बृहनपुण्याचे बापट बाप्पामुळे बाल बाल बचावले

Submitted by Madan Hunkare on 27 August, 2026 - 12:47

पुणे शहराच्या महापालिकेत गणेश मंडळांची बैठक होती. महापौर भाजपच्या आणि सत्ताही भाजपचीच. सर्व नगरसेवक भाजपचेच.
अशा या वातावरणात बाप्पाचा उत्सव कसा करायचा यावर गंभीर चर्चा चालू असतानाच पुण्याचे एक नागरिक श्रीयुत बापट म्हणाले कि उत्सव करा पण डीजेमुक्त करा. कुठेच डीजेही नको किंवा स्पीकर्स नको.

यामुळे वातावरण तंग झालं. नगरसेवक, गणपती मंडळांचे कार्यकर्ते तापले. कोण आहे रे तो असे आवाज येऊ लागले. बाका प्रसंग उद्भवला.
बापटांना कुठे काय बोलायचं हे भान नसल्याचे दिसले.

https://www.youtube.com/watch?v=_5eE-0FDvhw

पुणे ही सांस्कृतिक राजधानी असल्याने संस्कृतीवरच बंदी आणण्याची मागणी केल्याने लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक कार्यकर्ते यांचे भान सुटणे हे एकदम नॅचरल होतं. बापट किरकिरे असतील. पण जिवावर उदार होऊन अशा मागण्या करू नयेत हे कुणालाही कळते.

अशा वेळी बाप्पानेच महापौर मंजुषा नागपुरे यांना बुद्धी दिली आणि त्यांनी "कोण आहे हा, याला धक्के मारून बाहेर काढा" असे उद्गार काढले. यामुळे सभागृहात जीवहिंसा न होता बापट बचावले.

पण बापट सुधारले का?
https://www.youtube.com/watch?v=HsLNl-Gdzv0

उलट चर्चा सुरू झाल्या आहेत. बापटांनी पुण्याच्या सांस्कृतिक जीवनात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
https://www.youtube.com/watch?v=siDYlYjsFgU

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुरूवारी कमीच होती. पण शुक्रवारी आणि आज सोमवारीही आवाजाची पातळी डेक्कनपर्यंत कमी होती.
डेक्कनला एका ट्रॉलीवर डीजे ठेवून ती फिरवत होते. ही पळवाट काढली असेल असे वाटले, पण आज ते काही दिसले नाही.

मात्र दांडेकर पुलाच्या चौकात मोठमोठ्याने स्पीकर्स लावलेले होते. म्हणजे हे मंडळांचे ऐच्छिक धोरण आहे कि पोलीसांचे हे समजले नाही.

I am also in pune for last 3 days and noticed relatively less sound level than expected. पण अनंत चतुर्दशीला खरी टेस्ट आहे. पण मी तेव्हा मसुरीमध्ये असेन.

बापट मुद्दा मांडून झाल्यावर जी नकारार्थी मान हलवतात ती देहबोली लाजवाब आहे. Lol

बापटांचे लेटेस्ट मुद्दे (परवानगीची मिजास) अप्रतिम आहेत.

काही म्हणा, पण ह्या माणसाच्या हाती सत्ता यावी. Lol जबरदस्त विचार आहेत.

लाऊडस्पिकरमध्ये लाऊड असल्याने त्याची खुल्या सार्वजनिक ठिकाणी परवानगी मागणे किंवा देणे हेच चुकीचे आहे हा त्यांचा मुद्दा कोर्टालाही नाकारता येणार नाही

कर्कश्श आवाज करुन, दारू आणि अन्य भयंकर पदार्थ सेवन करुन धिंगाणा घालणे ह्यात गणेश भक्ती, धर्म, परंपरा, विद्येच्या देवतेची उपासना ह्याचा मागमूसही दिसत नाही.
उघड्यावर असणारा डिस्कोथेक असे ह्या उत्सवाचे रुप आहे.
बापट नास्तिक आहेत म्हणून मुक्तपणे शिव्याशाप देणारे ह्या गणपतीच्या नावाखाली चालणार्या पूर्ण अधार्मिक चाळ्यांना फारतर तोंडदेखले वाईट म्हणतात. त्यावर इतका संताप व्यक्त होताना दिसत नाही.

