दत्तकृपा

Submitted by विक्रमादित्य पणशीकर on 4 December, 2014 - 09:33

श्रीदत्तस्तवस्तोत्रम्
दत्त उपासनेची परंपरा भारतात अनादीकालापासून आहे. निष्पाप मनाने स्मरण करताच कृपावंत होणारे दत्तप्रभु अनेकांचे आराध्यदैवत आहे. दत्तप्रभु ही वैराग्यस्वरूप त्यामुळे त्यांच्या उपासनेने घरातील कर्त्यापुरषाच्या मनात वैराग्यभाव जागृत होऊन , गृहस्थाश्रमातील कर्तव्यास दुय्यम दर्जा दिला जाईल असी शंका अनेकांच्या मनात डोकावताना दिसते. मात्र प्रत्यक्षात असे काही नाही हे अनुभवाने सिद्ध झाले आहे. दत्तप्रभुंच्या उपासनेने आपल्या कर्तृत्त्वाने अर्थप्राप्ती करत असताना सन्मार्गाने चांचल्यरहित सुलक्ष्मी सुहास्यवदनाने आपल्या घरी यावी याबाबत साधक जागृक राहतो, हे सर्वात महत्त्वाचे मानावे लागेल. मनात धर्मभावना जागृत होऊन परोपकाराय पुण्याय, पापाय परपीडनम् ‍ हे सुत्र जीवनास योग्य आकार देते. दत्तमहाराजांची टेंब्येस्वामींनी केलेली स्तोत्रे सिद्धवाणीतून रचलेली असल्याने झटित फलद्रुप होणारी आहेत. श्रीटेंब्येस्वामींनी रचलेले श्रीदत्तस्तवस्तोत्रम् हे म्हणावयास अत्यंत सोपे व मनाची धार्मिक बैठक तयार करणारे असे स्तोत्र आहे.

श्रीदत्तस्तवस्तोत्रम्
भूतप्रेतपिशाचाद्या यस्य स्मरणमात्रतः
दूरादेव पलायन्ते दत्तात्रेयं नमामि तम्

ज्यांच्या केवळ स्मरणाने भूत, प्रेत पिशाच्च दूर निघून जातात, त्या अत्रिसुत्र श्रीदत्तात्रेयांना मी नमस्कार करतो.

यन्नामस्मरणाद्दैन्यं पापं तापश्च नश्यति
भीतिग्रहार्तिदुःस्वप्नं दत्तात्रेयं नमामि तम्

ज्यांच्या केवळ नामस्मरणाने दैन्य, पाप, ताप, भय, ग्रहपीडा,,दुःस्वप्न( भीतिदायक स्वप्ने) नाहिशी होतात, त्या श्रीदत्तात्रेयांना मी नमस्कार करतो.

दद्रुस्फोटककुष्ठादि महामारी विषूचिका
नश्यन्त्यन्ते‍ऽपिरोगाश्च दत्तात्रेयं नमामि तम्

खरूज, फोड कुष्ठ, महामारी, पटकी, व इतरही असाध्य रोग ज्यांच्या कृपेने नाहीसे होतात, त्या श्रीदत्तात्रेयांना मी नमस्कार करतो.

संङ्गजा देशकालोत्था अपि साङ्क्रमिका गदाः
शाम्यन्ति यत्स्मरणतो दत्तात्रेयं नमामि तम्

सहवासजन्य, देश व काल यांच्यामुळे निर्माण होणारे आणि संसर्गजन्य रोग ज्यांच्या केवळ स्मरणाने नाहीसे होतात, त्या श्रीदत्तात्रेयांना मी नमस्कार करतो.

सर्पवृश्चिकदष्टानां विषार्तानां शरीरिणाम्
यन्नामशान्तिदं शीघ्रं दत्तात्रेयं नमामि तम्

साप विंचू यासारख्या (प्राण्यांच्या) विषबाधेने पीडित झालेल्या व्यक्तींना , केवळ ज्य़ांच्या नामस्मरणाने ( ताबडतोब) शांती मिळते, त्या श्रीदत्तात्रेयांना मी नमस्कार करतो.

