कोकण रेल्वे आणि गुजराती धिंगाणा

Submitted by pratidnya on 3 June, 2026 - 10:07

थोड्याफार फरकाने मला रेल्वे आणि विमानप्रवासात अलीकडच्या वर्षांत बऱ्याचदा असे अनुभव आले आहेत.

कोकणरेल्वेने नवऱ्यासोबत गावी जायला निघाले होते. तब्येत ठीक नव्हती. दोन कंपार्टमेंट सोडून असणाऱ्या सीटवर गुजराती लोकांचा एक मोठा फॅमिली ग्रुप होता. गोव्याला जात असावेत. नेहमीप्रमाणे त्यांनी बचाबचा खायला सुरुवात केली. रात्रीचे अकरा वाजून गेले होते तरी मोठा स्पीकर लावून सर्वांनी गाणी गायला सुरुवात केली. आजूबाजूला आपल्या गावी जाणाऱ्या कोकणी चाकरमानी लोकांची गर्दी. दबक्या आवाजात सर्वांनी अरे आता झोपायची वेळ झाली कुणीतरी यांना गाणी बंद करायला सांगा अशी कुजबुज सुरु केली. प्रत्यक्षात कुणीच त्यांना सांगायला जाईना. आमच्या बाजूच्या सीटवर बसलेल्या काकांचा आवाज जरा वाढला. पण तोही फक्त बाजूला बसलेल्या माणसांसमोर. अरे काय माणसं आहेत, किती तो गोंधळ, किती तो आम्हाला त्रास वगैरे वगैरे. पण हे सर्व त्यांना तिथे जाऊन सांगायची हिंमत होईना. TCने येऊन अगदी सौम्य आवाजात जरा टोकलं तर ते लोक अगदी निर्लज्जपणे क्या हैं वो फॅमिली फॅमिली थोडा एन्जॉय कर रहे हैं अभी थोडे देर मे बंद कर देंगे असे अगदी गोड आवाजात सांगायला लागले. (असेच गोडगोड बोलून १०० ची गोष्ट १००० ला विकतात). पण अर्धा तास होऊन गेला तरीही आवाज सुरूच. वरच्या सीटवर बसलेला एक तरुण म्हणायला लागला मी सांगतो त्यांना मी रेल्वेतच कामाला आहे. पण असं दोन तीन वेळा बोलून झाल्यावरही आपल्या सीटवरून तो खाली उतरला नाही. माझी तब्येत बरी नव्हती, झोपायचं होतं. ह्यांच्या भसाड्या गाण्यांमुळे डोकं अतिशय दुखत होतं. शेवटी नवऱ्याला म्हटलं चल जाऊया तिकडे. दोघेही तणतणत गेलो आणि जोरजोरात शिव्या घातल्या आणि आता आता तुमची गाणी बंद नाही केलात तर स्पीकर गाडीतून खाली फेकून देईन, आवाज अगदी बंद झाला पाहिजे असं किंचाळले. त्या ग्रुपमधल्या तरुण मुलांनी दात काढून फिदीफिदी हसायला सुरुवात केली. पण त्यांच्यातल्या प्रौढ लोकांना काय वाटलं काय माहित त्यांनी गाणी अगदी बंद केली. यात आश्चर्य म्हणजे आजूबाजूला सर्व मराठी कुटुंबं होती पण एकही आमच्या बाजूने त्या लोकांना खडसवायला आला नाही. तोंडातल्या तोंडात पुटपुटत सीटवरच बसून त्यांचा काही निषेध चालला होता तोच.

