थोड्याफार फरकाने मला रेल्वे आणि विमानप्रवासात अलीकडच्या वर्षांत बऱ्याचदा असे अनुभव आले आहेत.
कोकणरेल्वेने नवऱ्यासोबत गावी जायला निघाले होते. तब्येत ठीक नव्हती. दोन कंपार्टमेंट सोडून असणाऱ्या सीटवर गुजराती लोकांचा एक मोठा फॅमिली ग्रुप होता. गोव्याला जात असावेत. नेहमीप्रमाणे त्यांनी बचाबचा खायला सुरुवात केली. रात्रीचे अकरा वाजून गेले होते तरी मोठा स्पीकर लावून सर्वांनी गाणी गायला सुरुवात केली. आजूबाजूला आपल्या गावी जाणाऱ्या कोकणी चाकरमानी लोकांची गर्दी. दबक्या आवाजात सर्वांनी अरे आता झोपायची वेळ झाली कुणीतरी यांना गाणी बंद करायला सांगा अशी कुजबुज सुरु केली. प्रत्यक्षात कुणीच त्यांना सांगायला जाईना. आमच्या बाजूच्या सीटवर बसलेल्या काकांचा आवाज जरा वाढला. पण तोही फक्त बाजूला बसलेल्या माणसांसमोर. अरे काय माणसं आहेत, किती तो गोंधळ, किती तो आम्हाला त्रास वगैरे वगैरे. पण हे सर्व त्यांना तिथे जाऊन सांगायची हिंमत होईना. TCने येऊन अगदी सौम्य आवाजात जरा टोकलं तर ते लोक अगदी निर्लज्जपणे क्या हैं वो फॅमिली फॅमिली थोडा एन्जॉय कर रहे हैं अभी थोडे देर मे बंद कर देंगे असे अगदी गोड आवाजात सांगायला लागले. (असेच गोडगोड बोलून १०० ची गोष्ट १००० ला विकतात). पण अर्धा तास होऊन गेला तरीही आवाज सुरूच. वरच्या सीटवर बसलेला एक तरुण म्हणायला लागला मी सांगतो त्यांना मी रेल्वेतच कामाला आहे. पण असं दोन तीन वेळा बोलून झाल्यावरही आपल्या सीटवरून तो खाली उतरला नाही. माझी तब्येत बरी नव्हती, झोपायचं होतं. ह्यांच्या भसाड्या गाण्यांमुळे डोकं अतिशय दुखत होतं. शेवटी नवऱ्याला म्हटलं चल जाऊया तिकडे. दोघेही तणतणत गेलो आणि जोरजोरात शिव्या घातल्या आणि आता आता तुमची गाणी बंद नाही केलात तर स्पीकर गाडीतून खाली फेकून देईन, आवाज अगदी बंद झाला पाहिजे असं किंचाळले. त्या ग्रुपमधल्या तरुण मुलांनी दात काढून फिदीफिदी हसायला सुरुवात केली. पण त्यांच्यातल्या प्रौढ लोकांना काय वाटलं काय माहित त्यांनी गाणी अगदी बंद केली. यात आश्चर्य म्हणजे आजूबाजूला सर्व मराठी कुटुंबं होती पण एकही आमच्या बाजूने त्या लोकांना खडसवायला आला नाही. तोंडातल्या तोंडात पुटपुटत सीटवरच बसून त्यांचा काही निषेध चालला होता तोच.
त्यांना गप बसवून आमच्या सीटवर परत आलो तर रेल्वेत काम करणारा मुलगा त्याच्या सीटवर पांघरूण तोंडावर ओढून झोपून गेला होता. काही वेळाने त्या कुटुंबातला मोठा काका आमच्या सीटजवळ आला आणि माझ्या आजूबाजूला बसलेल्या लोकांना सांगायला लागला. वो क्या हैं ना सब फेमिली गोवा घुमने जा राहा हैं ना तो जरा मजा मस्ती मे गा रहा था. त्यावर आमच्या बाजूच्या सीटवर बसलेले काका जे सीटवर बसल्या बसल्या त्यांना शिव्या घालत होते ते अगदी प्रेमाने त्या गुजराती माणसाच्या पाठीवर अलगत थोपटत म्हणाले. कूच नही चलता हैं.
तुम्हालाही प्रवासात असे अनुभव आले असतील तर शेअर करा.
