कोकण रेल्वे आणि गुजराती धिंगाणा

Submitted by pratidnya on 3 June, 2026 - 10:07

थोड्याफार फरकाने मला रेल्वे आणि विमानप्रवासात अलीकडच्या वर्षांत बऱ्याचदा असे अनुभव आले आहेत.

कोकणरेल्वेने नवऱ्यासोबत गावी जायला निघाले होते. तब्येत ठीक नव्हती. दोन कंपार्टमेंट सोडून असणाऱ्या सीटवर गुजराती लोकांचा एक मोठा फॅमिली ग्रुप होता. गोव्याला जात असावेत. नेहमीप्रमाणे त्यांनी बचाबचा खायला सुरुवात केली. रात्रीचे अकरा वाजून गेले होते तरी मोठा स्पीकर लावून सर्वांनी गाणी गायला सुरुवात केली. आजूबाजूला आपल्या गावी जाणाऱ्या कोकणी चाकरमानी लोकांची गर्दी. दबक्या आवाजात सर्वांनी अरे आता झोपायची वेळ झाली कुणीतरी यांना गाणी बंद करायला सांगा अशी कुजबुज सुरु केली. प्रत्यक्षात कुणीच त्यांना सांगायला जाईना. आमच्या बाजूच्या सीटवर बसलेल्या काकांचा आवाज जरा वाढला. पण तोही फक्त बाजूला बसलेल्या माणसांसमोर. अरे काय माणसं आहेत, किती तो गोंधळ, किती तो आम्हाला त्रास वगैरे वगैरे. पण हे सर्व त्यांना तिथे जाऊन सांगायची हिंमत होईना. TCने येऊन अगदी सौम्य आवाजात जरा टोकलं तर ते लोक अगदी निर्लज्जपणे क्या हैं वो फॅमिली फॅमिली थोडा एन्जॉय कर रहे हैं अभी थोडे देर मे बंद कर देंगे असे अगदी गोड आवाजात सांगायला लागले. (असेच गोडगोड बोलून १०० ची गोष्ट १००० ला विकतात). पण अर्धा तास होऊन गेला तरीही आवाज सुरूच. वरच्या सीटवर बसलेला एक तरुण म्हणायला लागला मी सांगतो त्यांना मी रेल्वेतच कामाला आहे. पण असं दोन तीन वेळा बोलून झाल्यावरही आपल्या सीटवरून तो खाली उतरला नाही. माझी तब्येत बरी नव्हती, झोपायचं होतं. ह्यांच्या भसाड्या गाण्यांमुळे डोकं अतिशय दुखत होतं. शेवटी नवऱ्याला म्हटलं चल जाऊया तिकडे. दोघेही तणतणत गेलो आणि जोरजोरात शिव्या घातल्या आणि आता आता तुमची गाणी बंद नाही केलात तर स्पीकर गाडीतून खाली फेकून देईन, आवाज अगदी बंद झाला पाहिजे असं किंचाळले. त्या ग्रुपमधल्या तरुण मुलांनी दात काढून फिदीफिदी हसायला सुरुवात केली. पण त्यांच्यातल्या प्रौढ लोकांना काय वाटलं काय माहित त्यांनी गाणी अगदी बंद केली. यात आश्चर्य म्हणजे आजूबाजूला सर्व मराठी कुटुंबं होती पण एकही आमच्या बाजूने त्या लोकांना खडसवायला आला नाही. तोंडातल्या तोंडात पुटपुटत सीटवरच बसून त्यांचा काही निषेध चालला होता तोच.

त्यांना गप बसवून आमच्या सीटवर परत आलो तर रेल्वेत काम करणारा मुलगा त्याच्या सीटवर पांघरूण तोंडावर ओढून झोपून गेला होता. काही वेळाने त्या कुटुंबातला मोठा काका आमच्या सीटजवळ आला आणि माझ्या आजूबाजूला बसलेल्या लोकांना सांगायला लागला. वो क्या हैं ना सब फेमिली गोवा घुमने जा राहा हैं ना तो जरा मजा मस्ती मे गा रहा था. त्यावर आमच्या बाजूच्या सीटवर बसलेले काका जे सीटवर बसल्या बसल्या त्यांना शिव्या घालत होते ते अगदी प्रेमाने त्या गुजराती माणसाच्या पाठीवर अलगत थोपटत म्हणाले. कूच नही चलता हैं.

