कोकण रेल्वे आणि गुजराती धिंगाणा

Submitted by pratidnya on 3 June, 2026 - 10:07

थोड्याफार फरकाने मला रेल्वे आणि विमानप्रवासात अलीकडच्या वर्षांत बऱ्याचदा असे अनुभव आले आहेत.

कोकणरेल्वेने नवऱ्यासोबत गावी जायला निघाले होते. तब्येत ठीक नव्हती. दोन कंपार्टमेंट सोडून असणाऱ्या सीटवर गुजराती लोकांचा एक मोठा फॅमिली ग्रुप होता. गोव्याला जात असावेत. नेहमीप्रमाणे त्यांनी बचाबचा खायला सुरुवात केली. रात्रीचे अकरा वाजून गेले होते तरी मोठा स्पीकर लावून सर्वांनी गाणी गायला सुरुवात केली. आजूबाजूला आपल्या गावी जाणाऱ्या कोकणी चाकरमानी लोकांची गर्दी. दबक्या आवाजात सर्वांनी अरे आता झोपायची वेळ झाली कुणीतरी यांना गाणी बंद करायला सांगा अशी कुजबुज सुरु केली. प्रत्यक्षात कुणीच त्यांना सांगायला जाईना. आमच्या बाजूच्या सीटवर बसलेल्या काकांचा आवाज जरा वाढला. पण तोही फक्त बाजूला बसलेल्या माणसांसमोर. अरे काय माणसं आहेत, किती तो गोंधळ, किती तो आम्हाला त्रास वगैरे वगैरे. पण हे सर्व त्यांना तिथे जाऊन सांगायची हिंमत होईना. TCने येऊन अगदी सौम्य आवाजात जरा टोकलं तर ते लोक अगदी निर्लज्जपणे क्या हैं वो फॅमिली फॅमिली थोडा एन्जॉय कर रहे हैं अभी थोडे देर मे बंद कर देंगे असे अगदी गोड आवाजात सांगायला लागले. (असेच गोडगोड बोलून १०० ची गोष्ट १००० ला विकतात). पण अर्धा तास होऊन गेला तरीही आवाज सुरूच. वरच्या सीटवर बसलेला एक तरुण म्हणायला लागला मी सांगतो त्यांना मी रेल्वेतच कामाला आहे. पण असं दोन तीन वेळा बोलून झाल्यावरही आपल्या सीटवरून तो खाली उतरला नाही. माझी तब्येत बरी नव्हती, झोपायचं होतं. ह्यांच्या भसाड्या गाण्यांमुळे डोकं अतिशय दुखत होतं. शेवटी नवऱ्याला म्हटलं चल जाऊया तिकडे. दोघेही तणतणत गेलो आणि जोरजोरात शिव्या घातल्या आणि आता आता तुमची गाणी बंद नाही केलात तर स्पीकर गाडीतून खाली फेकून देईन, आवाज अगदी बंद झाला पाहिजे असं किंचाळले. त्या ग्रुपमधल्या तरुण मुलांनी दात काढून फिदीफिदी हसायला सुरुवात केली. पण त्यांच्यातल्या प्रौढ लोकांना काय वाटलं काय माहित त्यांनी गाणी अगदी बंद केली. यात आश्चर्य म्हणजे आजूबाजूला सर्व मराठी कुटुंबं होती पण एकही आमच्या बाजूने त्या लोकांना खडसवायला आला नाही. तोंडातल्या तोंडात पुटपुटत सीटवरच बसून त्यांचा काही निषेध चालला होता तोच.

त्यांना गप बसवून आमच्या सीटवर परत आलो तर रेल्वेत काम करणारा मुलगा त्याच्या सीटवर पांघरूण तोंडावर ओढून झोपून गेला होता. काही वेळाने त्या कुटुंबातला मोठा काका आमच्या सीटजवळ आला आणि माझ्या आजूबाजूला बसलेल्या लोकांना सांगायला लागला. वो क्या हैं ना सब फेमिली गोवा घुमने जा राहा हैं ना तो जरा मजा मस्ती मे गा रहा था. त्यावर आमच्या बाजूच्या सीटवर बसलेले काका जे सीटवर बसल्या बसल्या त्यांना शिव्या घालत होते ते अगदी प्रेमाने त्या गुजराती माणसाच्या पाठीवर अलगत थोपटत म्हणाले. कूच नही चलता हैं.

