मनस्मिंनी कुठल्यातरी बाफ वर लिहिलेल्या प्रतिसादात 'मी अॅडमिन असतो तर अमुक अमुक केले असते' असे लिहिले. वाचताक्षणीच विचारांचे वारू चौफेर ऊधळून आले. मनस्मि, १०-१५ मिनिटे तुमच्या कल्पनेने दिवसाढवळ्या मस्त स्वप्नरंजन करवले. धन्यवाद तुम्हाला. 
'' जलते हैं जिसके लिये..'' एक भावानुवाद
ज्यासाठी अविरत जळती
सखी तव नयनांच्या ज्योती
ते तरलतन्मयी गीत मी आणियले तुजसाठी ..
जो दु:खदाह विरहाचा
माझ्या उरात अडलेला
जो मंत्रमोह प्रीतीचा
नजरेत तुझ्या दडलेला
स्वीकारशील ना सजणी ? तो मुग्धभाव ये ओठी ..
जप ओंजळीत हृदयाच्या
हे आरस्पानी गीत
पार्यापरी मंथर अंतर
काचेपरी नाजूक प्रीत
तू ऐकशील ना सजणी ? मी गुणगुणतो एकांती ..
रसवंती तुझ्या ओठांची
जोवरी न यास मिळाली
भ्रमरासम रुंजत राहील
हे तुझ्या बटांच्या खाली
तू जाणशील ना सजणी ? श्वास हे कुणास्तव गाती..
भारती बिर्जे डिग्गीकर