पुणे शहराच्या महापालिकेत गणेश मंडळांची बैठक होती. महापौर भाजपच्या आणि सत्ताही भाजपचीच. सर्व नगरसेवक भाजपचेच.
अशा या वातावरणात बाप्पाचा उत्सव कसा करायचा यावर गंभीर चर्चा चालू असतानाच पुण्याचे एक नागरिक श्रीयुत बापट म्हणाले कि उत्सव करा पण डीजेमुक्त करा. कुठेच डीजेही नको किंवा स्पीकर्स नको.
यामुळे वातावरण तंग झालं. नगरसेवक, गणपती मंडळांचे कार्यकर्ते तापले. कोण आहे रे तो असे आवाज येऊ लागले. बाका प्रसंग उद्भवला.
बापटांना कुठे काय बोलायचं हे भान नसल्याचे दिसले.
https://www.youtube.com/watch?v=_5eE-0FDvhw
पुणे ही सांस्कृतिक राजधानी असल्याने संस्कृतीवरच बंदी आणण्याची मागणी केल्याने लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक कार्यकर्ते यांचे भान सुटणे हे एकदम नॅचरल होतं. बापट किरकिरे असतील. पण जिवावर उदार होऊन अशा मागण्या करू नयेत हे कुणालाही कळते.
अशा वेळी बाप्पानेच महापौर मंजुषा नागपुरे यांना बुद्धी दिली आणि त्यांनी "कोण आहे हा, याला धक्के मारून बाहेर काढा" असे उद्गार काढले. यामुळे सभागृहात जीवहिंसा न होता बापट बचावले.
पण बापट सुधारले का?
https://www.youtube.com/watch?v=HsLNl-Gdzv0
उलट चर्चा सुरू झाल्या आहेत. बापटांनी पुण्याच्या सांस्कृतिक जीवनात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
https://www.youtube.com/watch?v=siDYlYjsFgU
गुरूवारी कमीच होती. पण
गुरूवारी कमीच होती. पण शुक्रवारी आणि आज सोमवारीही आवाजाची पातळी डेक्कनपर्यंत कमी होती.
डेक्कनला एका ट्रॉलीवर डीजे ठेवून ती फिरवत होते. ही पळवाट काढली असेल असे वाटले, पण आज ते काही दिसले नाही.
मात्र दांडेकर पुलाच्या चौकात मोठमोठ्याने स्पीकर्स लावलेले होते. म्हणजे हे मंडळांचे ऐच्छिक धोरण आहे कि पोलीसांचे हे समजले नाही.
I am also in pune for last 3
I am also in pune for last 3 days and noticed relatively less sound level than expected. पण अनंत चतुर्दशीला खरी टेस्ट आहे. पण मी तेव्हा मसुरीमध्ये असेन.
बापट मुद्दा मांडून झाल्यावर
बापट मुद्दा मांडून झाल्यावर जी नकारार्थी मान हलवतात ती देहबोली लाजवाब आहे.
बापटांचे लेटेस्ट मुद्दे (परवानगीची मिजास) अप्रतिम आहेत.
काही म्हणा, पण ह्या माणसाच्या हाती सत्ता यावी.
जबरदस्त विचार आहेत.
लाऊडस्पिकरमध्ये लाऊड असल्याने
लाऊडस्पिकरमध्ये लाऊड असल्याने त्याची खुल्या सार्वजनिक ठिकाणी परवानगी मागणे किंवा देणे हेच चुकीचे आहे हा त्यांचा मुद्दा कोर्टालाही नाकारता येणार नाही
Pages