सगळे "भारतीय" ("आपण" नव्हे )
सगळे "भारतीय" ("आपण" नव्हे ) जणू काही एक सारखे आहेत असे समजणारे उंटावरचे शहाणे खूप डोक्यात जातात
घोरणं हे शरीरात काही बिघाड
घोरणं हे शरीरात काही बिघाड असल्याचं लक्षण आहे, हेच कित्येकांना माहीत नसतं.
बिग बॉसमधला अमल मलिक CPAP वापरतो. त्याला sleep apnea आहे.
त्याच्या घोरण्यावर नाही
त्याच्या घोरण्यावर नाही तोंडावर लगाम घालायला हवा आहे!

मग त्याला बिग बॉसमध्ये कशाला
मग त्याला बिग बॉसमध्ये कशाला बोलवलं असतं?
किल्लीने म्हटलंय तसं मलाही
किल्लीने म्हटलंय तसं मलाही कानात इअरप्लग घालून गाणं ऐकताना, मोनोटोनस कमेण्ट्री असलेला व्हिडीओ ऐकताना झोप येते. झोप नसते ती, गुंगी असते. झोपेने ताजंतवानं वाटतं. गुंगी आली कि जागं होताना त्रास होतो. गुं गुं गुं गुं होत राहतं. म्हणूनच गुंगी म्हणत असतील.
ट्रेनमधे रात्री खिडकी उघडी असेल तरी झोप येते. पण लोक लगेच बंद करतात. खिडकीतून येणारं वारं आणि लुंगी नेसली कि गुंगी येते.
मग घोरासूर येवो वा चुपके चुपके परिमल.
कुठे जाण्यासाठी जर ट्रेनने
कुठे जाण्यासाठी जर ट्रेनने रात्रीच जावं लागणार असेल किंवा जर तिकडे जाणारी ट्रेन देखील रात्रीच असेल तर मग अशा माणसाने काय करावे?
क्रिब मारावा, धागे काढावे,
क्रिब मारावा, धागे काढावे, रडगाणी गावी. बाकी काही अर्थात करायची गरज नाही. हा गुन्हा नाही. तुम्ही निश्चिंत असा!
कुठे जाण्यासाठी जर ट्रेनने
कुठे जाण्यासाठी जर ट्रेनने रात्रीच जावं लागणार असेल किंवा जर तिकडे जाणारी ट्रेन देखील रात्रीच असेल तर मग अशा माणसाने काय करावे? >> त्या ट्रेनने ममो जाणार नाहीत ही खात्री करून तिकीट बूक करावे.
ममो - ह. घ्या.
मराठी माणसे इथे आपसात भांडू
मराठी माणसे इथे आपसात भांडू लागली.
म्हणून लेकानो आपण गुजराती लोकांपेक्षा चार पैसे कमी कमावतो..
ते खाऊन पिऊन गाडीत दंगा घालतात
आणि मराठी माणसे खाया पिया कुछ नही, धाग्यावर दंगा घालतात..
ट्रेन मधे जागेपणी दंगा करणारे
ट्रेन मधे जागेपणी दंगा करणारे, इतर त्रास देणारे गुजराथी/लोक असा विषय होता.
ट्रेन मधे रात्री झोपेत घोरणारे पेशंट (हेच म्हणुयात आता कारण तो आजार आहे ते तरी नशिबाने इथे लोकांना मान्य आहे) मधे आणले गेले.तेही ट्रोल करण्याच्या सुरात...
मग त्या लोकांनी कसं सीपॅप मशीन सोबत नेलं पाहिजे, ते नेलं नाही तर ते कसे अनकल्चर्ड ( सीपॅप मशीन कसे दिसते, ते सोबत बाळगणे त्या माणसाला कितपत शक्य आहे, प्रवास करणार्या माणसाच्या इतर काय अडचणी आहेत हे काहीही माहित नसताना घोरणार्या माणसांना दिले गेलेले सल्ले बघुन धन्य झाले)
तुम्ही आणि तुमच्या जवळची मंडळी घोरत नाहीत याबद्दल अभिनंदन.सुखी रहा
घोरण्यामुळे होणारे त्रास, विविध मशिन्स, नाकाला लावायच्या पट्ट्या, उपचार इत्याची प्रयोग, त्याचा होणारा उपयोग पण त्याचबरोबर होणारे त्रास हे सगळं माहिती आहे.त्यामुळे आलेल्या कमेंट वाचुन रहावलं नाही आणि लिहिलं.
