थोड्याफार फरकाने मला रेल्वे आणि विमानप्रवासात अलीकडच्या वर्षांत बऱ्याचदा असे अनुभव आले आहेत.
कोकणरेल्वेने नवऱ्यासोबत गावी जायला निघाले होते. तब्येत ठीक नव्हती. दोन कंपार्टमेंट सोडून असणाऱ्या सीटवर गुजराती लोकांचा एक मोठा फॅमिली ग्रुप होता. गोव्याला जात असावेत. नेहमीप्रमाणे त्यांनी बचाबचा खायला सुरुवात केली. रात्रीचे अकरा वाजून गेले होते तरी मोठा स्पीकर लावून सर्वांनी गाणी गायला सुरुवात केली. आजूबाजूला आपल्या गावी जाणाऱ्या कोकणी चाकरमानी लोकांची गर्दी. दबक्या आवाजात सर्वांनी अरे आता झोपायची वेळ झाली कुणीतरी यांना गाणी बंद करायला सांगा अशी कुजबुज सुरु केली. प्रत्यक्षात कुणीच त्यांना सांगायला जाईना. आमच्या बाजूच्या सीटवर बसलेल्या काकांचा आवाज जरा वाढला. पण तोही फक्त बाजूला बसलेल्या माणसांसमोर. अरे काय माणसं आहेत, किती तो गोंधळ, किती तो आम्हाला त्रास वगैरे वगैरे. पण हे सर्व त्यांना तिथे जाऊन सांगायची हिंमत होईना. TCने येऊन अगदी सौम्य आवाजात जरा टोकलं तर ते लोक अगदी निर्लज्जपणे क्या हैं वो फॅमिली फॅमिली थोडा एन्जॉय कर रहे हैं अभी थोडे देर मे बंद कर देंगे असे अगदी गोड आवाजात सांगायला लागले. (असेच गोडगोड बोलून १०० ची गोष्ट १००० ला विकतात). पण अर्धा तास होऊन गेला तरीही आवाज सुरूच. वरच्या सीटवर बसलेला एक तरुण म्हणायला लागला मी सांगतो त्यांना मी रेल्वेतच कामाला आहे. पण असं दोन तीन वेळा बोलून झाल्यावरही आपल्या सीटवरून तो खाली उतरला नाही. माझी तब्येत बरी नव्हती, झोपायचं होतं. ह्यांच्या भसाड्या गाण्यांमुळे डोकं अतिशय दुखत होतं. शेवटी नवऱ्याला म्हटलं चल जाऊया तिकडे. दोघेही तणतणत गेलो आणि जोरजोरात शिव्या घातल्या आणि आता आता तुमची गाणी बंद नाही केलात तर स्पीकर गाडीतून खाली फेकून देईन, आवाज अगदी बंद झाला पाहिजे असं किंचाळले. त्या ग्रुपमधल्या तरुण मुलांनी दात काढून फिदीफिदी हसायला सुरुवात केली. पण त्यांच्यातल्या प्रौढ लोकांना काय वाटलं काय माहित त्यांनी गाणी अगदी बंद केली. यात आश्चर्य म्हणजे आजूबाजूला सर्व मराठी कुटुंबं होती पण एकही आमच्या बाजूने त्या लोकांना खडसवायला आला नाही. तोंडातल्या तोंडात पुटपुटत सीटवरच बसून त्यांचा काही निषेध चालला होता तोच.
त्यांना गप बसवून आमच्या सीटवर परत आलो तर रेल्वेत काम करणारा मुलगा त्याच्या सीटवर पांघरूण तोंडावर ओढून झोपून गेला होता. काही वेळाने त्या कुटुंबातला मोठा काका आमच्या सीटजवळ आला आणि माझ्या आजूबाजूला बसलेल्या लोकांना सांगायला लागला. वो क्या हैं ना सब फेमिली गोवा घुमने जा राहा हैं ना तो जरा मजा मस्ती मे गा रहा था. त्यावर आमच्या बाजूच्या सीटवर बसलेले काका जे सीटवर बसल्या बसल्या त्यांना शिव्या घालत होते ते अगदी प्रेमाने त्या गुजराती माणसाच्या पाठीवर अलगत थोपटत म्हणाले. कूच नही चलता हैं.
