गझलेत नसतो सेक्स त्यांना सांग तू

नियम झाकती फ्लेक्स त्यांना सांग तू

Submitted by चायवाला on 24 December, 2013 - 03:33

या मूळ रचनेवर रचलेले हे काहीच्या काही विडंबन. मूळ गझलकाराची अजिबात माफी न मागता. Proud
------------------------------------------------------------------------------------------------

बेदरकारपणाला मार थोडी टांग तू
चुकवून लाल पळतोस कसा रे सांग तू

जे राखतात कायदा ते आले इथे
नियम झाकती फ्लेक्स त्यांना सांग तू

नियम पाळणारा तू नाहीस हे मी जाणले
आज कुणाला उडवलेस मजला सांग तू

तो कायदा पाळणार्‍यांस केवळ पावतो
का लावतो आहेस येथे रांग तू

हाकताना गाडी बोलतोस मोबाईलवरी
की झिंगतो आहेस पिऊन भांग तू

उगा काढूनी गाडी कशाला फिरवली

गझलेत नसतो सेक्स त्यांना सांग तू

Submitted by बेफ़िकीर on 23 December, 2013 - 12:44

कडवेपणाला मार थोडी टांग तू
देऊ नको इतक्या पहाटे बांग तू

जे लावण्या रचतात ते आले इथे
गझलेत नसतो सेक्स त्यांना सांग तू

माणूस तू नाहीस हे मी जाणले
ब्राह्मण मराठा दलित किंवा मांग तू

तो कष्ट करणार्‍यास केवळ पावतो
का लावतो आहेस येथे रांग तू

का झिंगतो आहेस ह्या जन्मामधे
की मानतो आहेस ह्याला भांग तू

दमछाक करणारा निघाला शेवटी
चालायला गेलास जो फर्लांग तू

सध्या असा मी वागतो आहे उथळ
सध्या नको लावूस माझा थांग तू

नाकारतो आहेस अस्तित्वास ह्या
की फेडतो आहेस माझे पांग तू

Subscribe to RSS - गझलेत नसतो सेक्स त्यांना सांग तू