त्यातही भारताबाहेरील घोरणारे लोक कसे शहाणे असतात आणि भारतातले कसे मुर्खासारखे वागतात असा सूर बघुन खरच काय बोलावं यापुढे असं झालं...
खरतर माबोवर कोणत्याही वादात मी फारसं कधी पडत नाही पण यावेळी बोलावंस वाटलं..
पण न बोललेलं बरं हेच धोरण योग्य आहे हा धडा मिळाला
आता रेल्वेत घोरणाऱ्या दोन चार
आता रेल्वेत घोरणाऱ्या दोन चार माणसांचे खून पाडायचे बाकी आहेत, ते का एकदा पडले की साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण
त्या ट्रेनने ममो जाणार नाहीत
त्या ट्रेनने ममो जाणार नाहीत ही खात्री करून तिकीट बूक करावे.
युवी. >> ती खात्री लोकांनी कशी करावी?
आता सांगू नका मायबोली वर धागा काढून खात्री करून घ्यावी म्हणून.
आणि खात्री करण्यासाठी धागा काढणे ट्रेनने प्रवास करणाऱ्याला प्रत्येकाला शक्य ही नाही.
घोरण्याची समस्या असल्याने जर
घोरण्याची समस्या असल्याने जर झोपेच्या गोळ्या घेतल्या तर घशातले स्नायू शिथिल झाल्याने घोरणे वाढू शकते.
सलाईन नेजल स्प्रे हे जर नाक नाक स्नायूंमुळे बंद झाले असेल तर उपयोगाचे नसतात. ज्या स्प्रे मधे मेडिसिन असते ते जास्त काळ वापरले तर घोरणे वाढू शकते.
CPAP मशीन हा वैद्यकीय उपचार आहे. इतरांना त्रास होऊ नये म्हणून वापरायचा नाही.
तोंडाला टेप लावणे. रुमाल, पट्टी किंवा इतर वस्तूंनी हनुवटी/तोंड घट्ट बांधणे किंवा श्वासोच्छ्वासात अडथळा आणणारे कोणतेही "जुगाड" उपाय हे धोकादायक ठरू शकतात.
CPAP मशीन घेऊन प्रवास करणारा कुणीही अद्याप पाहिलेला नाही. हा खरोखर निर्धोक उपाय असेल तर करायला हरकत नाही. पण त्याबद्दल अवेअरनेस आहे असे वाटत नाही. एखादी रूजलेली, रुळलेली गोष्ट करण्यास नकार देणे हे मुद्दाम त्रास देण्याचे लक्षण म्हणावे लागेल. पण आपण सुचवत असलेले उपाय निर्धोक आहेत का याची चाचपणी तरी व्हावी. डॉक्टर सुद्धा असे सर्वसाधारण सल्ले ऑनलाईन देत नाहीत.
(यात कुणाला मजा येत असेल तर येवो. काही जण काहीही वाक्य लिहीतात आणि त्यापुढे स्मायल्या टाकतात, ते वाक्य खरंच विनोदी असते का हा संशोधनाचा विषय आहे. पण मग दुसरा व्यक्तीही तसेच सपक उत्तर देऊन स्मायल्या टाकतो, मग केविलवाणे स्मायल्यांचे युद्ध सुरू होते, हा प्रकार उबगवाणा असतो. तसंच एखाद्याला उगीचच मजा येणे हा ही. तुम्हाला राग आलाय तर एकवेळ शिव्या द्या. ते नैसर्गिक आहे, अधिकार असतील तर आयडी उडवा. पण बळंबळं हसणे हा अमानवीय प्रकार आहे. आवरा. या लक्षणांवर लेख येऊ शकतो, पण एव्हढा वेळ कुणाकडे आहे? )
कुठे जाण्यासाठी जर ट्रेनने
कुठे जाण्यासाठी जर ट्रेनने रात्रीच जावं लागणार असेल किंवा जर तिकडे जाणारी ट्रेन देखील रात्रीच असेल तर मग अशा माणसाने काय करावे?
हा प्रश्न बरोबर ( genuine) आहे.
मी सुद्धा राजधानी एक्सप्रेस ने जाताना एव्हीलची गोळी बरोबर घेऊन गेलो होतो.
एव्हील हे औषध खरं तर ऍलर्जी वर आहे पण त्याचा साईड इफेक्ट म्हणून झोप येते.
या औषधाला प्रिस्क्रिप्शन लागत नाही शिवाय १५ -२० रुपयात कुठल्याही केमिस्ट कडे मिळते.