तुम्हालाही प्रवासात असे अनुभव आले असतील तर शेअर करा.
आधी केले मग सांगीतले
आधी केले मग सांगीतले
माझा झाला बघून
हर्पेन,
हर्पेन,
The moment you label something you stop experiencing it, you experience the label instead - पटलं, मार्मिक कोट आहे. होतं असं हा स्वानुभव.
हर्पेन,
हर्पेन,
The moment you label something you stop experiencing it, you experience the label instead - पटलं +१२३
मा पृ - होय होतं खरं असं, पण
मा पृ - होय होतं खरं असं, पण म्हणूनच आता जर असं कळलंय तर वळायचा प्रयत्न असतो. हे ही कळलंय की लेबलपलीकडे जाणे फार अवघडही नाही.
सगळे रेल्वे परवासाबद्दल बोलत
सगळे रेल्वे परवासाबद्दल बोलत आहेत विमानाबद्दल कोणीच बोलत नाही. धागा ज्यांनी काढलाय त्यांना विमान प्रवासाचे अनुभव पण अपेक्षित आहेत हे त्यांनी लिहिलं आहे. तर ती एक पावसाळी रात्र होती. मी मुंबईवरून दिल्लीला जात होतो. सगळे लोक्स घाबरले होते. आम्ही विमानात आपापल्या सीटांवर जाऊन बसलो. एयर होस्टेस आली आणि बोलली घाबरू नका मी आहे ना. तिच्या आवाजात एक आत्मविश्वास होता. आम्ही सगळे आश्वस्त झालो. थोड्या वेळाने ती गायब झाली. आम्ही बोललो जाऊ दे गेली असेल चहा आणायला. विमान ढगात गेल्यावर ती परत आली आणि बोलली चला आपण जरा टेन्शन फ्री होऊ. मग तिने झिंगाट गाण्यावर डांस सुरू केला. आम्ही सगळे देहभान हरपून तिच्यासोबत नाचू लागलो. नाचता नाचता मी पायलट केबिनमध्ये गेलो आणि माझी बोबडीच वळली. त्या सिटवर पायलट नव्हताच. मी किंचाळत बाहेर आलो आणि बोललो विमानात पायलट नाही तसे सगळे थरथर कापायला लागले. एयर होस्टेस बोलली घाबरू नका मीच पायलट आणि मीच होस्टेस आहे. मी कॉम्प्युटर गेममधून विमान उडवायला शिकले आणि आता प्रॉब्लेम असा आहे की मला ते उतरवायचं कसं ते माहीत नाही. ते ऐकून सगळे सैराट पळायला लागले. मी विमानात पॅराशूट कुठे आहे ते बघून ठेवलं होतं. मग मी खिडकी उघडून जंप मारली आणि सुखरूप जमिनीवर उतरलो. पुढे त्या विमानाचं काय झालं माहीत नाही.
छान धागा, प्रतिसाद ही.
छान धागा, प्रतिसाद ही.
गुजरात्यांना बोलण्यात अर्थ नाही, हे सगळीकडेच घडते.
परदेशात म्हणजे सगळं अगदी बेस्ट असं आपल्याला वाटत. आम्ही लंडन हून स्कॉटलंड ला जात होतो ट्रेन ने. हा ट्रेनचा प्रवास सिनिक ब्युटी म्हणून प्रसिद्ध आहे, इतका की विमान भाड्यापेक्षा गाडीची तिकिटं कधी कधी महाग असतात. ट्रेन ही छान स्वच्छ आणि सुपर फास्ट होती. हवा ही फारच छान होती. प्रवासात खूप मजा येईल अशी अपेक्षा होती पण आमच्या जवळ पाच सहा मुलं बसली होती आणि त्यांचा अखंड दंगा चालू होता. गाणी गप्पा खिदळणे वगैरे .. सगळ्या प्रवासाची मजाच निघून गेली . इकडे पण हे चालतं ह्या विचाराने आवक /हैराण झाले मी.