तुम्हालाही प्रवासात असे अनुभव आले असतील तर शेअर करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

धागा वाचतेय.. रीप्लाय करणार नव्हते.. पण एक प्रतिसाद वाचुन रहावलं नाही म्हणुन करते..

रात्रीच्या ट्रेन मध्ये घोरणारे हा एक अफाट त्रासाचा विषय आहे. एकदा तर एक माणूस अक्षरशः वाघाच्या डरकाळ्या वाटाव्यात असा घोरत होता. हे डाराडूर झोपतात आणि आम्ही मात्र ह्यांच्या घोरण्यामुळे जागे. >>
पहिली गोष्ट म्हणजे घोरणारे लोक मुद्दाम कोणाला त्रास व्हावा म्हणून घोरत नाहीत. हा एक आजार आहे हे त्यांनाही माहिती आहे...अशा लोकांनी रात्रीच्या वेळी प्रवास करताना दुसर्‍यांना त्रास होउ नये म्हणुन एकतर प्रवास करुच नये किंवा झोपु नये अशी अपेक्षा आहे का ? ज्या प्रकारे ही कमेंट लिहिली ते अजिबात अवडले नाही.. प्रवासात जाणून्बुजुन दंगा करणे आणी घोरणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत..
बाकी गोंधळ चालुदेत

प्रवासात जाणून्बुजुन दंगा करणे आणी घोरणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.... १००% सहमत!! (मला घोरायची सवय नसली तरीही!)

घोरणे ही एक डिस ऑर्डर असली तरी इतर बाबतीत माणूस नॉर्मल असतो.
मी घोरतो, मी काही करू शकत नाही, त्यामुळे मी झोपणार , मला इतरांचं काय पडलंय असा विचार न करता इतर सहप्रवाशांचा ही विचार करून वर लिहिल्याप्रमाणे रात्रीचा प्रवास शक्य असेल तर टाळणे, किंवा त्या दिवशी दुपारी झोप घेऊन रात्री अगदी घरच्या सारखं न झोपता गजर लावून तीन चार तासांनी उठून गाणी ऐकणे, पॉडकास्ट ऐकणे किंवा हाय फाय ट्रेन असेल तर वाचायचा दिवा लावून वाचन करणे वगैरे उपायाने जागे राहून घोरणारा माणूस इतर प्रवाशांना ही थोडावेळ शांततेची झोप देऊ शकेल. पण त्यासाठी एवढा विचार हवा. असो.

माणसाने गरज असेल तरच प्रवास करावा विनाकारण मौजमजा करण्यासाठी प्रवास करू नये. मौजमजेचा प्रवास म्हणजे दंगा आणि गरजेचा प्रवास म्हणजे घोरणे.

लिहिल्याप्रमाणे रात्रीचा प्रवास शक्य असेल तर टाळणे.
मी गेल्या कित्येक वर्षात याच कारणासाठी रात्रीचा रेल्वे प्रवास टाळला.
सुदैवाने मागच्या वर्षी दिल्लीला राजधानी ने गेलो तेंव्हा माझे सहप्रवासी घोरणारे नव्हते.
वातानुकूलित डब्यात तर कुठेही माणूस घोरणारे असेल तर आवाज तुमच्या पर्यंत पोचतोच.

एसीत कुणी काय खाल्लं त्याच्या सुगंधित चहाड्या दरवळतात. कधी कधी डॉल्बी सराउंड साउंड सहित. ते ही क्षणिक घोरणेच की.

कै च्या कै अपेक्षा आहेत. जे लोक झोपेचे औषध घेतात त्यांना का विशिष्ठ वेळीच झोपायची वर्षानुवर्षे सवय होते. इतर वेळा त्यांनाझोप लागत नाही. त्यांनीही आदल्या दिवशी जागे राहून इतरांची मने सांभाळत बसायची की काय?
त्यापेक्षा आवाजात झोपायची सवय सर्वांनी करायला काय हरकत आहे? सराव करा सुरु हाकानाका Wink

असाच गुजराती धिंगाणा एकदा मुंबई नाशिक दरम्यान अनुभवला आहे.
प्रतिसादाची गाडी आता घोरण्याकडे वळलेली दिसते.