यामुळे रात्री जर रेल्वेने जायचा प्रसंग आला आणि लोकांच्या घोरण्यामुळे झोप येणार नसेल तर हा उपाय नक्की करता येईल.
फक्त पहाटे लवकर उतरायचे असेल तर बरोबरच्या कुणाला तरी उठवायला सांगायला विसरू नका. काही लोकांना या औषधामुळे अति गाढ झोप लागते.
धिंगाणा एक्सप्रेस खूप
धिंगाणा एक्सप्रेस खूप वेगवेगळे स्टेशन्स घेत सगळीकडे फिरत आहे

ट्रेनमध्ये रात्री झोपमोड होण्यात आलेल्या स्टेशनचा वाटा मोठा असतो.
मध्यरात्री 2 वाजता तुम्ही कडप्पा स्टेशनवर आहात हे 3 भाषेत टिंग टॉंग सहित ऐकवले जाते आणि झोपमोड होते असा अनुभव.
South कडे जाणारया ट्रेनमध्ये ( चेन्नई एक्सप्रेस तिरुपती ला जाताना ) reservation डब्यात कोणी घुसलेले पाहिले नाही.
गर्दी गर्दी नव्हती.
2 की 3 वेळा तो अनुभव सुखद होता.
नॉन ac स्लिपर क्लास मध्ये.
महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये गोंदिया ते जळगाव येईपर्यंत भाउ जरा सरकून घ्या करणारे डेली ट्रॅव्हलर लोकं प्रत्येक स्टेशनवर वेगवेगळे सेट असायचे.
एकाला ऍडजस्ट करून उतरवला की पुढच्या स्टेशनवर तो उतरेपर्यंत दुसरा कुणीतरी आहेच, भाउ सरकून घ्या.
काय प्रकार म्हणून चौकशी केली तर त्यांना तिकडे लोकल, डेमु लोकल, पॅसेंजर नाहीत आणि डेली updown करायला महाराष्ट्र एक्सप्रेस सोयीची होती.
कारण ती सगळे स्टेशन घेत जाते.
नवीन माहिती / अडचणी कळल्या लोकांच्या.
रात्री मात्र त्रास नव्हता.
एक दिवस सर्व मायबोलीकरांना
एक दिवस सर्व मायबोलीकरांना एका लांब पल्याच्या ट्रेनमध्ये छोटे छोटे ग्रुप करून थोड्या थोड्या अंतरावर बसवायला हवे आणि प्रवासानंतर इतर अ-मायबोलीकर प्रवाशांची या अनुभवावर मुलाखत घ्यायला हवी.
त्यानंतर हाच प्रयोग ईतर प्रवाशांमध्ये सारे गुजराती प्रवासी घेऊन करायला हवा.
प्रॅक्टिकली असा प्रवास शक्य नसेल तर तसे झाल्यास काय होईल याची कल्पना आपणच याच धाग्यावर करू शकतो
गुजरातीबोली वर ह्या विषयावर
गुजरातीबोली वर ह्या विषयावर काय बोलतात ते वाचायला हवं.
ऍडमिन दखल घेणार का
आंतर भाषीय चर्चा आणि दोन्ही बाजूनंची मते जाणून घेऊया
शेवटी आज शोधून टारमॅकवर गरबा
शेवटी आज शोधून टारमॅकवर गरबा केला तो शोधुन बघितला.
अगदीच गरीब प्रकार आहे हा!!! मला वाटलं फ्लॅश मॉब डान्स करतात तसा सफाईदार प्रोफेशनल काही असेल. हे अगदीच नाचाचे काहीही अंग नसलेले लोक, हात आणि पाय हलवत आहेत. प्रचंड गरीब आणि हलाखीचा प्रकार वाटला तो व्हिडिओ बघुन. छ्या! अगदीच लाजिरवाणं आहे.
आमच्या गावात दरवर्षी इंडिया गाला का मेला का असाच काही प्रकार समर मध्ये सिटी हॉलच्या समोर असतो. तिकडे एक वर्ष गेलेलो. लेझिम आणि ढोल बडवणे, लावणी, आणि गोंधळ आणि गडबड आणि वासुदेव असले काहीतरी प्रकार केलेले बघितले. फारच बोर प्रकरण होतं ते. उगा उमाळून उमाळून आलेले का आणलेले मायभूमीचे कढ!!! आपली संस्कृती आणि परंपरा वगैरे ही जर अशी असेल तर या स्वरुपात ताबडतोब नामशेष झालेलीच बरी. हे असलं काही जतन वगैरे करूच नये असं आपलं मला वाटलं. ते अर्थात व्यवस्थित स्टेजवर पैसे भरुन नियम परवानग्या काढून केलेलं प्रदर्शन होतं. नंतर खायला देसी फूड स्टॉल ही होते. त्यामुळे करण्याबद्दल काही म्हणणं नाहीच. पण फारच केविलवाणं वाटलेलं मला असं आठवतं. परत मुलांना फोर्स करुन घेऊन जायचं माझ्याच जिवावर आलं आणि परत काही गेलो नाही कधी.
