मायबोलीचे नवीन मुख्य प्रशासक

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

कुठल्याही संस्थेचा विकास होण्यासाठी आवश्यक असणारी एक गोष्ट म्हणजे अनेक व्यक्तिंचा त्यात असलेला सहभाग. नुसत्या अनेक व्यक्ती असणे पुरेसे नसते तर वेगवेगळ्या भूमिका आणि त्या पार पाडण्यासाठी लागणारी कौशल्ये, वेळ यांचेही गणित जमावे लागते. आणि जसे पाणी वाहते असले की जास्त चांगले तसे एकाच भूमि़केत संस्थेतली माणसे फार वेळ राहिली तर संस्थेला शैथिल्य येते, व्यक्तिही तेच तेच काम करून कंटाळतात. नवीन नेतृत्वाला संधी मिळणे आवश्यक असते. त्यामुळे व्यवस्थित नियोजन करून अंमलात आणलेला बदल आवश्यक ठरतो. आणि मी स्वतःही अशा आवश्यक बदलाला अपवाद नाही.

मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की मायबोलीचे/हितगुजचे नवीन मुख्य प्रशासक(Admin) म्हणून श्री समीर सरवटे (समीर) यांनी जबाबदारी उचलली आहे. समीर गेली ९ वर्षे मायबोलीचे सभासद आहेत. त्यांनी अनेक वर्षे हितगुजचे नेमस्तक (Moderator) म्हणून काम केले आहे. ते मुख्य संपादक असताना २००३ साली हितगुज दिवाळी अंकाला मुंबई मराठी पत्रकार संघाचे पारितोषिक मिळाले होते. सध्या गेले २ वर्षे मायबोली इंक यासंस्थेचे मुख्य वित्तअधिकारी हा अतिरिक्त भार ही तें संभाळत आहेत.

मी समीर सरवटे यांचं हार्दिक अभिनंदन करतो. माझ्यावर तुम्ही जसं प्रेम केलंत, जसा मला पाठींबा दिलात तसाच त्यानाही मायबोलीकरांकडून मिळेल याची खात्री आहे.

अजय गल्लेवाले.

(जाता जाता: नाही मी इतक्यात निवृत्त होत नाहीये! मायबोलीचा वाढता पसारा पाहता प्रशासकीय काम, तांत्रिक सुविधा आणि मायबोलीचे काही नवीन उपक्रम या सगळ्यांवर काम करताना सगळीकडेच माझं दुर्लक्ष होत होतं. आता तांत्रिक सुविधा, नवीन उपक्रम याकडे थोडं जास्त लक्ष देता येईल. किंवा प्रशासकीय कामामुळे नवीन सुविधा द्यायला वेळ मिळत नाहीये असल्या सबबी मला देता येणार नाही :)).

विषय: 
प्रकार: 

दोघांनाही ........ जाहीर अभिनंदन, अन अनेक शुभेच्छा !!! Happy

पुर्वीचे अ‍ॅड्मीन अन मी एकदा पुण्यात (कर्मधर्मसंयोगाने) भेटलो होतो! ........आशा करितो कि आपण ही असेच एकदा भेटु!

तर....
सिनियर अ‍ॅडमिन : वरिष्ट प्रशासक
ज्युनियर अ‍ॅडमिन : कनिष्ठ प्रशासक
डेप्युटी अ‍ॅडमिन : उप प्रशासक
असिस्टंट अ‍ॅडमिन : सहाय्यक प्रशासक

सहकारी प्रशासक असा शब्द घ्या....... ईंग्रजीत काय म्हणता येइल? (को-अ‍ॅडमिन)
-------------------------------------------
आज कानोकानी वाचलेत का?

नविन प्रशासकांचे अभिनंदन

अरेच्चा, खुप उशिरा वाचली ही बातमी.

समीर हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!!!

तुम्हा दोघांनाही नविन उपक्रमांमध्ये उदंड यश लाभो अणि मायबोलीची अशीच उत्तरोत्तर प्रगति होत राहो !!!

समीरजी. काम उत्तम चालू आहे. काही व्यक्तींच्या पिरपिरीकडे लक्श देऊ नका. म्हणे ही शाई द्या अन ती शाई द्या. अन्नछत्रात जेवायचे अन वर बडीशेप मागायची. ह्या: ...

Pages