रात्रीच्या ट्रेन मध्ये घोरणारे हा एक अफाट त्रासाचा विषय आहे. एकदा तर एक माणूस अक्षरशः वाघाच्या डरकाळ्या वाटाव्यात असा घोरत होता. हे डाराडूर झोपतात आणि आम्ही मात्र ह्यांच्या घोरण्यामुळे जागे. घोरणाऱ्यांच्यात पुरुषच जास्त असतात असं माझं निरीक्षण आहे. बायका एवढ्या जोरा जोरात घोरत नाहीत असं मला वाटत.
घोरणाऱ्यांच्यात पुरुषच जास्त
घोरणाऱ्यांच्यात पुरुषच जास्त असतात असं माझं निरीक्षण आहे. बायका एवढ्या जोरा जोरात घोरत नाहीत असं मला वाटत.>> एकदम मनातलं बोललात.
बायका दिवसभर बोलून बोलून गळा साफ करतात, पण पुरूषांना बोलायलाच मिळत नसल्याने त्यांचे घशात अडकलेले शब्द, भावना घोरण्यातून बाहेर पडत असतील.
गुजराती लोकांच्या ग्रुपला
गुजराती लोकांच्या ग्रुपला चारचौघात वावरण्याचा सेन्स नसतो असं मला वाटतं. मोठमोठ्याने बोलणे, कितीही शांत जागा असेल तरी एकमेकांना हाका मारणे, रांगा मोडून किंवा एका माणसापाठी ४-५ जण घुसवणे,इतरांच्या पर्सनल स्पेसची जाणीव नसणे वगैरे गोष्टी मीही ऑब्झर्व्ह केल्या आहेत.
अगदी मलबार हिलमधले गुजराती कसे वागतात माहित नाही. पण गरीब, मध्यमवर्गीय वगैरे सर्व लोकांत ही प्रवृत्ती दिसते.
खाणे खाऊन झाल्यावर आजूबाजूला कचरा करणे यात सर्वच भारतीय सामील असतात. पण इतर राज्यातल्या लोकांचं पब्लिक प्लेसमध्ये खाण्याचं प्रमाण गुजरात्यांपेक्षा कमी असल्याने त्यांना तेवढ्या शिव्या बसत नसाव्यात.
बाकी फ्लॅश मॉब, गरबा, भजन, कीर्तन, ढोल, गणेशोत्सव/दहीहंडी/नवरात्र, जयंत्या मयंत्या वगैरे गोष्टी ज्याचा डेसिग्नेटेड वापर काहीतरी वेगळा आहे अश्या कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी करू नयेत असं मला वाटतं. ज्यांना हौसेपोटी किंवा रीळं बनवण्यासाठी लोक जमवून या गोष्टी करायच्या आहेत त्यांनी पैसे मोजून कुठली तरी जागा तात्पुरती/कायमस्वरूपी आणि नियमात बसेल तेवढ्या गोष्टी कराव्यात.
फ्लॅश मॉब, गरबा, भजन, कीर्तन,
फ्लॅश मॉब, गरबा, भजन, कीर्तन, ढोल, गणेशोत्सव/दहीहंडी/नवरात्र, जयंत्या मयंत्या वगैरे गोष्टी ज्याचा डेसिग्नेटेड वापर काहीतरी वेगळा आहे अश्या कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी करू नयेत असं मला वाटतं. >>+१००
रस्त्यावर सण करायला कुणी
रस्त्यावर सण करायला कुणी सुरूवात केली?
तेच लोण पुढे बहुजन समाजात झिरपलं. फक्त पुण्यातल्या दोन ते तीन पेठांत असलेला गणेशोत्सव वर्तमानपत्रातून कौतुकाने फोटो छापत, बातम्या देत लोकप्रिय करत नेला. पुढे तो आजूबाजूच्या पेठांत गेला. मग दहा दिवस जुनं पुणं बंद राहू लागलं. तेव्हांच या गोष्टी बंद करता आल्या असत्या. आता हे बंद करता येण्याच्या पलिकडे आहे माहिती असताना असं व्हायला हवं हे बोलण्यात अर्थ नाही.