खिचडीमधल्या हंसा आणि जयश्री
खिचडीमधल्या हंसा आणि जयश्री अशा कुठल्याही प्रसंगी गरबा करायच्या. त्यांच्यापासून प्रेरणा घेतली असेल.
https://www.ndtv.com/travel/viral-video-indian-visitors-perform-garba-at...
Indian Visitors Perform Garba At Great Wall Of China
Gujarat tourists perform garba at landslide site,
:
https://www.moneycontrol.com/news/trends/gujarat-tourists-perform-garba-...
हे अगदीच नाचाचे काहीही अंग
हे अगदीच नाचाचे काहीही अंग नसलेले लोक, हात आणि पाय हलवत आहेत >>>
नशीब गुजराती होते. मराठी लोक इतके कॉन्फिडण्ट झाले तर उद्या टारमॅकवर तो जिना येईपर्यंत दहीहंडीसारखे मजले करून त्याआधीच विमानात चढतील 
बाकी हे लेझिम, ढोल ई कार्यक्रम म्हणजे सगळाच उमाळा नसतो. भारतात राहात असते तर यातल्या बहुतेकांनी सोसायटीच्या कार्यक्रमात हे केलेच असते. त्यांना आता इथे करता येते, इतकेच
पण हे परवानग्या काढून केलेले सांस्कृतिक कार्यक्रम असल्याने मला हे खटकत नाहीत.
>>टारमॅकवर तो जिना येईपर्यंत
>>टारमॅकवर तो जिना येईपर्यंत दहीहंडीसारखे मजले करून त्याआधीच विमानात चढतील >>
हो! मलाही खटकत नाही. इतकं जगात वाटेल ते लोक करतात, तुम्ही पण करा.
मी काही परत जाणार नाही ते बघायला. फूड स्टॉल चांगले असतील, बरोबर गप्पा टप्पा करायला चांगली कंपनी असेल, कोणी ओळखीचं त्यात काही करणार असेल तर मग अर्थात सगळंच बदलेल.
लावणी आणि नाच वगैरे ठीक होतं, पण कोणीतरी मोरपिसं लावून वासुदेव बनुन आला आणि ती व्यक्ती शत्रूपक्षातली होती बहुतेक त्याचा हा वर निघालेला राग असावा.

भारतात जे हिडीस प्रदर्शन होते
भारतात जे हिडीस प्रदर्शन होते सगळ्याच जयंत्या, पुण्यतिथ्या, सार्वजनिक कार्यक्रमांचे त्यामानाने इथे (अजून तरी )बरे म्हणता येईल.
आपल्या पोरांना फोर्स करून या प्रकरणांना नेंणं मी ही बंद केलंय! मातीचे कुल्ले शेवटी... 
पण तरी उमाळे प्रकरण इज पर्सनल!
मी सुद्धा इथल्या सार्वजनिक (देसी) कार्यक्रमांना फारशी हजेरी लावत नाही... कधी अगदीच नाईलाज असेल तरच!
https://www.youtube.com
https://www.youtube.com/shorts/1LkAkyrdFvM
टारमॅकवर तो जिना येईपर्यंत
टारमॅकवर तो जिना येईपर्यंत दहीहंडीसारखे मजले करून त्याआधीच विमानात चढतील >>>
भारतात राहणारे भारतीय
भारतात राहणारे भारतीय एकंदरीतच किती गलिच्छ, क्लासलेस, अतिशय मूर्ख आणि बुरसटलेले परंपरावादी असतात हे फिरून एकदा कळले परत.
पण "आपली संस्कृती आणि परंपरा वगैरे ही जर अशी असेल तर या स्वरुपात ताबडतोब नामशेष झालेलीच बरी."
हे नवीनच शिकायला मिळाले. I mean I understand the nuisance of Gujarati peeps at times still in my personal opinion that comment was bit over the board.
