मायबोलीचे नवीन मुख्य प्रशासक

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

कुठल्याही संस्थेचा विकास होण्यासाठी आवश्यक असणारी एक गोष्ट म्हणजे अनेक व्यक्तिंचा त्यात असलेला सहभाग. नुसत्या अनेक व्यक्ती असणे पुरेसे नसते तर वेगवेगळ्या भूमिका आणि त्या पार पाडण्यासाठी लागणारी कौशल्ये, वेळ यांचेही गणित जमावे लागते. आणि जसे पाणी वाहते असले की जास्त चांगले तसे एकाच भूमि़केत संस्थेतली माणसे फार वेळ राहिली तर संस्थेला शैथिल्य येते, व्यक्तिही तेच तेच काम करून कंटाळतात. नवीन नेतृत्वाला संधी मिळणे आवश्यक असते. त्यामुळे व्यवस्थित नियोजन करून अंमलात आणलेला बदल आवश्यक ठरतो. आणि मी स्वतःही अशा आवश्यक बदलाला अपवाद नाही.

मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की मायबोलीचे/हितगुजचे नवीन मुख्य प्रशासक(Admin) म्हणून श्री समीर सरवटे (समीर) यांनी जबाबदारी उचलली आहे. समीर गेली ९ वर्षे मायबोलीचे सभासद आहेत. त्यांनी अनेक वर्षे हितगुजचे नेमस्तक (Moderator) म्हणून काम केले आहे. ते मुख्य संपादक असताना २००३ साली हितगुज दिवाळी अंकाला मुंबई मराठी पत्रकार संघाचे पारितोषिक मिळाले होते. सध्या गेले २ वर्षे मायबोली इंक यासंस्थेचे मुख्य वित्तअधिकारी हा अतिरिक्त भार ही तें संभाळत आहेत.

मी समीर सरवटे यांचं हार्दिक अभिनंदन करतो. माझ्यावर तुम्ही जसं प्रेम केलंत, जसा मला पाठींबा दिलात तसाच त्यानाही मायबोलीकरांकडून मिळेल याची खात्री आहे.

अजय गल्लेवाले.

(जाता जाता: नाही मी इतक्यात निवृत्त होत नाहीये! मायबोलीचा वाढता पसारा पाहता प्रशासकीय काम, तांत्रिक सुविधा आणि मायबोलीचे काही नवीन उपक्रम या सगळ्यांवर काम करताना सगळीकडेच माझं दुर्लक्ष होत होतं. आता तांत्रिक सुविधा, नवीन उपक्रम याकडे थोडं जास्त लक्ष देता येईल. किंवा प्रशासकीय कामामुळे नवीन सुविधा द्यायला वेळ मिळत नाहीये असल्या सबबी मला देता येणार नाही :)).

विषय: 
प्रकार: 

समीर अभिनंदन!
अजय, तुम्हांला खूप शुभेच्छा.

अजय आणि समीर: अभिनंदन आणि नव्या उपक्रमांसाठी शुभेच्छा! मायबोली अजून बहरुदे.

समीर अभिनंदन! नव्या उपक्रमांसाठी शुभेच्छा
अजय धन्यवाद

समीर, हार्दिक अभिनंदन!

समीर, हार्दिक अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा या नवीन वाटचालीसाठी!! अजय, आजवर अ‍ॅडमिन म्हणून जे काम केलेत त्याबद्दल धन्यवाद द्यायला शब्द पुरेसे नाहीत!! यापुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा, नविन उपक्रम अन सुविधांबद्दल आत्त्ताच एक्साईटमेन्ट वाटतेय!! Happy

नवीन प्रशासकांचे अभिनंदन!... Happy

अभिनंदन आणि नव्या उपक्रमांसाठी शुभेच्छा! मायबोली अजून बहरुदे.
Happy

अभिनंदन समीर आणि खूप खूप शुभेच्छा!
खरच मायबोली प्रत्येक दिवसाचा अविभाज्य बाग बनलेय. पूर्वीपासून अ‍ॅडमिनचं धोरण इतकं नि:पक्षपाती आणि संयत राहिलय त्याबद्दल त्यांचेही खूप आभार.

अभिनंदन समीर.
अजयराव आता तुम्ही नविन तांत्रिक बदलांचे मनावर घ्याच. Happy

अभिनंदन समीर!

आणि असंख्य मायबोलीकरांसाठी हे केवळ एक विरंगुळ्याचं साधन नसून, दैनंदिन आयुष्याचा एक भाग आहे..>>>>>> अनुमोदन चिनुक्स!!

समिर मनःपुर्वक अभिनंदन रे.. Happy
- अनिलभाई
It's always fun when you connect.

अरे वा.. Happy
समीरचे हार्दीक अभिनंदन...

अरे वा. समीर अभिनंदन आणि अजय तुमचेपण, भविष्यात मायबोलीवर अनेक चांगल्या सुविधा येवु देत आणि आपली मायबोली अशीच उत्तरोत्तर वाढु देत.

समीर आणि अजय दोघांचेही अभिनंदन,,, आणि मायबोलीच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी शुभेच्छा..

=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

अजय आणि समीर दोघांचेही अभिनंदन आणि शुभेच्छा !

समीर्..मनःपूर्वक अभिनंदन!
अजय्..पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!

समीर, आता जरा 'दादागिरी' कशी करायची ते शीक बाबा.
(म्हणजे अजय दादागिरी करत होते असं नाही Proud , पण) हा माणूस भलताच मवाळ आहे. Happy

दोघांचंही अभिनंदन आणि शुभेच्छा. Happy
-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

नवीन प्रशासकांचे अभिनंदन आणि वाढत्या जबाबदारीसाठी शुभेच्छा! तसेच 'मायबोली' हे संकेतस्थळ निर्माण करून, इतकी वर्षे यशस्वीरीत्या चालवून, मायबोलीला एक अतिशय वरचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल अजय गल्लेवाले यांचे अभिनंदन आणि आभार. चिन्मय म्हणतो त्याप्रमाणे मायबोली आमच्या आयुष्याचा भाग आहे. तिचे स्वरूप असेच निखळ, स्वच्छ राखल्याबद्दल विशेष आभार.

अरे वा !
समीर आणि अजय दोघांचं अभिनंदन Happy

समीर, प्रशासक पदाबद्दल हार्दीक अभिनंदन!!
अजय, नव्या उपक्रमांसाठी शुभेच्छा!

अनेकांची जीवलग मायबोली अजून बहरु दे. Happy

समीरचं अभिनंदन!
अंजलीस अनुमोदन! Happy

SVS तुझे हार्दीक अभिनंदन आणि वाढलेल्या जबाबदारीसाठी शुभेच्छा !!!

समीर, अभिनंदन. अजय, इतकी वर्ष मायबोलीची धुरा उत्कृष्ट्पणे सांभाळल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद.

समीर अभिनंदन!
अजय, धन्यवाद आणि शुभेच्छा.

अभिनंदन ... शुभेच्छा ... वगैरे .... वगैरे ...
Happy

परागकण

समीर बढतीबद्दल अभिनंदन आणि नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा !!
अजय, तुम्हांला तुमच्या नवीन कामासाठी शुभेच्छा !!

समीर अभिनंदन! अजय तुम्हालाही नवीन कामासाठी शुभेच्छा!

समीर मनःपुर्वक अभिनंदन ..

समीर, अजय खुप खुप आभार आणि भरपूर शुभेच्छा! Happy

Pages