त्रास होतो इथपर्यंत ठीक होत. पण त्यांनी प्रवास करू नये किंवा जागे रहावे ही हुकूमशाही आहे.
खेडेगावात एसटीत कुणी सारख्या तक्रारी करू लागला कि त्याला एखादी बाई सुनावते कि स्वतःच्या हेलिकॉप्टरने फिर.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत इतरांनी गैरसोय करून घेऊन आपली सोय केली पाहिजे ही अपेक्षा हास्यास्पद आहे. घोरण्यावर गोळी असेल तर ठीक आहे. ती घेण्याचं बंधन घालता येईल. असे नियम करायचे म्हटले तर कोविड प्रमाणे सर्वांची तपासणी करून मगच ट्रेनमधे प्रवास करू दिला जाईल. कणकण असेल तरी उतरावं लागेल.

माफ करा ज्या कुणाची कमेण्ट असेल त्यांनी.

त्रास होतो इथपर्यंत ठीक होत. पण त्यांनी प्रवास करू नये किंवा जागे रहावे ही हुकूमशाही आहे. >> हा हुकूम नाही, हे ज्याचं त्याला आतूनच वाटायला हवं. बाहेरून सांगून येणाऱ्या \ होणाऱ्या या गोष्टी नाहीत.

बापरे... घोरणार्‍या लोकांबद्दल ममोंना फारच राग दिसतो...
तुमच्याबद्दल फार आदर आहे मनीमोहोर ताई, तुमचं लेखन मनापासुन आवडतं आणि त्यातुन तुम्ही बर्‍याच संवेदनशील असाल असं वाटलं होतं.
पण हे प्रतिसाद नक्की तुम्हीच लिहिलेत की तुमचं अकाउंट हॅक करुन अजुन कुणी अशी शंका यावी इतपत असंवेदनशील आहेत.

घोरणार्‍या माणसाने दिवसाची झोप प्लॅन करुन रात्री प्रवास करायचा, गजर लावुन उठायचं या अपेक्षा जरा जास्त होत नाहीत का ?
मग शांततेतच झोप येते असा हट्ट असलेल्या माणसाने पण रात्रीचा प्रवास असेल तर दिवसा झोप प्लॅन करुन रात्री प्रवास करावा की...रहावं स्वतः जागं. कानात मस्त हेड्फोन्स घालुन गाणी ऐकावीत. किंवा घोरणार्‍या माणसांचं विचित्रं घोरणं ऐकत स्वत:ची करमणुक करुन घ्यावी.. Happy

माझा आक्षेप फक्त जागेपणी ट्रेन मधे दंगा करणार्यांसोबत घोरणार्‍यांना कंपेअर करणार्‍यांसाठी होता. तुम्ही तर घोरणार्‍या माणसांना एकदम आरोपीच्या पिंजर्‍यात नेउन बसवलं की :-)...
अहो दिवसभर ऑफिस करुन एखाद्याला नाईलाजाने रात्री प्रवास करावा लागत असेल तर त्याने त्याची झोप कशी बरं कंट्रोल करावी.
घोरणार्या लोकांना जोवर पब्लिक ट्रास्पोर्ट ची तिकिटे मिळण्यावर बंदी येत नाही तोवर सार्वजनिक वाहनात लोक घोरत रहाणार Happy

ही टिपिकल भारतीय एन्टायटल्ड मनोवृत्ती आहे. जग भारतीयांना याच कारणाने नावे ठेवतं. आपल्यामुळे सभोवतालाला कसा कमीत कमी त्रास होईल ते सतत बघणे. त्रास होणारच असेल तर आगाऊ + नंतर सॉरी म्हणणे, माफी मागणे, त्रासाची कल्पना देणे, त्यात अकोमोडेटीव्ह असणे, सभोवताला बद्दल परिस्थिती बद्दल अवेअर असणे, सजग असणे हे सार्वजनिक ठिकाणी वावरताना सामान्य असावे.
पण लक्षात कोण घेतो!
सगळ्याचा जन्मसिद्ध हक्क! वर नियम आहे का? तर मग बोला!!! नियम नाही. त्यामुळे अवश्य प्रवास करा. नखे कापा, केस विंचरा.. आणि काय जे नियम नसतील ते ते करूच शकता. सध्या किमान नियम तरी पाळा! लेट्स स्टार्ट देअर!