या वेबसाईटवर गुजराती
या वेबसाईटवर गुजराती नसल्याने एकतर्फी मत मांडले जातेय. त्यामुळं त्यांची बाजू सुद्धा ऐकाविशी वाटणे ही न्यायबुद्धी आहे. किमान एकाला तरी असे वाटले ही समाधानाची गोष्ट आहे.
मुसलमान थोडे दुर्दैवी आहेत याबाबतीत. मूठभर आयडी आपला अधिकार असल्याप्रमाणे मोहीमा चालवतात. हा आपला हक्क आहे असे त्यांना वाटते. जे मुस्लिमांची बाजू मांडतात (कारण मुस्लीम इथे औषधालाही नाहीत), त्यांना हिरवे, बाटगे, मुल्ला म्हटले जाते. त्यांना अभय का आहे?
मत मांडणे आणि द्वेष पसरवणे यात फरक नाही का?
भारतात जे हिडीस प्रदर्शन होते
भारतात जे हिडीस प्रदर्शन होते सगळ्याच जयंत्या, पुण्यतिथ्या, सार्वजनिक कार्यक्रमांचे त्यामानाने इथे (अजून तरी )बरे म्हणता येईल.
हिडीस फक्त जयंत्या पुण्यतिथी इत्यादी वाटणे ठीकच आहे पण हा मानवी स्वभाव आहे. अन् हा हिडीसपणा कुठल्यातरी स्वरूपात कायम व्यक्त होतच असतो. मला वाटते एकट्या भारतीय समाजाला त्यासाठी इतके बडवणे बरे नव्हे.
हल्लीचीच बातमी पॅरिस सेंट जर्मेन (पी एस जी) क्लब इंटर मिलान क्लब सोबत कुठलीशी फुटबॉल चॅम्पियनशिप मॅच जिंकल्याबद्दल पॅरीस मध्ये लोकांनी दंगली अन् जाळपोळ केली, ४१६ दंगलखोर ताब्यात घेतले त्यानिमित्ताने.
आता फुटबॉल मॅच जिंकली म्हणून दुकाने पेटवून माल लुटण्यात कसली आनंदाची अभिव्यक्ती आली आहे ? हे एक उदाहरण झाले, प्रत्येक तथाकथित पुढारलेल्या देशात पण ही असली थेर होतच असतात की ! त्यासाठी इतके जास्त violent रित्या व्यक्त होण्याची खास गरज भासत नाही मला तरी.
RCB fan सुद्धा हेच करू लागले
RCB fan सुद्धा हेच करू लागले आहेत.
पोलिसांसमोर सुद्धा बिनधास्त त्यांना चिडवत नाचत होते. राष्ट्रीय संपत्तीची नासधूस करत होते
आपल्याकडे गुजराती जनतेने
आपल्याकडे गुजराती जनतेने tarmac वर गरबा घातला, त्यामुळे सगळे गुजराती, नॉन गुजराती, भारतीय (भारतात राहणारे बरंका) हे बार्बरीयन्स असल्याचे वैश्विक सत्य ज्ञान मी हल्लीच पचवण्याचा पराक्रम केला आहे ब्लडी देसी लोक असलेच असतात त्यामुळे आता इतक्या व्हरायटी मधे RCB फॅन्सचे काय कौतुक साहेब ?
पॅरीस ऑन द सीन सारखे सुसंस्कृत , फॅशनची राजधानी, प्रेमळ लोकांची गुलछबू नगरी असे वागेल असे वाटले नव्हते हो !
मरू दे गुजराती/ पक्षी भारतीय असतील मेले पॅरिस सेंट जर्मेन चाहते पण
नवीन Submitted by अमितव on 10
नवीन Submitted by अमितव on 10 June, 2026 - 00:28 >>>


टारमॅकवर तो जिना येईपर्यंत दहीहंडीसारखे मजले करून त्याआधीच विमानात चढतील >>>
I mean I understand the nuisance of Gujarati peeps at times still in my personal opinion that comment was bit over the board.>>>हे त्यांनी कुत्सित विनोदाच्या अंगाने लिहिलंय असे मला वाटते, ज्यात त्यांचा रोख हा तो प्रकार किती केविलवाणा होता याच्या तुलनेसाठी त्याप्रकारचे exaggeration केले गेले आहे, आणि विनोदात exaggeration चा गुणधर्म हा एक प्रामुख्याने आढळून येणार गुणधर्म आहे.
Pages