शाहरूख

शाहरूख की एक्टींग और किंग खान का स्टारडम - फिल्म "रईस"

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 January, 2017 - 05:13

बनिये का दिमाग और मियाभाई की डेअरींग!

शाहरूख की एक्टींग और किंग खान का स्टारडम - फिल्म "रईस"

रईस उलटे वाचले की सईर असे वाचले जाते. सई कोण हे सांगायची गरज नाही आणि र रुन्मेषचा हे सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण बस्स तेव्हाच हा चित्रपट बघायचे नक्की झाले होते Happy

विषय: 

पंतप्रधानांचा / सेलिब्रेटींचा फोटो जाहीरातीसाठी वापरणे ५००/- रुपये फक्त?

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 December, 2016 - 07:33

मध्यंतरी जिओच्या जाहीरातीत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी दिसल्याने वाद उद्भवला होता. मी मोदी भक्त नाही की द्वेषी नाही, (हे हल्ली आवर्जून सांगावेच लागते) पण मलाही ते खटकले होते. मात्र त्यानंतर पुढे क्लीअर झाले होते की मोदींचा फोटो त्यांच्या परवानगीशिवाय वापरण्यात आला होता. पुढे कायद्यानुसार काय ती कारवाई होईलच असे समजून मी तो विषय डोक्यातून तेव्हाच काढून टाकला होता. किंबहुना मोदींच्या जागी जिओच्या जाहीरातीत शाहरूख खान आल्याने आनंदच झाला होता.

FAN - एका फॅनच्या नजरेतून ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 June, 2016 - 13:47

कॉमनसेन्स इज सो अनकॉमन...

इट इज वेरी डिफिकल्ट टू बी सिंपल..

याच धर्तीवर असेही म्हणता येईल की स्वत:चा अभिनय करणे हा जगातील सर्वात कठीण अभिनय आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

शाहरूख खानचा लोकाना इतका राग का येतो ?

Submitted by केदार जाधव on 17 December, 2015 - 01:51

नमस्कार , हा धागा सुचायच तात्कालिक कारण म्हणजे दिलवाले सिनेमा पाहू नका म्हणून येणारे वाटेल ते मेसेज .
अगदी तो देशद्रोही पासून मुसलमान अन पाकडा आहे इथपर्यंत .

इथे मी सुरूवातीलाच नमूद करतो की मी शाहरूखचा फॅन आहे . त्याच सर्वात महत्वाच कारण म्हणजे "ही इज सेल्फ मेड मॅन" . त्याची स्ट्रगल अन त्यानंतर त्याने घेतलेली झेप तर कुठल्याही क्षेत्रातील माणसाने आदर्श घ्यावा अशी आहे .
दुसर या इंडस्ट्रीत राहून ही उगाच हिरोईनशी स्क्कॅंडलचा आधार न घेता फॅमिलीला महत्व देण .
त्याहूनही जास्त आवडतो मला त्याचा कभी हा , अंजाम , डर अन बाजीगर मधला अभिनय . राहुल अन राज कधी आवडलेच नाहीत मला Happy

शब्दखुणा: 

"पीके" च्या निमित्ताने - पब्लिक सब जाणती है!. पर समझती नही है!!

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2015 - 05:30

पीके धरतीवर अवतरून एव्हाना युगे उलटली. अर्ध्याअधिक पृथ्वीवासीयांना त्याने दर्शन देऊन झाले. कित्येकांनी त्यावर वृत्तांत लिहिले. तर आता हा रुनम्या काय नवीन घेऊन आला आहे असा जो प्रश्न शिर्षक वाचून पडला असेल त्याचे उत्तर लेख वाचल्यावर मिळेलच. पण यातील मते माझी एकट्याचीच अशी नसून ती पब्लिकची मते आहेत. कारण चित्रपट संपल्यानंतर मी सहप्रेक्षकांशी गप्पा मारून हा चित्रपट पाहिल्यापाहिल्या त्यांच्या मनात काय तरंग उठले हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच हे एकाअर्थी परीक्षण नसून पीकेच्या निमित्ताने माझ्या चित्रपटज्ञानाचा आणि भारतीय चित्रपट रसिकांच्या वैचारीक आवडीनिवडींचा घेतलेला आढावा आहे.

विषय: 

मोहब्बतें - गुरू नॉट कूल

Submitted by फारएण्ड on 16 June, 2013 - 22:02

ज्याचे खरे नाव 'गुरू नॉट कूल' असायला हवे, अशा गुरूकूल नावाच्या कडक स्कूल बद्दल हा चित्रपट आहे. कडक म्हणजे अभ्यास किती कडक करावा लागतो ते माहीत नाही. आख्ख्या चित्रपटभर एकही वर्ग दाखवलेला नाही, कोणी अभ्यास करतानाही दाखवलेले नाही. पण येथील संचालक अधूनमधून सगळ्यांना हॉल मधे राउंड अप करून रागीट चेहर्‍याने ‘परंपरा और अनुशासन’ शिकवतो. भाषा अशी की तुलनेत उत्तर प्रदेश भाजप चे अध्यक्ष हाय फाय इंग्रजी बोलत असतील असे वाटावे. कडकपणा एवढाच.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - शाहरूख