मायबोलीचे नवीन मुख्य प्रशासक

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

कुठल्याही संस्थेचा विकास होण्यासाठी आवश्यक असणारी एक गोष्ट म्हणजे अनेक व्यक्तिंचा त्यात असलेला सहभाग. नुसत्या अनेक व्यक्ती असणे पुरेसे नसते तर वेगवेगळ्या भूमिका आणि त्या पार पाडण्यासाठी लागणारी कौशल्ये, वेळ यांचेही गणित जमावे लागते. आणि जसे पाणी वाहते असले की जास्त चांगले तसे एकाच भूमि़केत संस्थेतली माणसे फार वेळ राहिली तर संस्थेला शैथिल्य येते, व्यक्तिही तेच तेच काम करून कंटाळतात. नवीन नेतृत्वाला संधी मिळणे आवश्यक असते. त्यामुळे व्यवस्थित नियोजन करून अंमलात आणलेला बदल आवश्यक ठरतो. आणि मी स्वतःही अशा आवश्यक बदलाला अपवाद नाही.

मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की मायबोलीचे/हितगुजचे नवीन मुख्य प्रशासक(Admin) म्हणून श्री समीर सरवटे (समीर) यांनी जबाबदारी उचलली आहे. समीर गेली ९ वर्षे मायबोलीचे सभासद आहेत. त्यांनी अनेक वर्षे हितगुजचे नेमस्तक (Moderator) म्हणून काम केले आहे. ते मुख्य संपादक असताना २००३ साली हितगुज दिवाळी अंकाला मुंबई मराठी पत्रकार संघाचे पारितोषिक मिळाले होते. सध्या गेले २ वर्षे मायबोली इंक यासंस्थेचे मुख्य वित्तअधिकारी हा अतिरिक्त भार ही तें संभाळत आहेत.

मी समीर सरवटे यांचं हार्दिक अभिनंदन करतो. माझ्यावर तुम्ही जसं प्रेम केलंत, जसा मला पाठींबा दिलात तसाच त्यानाही मायबोलीकरांकडून मिळेल याची खात्री आहे.

अजय गल्लेवाले.

(जाता जाता: नाही मी इतक्यात निवृत्त होत नाहीये! मायबोलीचा वाढता पसारा पाहता प्रशासकीय काम, तांत्रिक सुविधा आणि मायबोलीचे काही नवीन उपक्रम या सगळ्यांवर काम करताना सगळीकडेच माझं दुर्लक्ष होत होतं. आता तांत्रिक सुविधा, नवीन उपक्रम याकडे थोडं जास्त लक्ष देता येईल. किंवा प्रशासकीय कामामुळे नवीन सुविधा द्यायला वेळ मिळत नाहीये असल्या सबबी मला देता येणार नाही :)).

विषय: 
प्रकार: 

समीर, हार्दिक अभिनंदन ! अजय : आतापर्यंतच्या उच्च कामागिरीबद्द्ल मनापासून धन्यवाद आणि
नवीन कामासाठी शुभेच्छा !!

> समीर, नव्या जबाबदारीबद्दल ????????? Sad Happy काय म्हणू?
सुप्रिया, काळ्जी करु नकोस, काय म्हणायचं हे ठरवायला तुला भरपूर वेळ असणार आहे ! Happy

समीर, हार्दिक अभिनंदन !!

अ‍जय, तुम्हाला पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा !!

आपणा सर्वांना शुभेच्छांबद्द्ल मनःपूर्वक धन्यवाद. आत्तापर्यंत तुम्हा सर्वांचे जे सहकार्य मिळाले आहे तसेच पुढेही मिळत राहील याची खात्री आहे.

पार्टी पार्टी पार्टी

आता जनतेला तक्रार करायला चार विचारपुशी झाल्या.
१) वेबमास्तर
२) अ‍ॅडमिन
३) समीर
४) अजय
देव ह्यांचं भलं करो!

अभिनंदन आणि शुभेच्छा! समीर, अजय.

समीर आणी अजय,
मनःपूर्वक शुभेच्छा !

समीर जी अभिनंदन समीर आणि अजय जी शुभेच्छा Happy .... आभार Happy

समीर... मनःपूर्वक अभिनंदन! अजय... मनःपूर्वक शुभेच्छा !

समीर आणि अजय अभिनंदन आणि शुभेच्छा आणि धन्यवाद! आपली मायबोली अशीच बहरत राहो.

आहा!
समीर, अभिनंदन आता काम अजून वाढणार म्हणजे Happy
लगे रहो.

