'' जलते हैं जिसके लिये..'' एक भावानुवाद

Submitted by भारती.. on 10 April, 2013 - 12:09

'' जलते हैं जिसके लिये..'' एक भावानुवाद

ज्यासाठी अविरत जळती
सखी तव नयनांच्या ज्योती
ते तरलतन्मयी गीत मी आणियले तुजसाठी ..

जो दु:खदाह विरहाचा
माझ्या उरात अडलेला
जो मंत्रमोह प्रीतीचा
नजरेत तुझ्या दडलेला
स्वीकारशील ना सजणी ? तो मुग्धभाव ये ओठी ..

जप ओंजळीत हृदयाच्या
हे आरस्पानी गीत
पार्‍यापरी मंथर अंतर
काचेपरी नाजूक प्रीत
तू ऐकशील ना सजणी ? मी गुणगुणतो एकांती ..

रसवंती तुझ्या ओठांची
जोवरी न यास मिळाली
भ्रमरासम रुंजत राहील
हे तुझ्या बटांच्या खाली
तू जाणशील ना सजणी ? श्वास हे कुणास्तव गाती..

भारती बिर्जे डिग्गीकर
---------------------------------------------------------------------------

जलते हैं जिसके लिये
तेरी आंखोंके दिये
ढूंढ लाया हूं वही गीत मैं तेरे लिये..

दर्द बनके जो मेरे
दिलमे रहा, ढल ना सका
जादू बनके तेरी आंखोंमे
रुका ,चल ना सका
आज लाया हूं वही गीत मैं तेरे लिये..

दिलमे रख लेना इसे
हाथोंसे ये छूटे ना कही
गीत नाजूक हैं मेरा
शीशेसेभी, टूटे ना कही
गुनगुनाऊंगा यही गीत मैं तेरे लिये..

जब तलक ना ये तेरे
रसके भरे होठोंसे मिले
यूंही आवारा फिरेगा
ये तेरे जुल्फोंके तले
गाये जाऊंगा यही गीत मैं तेरे लिये..

(गीतकार मजरूह सुलतानपुरी,संगीतकार सचिनदा बर्मन, चित्रपट सुजाता १९५९ )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गाणं सुंदर आहे आणि भानुवादही छान जमलाय !

अशा भावानुवादासाठी काही गाणी सुचवावीत असे वाटतेय. ग्रीन सिग्नल मिळेल का ?

वा

अनुवाद चांगला झालाय.
--------------------------------------------------------------------------------

ओळी ओळीनुसार अनुवाद होण्याऐवजी, केवळ गीतातले भाव
सोप्या शब्दात अनुवादित झाल्यास अधिक आवडतील..... वैम. कृगैन.

--------------------------------------------------------------------------------
कृपया विपू पहावी.

सुरेख जमलं आहे. काही काही शब्द फारच आवडले, जसे तरलतन्मयी, पार्‍यापरी मंथर अंतर..

भ्रमरासम रुंजत राहील
हे तुझ्या बटांच्या खाली
हा खूप शब्दशः अनुवाद वाटला..

आजपर्यंतच्या तुमच्या सर्व अनुवादांपैकी मला सर्वाधिक अवडलेला अनुवाद

अतीशय उत्तम
धन्यवाद भरतीताई

सर्वांचे आभार.

आयडू,आवडत्या दहासाठी खूपच.

उल्हासजी,भरतजी,होय,त्या सोप्या प्रवाही शब्दांचा अर्थानुवाद करणे कठीणच म्हणून भावानुवाद केला..मलाही जाणवते ते,पण आग्रहाशिवाय या रचनेकडे बघता येणे शक्य असेल तर ती कदाचित बरी वाटेल.:) स्पष्ट मताबद्दल खरेच आभार.

आभार अमेय,पुलस्ति,सुसुकु..
>>पण अधिक चांगला होउ शकेल असे वाटते>>>>

होय सुसुकु,शक्य आहेच ते नेहमीच.
कुणाला हा अनुवाद अधिक सोप्या शब्दात हवा होता,कुणाला 'भ्रमरासम' हा शब्दशः अनुवाद वाटला,(जो व्यक्तिशः मला खूप आवडला होता, भ्रमराची अप्रकट प्रतिमा अनुवादात प्रकटल्याची गंमत जाणवून.) ,कुणाला ओळीओळीचा अनुवाद नको होता..तर व्यक्तीगणिक मते वेगळी.
यानिमित्ताने एकच लिहावंसं वाटतं,अनुवाद तोही कवितेचा करताना एक समांतर निर्मितीच घडते,जी निर्मितीसारखीच खरं तर हटवादी असते Happy . ती तशी का हे नाही सांगता येत, ती तशी असणे कवीसाठी अपरिहार्य होते,इतकेच कळते..

आवडला !