माळी

गवतकाप्याची गोष्ट

Submitted by मोहना on 24 July, 2014 - 17:54

रॉजर गेल्या गेल्या मला एकदम उत्साहच चढला. इस्टोरी भन्नाट होती त्याची. घाईघाईत मुलाला फोन लावला,
"अरे एका कैद्याची ओळख झाली."
"तू काय तुरुंगात आहेस?" लेकानेही अधूनमधून मी सुट्टीसाठी तुरुंगात जात असेनच या खात्रीने विचारलं.
"तो आला होता घरी."
"आता तुझी कैद्यांशी मैत्री? आई, तू लिहितेस हे मान्य पण विषय मिळावेत म्हणून हे असं...."
"पुरे रे. आधी ऐक तर." मी त्याला माळीबुवांची गोष्ट सांगायला सुरुवात केली. त्या आधी थोडी पार्श्वभूमी सांगते. काय आहे, सध्या आम्ही वर्षाच्या कराराने कुणी आमचं अंगण हिरवंगार राखेल का याच्या शोधात आहोत. त्यामुळे येऊन जाऊन घरी भावी माळी टपकत असतात.

शब्दखुणा: 

बागकाम करण्यासाठी माळी पाहिजे

Submitted by प्रमोद् ताम्बे on 5 April, 2014 - 09:31

आम्ही (मी व माझी पत्नी) गेल्या सहा वर्षांपासून आमच्या घराच्या गच्चीवर एक छानसा माती विरहित जैविक बगीचा फुलवला असून वयपरत्वे ( माझे वय आता ७३ आहे) आम्हाला दोघांनाही आता बागेची देखभाल करणे दुरापास्त होऊ लागले आहे. त्यामुळेच आता आम्हाला आमच्या घराच्या गच्चीवरील बागेच्या देखभालीसाठी महिन्यातून दोनदा (शक्यतो रविवारी) दोन तास काम करून जाईल अशा अनुभवी माळ्याची नितांत गरज भासू लागली आहे. आम्ही फक्त झाडांना रोज पाणी घालत जाऊ.
कृपया मायबोलीकरांनी याबाबत मला मदत करावी अशी विनंती कतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - माळी