आवारगी.

Submitted by सतीश कुमार on 5 October, 2019 - 06:29

आवारगी.

गुलाम अली यांच्या गझलांची महफिल आणि त्यात "आवारगी " ही गझल म्हणजे सोनेपे सुहागा. ती हमखास वन्स मोअर मिळवून जात असे. गुलाम अली यांचे घराणे पतीयाळा. अतिशय सुंदर ताना आणि फिरत घेऊन गझलेत रंग भरण्यात ते माहीर. मोहसीन नक्वी यांची ही गझल इतक्या उत्कटतेने अली गात असत की कितीही वेळा ऐकली तरी कान तृप्त होत नसत. नक्वी साहेब यानी पाकिस्तान पीपल्स पार्टी च्या तिकिटावर निवडणूक लढवली. सत्तेत असलेल्या राजकारणी लोकांना त्यांनी आपल्या कवितेत धारेवर धरले आणि सडकून टीका केली. सामान्य जनता भरडत असताना राजकारणी लोकांच्या ओठावर हसू उमटते याचा त्यांना राग येत असे. उर्दू भाषेवर असणारे असामान्य प्रभुत्व हे त्यांच्या गझलेत आढळून येतेच. राजकारणात अनेक टीका टिप्पणी सहन केल्यामुळे कदाचित ते एकलकोंडे झाले असावेत आणि कोणाचीच साथ मिळाली नाही म्हणून निराश होऊन त्यांचा हातून " आवारगी" सारखी अप्रतिम रचना लिहिली गेली असावी. अली नेहमीप्रमाणे सुरुवातीला एक शेर म्हणूनच गझलेला सुरुवात करीत असत.

बडे वुसूकसे दुनिया फरेब देती है, बडे खुलूससे हम ऐतबार करते है. हा शेरच नक्वींच्या मनस्थितीचे वर्णन करतो. ते म्हणतात, " किती आत्मविश्वासाने ही दुनिया आम्हाला फसवीत आहे,आणि आम्ही ही किती प्रामाणिकपणे त्यावर विश्वास ठेवून आहोत"..

.ये दिल, ये पागल दिल मेरा क्यों बुझ गया, आवारगी इस दश्त में इक शहर था वो क्या हुआ, आवारगी।

( माझ्या वेड्या मनाचा अंत का झाला? एकटेपणामुळेच.( मी एकाकी होतो ) ह्या वाळवंटात एक शहर वसलं होतं ते कुठे गेलं? आवारगी न् काय...(शहर उजाड झालं आणि मी एकाकी उरलो. )

कल शब मुझे बेशक्ल की आवाज़ ने चौंका दिया मैंने कहा तू कौन है उसने कहा आवारगी।

( काल रात्री, चेहरा नसणाऱ्या कोणत्या तरी (आकृती ) च्या आवाजाने मी चमकलो.कोण आहेस तू?मी विचारलं. तो म्हणाला... एकाकी!..

इक अजनबी झोंके ने जब पूछा मेरे ग़म का सबब सहरा की भीगी रेत पर मैंने लिखा आवारगी।

( अजाणत्या वा-याच्या झुळकेनी मला जेव्हा माझ्या दुःखाचं कारण विचारलं तेव्हा ओल्या वाळू वर मी लिहिलं ...एकाकी ...

ये दर्द की तनहाइयाँ, ये दश्त का वीराँ सफ़र हम लोग तो उकता गये अपनी सुना, आवारगी।

( ही एकटेपणाची सल आणि वैराण वाळवंटातला विराणा प्रवास ...आम्हाला अगदी वीट आलाय ..तू तुझं सांग...एकाकी ..

एक तू के सदीयोंसे मेरा हमराह भी हमराज भी एक मैं के तेरे नामसे ना आश्ना आवारगी

( गेली कित्येक शतकं तू माझा सखा आहेस आणि माझी गुपितं जाणतोस, आणि मी? तुझ्या नावाची ही खबर नाही... एकाकी ..)

कल रात तनहा चाँद को देखा था मैंने ख़्वाब में ‘मोहसिन’ मुझे रास आएगी शायद सदा आवारगी।

( काल रात्री स्वप्नात चंद्राला एकटाच फिरताना पाहीलं .मग मला असं वाटायला लागलंय कि आता कायमचं आवडेल मला ( राहायला ) एकाकी .

१९९६च्या जानेवारी महिन्यात लाहोर येथें नक्वींचे वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी निधन झाले आणि उर्दू जगत एका संवेदनशील कवीला मुकला. ...

*****

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

माझ्या आवडत्या गझलांपैकी एक.

ह्याच धर्तीवर नुसरत फतेह अली खान यांची ' फिरते है कब से दर ब दर, कभी इस नगर, कभी उस नगर। एक दुसरे के हमसफर, मै और मेरी आवारगी' ही सुद्धा एक छान ग़ज़ल आहे.

आवारगी शब्दाचा अर्थ एकाकी असा आहे..हेच मुळात ठाऊक नव्हत..

खुप छान आणि सोप्या शब्दांत गजलांचा अर्थ सांगताय.. आवडलं.. Happy

@जावेद खान, मला आवडला तुमचा प्रतिसाद. उर्दू भाषाच इतकी मोहक आहे की अर्थ कळला तर त्याच्या प्रेमातच पडतो आपण. आणि उर्दू गझल लेखकांनी तर ही भाषा इतकी समृद्ध केली आहे की अशा गजलांना काय आणि कशी दाद द्यावी कळतच नाही. सुरुवातीचा शेर, " बडे वुसुक से दुनिया फरेब.." ..हे आताच्या काळात ही किती चपखल बसते. नुसरत फतेह म्हणजे दादा माणूस...व्वा.. दमा दम मस्त तर त्यांनीच म्हणावं..

@जावेद खान, मला आवडला तुमचा प्रतिसाद. उर्दू भाषाच इतकी मोहक आहे की अर्थ कळला तर त्याच्या प्रेमातच पडतो आपण. आणि उर्दू गझल लेखकांनी तर ही भाषा इतकी समृद्ध केली आहे की अशा गजलांना काय आणि कशी दाद द्यावी कळतच नाही. सुरुवातीचा शेर, " बडे वुसुक से दुनिया फरेब.." ..हे आताच्या काळात ही किती चपखल बसते. नुसरत फतेह म्हणजे दादा माणूस...व्वा.. दमा दम मस्त तर त्यांनीच म्हणावं..