पुण्यातील कौन्सिलर, मानसोपचारतज्ज्ञांची नावे हवी आहेत

Submitted by रूनी पॉटर on 4 November, 2014 - 11:58

सिंहगड रोड भागात दोघेच रहात असलेल्या सत्तरीतल्या आजी-आजोबांना कौटूंबिक कारणासाठी कौन्सिलिंगची गरज आहे. या वयात आरोग्यावर परीणाम न होवू देता एकमेकांशी कसे जुळवून घ्यावे वा अश्या नेहमी वादविवाद होणार्‍या काही विषयावर काय तोडगे काढावेत याबद्दल त्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन हवे आहे (घरच्यांचे नकोय).
त्यासाठी कोणी तज्ज्ञ सुचवा. आजी आजोबा फक्त बस व रीक्षा असा प्रवास करतात तेव्हा त्यांना जाण्यासाठी सोयीचे ठिकाण हवे.
इथे फक्त तज्ज्ञांची माहिती (नाव, पत्ता, फोन व असेल तर अनुभव) अपेक्षित आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रूनी
मी अनुभव घेतलेले आहेत खालिल दोघांचेही.,

डॉक्टर नेहा पांडे - मी अनेक वर्ष जातेय यांच्याकडे (माझं आयुष्या सावरलं यांनी)
रिलेशनशिप थेरपिस्ट आहेत. मी यांच्याकडे जायला लागून पुढच्या वर्षी १० वर्ष होतील

डॉक्टर भूषण शुक्ल - मी ६ महिने गेले होते. (नेहा मॅम कडे जाण्या अगोदर) नंतर ते स्वतः लंडन ला उच्च शिक्षणासाठी गेले होते. आता परतले आहेत. सत्यमेव जयते मधल्या गुड टच बॅड टच चं जे छोटं वर्कशॉप दाखवलं होतं ती भूषणची कॉन्सेप्ट होती. व्हेरि सेन्सिटिव्ह पर्सन.

वरिल दोघे ही सायकिअ‍ॅट्रिस्ट आहेत. (आउषधांची गरज असेल तर ती ही मदत मिळू शकेल)

तुझी विपु बंद आहे, त्यामूळे इथे लेखनाला मर्यादा येतेय. तुला माझा ईमेल आयडी कसा कळवू ते सांग. मग अजून सविस्तर बोलेन.

डॉ. भूषण शुक्ल यांच्याबद्दल अनेकांकडून फक्त चांगलंच ऐकलं आहे. कर्वे रस्त्यावर त्यांचं क्लिनिक आहे.

Madyantari mabovar ek Seema Gaikawad navachya dr. Hotya. Tyanche kahi lekh pan hote.

रूनी सीमा गायकवाड यांना मी फारच चांगल्या पद्धतीने ओळखते. त्या सायकइअ‍ॅट्रिस्ट नाहित कौन्सिलर आहेत.
मोअर ऑन ईमेल.

धन्यवाद जागू. शोधते गायकवाड यांचे प्रोफाइल. जे तज्ज्ञ माहित आहेत त्यांचे पत्ते देणार का प्लीज. डॉ. भूषण शुक्ल अलुरकरच्या वर आहेत हे कळले. आता तिथे दागिण्यांचे दुकान झालय ना.

>>आरोग्यावर परीणाम न होवू देता एकमेकांशी कसे जुळवून घ्यावे वा अश्या नेहमी वादविवाद होणार्‍या काही विषयावर काय तोडगे काढावेत याबद्दल त्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन हवे आहे

अनेक धाग्यांवर पण अशा मार्गदर्शनाची गरज आहे असे वाटते Lol

डॉ. सुनील गोडबोले
डॉ. सौ. ए. एस. गोडबोले

चिरंजीव क्लिनिक
Consultatnt in Child Development and Disease
फोनः ०२०-२४४८६७४४, ०२०-६४१९३४५४

पण फ्रॅकली जुळतच नसेल तर त्यांना सेपरेट होउद्या आणि आनंदात राहुद्या की. उगीच चिकटवून का ठेवायचे? फ्रीडम इज एवरीथिन्ग. अ‍ॅट लिस्ट फॉर मी. ह्या वयात वगिअरे काही नाही.