आपल्यामुळे सभोवतालाला कसा कमीत कमी त्रास होईल ते सतत बघणे

हे आपल्या भारतीय लोकांच्या खिजगणतीतच नसते.

blatant disregard to others' discomfort is norm rather than exception

बाजारात मोठी SUV उभी केल्यामुळे मागे वाहतूक अडकली आहे याची तमा न बाळगणे, वेळी अवेळी डीजे आणि ढोलताशे वाजवून लोकांना त्रास देणे, वाटेल तिथे कचरा टाकणे, दिलेल्या वेळेनंतर उगवल्यामुळे लोकांना ताटकळत राहावे लागेलं याची चिंता न करणे आणि अशा असंख्य गोष्टीबद्दल ना खंत ना खेद बाळगणे हा स्थायीभाव आहे.

जोरात घोरणे हि क्रिया त्या माणसाच्या नियंत्रणात नाही.( खरं तर हा एक आजार आहे परंतु आपण याचे नियंत्रण करू शकतो हेच बहुसंख्य लोकांना माहिती नाही). पण त्यामुळे रेल्वे मध्ये इतरांना त्रास होतो याबद्दल फारसे कुणाला वाईट वाटत नाही.

मला आणि माझ्या पत्नीला इतरांच्या घोरण्याचा त्रास होतो त्यामुळे अनेकवेळेस आम्ही लग्नाला/ ट्रिप ला गेलो तर आमची स्वतंत्र खोली घेतो.
लोक आपल्याला काय म्हणतील याची चिंता करून आपली रात्र जागण्यात वाया घालवणे मला पटत नाही.

याच कारणास्तव आम्ही रेल्वेने रात्रीचा प्रवास टाळतो.

इतक्या सर्व लोकांना सुधारणे शक्य नाही

अमितव , सुबोध खरे धन्यवाद...
ट्रेनमध्ये समोरच्या मुलीचे केस आपल्या नाकात जात असतील आणि आपण तिला सांगितले तर खरं म्हणजे तिने सॉरी म्हणून आपल्या केसांचा बंदोबस्त करायला हवा, केस बांधणे, दुपट्टा घेणे वगैरे काही ही.. पण होतं काय ? सेकंड मध्ये असलो तर ती म्हणते गर्दी आहे केस नाकात जात असतील तर फर्स्ट ने जा, फर्स्ट मध्ये असलो तर म्हणते स्वतःच्या गाडीने जा पण ती तिचे केस आवरत नाहीच. बोलणारा मूर्ख ठरतो.
तसंच आहे हे माझ्या घोरण्याचा त्रास होतो तर त्यासाठी मी काही करीन नाहीच उलट कशाला येताय गाडीत ? असा प्रतिप्रश्न येणार

सगळं काही नियम कायदे करून होणार नाहीच. सार्वजनिक ठिकाणी आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होत असेल तर त्याची जबाबदारी आपण घेणे हा साधा संस्कार आहे. तो अंगी बाणवला तरी पुष्कळ होईल मग कोणत्या ही कायद्याची गरज लागणार नाही.
पण सध्या तरी भारतात तरी ही फारच मोठी अपेक्षा आहे असं वाटतंय.

घोरणार्‍या व्यक्तीला आपण घोरतो हेच अनेक वेळा माहीत नसतं.

