पद्धती

व्हेन इन रोम (ग्रीस ११)

Submitted by Arnika on 2 December, 2018 - 06:42

जुन्या पेठेकडे जायला निघाले होते मी. चार स्टेशनं होता होता गाडीत बरीच गर्दी चढली, त्यातच हे दोन बापे होते. शिपिंग कंपनीतल्या कामगारांमुळे ग्रीकच्या खालोखाल माझ्या कानावर सगळ्यात जास्त पडलेली भाषा, बंगाली, बोलत होते. जरा गर्दी विरळ झाल्यावर त्यांनी मला खिडकीत बसलेलं पाहिलं आणि समोरच्या दोन जागांवर येऊन बसले. मी गाणी न ऐकता कानात हेडफोन ठेऊन लक्ष देत होते. “लांब केस”, “रंग”, “बांग्ला?” एवढं समजलं. बाकी नजर समजायला बंगाली कळायची गरज नव्हती. त्यांचं स्टेशन लगेचच आलं होतं, पण एक माणूस जागेवरून उठायला लागला तेव्हा दुसऱ्याने त्याला पुन्हा खाली बसवलं. माझ्याशी बोलून बघणार होते ते.

विषय: 
Subscribe to RSS - पद्धती