'डॉ. प्रकाश बाबा आमटे

बिरादरीची माणसं - गोविंद काका

Submitted by लोकेश तमगीरे on 20 June, 2019 - 01:07

बाबांच्या अथक प्रयत्नानंतर महाराष्ट्र शासनाने भामरागड़ येथील त्रिवेणी संगमाच्या ३ किलोमीटर अलीकडे, हेमलकसा गावी काही जमीन लोक बिरादरी प्रकल्पाच्या निर्मितीकरिता दिली. प्रकल्प निर्मितीच्या सुरुवातीला, दुर्दम्य जिद्दीच्या बाबांसोबत काही १५-२० लोकं १९७३ साली घनदाट अशा दंडकारण्यामध्ये आली. सुरुवातीला बाबांसह या सर्वांनी काही राहण्यायोग्य झोपड्या आणि शेतजमिनी तयार केल्या आणि लोक बिरादरीच्या कार्याचा आरंभ झाला. या कार्यकर्त्यांमधीलच एक नाव जे बिरादरीमधे आजही आपसुक तोंडावर येते ते म्हणजे आमचे "गोविंद काका". लोक बिरादरी प्रकल्पाचे सर्वात पहिले कार्यकर्ते म्हणून ते आजही बिरादरीत ओळखले जातात.

बिरादरीची माणसं - पल्लो मामा

Submitted by लोकेश तमगीरे on 31 May, 2019 - 05:52

" बिरादरीची माणसं - पल्लो मामा "

'डॉ. प्रकाश बाबा आमटे, द रियल हिरो'

Submitted by कविता केयुर on 14 October, 2014 - 04:39

'डॉ. प्रकाश बाबा आमटे, द रियल हिरो'

एक उत्कट हळवां अनुभव…

ज्यांच्या नावातच ' प्रकाश ' आहे , त्यांना पाहतानां ' आपण कोठे आहोत ', याची होणारी जाणीव बहुदा आपल्या प्रत्येकालाच परत शून्यावर नेवून ठेवते.

'आपल्याला नक्की काय हवयं ' किंवा ' आपण आयुष्यात नक्की काय करतोय ', अशा एक ना अनेक प्रश्नांनी अंतर्मुख करायला लावणारी हि एक वास्तव कलाकृती.

' माणुसकी ', 'त्याग ', 'समर्पण ', 'नि :स्वार्थता ', 'व्रत ' यासारख्या आपल्या ओळखीच्याच शब्दांचे इथे सापडलेले नवीन अर्थ, जे कदाचित आजवर आपण अनुभवलेच नाहीत …

' इतक्या विरक्तीने राहूनही एवढं श्रीमंत बनता येतं ', या विचाराने उध्वस्थ करणारी जाणीव …

विषय: 
Subscribe to RSS - 'डॉ. प्रकाश बाबा आमटे