तुम्हालाही प्रवासात असे अनुभव आले असतील तर शेअर करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

<<हे अगदीच नाचाचे काहीही अंग नसलेले लोक, हात आणि पाय हलवत आहेत. प्रचंड गरीब आणि हलाखीचा प्रकार वाटला तो व्हिडिओ बघुन.>> Lol
मग! कुठेही जाऊन नाचणारे तुम्हाला आपल्या सुंदर कलेचे सादरीकरण करत असतील असे वाटले होते की काय! Proud

<<टारमॅकवर तो जिना येईपर्यंत दहीहंडीसारखे मजले करून त्याआधीच विमानात चढतील.>> Lol

मग! कुठेही जाऊन नाचणारे तुम्हाला आपल्या सुंदर कलेचे सादरीकरण करत असतील असे वाटले होते की काय! Lol पॉईंट आहे.

जेम्स वांड, चील!
इतर लोक किती बेपर्वा आहेत, जथ्याने काय काय करतात याची जंत्री हवी असेल डिस्क्लेमर म्हणून, तर ती देऊ शकतो. सुरुवात मात्र अमेरिकेपासून करू.

नाचणारे तुम्हाला आपल्या सुंदर कलेचे सादरीकरण करत असतील असे वाटले होते की काय! >> खरं सांगायचं तर हो. Lol काही वर्षांपूर्वी असा फ्लॅश मॉब,... म्हणजे सफाईदार निपुण नृत्य करणारे अचानक कुठल्या ठिकाणी येऊन ( म्हणजे इतरांसाठी अचानक, त्यांचे स्क्रिप्टेड असणार) नाच, गाणे इ. करत. असे व्हिडिओ बघितले आहेत. एअरपोर्ट च्या अरायव्हल हॉल मधली एक क्लिप लक्षात आहे. ती खरंच सुंदर होती. मला भाबडेपणे तसंच काही असेल वाटलं होतं. त्यामुळे जरा जास्तच भ्रमनिरास झाला असेल.
तसा उत्स्फूर्त वाटेल असा सुंदर कोरिओग्राफ्ड नाच असता तर मी आनंदाने बघितला असता. नियम वगैरे सुपरसीड झाले असते. पण ...की राजहंसाचे चालणे, आणि परंतु काय कवणे चालोची नये की काय? विचारले तर... हो! Lol
म्हणजे पैसे भरून स्टेज घ्या आणि हवं ते करा... तर टारमॅकवर तरी नकोच! परत लहान मुलांनी केला असता तर कौतुकाने बघितले असते इ. डिस्क्लेमर आताच आठवेल तसे टाकतो.

ते चिपळ्या का वाजवताहेत?

हा पण एक पहिली ड लेव्हलचा नमुना बघा.
लग्नानिमित्त त्यांच्याकडे जेवायला जाणाऱ्यांना म्हणून हा डान्स बघायची शिक्षा असेल....

भरतजिनी लिंक दिलेल्या व्हिडिओमध्ये जे गुजराथी लोक आहेत त्यांचा लग्नाचा धिंगाणा महिनाभर इंस्टाग्रामवर चालू होता Lol
राष्ट्रीय लग्न म्हणून जाहीर करायचं तेवढ राहिल होत. Biggrin

एक से बढकर एक आहेत अगदी, Lol

मला एक समजत नाही अशी कोणती मजबुरी असते यांना, की हे करायचेच असते? नक्कीच यांच्या बायका यांना भरीस घालत असणार, निदान या दोन उदाहरणात तरी तेच दिसतंय Rofl

दोघांच्याही बाबत स्त्रीहट्टापुढे काही चालत नाही असं म्हणायला वाव आहे.

पुरुष घोरतात याचा असा सूड उगवला बघा.

Pages