देवनागरी सभासद नाव आणि हजर सभासद

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

प्रमोददेव यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत आहे.

१) ह्या संकेतस्थळाचे मायबोली हे नाव अतिशय सुंदर आहे. अशा सुंदर संकेतस्थळावर सभासदांना आपली नावे इंग्रजीतच नोंदवावी लागतात.....ती देवनागरीत कधी होणार? तशी आजपर्यंत न करण्यामागे नेमके काय कारण आहे?

मायबोली हे संकेतस्थळ १३ वर्षांपुर्वी सुरू झालं आहे. तेव्हा जे सॉफ्टवेअर वापरात होतं त्यावर देवनागरी (युनिकोड) चालत नसे. २ वर्षांपूर्वी मायबोलीचं स्थलांतर नवीन प्रणालीमध्ये केलं आणि तो बदल अजून चालू आहे. हे स्थलांतर पूर्ण झालं नसल्याने सभासदांना देवनागरी नावे अजून घेता येत नाही.

२) हजर असलेल्या सभासदांची यादी इतर संकेतस्थळांप्रमाणे मायबोलीवर का दिसत नाही?
त्यासंबंधीचे नेमके काय कारण आहे?

मायबोलीवर असलेल्या एकंदर सभासदांचा विचार करता अशी यादी दिल्याने सर्व्हरवर अतिरिक्त ताण येत असल्याचे लक्षात आले. सध्या प्रणालीमध्ये काही फेरबदलाचे काम चालू आहे. ते पूर्ण झाल्यावर ही यादी दाखवण्याचा विचार आहे.

विषय: 
प्रकार: 

मनःपूर्वक धन्यवाद एडमिन-टीम.
आता सगळ्या शंका फिटल्या. Happy