भारतात रेल्वेने प्रवास करायचा आणि आपण स्वितझर्लंडच्या रिकाम्या ट्रेनमधून रोमँटिक प्रवास करतोय अशा अपेक्षा ठेवणार्‍या सर्वांना पद्मभूषण मिळू शकतं. झेलम एक्सप्रेसला पूर्वॉ ग्वालियर गेलं कि लोक रिझर्व्ड डब्यात घुसत आणि तीन जणांच्या सीटवर बसत. मी एक दोनदा हटकलं. पण वारंवार जावं लागत असल्याने टॉलरन्स वाढला. एकदा एकाने सांगितलं कि आम्ही आग्र्याला राहतो आणि दिल्लीला नोकरी करतो. आमच्यासाठी डेक्कनक्वीन सारखी ट्रेन नाही. मग आम्हाला नाईलाजाने अशा ट्रेनमधे बसावं लागतं.

एकदा तर टीसीने सांगितलं कि पंगा घेत नाही आम्ही. एका टिसीला चालत्या ट्रेनमधून फेकून दिलं आहे.
आपण कधीतरी प्रवासाला चाललेलो असतो. आपल्याला एव्हढा त्रास होतो. पण यांना रोजचा त्रास आहे. सोयी नाहीत. कोण असलं जिणं मजेसाठी जगेल? आपण राहतो त्या देशाची परिस्थिती कशी आहे हे माहिती असेल तर आपणच शहाणपणाने घ्यावं. '

एसटी बसमधे रिझर्वेशन असलं कि आख्खी बस आपल्या मालकीची झाली असं समजतात काही लोक. एसटी बस ही सार्वजनिक व्यवस्था आहे. तिच्यावर अवलंबून असलेले लोक कोटीत आहेत. जेव्हढी आसनं तेव्हढ्यांनाच घेणार असं करता येत नाही. एक बसलेला पुणेरी माणूस मधे उभ्या असलेल्या लोकांवर "काय जनावरं आहेत" छाप कटाक्ष टाकत खेकसत होता. ब्रेक दाबल्यावर एक बाई त्याच्या अंगावर रेलली. हा इतका बोलला तिला. तिने मग त्याची हजेरी घेतली. कंडक्टरने पण खाली उतरवीन असा दम दिला.

परिस्थिती डोळ्याने द्सिfunction at() { [native code] }एय तरी असा तर्‍हेवाईकपणा करणारे दिसतात.
तर तम भाव !

मुद्दा - जिथे लोक मुद्दामून करत नाहीत, नाईलाज आहे, तिथे हेकटपणा करणं कधी अंगाशी येईल सांगता येत नाही. मुद्दामून एसयुव्ही उभी करणं हा उद्दामपणा आहे. पण असं निरीक्षण आहे कि जर ती एसयुव्ही काळी असेल तर लोक लांब गेल्यानंतर बडबड करतात. त्याला कुणी सांगायला जात नाही.

<<झेलम एक्सप्रेसला पूर्वॉ ग्वालियर गेलं कि लोक रिझर्व्ड डब्यात घुसत आणि तीन जणांच्या सीटवर बसत. मी एक दोनदा हटकलं. >>
हा अनुभव आहे, झेलम, गोवा एक्स्प्रेस, दक्षिण एक्स्प्रेस वगैरेचा. खाली सरका सरका करून बसतातच, वरच्या बर्थवर कुणी झोपलं असेल बर्थ रिझर्व असणारे तर त्याला ही उठवून बसवत आणि चढून बसत हटकलं तर म्हणत "रिझर्व्हेशन है तो रात को सो जाओ. दिन मे गप शप करो, ताश खेलो, ट्रेन मे घुमो फिरो, कौनसा स्टेशन आता है देखो, उतरो चढो, खाओ पीओ. "

माझा मित्र घोरतो. परदेशात आहे, मराठी, मध्यमवर्गीय, पुणेरी इ. इ. आहे.
आम्ही एकत्र कुठे जातो तेव्हा कायम सीपॅप मशीन आणि डिस्टिल्ड वॉटर घेऊन फिरतो. घरी झोपताना ही वेगळ्या बेडरुम मध्ये झोपतो किंवा सीपॅप लावतो. आणखी काही प्रश्न असेल तर विचारा.