अमा , भारीच सल्ला देताय.
चुकून असे सल्ले कुणाला प्रत्यक्ष देऊ नका.
Sad

पुण्यात आर्मी कॅम्प मधे आहेत. त्या सिव्हिल केसेस घेतात का विचारावे लागेल
त्यांना विचारुन इथे आपणास नंबर देतो

डॉक्टर लुकतुके आहेत पुण्यात विजय टोकीज जवळ क्लिनिक आहे.
ते MBBS आहेत आणी काउंसलींग पण करतात. स्वता ७०+ वर्षाचे आहेत त्यामुळे आयुष्य बघितलेले आहे.
पैश्यासाठी पुन्हा पुन्हा यायला लावणार्‍यातले ते नाहीत.

मानसोपचार तज्ञाकडे जाण्यापुर्वी खालील लेख जरुर वाचावेत
मानसोपचारतज्ञाकडे जाण्यापूर्वी - १
मानसोपचारतज्ञाकडे जाण्यापूर्वी - २

माझा वैयक्तिक अनुभव व प्रतिक्रिया खालील लिंकवर दिल्या आहेतच.
http://www.aisiakshare.com/node/1994?page=1#comment-30724

हा असा गैरसमज का असतो लोकांचा>>>>>

कारण मला स्वताला डॉक्टर लुकतुक्यांचा अनुभव आहे.
ते गेले १५ वर्ष मानसिक रोग्यांचा एक ग्रुप पण पूर्ण पणे मोफत चालवत आहेत.

वर माझ्या प्रतिक्रियेतील लिंक मधील ते मानसोपचार तज्ञ डॉ लुकतुकेच आहेत. त्यांचे विषयी आदर आहेच. तेव्हा त्यांच म्हणण पटल नव्हत.आज पटतय.

कारण मला स्वताला डॉक्टर लुकतुक्यांचा अनुभव आहे.
ते गेले १५ वर्ष मानसिक रोग्यांचा एक ग्रुप पण पूर्ण पणे मोफत चालवत आहेत. >> हाऊ मटेरियलिस्टिक Sad

कोणताही कारागिर आपल्या स्किल प्रमाणे चार्ज करतो. इथे कारागिर या अर्थी डॉक्टर असा घ्यावा. प्रत्येक डॉक्टर 'धंदा' करून पैसे उकळवत नाही.

मी माझ्या कौन्सेलर ला त्यांची फी २५० रू प्रत्येक भेटीची होती तेव्हापासून जाते आहे आता ती ६००-७०० पर सेशन आहे. पण त्यात त्यांचे स्किल्स, मला झालेला उपयोग आणि आमची कंफर्ट लेव्हल या गोष्टी येतात.

कृपया कसली ही विधानं करून विनाकारण मोफत सेवा देतात तेच ग्रेट डॉक्टर असा समज पसरवण्याचा प्रयत्न करू नका.

आणि कौन्सेलिंग घेण्यासाठी पण एक प्रकारची 'कुवत' लागते. तीच नसेल तर कुणालाच कौन्सेलिंग चा उपयोग होणार नाही. कारण ती कोणत्याही सायकिअ‍ॅट्रिक औषधा सारखी रासायनिक प्रक्रिया नाही.

अक्षरशः साती मी ते वाक्य वरच्या पोस्टीत टाकलं होतं पण फार रूड वाटेल म्हणून काढून टाकल<.

फुकट हे प्रत्येक वेळी पौष्टिक असेल असे नाही पण नसेल असेही नाही. पुण्यात किती तरी दर्जेदार कार्यक्रम फुकट असतात. कधी या उलटही असते. काही चाणाक्ष लोक कमी किमतीत उच्च दर्जाच्या सेवा शोधतात.

कमी किंमतीत कश्याला , फुकटात शोधल्या तरी काही म्हणणं नाही हो,पण त्यापायी कामाचा योग्य मोबदला घेणार्यांना तुम्ही नावे ठेऊ शकत नाही.
असो. या धाग्यावर अजून अवांतर नको म्हणून हेमाशेपो.

कृपया कसली ही विधानं करून विनाकारण मोफत सेवा देतात तेच ग्रेट डॉक्टर>>>>

@दक्षीणा - तुमचा गैरसमज झालेला आहे मी जे काही लिहीले त्याच्या वरुन.
लुकतुके अजिबात मोफत ट्रीट्मेंट देत नाहीत. सध्या त्यांच्या एका सेशनची फी १००० आहे सध्या.