दोन्ही अ‍ॅडमिनना मनःपूर्वक शुभेच्छा Happy

नविन प्रशासकांचे अभिनंदन !
जुन्या प्रशासकांना नविन उपक्रमासाठी शुभेच्छा!! Happy

हे हे... समिर थॅक्स आणि अभिनंदन.
अजय तुमचे आभार मानण शक्य नाही हो... तुम्हाला हॅट्स ऑफ!!!!
मानाचा मुजरा!!!!

समिर ,अजय दोघास शुभेच्छा .

मायबोलिची धुरा यशस्वीरित्या सांभाळ्याबद्दल अजय यांचे अभिनंदन आणी आभार्..समिर यांचे अभिनंदन!

अजय - समीर दोघांचेही अभिनंदन. आणि शुभेच्छा !

वा वा, दोघांचे अभिनन्दन. एकसे भले दो....

(मात्र आता उसंत आहे तर ते पांढर्‍या शाइचे आणि रंगीत अक्षरांचे बघा बुवा. म्हणजे 'तो' त्रस्त समंध शान्त होइल :फिदी:)

अभिनंदन.. समीर आणि अजयजी.

मायबोली अशीच दिवसेंदिवस बहरत जाऊ देत ही शुभेच्छा!!!

--------------
नंदिनी
--------------

मृण Lol
हो, तक्रारी कोणाच्या विपूत करायच्या, त्याचा खुलासा सत्वर करा Proud
---------------------------------------------
यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..

नविन प्रशासकाचे माबोवर स्वागत आणि शुभेच्छा!

शरद
.............................
"तुजसारखे कवी जे येतात रोज 'खावर'
बसतात गप्प सारे कोलाहलात इथल्या!"
............................

मायबोलीला, आणखी एक समर्थ प्रशासक मिळाला !!

अभिनंदन समीर!

मी ह्यापूर्वी जे दोन प्रश्न विचारले होते त्याची उत्तरे आता नव्या प्रशासकांकडून तरी मिळतील का?
मिळतील अशी आशा धरायला काय हरकत आहे?
१) ह्या संकेतस्थळाचे मायबोली हे नाव अतिशय सुंदर आहे.
अशा सुंदर संकेतस्थळावर सभासदांना आपली नावे इंग्रजीतच नोंदवावी लागतात.....ती देवनागरीत कधी होणार?
तशी आजपर्यंत न करण्यामागे नेमके काय कारण आहे?

२) हजर असलेल्या सभासदांची यादी इतर संकेतस्थळांप्रमाणे मायबोलीवर का दिसत नाही?
त्यासंबंधीचे नेमके काय कारण आहे?

माझी अशी नम्र विनंती आहे की कारणं काहीही असोत; निदान ती आम्हाला कळावीत म्हणून तरी इथे देण्याची तसदी घ्यावी.

शुभं भवतु!

मायबोलिची धुरा यशस्वीरित्या सांभाळ्याबद्दल अजय यांचे अभिनंदन आणी आभार्..समिर यांचे अभिनंदन! आणि त्यांना अनेक शुभेच्छा! जरा बागराज्यातल्या लोकांकडे लक्ष द्या. गरीब बिचारे.

समीर, काही मदत लागली तर कळव (विनय, अनिलभाई, नयनीश, सचिन्_बी वगैरे मा.बो. करांना)

आजकालचा काळ हा एकदम क्रांतिकारी झाला आहे. श्रीमंत अमेरिका दळिद्री झाली. गरीब भारत श्रीमंत झाला. अमेरिकेत काळा माणूस राष्ट्राध्यक्ष झाला, नि चुकीच्या किनार्‍यावर बरोबर माणूस सापडला नि तो प्रशासक झाला!

Happy Light 1

मायबोलिची धुरा यशस्वीरित्या सांभाळ्याबद्दल अजय यांचे अभिनंदन
समिर यांचेही अभिनंदन! आणि त्यांना अनेक शुभेच्छा!

सुधीर

अजय आणि समिर, अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा ! Happy

प्रमोद देव,
आपल्या प्रश्नांची उत्तरे इथे दिली आहेत.

समीर, हार्दिक अभिनंदन !!

प्रशासकीय काम, तांत्रिक सुविधा आणि मायबोलीचे काही नवीन उपक्रम >> अजय, लगे रहो Happy

*********************

My true love hath my heart and I have his,
By just exchange one for another given:
I hold his dear, and mine he cannot miss
There never was a better bargain driven
My true love hath my heart and I have his.

Pages