कैच्या कै. विमानप्रवासात सीपॅप मशीन कसे वापरणार रात्री? माझ्यामतेतरी कुणी ठरवून घोरत नाही. पण तरी कुणाला त्रास होत असेल तर कानात घालायला बोळे देतात, ते वापरावेत. ज्याला त्रास होतो त्याने स्वतः न झोपणे किंवा डॉक्टर खरे म्हणाले तसे स्वतःची स्वतंत्र रूम घेणे हे जास्त सोपे आहे. घोरणाऱ्या व्यक्तीने सुद्धा नाकाला क्लिप मिळते ती लाऊन त्रास कमी करायचा प्रयत्न करावा. (क्लिपची फक्त जाहिरात बघितली आहे, प्रत्यक्ष अनुभव नाही).

मुळात सिव्हिक सेन्स वापरून वागले आणि समजूतदारपणा दाखवला, तर सगळ्यांना बरे पडते. ही साधी अपेक्षा असावी.

<< त्या दिवशी दुपारी झोप घेऊन रात्री अगदी घरच्या सारखं न झोपता गजर लावून तीन चार तासांनी उठून ....>>
एनटायटल्ड वृत्तीचा एक नमुना.

मला तर कितीही गोंधळात झोप येते
ट्रेन मध्ये तर फार छान झोप लागते.
....
ऑफिस ने पिकनिक ला नेलं होतं
तिकडे स्पीकर वर ढाणाणा गाणी वाजत होती, बाजूलाच एक बाक होता तिकडे बसल्या बसल्या झोपी गेले.
लग्न समारंभ असेल तर त्या हॉल मध्ये बसायला गाद्या असतात तिकडे झोपी जायचे मी लहानपणी
कॉलेज मध्ये फर्स्ट बेंच वर बसून झोपा काढल्यात
कुणी जास्त बडबड करत असेल तरी झोप येते हल्ली ऐकण्याची आणि बोलण्याची कॅपॅसिटी कमी झालीये
..
आता तु क टाळण्यासाठी म्हणून असं कुठेही झोप लागू देत नाही Proud

निकड असलेले लोक, त्या केसेस वेगळ्या. आपल्या रेल्वे सिस्टीम मधे सर्वत्र असे स्थानिक लोकांनी तयार केलेले पॅटर्न्स आहेत. ३६ तास चालणार्‍या गाडीच्या मधल्या कोणत्यातरी दोन स्टेशन्स मधे अनेक लोक चढतात, तेवढ्यापुरती गर्दी करतात आणि नंतर उतरून जातात.

आपल्यामुळे लोकांना होणार्‍या त्रासाची फिकीर नसणे आणि कोणी सांगितले तर आडमुठेपणा करणे - ममोंचा मुद्दा त्याबद्दल असावा. अशी होणारी गैरसोय, त्रास जर दुसर्‍या व्यक्तीकडे पर्याय नसल्याने झाला तर ते वेगळे. त्याची कारणे कळाली तर बहुतेक लोक अ‍ॅडजस्ट करतात असे पाहिले आहे.

मला तर कितीही गोंधळात झोप येते >>> सेम हिअर....सद्य स्थितीत माझ्या दृष्टीने माणसाला जेवणासाठी जशी मुळात भूक हवी मग काहीही मिळालं तरी खाल्ले जातं, तशी झोप येण्यासाठी मुळात झोप हवी, बाकी काळोख, शांतता, अंथरुण-पांघरुण इ. इ. सर्व चोचले आहेत...कदाचीत वय वाढल्यावर झोपेचे हे गणित बिघडूही शकेल....पण सध्या तरी जो है, वो है. Happy

किल्ली, तुला अमेरिकेचा प्रेसिडेंट व्हायचा चांस आहे! Wink तशीही तू युएसए मधलीच ना! Proud
उपाशी बोका, स्ट्रॉमॅन केला की वाचयला मजा येते जाम! Lol मुद्देवंचित नाही, पण सगळं उलगडलं की मजा जाईल त्यामुळे बोलत नाही. आता मुद्देवंचित नाही सांगायची वेळ येते फा च्या लेखामुळे. Lol आता हे ही रिकर्सिव्हली मुद्देवंचितात टाकता येईलच! Lol