त्यांना गप बसवून आमच्या सीटवर परत आलो तर रेल्वेत काम करणारा मुलगा त्याच्या सीटवर पांघरूण तोंडावर ओढून झोपून गेला होता. काही वेळाने त्या कुटुंबातला मोठा काका आमच्या सीटजवळ आला आणि माझ्या आजूबाजूला बसलेल्या लोकांना सांगायला लागला. वो क्या हैं ना सब फेमिली गोवा घुमने जा राहा हैं ना तो जरा मजा मस्ती मे गा रहा था. त्यावर आमच्या बाजूच्या सीटवर बसलेले काका जे सीटवर बसल्या बसल्या त्यांना शिव्या घालत होते ते अगदी प्रेमाने त्या गुजराती माणसाच्या पाठीवर अलगत थोपटत म्हणाले. कूच नही चलता हैं.

तुम्हालाही प्रवासात असे अनुभव आले असतील तर शेअर करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मराठी असो किंवा गुजराती ,एकंदरीत आपण आपल्यापुरते पहावे, दुनिया गेली तेल लावत असा attitude झालेला दिसतो. मुंबईत ट्रेन मधे समोरच्या सीट वर पाय ठेवून बसणे ह्यात सगळेच असतात.

जणू महाराष्ट्रात कुणी गुटखा, मावा/खर्रा आणि पान तंबाखू खातच नाही. तुम्हा मराठी लोकांचे एवढे नैतिक अध:पतन झालेले आहे की तुमच्या प्रतीकांची देखील तुम्हाला फारशी पडलेली नसते, त्याच तंबाखू आणि बिडी यांच्या पाकिटावर 'संभाजी' वगैरे नावे दिसतात.>>> नाही तुम्हाला समजलेलं दिसतं नाही, थुंकणारे सेकंड क्लास मधेही असतात, पण फर्स्ट क्लास डब्यांत थुंकण्याचं उदाहरण मी मुद्दाम दिलं जे तुम्हालही पटल्याचं तुमच्या प्रतिसादातून ध्वनित होतयं, कारणं पैसा खर्चून वस्तू घेण्याची ऐपत असली की क्लास ही त्या सोबत आपसूकच येतो हा भ्रम बोकाळलेला गुजरात्यांईतका substanceless दुसरा कुणी समाज नसेल असं मला आवर्जून वाटतं.

>>>>>> कधीही गुजराती लोकांनी तिथे मराठी लोकांवर आवर्जून अन्याय केला आहे असे झालेले नाही. आतापर्यंत व्यवसाय असो वा संस्था असोत, गुजराती लोकांनी आम्हाला कसलाही त्रास दिलेला नाही.

मी तर 'मुंबई म्हणा तुमची, भांडी घासा आमची' असे त्यांना वाटते/ ते म्हणतात असे ऐकले आहे. फार गोंगाटी व खादाड, गोडबोली जमात आहे हे खरे आहे.

पैसा खर्चून वस्तू घेण्याची ऐपत असली की क्लास ही त्या सोबत आपसूकच येतो हा भ्रम बोकाळलेला गुजरात्यांईतका substanceless दुसरा कुणी समाज नसेल,

गावोगावी गुंठा मंत्री सोन्याने मढवलेले पांढरे कपडे घातलेले *हाय क्लास *नामदार लोक महाराष्ट्रात गावोगावी दिसतात.

गुजराती लोक एकंदर लाऊड असतात हे मान्य पण म्हणुन सरसकट त्यांचा द्वेष करण्याच्या मागचे "कार्यकारण" वेगळे आहे.

>> मी तर 'मुंबई म्हणा तुमची, भांडी घासा आमची' असे त्यांना वाटते/ ते म्हणतात असे ऐकले आहे. फार गोंगाटी व खादाड, गोडबोली जमात आहे हे खरे आहे. <<

तो मुंबईचा विषयच वेगळा आहे. अशा शहरावर प्रत्येक ग्रुप आपला वरचष्मा ठेवायचा प्रयत्न करतो. मराठी लोकांनी मग भरपूर पैसे कमवावेत, उद्योजकता जोपासावी, निगुतीने धंदे करावेत आणि गुजरात्यांना कामाला ठेवावे. कुणी अडवलं आहे? ग्रामीण महाराष्ट्र आता गरीब बिहारी बंगल्यांना शेतावर मजूर म्हणून ठेवत आहे तेव्हा बळी तो कान पिळी हा न्याय सगळ्यांनाच लागू होतो. पण आमची लोकसंख्या ३० टक्के आहे म्हणून आम्ही वाटेल ती भाषिक गुंडगिरी करणार तेही मुंबईसारख्या अजस्त्र बहुभाषिक आणि बहूसांस्कृतिक शहरात. नाही चालणार.