गीतेत तर स्पष्टच सांगितले आहे की ज्याला ऐकायची इच्छा नसेल त्याला डी. जे. च काय तर भगवद्गीता किंवा वेदमंत्रदेखील जबरदस्तीने ऐकवू नका.

इदं ते नातपस्काय नाभक्ताय कदाचन।
न चाशुश्रूषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयति।। 18-67 ।।

पण जर एखादा म्हणाला की मी कायदा मानणार नाही, विज्ञान किंवा धर्माज्ञा देखील मानणार नाही. आम्ही फक्त आमचा आनंद आमच्या पद्धतीने साजरा करणार तर त्याला कोण काय करणार? इतकंच नव्हे तर ते असेही म्हणतात की त्याचा खर्च देखील तुमच्याकडूनच वसूल करणार! उपक्रम या संकेतस्थळावर एका सदस्याने लिहिले आहे की,
आमच्या इथेही त्रास होतोच. पुण्यातले रस्त्याला लागूनच असलेले घर बदलून आम्हीही आता लवकरच दुसरीकडे जात आहोत. दरवर्षीचा गोकुळाष्टमी, गणपती, नवरात्रात सलग नऊ दिवस गरबा (नवीन निघालेल्या देवीच्या तोरणाच्या मिरवणुका ) दिवाळीतल्या हजारोंच्या माळा, अर्धा अर्धा तास चालू राहणारे आकाशातल्या रोषणाईचे फटाके यांचा आवाजाचा त्रास सहन करण्यापलीकडे जातो.

>>काही म्हणा, पण ह्या माणसाच्या हाती सत्ता यावी.<<
नको..

बापटांसारख्या टोनडेफ, साम्यवादि विचारसरणीच्या माणसांनी राबवलेले ड्रकोनियन कायदे/नियम सोसायची तयारी आहे का त्यांच्या समर्थकांची...

>>>>>>तुमचा तात्या करतोय ते सांगता येत नसूनही सहन करताच आहात ना राज?
तात्या किती का गाढवपणा आंतरराष्ट्रिय लेव्हलला करत असू देत, सिटिझनशिप असलेल्या सामान्य माणसाला झळ तशी पोचत नाहीये. कुठे काही कायदे केलेत त्याने जे जाचक आहेत. DEI निर्मूलनाचे प्रयत्न करतोय पण त्याची झळ एका विशिष्ठ ग्रुपलाच बसतेय. बाकी जनतेला भाव वाढीने तसा फरक पडलेला नाही. त्याच्या राज्यात, स्टॉक्स तर वर जातायत?
--------
मी तात्याचे समर्थन करत नाहीये, माझ्या डोळ्यांना इथे दिसाणारी वस्तुस्थिती सांगतेय.

दिवाळी साजरी करण्याचीही पद्धत अनेकांनी बदलून घेतली आहे. पूर्वी अभ्यंगस्नान झाल्यावर गावागावांमध्ये देवदर्शनाला जायची पद्धत होती त्यानंतर घरी येऊन फराळ करायचा. आताशा लोक अभ्यंगस्नान केल्यावर थेट बालगंधर्व किंवा यशवंतराव चव्हाण सभागृह गाठतात. तिथे संगीताची मैफल असते. ती ऐकून दहा साडेदहाला बाहेर पडतात. तोवर पहाटेच्या फटाक्यांचा दणदणाट विरलेला असतो आणि सारसबागेतील गर्दीही कमी झालेली असते. मग बाप्पाचे दर्शन घेऊन मस्त सहकुटूंब पक्वान्नांची थाळी ओरपायला दुर्वांकुर, सुकांता, ऋतुगंध अशा ठिकाणी जातात. दुपार लोळून काढतात. दुसर्‍या दिवशी घरचे लक्ष्मी-पूजन झाले की गाड्या काढतात आणि मस्त आठवडाभर कोकण किंवा दुसर्‍या राज्यांत जातात.