त्रिविधोत्पातशमनं विविधारिष्टनाशनम्
यन्नाम क्रूरभीतिघ्नं दत्तात्रेयं नमामि तम्

ज्य़ांचे नाम ( आधिभौतिक, आध्यात्मिक, आधिदैविक असे) विविध ताप नाहीसे करणारे आहे, तसेच अनेक प्रकारची अरिष्टे व भयंकर भीति दूर करणारे आहे, त्या श्रीदत्तात्रेयांना मी नमस्कार करतो.

वैर्यादिकृतमन्त्रादिप्रयोगा यस्य कीर्तनात्
नश्यन्ति देवबाधाश्च दत्तात्रेयं नमामि तम्

शत्रू, दुष्ट लोकांनी केलेल्या जारण-मारण, उच्चाटणादि प्रयोग, भूत-प्रेत पिशाच्चांनी केलेली पीडा, ज्यांच्या केवळ नामस्मरणाने नाहीशा होतात, त्या श्रीदत्तात्रेयांना मी नमस्कार करतो.

यच्छिष्यस्मरणात्सद्यो गतनष्टादि लभ्यते
य ईशः सर्वतस्त्राता दत्तात्रेयं नमामि तम्

ज्यांच्या शिष्याच्या ( कार्तवीर्यर्जुनाच्या) स्मरणाने हरवलेली किंवा (आपल्या) नजरेआड झालेली वस्तू प्राप्त होते, अशा सर्व बाजूनी रक्षण करना या ईश्वराला, श्रीदत्तात्रेयांना मी नमस्कार करतो.

जयलाभयशःकामदातुर्दत्तस्य यः स्तवं
भोगमोक्षप्रदस्येमं प्रठेद्दत्तप्रियो भवेत्

जयप्राप्ती, यश व इच्छापूर्ती करणा या, ऐहिक भोग व पारमार्थिक सुख प्राप्त करून देणा या श्रीदत्तात्रेयांचे हे स्तोत्र जो मनुष्य रोज श्रद्धेने पठण करील, तो मनुष्य श्रीदत्तात्रेयांना प्रिय होईल.

इति श्री.प.प.वासुदेवानंदसरस्वतीविरचितं दत्तस्तवस्तोत्रं संपूर्णम्

अशा रीतीने श्री.प.प. वासुदेवानंदसरस्वतींनी रचलेले श्रीदत्तस्तवस्तोत्र संपूर्ण.

श्री वासुदेवानंदसरस्वतींच्या दत्त उपासनेचे लक्ष्य दत्तप्रीती हे असल्याने त्यांनी रचलेल्या दत्तस्तोत्रांची अत्युत्तम फलश्रृती ही देखील शाश्वत सौख्य प्रदान करणारी दत्तप्रीती हेच आहे. त्यामुळे संचिताप्रमाणे भोगादी सौख्याचा अनुभव घेत असतानाच अंर्तमनात दत्तप्रीतीचा निर्मळ झरा प्रवाहीत करण्याचे महत्तकार्य हे स्तोत्र करते असा अनुभव आहे आपणही या दिव्य स्तोत्राचा अनुभव घ्य. ज्यांना हे स्तोत्र म्हणावयास शिकायचे असेल, त्यांनी ईमेल केल्यास स्तोत्राची mp3 फाईल विनामुल्य पाठवण्यात येईल.

विक्रमादित्य पणशीकर
vnp999@gmail.com
9049600622

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोड अवांतर- दत्तकृपा शब्द वाचला कि मला बारामतीच्या गोड बाबाची आठवण येते.'दत्तकृपा झाली अंगी गोडी आली' असे वचन लावून तो फिरत असे.

बालाजी तांबे यांच्या 'दत्तात्रेय' नावाच्या सीडीमध्ये हे स्तोत्र आहे.
ती सीडीच इतकी सुमधुर आहे. फार फार परिणामकारक स्तोत्रे आहेत त्यात.

@काऊ - हां धोब्याला वर देण्याचा अध्याय.
माझा आवडता - तो घेवड्याची वेल तोडण्याचा अध्याय आहे. फार फार आवडता आहे. (१४ की १८ आठवत नाही)