मराठी, बिहारी, भैय्ये, बंगाली, मल्याळी अशा कुणालाही नावे ठेवा, पण गुजरातींबद्दल कृपया काही बोलू नये ही विनंती. काही नाजूक हृदयाच्या इसमांचं बीपी वाढतं.

वडनगरला मेहसाणा ही एकच मीटर गेज ट्रेन येत असतानाच्या काळात चुकून कुणी वाटचुकरू आलाच तर त्याच्या साठी तासनतास थांबून चहा पाणी बनवणारा एक जण गुजरातीच आहे हे विसरू नये.

https://youtu.be/4Pk1vFMj-dc?si=sHPkVUlvo8hCW-oZ
हा भांगडा आहे कि गरबा याबद्दल मार्गदर्शन करावे.

ती कविता / नज्म याद आली "तुम भी हम जैसे निकले ">>
कविता शोधून वाचली, चांगलीं आहे.

इथे "मराठी धिंगाणा" असं उपरोधाने मुद्दाम लिहिलेय. कुठल्या एका प्रादेशिक लोकांपुरते सीमित नाही हे दाखवण्यास.

आपलेच अंदाज आडाखे बरोबर सिद्ध होताना पाहून पण वाईट वाटण्याची ही बहुदा आयुष्यातील पहिलीच वेळ ही आमच्या ! असो

images (46).jpeg

>> पैसा खर्चून वस्तू घेण्याची ऐपत असली की क्लास ही त्या सोबत आपसूकच येतो हा भ्रम बोकाळलेला गुजरात्यांईतका substanceless <<
हे संबंध भारताला लागू आहे. यावर गुजरात्यांची मक्तेदारी नाही. उलट मला तरी वाटते त्यांच्यात चिंगूसपणाच, व्यवहारीपणाचे, निगोशिएशनचे ऑब्सेशन आहे. त्यांना काही क्लास वगैरे चे फारसे पडलेले असते असे वाटत नाही, म्हणजे अपवाद असतील. नाहीतर पटेल लोकांनी सुमडीत सगळी मॉटेल इंडस्ट्री ताब्यात घेतली नसती कुठेही खळखळ ना करता.

मला तरी व्यक्तिश: गुजराती लोक उर्वरित भारतापेक्षा अगदीच गये 'गुजरे' आहेत असे वाटत नाही. उन्नीस बिस का फरक असेल एवढेच.
त्यांनी जगात सगळीकडे मनसोक्त गरबा खेळावा. पंजाबी लोकांनी भांगडे करावेत.
फक्त मराठी लोकांनी मात्र ढोल ताशे बडवलेले चालतात, ट्रेन मधे अभंग म्हंटलेले चालतात, झोप हराम करणरे जागरण गोंधळ घातलेले चालतात आणि परदेशांत देखील नद्यात गणपती विसर्जित केलेले चालतात असली दुटप्पी भूमिका घेऊ नये.