वर दिलेला मजकूर या दुव्यावरून घेतला आहे.
http://mr.upakram.org/node/2621

विषयांतराचा दोष पत्करून त्यावरील प्रतिक्रिया लिहित आहे. कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही.
मग तुम्ही जेव्हा कोकणात किंवा दुसर्‍या राज्यात पलायन करता तेव्हा तिकडे चायनामध्ये बँका नोटा छापत असतात. कारखान्यातील यंत्रे धडधडत असतात. तयार माल ट्रकमध्ये भरला जात असतो. ट्रकमधील माल बंदरावर दाटीवाटीने उभ्या असलेल्या जहाजात भरला जात असतो. तिथून भोंगे वाजवित या बोटी निघतात त्या जगभरात हा माल पोहोचविण्यासाठी. दोन पिढ्यांपूर्वी आपल्याइतकाच किंबहुना आपल्याहून मागास असलेला चीन हा देश आज कुठे पोहोचला आहे? तो तिथे कसा पोहोचला याचे शिक्षण शाळा कॉलेजात दिले जाते का?
दिवाळीला फराळ, होळीला पुरणपोळी, १५ ऑगस्टला जिलेबी, गणपतीत मोदक ह्या प्रथा परंपरा अवश्य पाळाव्या. पण त्यांची (प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष) जबरदस्ती करू नये. दोन चार परंपरावादी लोक नव्हे तर लाखो / करोडो लोक जर होळीची पुरणपोळी खाऊन दुपारच्या वेळी आडवे झाले तर किती मनुष्यतास वाया जातात याचा हिशोब करायला हवा. आमच्या इकडे गणपतीसाठी अर्धा रस्ता अडवून बांधलेला मंडप अजून तसाच आहे. विचारले तर म्हणतात आता नवरात्रीत देवी त्याच मंडपात बसवायची, उगाच परत परत खर्च नको. तसे असेल तर भर रस्त्यात कायमस्वरूपी मंडप का बांधू नये? दर वर्षी मंडप लावा/ काढा ही भानगडच नको. हे मी मनातल्या मनात किंवा नेटवर म्हणू शकतो. प्रत्यक्ष म्हणण्याची माझी हिंमत नाही कारण खरोखरच ते तसा कायमस्वरूपी मंडप बांधू शकतात.
विद्यानंद बापट यांच्यासारख्या बाळबोध ब्राह्मणी संस्कारात वाढलेल्या तरुणाला नास्तिकतेच्या टोकाला आणून पोहोचविण्यासाठी आपण सारेच जबाबदार आहोत.

मग तुम्ही जेव्हा कोकणात किंवा दुसर्‍या राज्यात पलायन करता तेव्हा तिकडे चायनामध्ये बँका नोटा छापत असतात. कारखान्यातील यंत्रे धडधडत असतात. तयार माल ट्रकमध्ये भरला जात असतो. ट्रकमधील माल बंदरावर दाटीवाटीने उभ्या असलेल्या जहाजात भरला जात असतो. तिथून भोंगे वाजवित या बोटी निघतात त्या जगभरात हा माल पोहोचविण्यासाठी. दोन पिढ्यांपूर्वी आपल्याइतकाच किंबहुना आपल्याहून मागास असलेला चीन हा देश आज कुठे पोहोचला आहे? तो तिथे कसा पोहोचला याचे शिक्षण शाळा कॉलेजात दिले जाते का?

>>>

हे काही झेपले नाही.
चीनमध्ये फेब्रुवारीच्या त्यांच्या नववर्षाच्या पूर्ण आठवड्यात सर्व कारखाने, व्यवस्थापने कडकडीत बंद असतात. कोणताही कारखाना, ऑफिस सुरू नसते. मग भले ते युरोप किंवा अमेरिकेसाठी काम करत असुदेत. बंद म्हणजे बंद. त्यांचा सण असतो तेव्हा ते सुट्टी घेतात. त्याचप्रमाणे भारतीयांनी त्यांच्या सणासमारंभांना सुट्टी घेतली तर काय चुकीचे आहे हे समजले नाही.