प्रगत समाजाने आदर्श घालून दिला असता तर झाले असते. भाजप सरकारने बुलडोझर संस्क्रुती आणली आहे. त्यांनी सणाच्या वेळी रस्ते बंद होणार नाहीत असा कार्यक्रम हाती घ्यावा. सगळीकडे समान कारवाई झाली तर विरोध होणार नाही.
>>पैसे मोजून कुठली तरी जागा
>>पैसे मोजून कुठली तरी जागा तात्पुरती/कायमस्वरूपी आणि नियमात बसेल तेवढ्या गोष्टी कराव्यात. >> एक पाऊल पुढे जाऊन त्या परवानगी घेऊन केलेल्या गोष्टी ही नियम ताणत-वाकवत करू नये की पुढच्या वर्षी तुमच्या आधी केलेल्या जुगाडाला जागुन त्या जागेला तुम्हाला हे प्रकार परत करता येऊ नये म्हणून नियमच बदलावे लागतील.
नियमात होतं, कायदा तोडलेला नाही हे पालुपद ऐकायची कोणाची इच्छा नसते. सिविलाईज्ड जगात नियम तसे शिथिल बनवलेले असतात कारण इतकं टोकाला जाणारे फार कुणी नसते.
इथे दसर्याला वीकडेला रावणदहन मैदानात आयोजित केलं होतं. सीटीने परवानगी दिली ते एक महामूर्ख लोक. शाळा चालू आहेत आणि वीक-डेला रात्री नेबरहुडाच्या जवळच्या मैदानात रात्री ९ वाजता स्पीकर लावून पार्किंग पेक्षा जास्त गर्दी झाल्याने आणि .... गटात आलं की भारतीयांचा सिविकसेन्सचे बारा वाजतात... या न्यायाने अस्ताव्यस्त पार्किंग लोकांनी केलं. बाय-लॉ-ला तिकिटे द्यायला बोलवायला लागलं. घरं जवळ असताना रावण दहन करायची, दसर्याला फॉल सुरू झालेला असतो, ड्राय वेदर असतं. जाळपोळ करायची ... हो फायर ट्रकला बोलावलेलं.... तरीही काहीही गरज न्हवती. ब्रॅमटनला करतात, मिसिसागाला करतात तर आपण का मागे ... अशा महाचक्रम विचारांचे देसी लोक असतात. रात्री नवाला ढोलताशे बडवायची वेळ आहे का? संयोजक आणि ते ढोल ताशे वाले, सगळ्यांना तिकिटं द्यायला हवी होती.
लोकांनी देसी लोकांच्या आणि सिटीच्या नावाने जाम आरडाओरडा केला.
आता परत ते पार्क या असल्या बेअक्कल लोकांना सिटीने देऊ नये. जिकडे देतील तिकडे प्रायव्हेट सिक्युरिटी हवी, पोलिसांचा जास्त खर्च करुन असले इव्हेंट पेड करण्याशिवाय गत्यंतर नाही वेळ आणावी.
>>>>>बायका एवढ्या जोरा जोरात
>>>>>बायका एवढ्या जोरा जोरात घोरत नाहीत असं मला वाटत.
आय डिसअॅग्री. जाडे लोक घोरतात. स्लीप अॅप्निआ असेल तर घोरतत. जेंडर न्युट्रल.
माबोवरच धागा आहे दिंड्या
माबोवरच धागा आहे दिंड्या पताके घेउन वारकरी अमेरिकेत निघतत. वारकरी म्हणजे (वारी करणारे नाहीत) तर २ दिवस देवाचा कढ आलेले, मौजमजा करणारे. आणि या मूर्खपणाला माबोवर लोकांनी पाठिंबा दाखवलेला आहे.