गावोगावी गुंठा मंत्री सोन्याने मढवलेले पांढरे कपडे घातलेले *हाय क्लास *नामदार लोक महाराष्ट्रात गावोगावी दिसतात.>>> नो डाउट हे लोण आता महाराष्ट्रात सोडा पूर्ण देशातच पसरलेलं ( जास्त करून बॅनर आणि इन्स्टा संस्कृती मुळे पश्चिम महाराष्ट्रात) आहे. पण जेंव्हा तुम्ही सामान्य लोकांच्या मानसिकतेची तुलना करता तेंव्हा एक फर्स्ट क्लास ची तिकीट घेतलेला मराठी माणूस आणि एक गुजराती माणूस जेंव्हा ट्रेन मध्ये प्रवेश करतो तेंव्हा त्यांच्या आविर्भावातला फरक तुम्हाला थोड्या निरीक्षणाने समजून येईल...कोणत्याही गोष्टीसाठी पैसे मोजल्यावर (कदाचित हे त्यांच्या समाजातील पैशांच्या महत्त्वामुळे असेल अथवा इतरही काही न उमगलेली करणे त्या मागे असू शकतात) आपला स्तर/ अधिकार मोजण्याचे, वर्तणूक जस्टीफाय करण्याचे तेच एकमेव परिमाण आहे, बाकी सर्व तेल लावत गेलं, अशीच मानसिकता/वर्तणूक तुम्हाला कमी अधिक प्रमाणात मुख्यत्वाने तेथे दिसेल.

त्यांचा द्वेष करण्याच्या मागचे "कार्यकारण" वेगळे आहे.>>> आणि असं बोलण्यामागचा माझा कार्यकारण भाव वेगळा असेल तर तो तसा सिद्ध करा, कोणतीही बाब सिद्ध करण्याची वेळ येताच 'तुम्हीच शोधा', 'तुम्हीच ठरवा', 'चालुद्यात' अशा वाटाण्याच्या अक्षता उधळत फिरू नका... Happy

फक्त मराठी लोकांनी मात्र ढोल ताशे बडवलेले चालतात, ट्रेन मधे अभंग म्हंटलेले चालतात, झोप हराम करणरे जागरण गोंधळ घातलेले चालतात आणि परदेशांत देखील नद्यात गणपती विसर्जित केलेले चालतात असली दुटप्पी भूमिका घेऊ नये.>>> TBH, व्यक्तीशः माझी या बाबींचा समर्थन करणारी भूमिका कधीच नव्हती, नसेल. एका गणेशउत्सवाच्या धाग्यावर याबाबत मांडलेली मते आजही असतील, फक्त तेंव्हा विरोधक तुम्हाला मराठी आणि हिंदू सणच बरे दिसतात, दिवस रात्र नमाज पढनारे दिसत नाही असे सुनावणारे होते...असो, चालायचंच.

गुजराती माणसाबद्दल बोलणे द्वेष कसे काय?
द्वेषाची व्याख्या काय? गुजराती माणूस प्रेमळ असतो का?
२००२ शब्दमर्यादेत उत्तर द्यावे.

गुजराती लोकं/पर्यटक गोंधळ घालणारी आहेतच. त्यांच्या गोंधळाचा बऱ्याच वेळा अनुभव घेतलेला आहे. माझा एक गुजराती मित्र आहे तो पण हे मान्य करतो. त्यामुळे त्यांच्यावर ह्यावरून कोणी टीका करत असेल तर खुद्द गुजराती माणसाला पण राग यायला नाही पाहिजे.
आपण जस अचरण करणार तशीच आपली image बनत राहणार. North east मध्ये दिल्ली आणि हरियाणा चे पर्यटक बदनाम आहेत.

तुम्हालाही प्रवासात असे अनुभव आले असतील तर शेअर करा.>> नुकतेच महाराष्ट्र एक्सप्रेस ने जाण्याचा अनुभव घेतला. आजुबाजूला मराठीच लोकं होती. पण एकजण रात्रभर मोबाईल वर मोठा आवाज करून चित्रपट बघत होता. तर एक लहान मुलगा मोबाईल वर गेम खेळत होता. आवाज मोठाच. Reservation चा डबा असला तरी जरा सरकून घ्या म्हणायला लोकं आलीच होती.