शनिवार / रविवारी काम करून त्याची भरपाई केली जाते. उदाहरणार्थ चीनमध्ये २०२६ ह्या वर्षात हे कामाचे दिवस आहेत.

Jan 4 (Sun) → working day
Feb 14 (Sat) → working day
Feb 28 (Sat) → working day
May 9 (Sat) → working day
Sep 20 (Sun) → working day
Oct 10 (Sat) → working day

मी या विषयातील तज्ज्ञ नाही. चीनने केलेली अचंबित करणारी प्रगती कदाचित वेगळ्या कारणाने असेल, साम्यवादाशी संबंधित नसेल.
_____
गणपती / नवरात्रीची तयारी कित्येक दिवस अगोदर सुरू होते. हल्ली गणपती "आगमन सोहळा" देखील जोरात असतो. विसर्जनाचा दिवस नक्की असला तरी आगमन मात्र मंडळाच्या सोयीनुसार कधीही होऊ शकतं. त्यात ट्राफिकची पूर्ण वाट लागते. रहदारीला अडथळा हा बापटांचा मुद्दा इतरही अनेक घटकांना लागू होतो. उदाहरणार्थ फेरीवाले, भाजीवाले, रस्त्यावरच राहणारे गरीब लोकं, भिकारी, कचरा फेकण्याच्या जागा, राजकीय पक्षांचे मोर्चे, निदर्शने, धार्मिक मिरवणुका, फुटपाथ न वापरता / पुढे मागे न पाहता मोबाईलवर नाहीतर आपसांत बोलत चालणारे पादचारी, भटके श्वान, गायी, बॅनर आणि फ्लेक्स, कशाही आणि कुठेही उभ्या केलेल्या गाड्या, अतिक्रमण करून बांधलेली अनधिकृत बांधकामे इत्यादी. पण गणपतीत ज्या प्रकारे पूर्ण कोंडी होते तशी इतर वेळी होत नाही. यातून जो आर्थिक फटका बसतो त्याचे नीट मोजमाप केले तर तो आकडा खूप मोठा असेल.

शांतनु, तुम्ही देत असलेली माहिती उत्तम आहे. पण माझी विनंती आहे कि या धाग्यावर ती नको.
कारण आता अनेकांनी हा धागा सोडून दिला असेल. ४५०+ प्रतिसाद झाल्यानंतर आता काही मूळ विषयावर लिहायचं राहिलं असेल असं वाटत नाही. या विषयावर चारही बाजूंनी चर्चा व्हायला हवी यासाठी नवीन धागा असेल तर लोकांचं लक्ष जाईल. अर्थात तुमची इच्छा महत्वाची. प्रतिसाद राखून ठेवतोय.

शंतनु, काय सांगताय हे? महाराष्ट्र सरकारच्या डोक्यावरचं कर्ज वाढत असताना नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी कित्येक दशसहस्र कोटींची उड्डाणे भरली जात आहेत. तिकडे उज्जैनमध्ये सिंहस्थ मेळ्यासाठी शहर चकाचक करण सुरू आहे. या दोन्ही ठिकाणे कोटी कोटी लोक येणार आहेत. त्यात महाराष्ट्रात पन्नास वर्षांत नव्हता असा भीषण दुष्काळ आहे.

आता यातून अर्थव्यवस्थेला चालना मिळते असे सांगणारेही येतीलच.

मुळात आपल्याकडे लोकांना द्यायला कामच नाहीए. त्यासाठीच त्यांना अशा नव्या जुन्या धार्मिक उत्सवांत गुंगवून ठेवावं लागतं. कावड यात्रांचं प्रमाण उगाच वाढतंय का? किंवा महाशिवरात्री, रामनवमीला , हनुमान जयंतीला यात्रा का निघू लागल्यात?

