तुझं' नावाची मालिका ३ ऑक्टोबरपासून दर रविवारी सकाळी १०.३० / रात्री ८ वाजता सुरू झाली आहे. यात प्रमुख भूमिकेत स्वप्निल जोशी असून त्याने यात मानसोपचारतज्ञाची भूमिका केली आहे. दर एपिसोड मधे एक वेगळी केस तो सोडवतो. प्रत्येक एपिसोडमध्ये मराठी चित्रपट / मालिकांमधले वेगवेगळे चेहरे दिसतात. साधी, थोडीशी बाळबोध पण मनोरंजन करणारी ही मालिका वाटते आहे. काही काही केसेस अगदी जवळच्या माणसांत, नातेवाईकांत पाहिल्यासारख्या रिलेट होतात. आधीचे एपिसोड युट्युबवर उपलब्ध आहेत.

चाईल्ड सायकॉलॉजिस्ट

Submitted by रश्मी. on 15 December, 2017 - 01:15

नमस्कार

मला पुणे व आसपासच्या परीसरातील मुलांच्या मानसोपचर तज्ञांचा पत्ता हवा आहे. माझी भाची अभ्यास अजीबात करत नाही, त्यात रसही दाखवत नाही. १० वर्षाची आहे. हुशार असुनही आता अजीबात लक्ष नाहीये अभ्यासात. घरी कसलीच अडचण नाही, कसला दबाव नाही. उलट लाडाने थोडी बिघडलीच आहे. खेळणे, टीव्ही कमी केले तरी किंवा समजावले तरी ऐकत नाहीये. मारुन प्रश्न सुटेल असे मला तरी अजीबात वाटत नाही.

मला मितान विषयी कल्पना आहे. पण माझाच मेल आय डी उडाल्याने मितानशी संपर्क साधु शकत नाही. मितान बहुतेक पुण्या बाहेर रहाते. तरी बाकी तज्ञांची माहिती असल्यास द्यावी.

धन्यवाद!

पुण्यातील कौन्सिलर, मानसोपचारतज्ज्ञांची नावे हवी आहेत

Submitted by रूनी पॉटर on 4 November, 2014 - 11:58

सिंहगड रोड भागात दोघेच रहात असलेल्या सत्तरीतल्या आजी-आजोबांना कौटूंबिक कारणासाठी कौन्सिलिंगची गरज आहे. या वयात आरोग्यावर परीणाम न होवू देता एकमेकांशी कसे जुळवून घ्यावे वा अश्या नेहमी वादविवाद होणार्‍या काही विषयावर काय तोडगे काढावेत याबद्दल त्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन हवे आहे (घरच्यांचे नकोय).
त्यासाठी कोणी तज्ज्ञ सुचवा. आजी आजोबा फक्त बस व रीक्षा असा प्रवास करतात तेव्हा त्यांना जाण्यासाठी सोयीचे ठिकाण हवे.
इथे फक्त तज्ज्ञांची माहिती (नाव, पत्ता, फोन व असेल तर अनुभव) अपेक्षित आहे.

विषय: 
Subscribe to RSS - मानसोपचार