गोंधळ आणि अरेरावीचे अनुभव आंबेडकर जयंती आणि धम्म चक्र दिनाच्या दिवसांमध्ये नागपूर मेल मधे बरेचदा आलेले आहेत. राखीव आसन वगैरे व्यवस्थेची तेव्हा अक्षरशः धूळधाण होते. (मला हे कुठल्याही जाती समाजाबद्दल बोलायचे नाही हे कृपया लक्षात घ्यावे) . पण खूप त्रास होतो त्या दरम्यान एवढेच सांगायचे आहे.

गुजराथी बद्दल वर बरंच लिहिल्या गेलंय. तसे त्यांचे अनुभव असतील.

नवीन नातं जुळल्यामुळे माझा गुजरातशी आता जवळून संबंध येतोय आणि हा अनुभव अतिशयच सुंदर आहे.
इथे गुजराथी लोकांच्या नावाने जसे खडे फोडण्यात येताहेत, तसेच तिथे गुजराथी लोकं मारवाडी लोकांच्या नावाने फोडतात. मारवाडी लोकं गुजरात मधे जाऊन बिझनेस करतात पण भाषा हिंदी वापरतात ह्याचा त्यांना भयंकर त्रास होतो.

बाकी दिखाऊपणा वगैरे बाबत माझा तरी अनुभव खूपच वेगळा आहे. कदाचित माझ्या वाट्याला उच्चशिक्षित आणि आमच्यासारखीच नोकरदार मंडळी आल्यामुळे असेल. अतिशय मृदुभाषी लोकं मिळाली आहे, त्यांचा आवाजाचा पोत सोडून. तो जाडाभरडाच आहे काही अपवाद वगळता. (त्यामुळेच कदाचित गुजराथी गायक गायिका माहिती नाहीत)
त्यांच्याबरोबर हॉटेल मध्ये जातांना तर नेहमी मला ' पसंद अपनी अपनी ' ह्या सिनेमातील मिथुन चक्रवर्ती आणि रती अग्निहोत्रीचा शेवटचा हॉटेल मधे जाण्याचा प्रसंग आठवतो.

पण गुजरातींबद्दल कृपया काही बोलू नये ही विनंती. काही नाजूक हृदयाच्या इसमांचं बीपी वाढतं.

हो ना

मागच्या पिढीपर्यंत सुद्धा तसंच होतं. त्यांच्याबद्दल काहीही बोलायचं म्हणजे ब्रम्हहत्येचं पाप लागत असते.

मी गांधीजींबद्दल बोलतो आहे.

आताची पिढीं गांधीजींबद्दल तेवढी हळवी राहिलेली नाही.

अ रे रे कुठे नेऊन ठेवला आहे माझा महाराष्ट्र.

पैसा खर्चून वस्तू घेण्याची ऐपत असली की क्लास ही त्या सोबत आपसूकच येतो हा भ्रम बोकाळलेला गुजरात्यांईतका substanceless <<
हे संबंध भारताला लागू आहे. यावर गुजरात्यांची मक्तेदारी नाही.

यू सेड इट

दिल्लीत जा

पंजाबी लोकांबद्दल आपले असेच मत होईल.

गुरुग्राम मध्ये थार किंवा पजेरो अथवा फॉर्च्युनर सारख्या मोठ्या एस यु व्ही मधून कानठळ्या बसतील असे पंजाबी पॉप संगीत वाजवत भयानक वेगाने गाड्या चालवताना दिसतात.

लग्नाच्या हॉल च्या बाहेर तीन चार तास इतक्या मोठ्या आवाजात डी जे लावून नाचत असतात कि नको ते लग्न

गुजराती लोक प्रेमळच असतात.
https://en.wikipedia.org/wiki/1985_Gujarat_riots

स्वाध्याय परिवारातर्फे जे आदिवासी आणि दलित संघाकडे आणले गेले त्यांच्याकरवी २००२ च्या दंगली घडवल्या गेल्या. त्यातला पोस्टर बॉय चर्मकार व्यवसाय करत होता. गावी गेल्यावर जातीय हिंसेत त्याचं घर जळालं. त्याला आता पश्चात्ताप होत आहे असा एक इंटरव्ह्यू पाहिला होता. कारसेवेच्या दरम्यान कुठल्याही ट्रेनमधे कारसेवकांनी कब्जा केलेला होता. पुढे काय घडलं हे सर्वांनाच ठाऊक आहे.