आपापल्या सणासमारंभांना सुट्टी असणे, घेणे ह्यात काहीच चुक नाही. मनुष्याचा जन्म फक्त मशीनीसारख काम करायला झालेला नाही. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही महत्वाचे. फक्त सणाचा इतरांना त्रास नको. पर्यावरणाची हानी नको.

>>> मुळात आपल्याकडे लोकांना द्यायला कामच नाहीए.

Rofl

काम करायला मुळशी पॅटर्न तयार आहे का? वरच्या विधानाला काही आधार?

हल्ली फार लॉजिकल लिहिता.

The unemployment rate for Gen Z (ages 15–29) sits heavily at 11.9%

आणखी आकडेवारी हवीय?

पुण्यात गेले काही दिवस युवकांची आंदोलनं सुरू आहेत ती नेमकी कशासाठी?

एखाद्याने आयुष्यात कधी सूर्योदय पाहिलेला नसेल आणि त्याने सूर्योदय होतो याचे पुरावे मागितले तर त्याचे समाधान कसे करावे याबद्दल मार्गदर्शन हवे आहे.

धुकं, अंधार, इल्युजन, डिल्युजन, खोटेपणा आणि केऑस - यांच्यात अडकलेले हे लोक आहेत. त्यांना कुठे सूर्य नि सुर्योदय दाखवता. कीव करावी आणि निघावं पुढे. जगात खूप आहे बघण्या-ऐकण्या-अभ्यास करण्याजोगं.

उपदेशो हि मूर्खाणां प्रकोपाय न शान्तये ।
पयःपानं भुजङ्गानाम् केवलं विषवर्धनम् ॥
(आम्हीही बापट Proud )

वर टाकोच्या राज्यांत शेअर मार्केट कसं वर गेलं करणारे लोक आहेतच. सप्टेंबरचे जॉब रिपोर्ट, आणि बेकारीचा दर, जुलै आणि ऑगस्टचे रिवाईझ केल्या नंतरचे जॉब नंबर त्यांनी बघितले नसतील का काय! कोण जाणे. आपला जॉब गेला तरी चालेल अब्दुल्लाला टाईट केला ना मग झालं तशातलीच गत आहे. डीईआय काढलं ना मग झालं, आपल्याला तेवढी तोशिष तर सहन केलीच पाहिजे ना.
पयःपानं भुजङ्गानाम् केवलं विषवर्धनम् ॥.. अगदी खरं! आपण दुसरं झाड शोधावे झालं.

<विद्यानंद बापट यांच्यासारख्या बाळबोध ब्राह्मणी संस्कारात वाढलेल्या तरुणाला नास्तिकतेच्या टोकाला आणून पोहोचविण्यासाठी आपण सारेच जबाबदार आहोत.>
या वाक्यातून नास्तिकता ही वाईट गोष्ट आहे, असं सूचित होतं. त्याला आक्षेप.
त्या पोस्टमध्ये या वाक्याआधी लिहिलेया अनिष्ट गोष्टींमुळे बापट नास्तिक झाले असं म्हणायचंय का? हे सुलभीकरण झालं.

बापटांनी विचार केला, अभ्यास केला, पुस्तकं वाचली तेव्हा ते नास्तिक झाले , असं झालं असेल ; असं वाटतं. त्यांच्या इतक्या मुलाखती झाल्यात. कोणी हा प्रश्न विचारलाय का त्यांना?

भरत +१

>>>>>डीईआय काढलं ना मग झालं, आपल्याला तेवढी तोशिष तर सहन केलीच पाहिजे ना.
रिझर्व्हेशनला किंवा कोण्या गटाच्या अतिरिक्त लाडाला विरोधच आहे. मग एशिअन का असेना. इट ब्रीडस कन्टेम्प्ट इन अदर पीपल. राईटली सो.

>>>>>>>>वर टाकोच्या राज्यांत शेअर मार्केट कसं वर गेलं करणारे लोक आहेतच.
खरे आहे ते.

