Submitted by शिवशंकर गोंड on 10 September, 2026 - 13:23
वृत्त : स्त्रग्विणी
कागदावर जरा उतरली अक्षरे
भावनांच्या सवे खेळली अक्षरे
फार केली जगाने प्रशंसा अशी
लाव काजळ म्हणू लागली अक्षरे
ती म्हणू लागली थांब आता इथे
पण तरीही पुन्हा जन्मली अक्षरे
स्पर्श झाला तुझा थांबली वेळ ही
मौन मी अन् इथे लाजली अक्षरे
ऐक माझे शिवा संपली ही कथा
शेवटी एकदा बोलली अक्षरे
- शिवशंकर सू. गोंड
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
दुसऱ्या शेरातील दुसरी ओळ:
दुसऱ्या शेरातील दुसरी ओळ:
तीट लावू म्हणू लागली अक्षरे
अशी करा
काजळ डोळ्यात घालतात, दृष्ट लागू नये म्हणून 'तीट' लावतात (बहुधा गालावर)
शिवा हे उपनाम घेणार असाल तर आधी डॉ. शिवाजी काळे ह्यांच्या असंख्य गझला वाचून घ्या व शक्यतोवर हे उपनाम बदला. मीर तकी मीरने 'मीर' हे उपनाम असेच घेतले होते. आधी ते उपनाम घेणाऱ्याने मीरचा भर मैफिलीत हे सांगून अपमान केला होता. मीर हा महान शायर होता म्हणून ते उपनाम आधी घेणारा नंतर गप्प बसला. मात्र, ती मीरची चूकच होती. डॉ. शिवाजी काळे हे केव्हापासूनच 'शिवा' हे उपनाम त्यांच्या गझलेत योजत आहेत.
शब्दांचे नैसर्गिक वजन हा मुद्दाही जरासा ध्यानात ठेवा. जरा, उतरली हे शब्द नैसर्गिक वजनानुसार वाटत नाहीत.
खयाल चांगले आहेत.
पुढील गझल लेखनास भरपूर शुभेच्छा!