त्यांचे नागपूरचे संत्रोबा आणि गुजराती ही प्रमळ जमात आहे.

थोडंसं असंच.....
माथेरानला बऱ्याचदा जातो, एक दिवस रस्त्याने भटकून येतो. चालताना एखादी मुलगी तावातावाने मोबाईलवर कुणाला तरी मोठमोठ्याने कर्कशपणे फटकारताना दिसते. बहुधा ती मराठीच असते. हे इथूनच करायला पाहिजे का हा विचार येतो. मग थोडा वेळ थांबतो, ती बरीच पुढे गेल्यावर चालायला सुरुवात करतो.

रेल्वेत गेलो की असे प्रॉब्लेम येतात त्यामुळे मी काय करतो मी रेल्वे फलाटाच्या थोडा पुढे थांबतो. गाडी सुटली की आरामात धावत जाऊन गाडीची शिडी पकडतो आणि टपावर जाऊन झोपतो. tc चा टेन्शन नाही. अंथरुणात मस्त गाढ झोप लागते.

गुजरात मतलब अलग लेव्हल के बंदे होते है..
महात्मा गांधी - सत्याग्रही
सरदार पटेल - फौलादी
मोदी शहा - व्यापारी
इतकी व्हरायटी खचितच कुठे मिळावी Happy

इथे एक प्रतिसाद का आला हे लक्षात आले होते. त्याला उत्तर देऊ नये असे आधी वाटले. पण एकदा तरी यामागची वृत्ती उघड केली पाहीजे.

काही लोक नेमके १४ एप्रिल , ६ डिसेंबर आणि धम्मचक्रप्रवर्तनाच्या दिवशीच बाहेर पडतात आणि त्यांना त्रास होतो. ते याच दिवशी ट्रेनमधे जात असतात. हे सगळे कोण असतात हे सर्वांना ठाऊक आहे. यांना दादरला त्रास होतो. १४ एप्रिलला यांचे कान फाटतात. त्रास व्हावा असे कसे कुणाला वाटेल?

पण उत्तराखंडात केदारनाथ, बद्रीनाथ, रूद्रप्रयाग, कर्णप्रयाग, प्रयाग, हरिद्वार, ऋषिकश इथे ड्रेनेज थेट गंगेत सोडलेलं असतं. कुंभमेळ्याला पाण्यातच कार्यक्रम उरकले जातात. पाण्याचे नमुने घेतले तेव्हां त्यात कुठले बॅक्टेरिया आढळले हे सर्च दिला तर सापडेल. जेव्हढी म्हणून तीर्थक्षेत्रे आहेत तिथे काय परिस्थिती असते हे सांगण्याची गरज नाही. पण त्याचा यांना त्रास होत नाही.

दहीहंडीला रस्ते अडतात, दिवसभर स्पीकर्स असतात. नवरात्रात नऊ दिवस, गणपतीत दहा दिवस आणि दिवाळीत चार दिवस फटाके वाजतात. लक्ष्मीपुजनाच्या दिवशी प्रमुख रस्ते बंद करावे लागतात. पुण्यात पालखी येते तेव्हां दोन दिवस पुणं बंद असतं. ज्यांना सुट्या नाहीत त्यांच्यावर पोलीस खेकसत असतात.

पण कुणाचेही कान फाटत नाहीत. कानाच्या डॉक्टरांचा धंदा तेजीत असल्याचे निरीक्षण कुणी मांडत नाही. स्पीकर दहा वाजता बंद करायचा निकाल मानणार नाही( असे यांचे नेते सांगतात. आता अकरा वाजेपर्यंत मुदत केली आहे. पण बंद होत नाहीत.