मी जे लिहीले होते ते नीट समजवुन घ्या. मी म्हणले होते "पैश्यासाठी पुन्हा पुन्हा यायला लावणार्‍यातले ते नाही" म्हणजे प्रत्येक वेळेला १००० रुपये मिळतायत म्हणुन येत रहा म्हणायचे असे करत नाहीत.
त्यांच्या अटी पण असतात आणि त्या रुग्णाला मान्य असतील तरच ते कंटीन्यु करतात.

रोगी थोडा बरा झाला की ते स्वताहुन सेशन्स बंद करा असे सांगतात आणि त्या रोग्याला त्यांच्या ग्रुप मधे यायला सांगतात ( जो की मोफत आहे ).

हा तो ग्रुप

Prajit - 'Mental Health' Self Help Group .

.
Prajit is the very active mental health self help group for people who suffer with the stress, uncontrolled anger, depression, tension etc. It helps to the people to come out of their problem and to lead the normal, happy and the better life.

This self help group is for

The people, who suffer with depression, who feel low, who are out of spirit & remain in the bad mood.
Those who are worried, tense, restless.
Those who cannot concentrate well.
The ones who are irritable, who have lost efficiency at work.

Symptoms 1.People who suffer from depression–symptoms
Fell low, out of spirit, in the bad mood, tired, exhausted, loss of appetite, loss of sleep, suicidal ideas and suicidal attempts.
2.People who are worried–symptoms
Feeling anxious, tense, restless, stressful, and fearful of the various thoughts at a time: at home and work. Vague fear that something bad happens irritability to work well.
3.People who have problems in family–symptoms
Quarrels, anger, violence, bitterness, unsatisfactory marriage breaking of relations or of family, divorce.
4.People who are not happy
For various reasons, mainly because of negative thinking
Method of Work
Self–help. Guidance is given on rational thinking & positive approach. Home work involves modifying own thinking & behavior in fruitful way. There is group guidance & group sharing. Teaching is based on psychology. We use the essence of theories of famous psychologists like Albert Ellis, Aaron T Beck etc. Daniel Goleman is taught. Ample help is sought from teaching of saints.

Useful details 1.Prajit Self–help Group meets on every Sunday at 10 am for about 3 hours at Nivara Old Age Home’s hall.
2.There is no commercial fee for membership but voluntary contribution is accepted.
3.There is a prayer and an oath. Acceptance of these two is necessary to become a member.
4.Group receives guidance from psychiatrist Dr. Ulhas Luktuke.
5.A lecture on positive thinking, group sharing & fellowship are three main parts of every meeting. From time to time there are variety entertainment programs, picnics etc. Booklets are also published.

टोच्या तुम्ही लुकतुकेंची काम करण्याची पद्धत सांगितली हे योग्य. पण बाकी डॉक्टर पैसे मिळतात म्हणून पुन्हा पुन्हा बोलवतात हे ही वाक्य आलंच आहे, आणि ते स्टेटमेंट आहे. इतर डॉक्टरांचा अनुभव न घेता तुम्ही असं स्टेटमेंट करू शकता का?

तुम्हाला माहित नसेल तर समुपदेशन करताना समुपदेशन घेण्यापेक्षा अधिक मानसिक उर्जा खर्च होते. जी पैशाच्या मोबदल्यात परत मिळू शकत नाही. समुपदेशन हा एक डिफिक्ल्ट टास्क आहे आणि तो दोघांसाठी ही डिफिकल्ट असतो. पैसे मिळतात म्हणून डॉक्टरला सोप्पा असतो असं नव्हे. खूप प्रोसेसिव्ह आणि अ‍ॅनालॅटिकल स्किल्स इन्व्हॉल व्ड असतात या प्रक्रियेत त्यामुळे जितक्या लवकर सेशन्स संपतील तितकी डॉक्टरांनाही ती फायद्याचीच असतात. लर्निंग स्लो असेल तर लोकांना वर्षानुवर्ष समुपदेशन घ्यावे लागते. पेशन्स मध्ये संपले की गयी भैस पानी मे.

Pages