अमेरिकेतील/ कॅनडातील वारकरी
अमेरिकेतील/ कॅनडातील वारकरी शांतपणे ट्रेलवर चालतात. मी बघितलं आहे त्यात तरी कुणाच्या अध्याय ना मध्यात फॅन्सी ड्रेस घालून टाळ वगैरे असतील तर ते घेऊन चालतात. ते महाराष्ट्रातील वारकऱ्यांसारखा रस्ता बंद करत नाहीत का जागोजागी हागत नाहीत का सगळा मार्ग फेकलेल्या अन्नाने आणि अस्ताव्यस्त कचऱ्याने गलिच्छ करत नाहीत. माझा त्याला अजून तरी पूर्ण पाठिंबा आहे.
त्यातही ढोल-ताशे आले तर मग अजिबात पाठिंबा असणार नाही. एकूणच ढोल ताशे प्रकार कुठेही डोक्यात जाणारा आहे.
विषय निघाला म्हणून... घोरत
विषय निघाला म्हणून... घोरत असाल तर ते हृदयाला चांगलं नाही. का घोरताय ते शोधून गरज असेल तर CPAP (Continuous Positive Airway Pressure) मशीन लावून झोपा. प्रचंड फरक पडतो आणि झोप चांगली लागते, दिवस उत्साहात जातो इ. इ. एक मित्र वापरतो आणि तो अत्यंत गुणकारी इलाज आहे.
ते कसं काम करत ते गुगल करून वाचा.
विषय निघाला म्हणून... घोरत
विषय निघाला म्हणून... घोरत असाल तर.... >>> बोकलतांचा पुढचा प्रतिसाद लिहायचा अंदाज देखील चुकावा, इतक्या सुळ्ळकन् धागा या ट्रॅक वरुन त्या ट्रॅकवर पळतोय....
सॉरी
तरी ते कसं काम करत लिहिण्याचा उत्साह मी टाळला. त्याचं काहीच नाही
ट्रॅकवर ठेवण्यास ही दोन
ट्रॅकवर ठेवण्यास ही दोन वाक्ये ऍड करा:
रेल्वेत एक CPAP कोच असावा, घोरणाऱ्यांसाठी राखीव.
या कोचेसचा खर्च गुजरात कडुन वसूल करावा.
>>>>>प्रचंड फरक पडतो आणि झोप
>>>>>प्रचंड फरक पडतो आणि झोप चांगली लागते, दिवस उत्साहात जातो इ. इ.
+१ इट्स अ गेम चेन्जर.
विषय बंद होण्यापूर्वी घाई
विषय बंद होण्यापूर्वी घाई करायला हवी
आमचा एक काका असाच डरकाळी घोरासुर आहे. लहानपणी आम्ही रात्रीचे रेल्वे प्रवास करताना कधी डब्यात इकडे तिकडे फिरत असू तेव्हा त्याच्या घोरण्यावरून मागोवा घेत नेमकी आपली जागा हुडकत असू.
(बाकी मूळ विषयाला धरूनही बरंच लिहायचं आहे..)
विषय बंद होण्यापूर्वी घाई
विषय बंद होण्यापूर्वी घाई करायला हवी Proud>>>

रेक्वेने सोय केली आहे.
रेक्वेने सोय केली आहे. त्यामुळं विषयाला धरूनच आहे.
अमितव, प्राचीन घोरावाडी
अमितव, प्राचीन

घोरावाडी
बाकी फ्लॅश मॉब, गरबा, भजन,
बाकी फ्लॅश मॉब, गरबा, भजन, कीर्तन, ढोल, गणेशोत्सव/दहीहंडी/नवरात्र, जयंत्या मयंत्या वगैरे गोष्टी ज्याचा डेसिग्नेटेड वापर काहीतरी वेगळा आहे अश्या कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी करू नयेत असं मला वाटतं. >> +१
नको तिथे नाच केला की असं होतं आणि डिपोर्ट व्हावं लागतं.
आज आमच्या इथे पिओनी फुलांच्या
आज आमच्या इथे पिओनी फुलांच्या बागेत उत्सव - वसन्त ऋतुमध्ये फुले फुलतात - होता.
तिथे अनेक विएतनमीज वय वर्षे २० ते ७० हे त्या झुडुपांच्या मध्ये जाऊन, तुडवत, तोडत फक्त फोटो फोटो करत धिंगाणा घालत होते. एक ग्रुप १०-१५ जणांचा सेल्फी काढत जोरात दंगा करु लागला, गोल करुन नाचू लागला.
