नियम झाकती फ्लेक्स त्यांना सांग तू

Submitted by चायवाला on 24 December, 2013 - 03:33

या मूळ रचनेवर रचलेले हे काहीच्या काही विडंबन. मूळ गझलकाराची अजिबात माफी न मागता. Proud
------------------------------------------------------------------------------------------------

बेदरकारपणाला मार थोडी टांग तू
चुकवून लाल पळतोस कसा रे सांग तू

जे राखतात कायदा ते आले इथे
नियम झाकती फ्लेक्स त्यांना सांग तू

नियम पाळणारा तू नाहीस हे मी जाणले
आज कुणाला उडवलेस मजला सांग तू

तो कायदा पाळणार्‍यांस केवळ पावतो
का लावतो आहेस येथे रांग तू

हाकताना गाडी बोलतोस मोबाईलवरी
की झिंगतो आहेस पिऊन भांग तू

उगा काढूनी गाडी कशाला फिरवली
चालायचे टाळतोस अवघा फर्लांग तू

सध्या असा वागतो आहेस का उथळ
हाकण्याची लागते आहे का टोटल सांग तू

नाकारतो आहेस पादचार्‍यांस ह्या
का मोडतो आहेस त्यांची टांग तू

खांदे फुले ताटी चिता अन् आसवे
पाळला नाही नियम परिणाम सांग तू

---------------------------------------------------------------
पहिल्या कडव्यात "लाल" = लाल सिग्नल
---------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गप्प्या मूळ रचनेइतकीच मस्त रचना... मला तर आवडली. खूपच...

फक्त
तो कायदा पाळणार्‍यांस केवळ पावतो
का लावतो आहेस येथे रांग तू >> हा शेर थोडा गंडलाय असं वाटतंय. किंवा मला नीट कळला नसावा.

दक्षे, म्हणजे कायदा पाळणार्‍यांनाच सिग्नलचा उपयोग (पावतो). उगाच का रांग लाऊन उभा आहेस गाडी घेऊन असे.

दक्षिणा,

गप्पिष्ठ ह्यांनी दिलेले स्पष्टीकरण वाचून हे स्पष्ट होत आहे की त्यांनी काय लिहिलेले आहे हे त्यांनाच आकळत नाही आहे. Proud

भाजपच्या विजयाचा उन्माद म्हणतात तो असाच असतो. Light 1

त्यात भाजपचा काय संबंध? Proud
दक्षे, म्हणजे त्या रांगेत उभा असलेल्याला सांगतो आहे कवी की तू सिग्नल तोड (अर्थात उपरोधाने)

सामजिक संदेश पसरवणारे विडंबन!<<< Lol

विदिपांनी स्वतःच्या अभिरुचीच्या विकासाचा मत्सर वाटून तिच्यावरच उगवलेला सूड वाटत आहे हा प्रतिसाद!

बेफि Rofl

विदिपांनी स्वतःच्या अभिरुचीच्या विकासाचा मत्सर वाटून तिच्यावरच उगवलेला सूड वाटत आहे हा प्रतिसाद! >> विदिपा बेफी माझ्यापेक्षा जास्त मुस्काडफोड आहेत.

विदिपांनी स्वतःच्या अभिरुचीच्या विकासाचा मत्सर वाटून तिच्यावरच उगवलेला सूड वाटत आहे हा प्रतिसाद! >> Rofl

विदिपा बेफी माझ्यापेक्षा जास्त मुस्काडफोड आहेत.<<<

हे तुम्ही मला त्यांच्याबद्दल सांगताय का त्यांना माझ्याबद्दल?

बेफी Biggrin

Rofl
विडंबन आणि प्रतिसाद एकदम भारीयैत..
कणखरजी रॉक्स !!!

हा शेर थोडा गंडलाय असं वाटतंय.<<< दक्षिणा + १
मी असा वाचला...

ते कायदे पाळून घेती पावत्या
का लावतो आहेस येथे रांग तू

(विडंबन असले तरी गझलेचे असल्याने गझलेचे नियम बियम पाळायलाच हवेत असे वै म.)