डॉ. नरेन्द्र दाभोलकर

(विवेक)सूर्य पाहिलेला माणूस - श्री. सुनील सुकथनकर

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

फार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात विवेकवादाचा जागर करणार्‍या आगरकरांनी लिहून ठेवलं होतं - 'मानसिक धैर्य म्हणजे काय? तर स्वतंत्रतेने विचार करून जे आपणास तथ्य वाटेल ते बिनदिक्कत बोलून दाखविणे आणि त्या बोलण्याप्रमाणे आचरण करणे. खरा शूर आहे तो जसा शत्रूंच्या संख्येची पर्वा न करता त्यांच्यावर बेलाशक तुटून पडतो व धारातीर्थी पतन पावण्याचा उत्साह बाळगतो, त्याप्रमाणेच मानसिक धैर्य त्याच्या ठायी पुरे वास करीत आहे तो पुरुष प्रतिपक्षांच्या आक्षेपास किंवा निंदकाच्या निर्भर्त्सनेस खुशाल एकीकडे गुंडाळून ठेवतो आणि आपल्या मताचे नि:शंकपणे प्रतिपादन करून त्याप्रमाणे आचरणही करण्यास चुकत नाही.

प्रकार: 
Subscribe to RSS - डॉ. नरेन्द्र दाभोलकर