>>>>सप्टेंबरचे जॉब रिपोर्ट, आणि बेकारीचा दर, जुलै आणि ऑगस्टचे रिवाईझ केल्या नंतरचे जॉब नंबर त्यांनी बघितले नसतील का काय! कोण जाणे.
पाहीलेला नाहीये पण लिंकड इन पल्स्वरुन मार्केट फारसे वाईट नसावे असे वाटते. 'अव्हेलेबल फॉर वर्क' पोस्टस आजकाल फारशा दिसत नाहीत. मध्यंतरी भरमसाठ दिसत हे खरे आहे.

भरत व हर्पा +१
बापटांनी जो मुद्दा मांडला आहे त्याचा त्यांच्या नास्तिक असण्यानसण्याशी संबंध नाही. हाच मुद्दा एखाद्या १००% आस्तिक गणेश भक्ताने मांडला असता तरीही तेवढाच योग्य असता.

नास्तिक दर्शनांबाबत वाचल्यानंतर मतात फरक पडला. आज नास्तिकचा संकुचित अर्थ आहे.

नास्तिक कशाला, सगळ्यांचेच अर्थ संकुचित झालेत. आस्तिकांनी खरं तर यावर सर्वात मोठा आक्षेप घ्यायला हवा. पण यातले बहुतांशी लोक 'सोयीस्कर ते चालेल', 'बहुमत असेल तिकडे आम्ही' असे आहेत. यांनी काय फार विचार केला आहे असं नाही. आस्तिक दर्शनं (आऊटडेटेड असतील तरीही. कुठचंही तत्त्वज्ञान कधीही ऑब्सोलीट होत नाही. मनुस्मृतीमध्येही उपयोगी तत्त्वज्ञान असल्याचं भक्त रेटून सांगतातच. शिवाय पुढचं कळण्यासाठी आधीचं माहिती असायलाच हवं असतं) काय आहेत, वेद काय म्हणतात हेही सामान्य आस्तिकाला ठाऊक नसतं. आपल्या कर्माचा आणि फळाचा हिशेब मांडायला कुठचा तरी टेकू, फळी हवी म्हणून ते आस्तिक असतात. नास्तिक असायला फार विचार, उत्खनन आणि स्वतःच्या आत पाहावं लागतं, त्यासाठी तेवढी हिंमतही लागते, कारण आत बघितलं तर अनेक भयानक आणि विकृत गोष्टी सापडू शकतात. त्या दिसू नयेत- यासाठी म्हणण्यापुरतं, अस्मितेपुरतं आणि झालंच तर कर्मकांडापुरते मुळातूनच 'आस्तिक' असलेले लोक आजुबाजूला सगळेकडे दिसतात. आस्तिक असायला नुसतं बाहेर तोंड करून पाहिलं तरी चालतं- असा आजचा हिशेब आहे. खरा आस्तिक असा नसतो. इथं आस्तिकतेचे आणि सनातनाचे ढोंग घेतलेले सारे असेच आहेत, खोटे आहेत, स्वतःच्या आत पाहायला भिती वाटते म्हणून सतत बाहेर पाहत राहण्याची सवय झालेले आहेत.

साजिरा, 'न्हाव्यासारखी हजामत घरच्या घरी कशी करावी' धागा वाचते आहे की काय असं वाटलं एक मिनिट. Proud

साजिरा, यातल्या अनेक नास्तिक दर्शनातले वादविवाद हल्ली फ्री विल, क्वाण्टमच्या नावाखाली पुन्हा चघळत आहेत. ते म्हणजे काहीतरी नवीन आहे आणि मला हे माहीत आहे या अविर्भावात. फ्री विल वरून अडीच हजार वर्षांपूर्वी झालेल्या चर्चा पाहिल्या तर आपण चाकाचा शोध पुन्हा लावतोय असं फिलिंग येतं. कुठल्या तरी धाग्यावर लिहीलंय.

चार्वाकदर्शन
https://www.maayboli.com/node/89000

अजित केशकंबली व अन्य नास्तिकदर्शनांबद्दल बोलूयात कुठेतरी, कधीतरी.

Pages