गरुदेवदत्त

दत्ताळलो आम्ही

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 14 May, 2014 - 04:55

दत्ताळलो आम्ही
भक्ताळलो आम्हीं
विरक्तीच्या पथी
रक्ताळलो आम्ही

तया प्रेमा साठी
आतुडलो आम्ही
शब्दांच्या बुडाडी
गोंधळलो आम्ही

लय सूर ताली
नादावलो आम्ही
घडेनाच काही
पस्तावलो आम्ही

बोलाविल्या विना
द्वारी आलो आम्ही
प्रतिक्षेत जन्म
खंतावलो आम्ही

कधी रानोमाळी
भटकलो आम्ही
शोधात तयाच्या
हरवलो आम्ही

पाशात व्यसनी
सापडलो आम्ही
न राहिलो जिते
वा न मेलो आम्ही

Pages

Subscribe to RSS - गरुदेवदत्त