मला पण कुठेही झोप येते. बस मध्ये उभ्या उभ्या इंजिनिअरिंगची चार वर्षे येता जाता झोपलो आहे. बस मध्ये उभ्याने झोपलं की मध्येच गुडघ्यात पाय मुडपतो Lol
अजुनही बस, ट्रेन,घरात बाहेर कुठेही कधी ही झोपू शकतो. हल्ली सकाळी मात्र ६ ला जाग येऊ लागली आहे. आता शिळोप्याच्या गप्पाच हाणायच्या तर मग!.... Proud

माझी झोप फार नाजुक. ट्रेनमध्ये घोरणारे असतात. अपरात्री स्टेशन आलं की तिथे कुणी चढणारे उतरणारे असतील तर ते सताड (वेगळीच विशेषणे देण्याची फॅशन आलीय ना) दिवा लावतात, उतरणारे तर बंद न करता निघून जातात. चढलेल्यांध्ये काही फोनचा फ्लॅश लाईट लावून, आवश्यकच असेल तर दिवा लावुन पटकन बंद करून रिडींग लॅम्प लावणारे विचारी लोकही असतात (मायबोलीकरांसारखे) पण विरळाच.

मी आय ब्लाईंड आणि इअर प्लग्ज घेऊन जातो. इअर प्लग्ज तासाभरात बाहेर येतात. ते एका अर्थी चांगले ही. (रात्रभर कानाचा बोगदा बंद ठेवू नये इति ENT डॉक.) बाजूला कुणी घोरणारे असेल तर मी झोपेची अर्धी गोळी घेतो. (टिनीटस साठी गरज पडेल तशी घेण्यास मला प्रिस्क्राईब केली आहे.) ती फास्ट ऍक्टिंग आहे. पाच- दहा मिनिटात झोप येऊ लागते. ती घेऊन पंधरा वीस मिनिटात झोपलं नाही तर उपयोग नाही. झोप यायला लागली की कानात इअर प्लग्ज घालुन टाळी वाजवून किंवा हळूच टपली मारून किंवा पांघरुणाला झटका देऊन घोरण्याऱ्याची तंद्री भंग करतो. एवढ्याने त्याला जाग येत नाही पण तंद्री भंग होऊन घोरण्यात थोडा खंड पडतो. परत पूर्ण पट्टी लागायला वेळ लागतो. तेवढ्यात वेळात डोळ्यावर ब्लाइंड घेऊन झोप लागली तर बिंगो!
नाही तर मग लागेल तेव्हा लागली तर लागली. बहुत करून आपले स्टेशन जवळ आले की लागते. (काही लोकांची निर्मिती देव नाही, मर्फी करतो.)

घोरणे टाळायला नसल स्ट्रिप्स मिळतात ना, त्याचा फायदा होत नाही का? निदान आवाज थोडा कमी व्हायला. हे वापरणारे कुणी पाहिलं नाही क्रिकेटपटु वगळता.

स्टेशन यायची वेळ आली की मला ही अनावर झोप येते. Lol संपूर्ण विमानात बघ बघ पिक्चर बघितले की लँडिंगच्या आधी २० मिनिटे ते टॅक्सी करुन गेटला लागे पर्यंत अगदी ब्रह्मानंदी टाळी प्रकारची झोप लागते. डोळे उघडूच शकत नाही प्रकार होतो.
झोपची गोळी हवी असेल तर बेनाड्रिल घ्या. ओव्हर द काऊंटर आणि एक नंबर ड्राऊझी आहे, वर अ‍ॅलर्जी पळून जाईल हा एक साईडिफेक्ट Wink
अ‍ॅलर्जीने सर्दी आणि अशाच अनावर शिंका चालू झाल्या की बेनाड्रिल घ्यायला फार मस्त वाटतं. डोळ्यावर मेल्यासारखी झापड येऊन झोपण्यात एक वेगळीच मजा असते. ड्राईव्ह मात्र अजिबात करू नका.
एक नॉन ड्राऊझी गोळ्या आणलेल्या तर छ्या! काही मजाच नाही. अ‍ॅलर्जी तशीच परत डेंजर झोप आली पाहिजे ती आलीच नाही. काय फायदा मग त्या अ‍ॅलर्जीचा! ऑ!

Pages