या अशा वेळी कोण ट्रेन मधून किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरून प्रवास करतं? त्यांचे अनुभव कधी येणार? नेम धरून एखाद्या दिवसाचे नाव घेणं हे नवं होतं तेव्हां ठीक होतं. वर्षानुवर्षे तीच नागपुरी संत्री त्याच दिवशी ट्रेनमधे जातात हे आता पाठ झालेलं आहे.

कधीतरी नाईलाज म्हणून प्रवास करावा लागतो.
ठराविक दिवशी इतर लोकांनी प्रवास करायचा नसेल तर तिकिट विक्री , त्या दिवसांचे आरक्षण सरळ बंद ठेवावे. नाहीतरी जे लोकं झुंडीने आले असतात त्यांच्याकडे तिकीट असतेच असे नाही.

सार्वजनिक ठिकाणी आसपासचे वातावरण, शांतता, तेथील प्रचलित प्रोटोकॉल याचा विचार न करता शिक्षित लोकांनी केलेले obnoxious (याला चपखल मराठी शब्द मला माहीत नाही) वागणे - हे मराठी लोकांचे कमीच पाहिले आहे. कारण हे असे वागायला जो सामुदायिक आत्मविश्वास लागतो तो मराठी शिक्षित किंवा ममव लोकांकडे नसतो. तो येईल तेव्हा मराठीही वागतील तसेच.

अशिक्षितांच्या अशा वागण्याबद्दल तितका राग येत नाही. मुंबईच्या विमानतळावर गल्फ फ्लाइट असेल तर अनेकांना अनुभव असेल.खेड्यापाड्यातून आलेली तरूण पोरे असतात. साधे कपडे, चेक इन बॅग दिल्यावर हातात असलेली कपड्यांच्या दुकानातून मिळणारी पिशवी. तिथली प्रोसेस माहीत नसल्याने कावरेबावरे झालेले असतात. अमेरिकेला सरावलेल्यांच्या "पर्सनल स्पेस" कन्सेप्टचा त्यांना पत्ताही नसतो. पहिल्यांदा असे लोक रांगेत पुढेमागे आले तेव्हा डोक्यात आलेली तुच्छताही आठवते. पण नंतर त्यांच्याशीच बोलणे झाले आपोआप आणि नंतर कधीच तसे वाटले नाही.

बाकी गुजराती किंवा कोणालाच घाऊक दोष देण्याइतके काही पाहिलेले नाही. स्वतःला पुरोगामी समजणार्‍यांनी असले घाऊक दोष देऊ नयेत या रॉय यांच्या मताशी सहमत. (इतक्या गोळीबारात मधेच आलेल्या "गुजरे" ची नोंदही घेतली Happy ) पण अशा लोकांच्या होली काऊज वेगळ्या आहेत. फक्त त्यांना घाऊक दोष दिलेला त्यांना चालत नाही. इतर गटांकरता ओपन सीझन.

एखादा अनुभव लिहिताना पण सर्वधर्म समभाव, धर्म निरपेक्ष पणा, जात पात, प्रादेशिकता, वंशवाद याचा बॅलन्स सांभाळलाच पाहिजे का?
प्रत्येक वेळेस पोलिटिकली करेक्टच राहावं असं काही नाही.

नावडतीचं मीठ अळणी
आपला तो बाब्या दुसर्‍याचं ते कार्टं
आपलं ठेवायचं झाकून दुसर्‍याचं पहायचं वाकून
स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही दुसर्‍याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं

माणुसकीचा गहिवर येतो ज्याला जेव्हा जसे सोयीचे जगात नसते कोणी कोणाचे

https://youtube.com/shorts/8JKxgf-NyJM?si=yCkyDRvgzbFt5Ty7

Pages