बाकी आलेले सर्व वैतागून गेले होते.
हनोई विमान तळावर धावपट्टीवर गरबा केलेल्या लोकांची आठवण आली.
तुमचं निरीक्षण पूर्णपणे
तुमचं निरीक्षण पूर्णपणे चुकीचं आहे असं मला वाटत नाही. माझाही वैयक्तिक अनुभव अनेकदा याच दिशेने गेलेला आहे. अर्थात, एखाद्या समुदायाबद्दल किंवा विशिष्ट भौगोलिक पार्श्वभूमीच्या लोकांबद्दल सरसकट निष्कर्ष काढणं योग्य नाही, हेही तितकंच खरं आहे. पण एकच प्रकारचा अनुभव पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी येऊ लागला की त्यामागे काही सामाजिक किंवा सांस्कृतिक कारणं असू शकतात का, हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे.
माझ्या निरीक्षणात एक गोष्ट वारंवार आली आहे—सार्वजनिक ठिकाणी स्वतःचा उत्साह, आनंद किंवा आर्थिक सुबत्ता खूप ठळकपणे प्रदर्शित करण्याची एक प्रवृत्ती काही लोकांमध्ये दिसते. त्यात स्वतः मजा करणं हा प्रश्न नसतो; पण त्या प्रक्रियेत आजूबाजूच्या लोकांची शांतता, त्यांचा वैयक्तिक अवकाश किंवा त्यांचा अनुभव यांचाही विचार व्हायला हवा. दुर्दैवाने अनेकदा तो होताना दिसत नाही.
मला स्वतःला इतका त्रासदायक अनुभव आला आहे की क्लब महिंद्राच्या काही प्रॉपर्टीजमध्ये जाणंच मी कमी केलं. तुंगी (लोणावळा), महाबळेश्वर आणि गोवा या ठिकाणी पूर्वी जाण्याचं मुख्य आकर्षण म्हणजे तिथली शांतता, निवांतपणा आणि निसर्गाशी जवळीक. पण गेल्या काही वर्षांत तिथे वाढलेल्या गोंगाटी आणि इतरांच्या सोयींची फारशी पर्वा न करणाऱ्या वर्तनामुळे तो अनुभव बऱ्याच प्रमाणात बदलला आहे. प्रश्न कोणत्या समुदायाचा आहे हा नाही; प्रश्न सार्वजनिक शिष्टाचाराचा आहे. पैसा, पर्यटन किंवा एन्जॉयमेंट यांचा आनंद जरूर घ्यावा, पण तो इतरांच्या अनुभवाच्या किंमतीवर नसावा, एवढीच अपेक्षा.
बायका दिवसभर बोलून बोलून गळा
बायका दिवसभर बोलून बोलून गळा साफ करतात, पण पुरूषांना बोलायलाच मिळत नसल्याने त्यांचे घशात अडकलेले शब्द, भावना घोरण्यातून बाहेर पडत असतील.
Submitted by Madan Hunkare on 6 June, 2026 - 13:56
म्हणजे पुरुषांचे दिवसभर दबलेले "हुंकार" रात्री सुप्तावस्थेत बाहेर पडून बायकांना त्रस्त करता असावेत का?
बाय द वे, जे घोरत नाहीत त्यांना "अघोरी" म्हणू शकतो का?
पालथे झोपा, घोरणे बंद. कशाला
पालथे झोपा, घोरणे बंद. कशाला हवीत महागडी मशिने आणि औषधे?
कुणी घोरू लागला की त्याच्या तळपायाला पीस फिरवून गुदगुल्या करायच्या. रेल्वेतही करू शकतो.
रेल्वेत तृतीयपंथियांचा त्रास
रेल्वेत तृतीयपंथियांचा त्रास असतो. पैसे नाहीत म्हटलं कि शिव्याशाप देतात.
आता रेल्वे पोलीस कारवाई करतंय असं वाचलं. धन्यवाद मोदीजी.
संघी निकले म्हणजे??
संघी निकले म्हणजे??
Pages