Submitted by भरत. on 9 April, 2026 - 01:44
आधीच्या मी वाचलेले पुस्तक -३ या धाग्यावर २००० हून अधिक प्रतिसाद झाल्याने , नवा धागा काढला आहे.
आनंदाने वाचत राहू. काय वाचलं त्यावर काथ्याकूट करत राहू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बिटकॉईनचा जनक असलेला खरा
बिटकॉईनचा जनक असलेला खरा व्यक्ती कोण याच्या न्यूयॉर्क टाईम्सच्या आनि एबीओच्या शोधपत्रकारितेबद्दल वाचलं. यातून जे फायनल नाव समोर आलं त्याने अ र्थातच ते नाकारलं. या शोधात अनेक लेयर्स आहेत. जसे पॅटर्न्स स्टडी करून शोध घेणे. यात बेसिक काही चुका होऊ शकतात. शोधकर्त्याचा पूर्वग्रह यात रोल बजावतो. जसे कि काही जणांनी एआय असिस्टन्स बद्दल मतं मांडताना एखादा व्यक्ती मूळचा हुषार असेल किंवा तो हुषार नसू शकतो किंवा जालावर त्या आधी नव्हता म्हणजे त्याला जालावर आल्यावरच समजू लागले असे ग्रह पाळलेले असतात. याचा पॅटर्न्स मधे प्रभाव पडत असतो. शिवाय पॅटर्न्स स्डटी करताना जे लोक माहीत आहेत त्यांचाच पॅटर्न स्टडी होणे हा मानवी दोष आहे.
समजा एखाद्याने या शोधपत्रिकारितेवर एखादी कादंबरी लिहीली आणि ती बेस्टसेलर झाली तर या कादंबरीकाराने त्या पत्रकाराची परवानगी घेतलेली असणे अपेक्षित आहे का? जर त्याने नावे बदलली, बिटकॉईनचं नाव बदललं पण घटनाक्रम मॅच होत असेल तर तो कॉपीराईटमधून सुटू शकतो का? याच्यावर कादंबरी येऊ शकेल एव्हढं इंटरेस्टींग प्रकरण आहे हे.
पहिला जो कथा/ माहिती प्रकाशित
पहिला जो कथा/ माहिती प्रकाशित करतो त्याला प्रताधिकार मिळतो. पण काही शोध अगोदर कुणी लावलेले असतात पण प्रसिद्धी करत नाही किंवा त्याला ती साधने माहीत नसतात त्याचे नाव होत नाही. ज्योतिषातील कृष्णमूर्ती पद्धत ( kp नावाने ओळखली जाते) त्याची माहिती करून दिली कृष्णमूर्ती याने. परंतू शोधली होती दुसऱ्याच माणसाने.
________________________________________
केशवकूल, लिंक पाहिली. ती साईट बुकमार्क केली. वाचनालयात शोधतो हे पुस्तक आले आहे का.
हा योग्य धागा नाही पण इतर
हा योग्य धागा नाही पण इतर कुठे विचारु ते कळलं नाही म्हणून इथे विचारते आहे.
इथे कोणी लोकसत्ताचे premium subscription घेतले आहे का? वर्षाचे $30 असे दिसते आहे. पण त्यांचे ॲप अत्यंत भंगार आहे. इतके पैसे मोजून काही चांगले वाचायला मिळेल का याची खात्री करून घ्यावी म्हणून विचारते आहे.
भारताबाहेर राहणारे लोक कोणती मराठी वृत्तपत्रे वाचतात आणि कशी असा पण एक प्रश्न आहे!
मोठ्या वृत्तसेवा/
मोठ्या वृत्तसेवा/ वृत्तपत्रांची apps भंकस आहेत. अजिबात घेऊ नयेत.
epaper चे पैसे भरल्यास छापील पेपराची आवृत्ती मिळते. मागील अंकही पाहता येतात, लेख साठवता येतात. जाहिराती दिसतात. लोकसत्ताच्या संपादकीय किंवा रविवार पुरवणीतल्या लेखांत. दोन ओळींसुद्धा कामाच्या नसतात.
महाराष्ट्र टाईम्स पेपर फक्त काही घराण्यांचा, कुटुंबांचा उदोउदो करणारा पेपर आहे (हे माझे मत.)बाकी काही नाही.
नवशक्ति (आणि इंग्रजी freepress journal) epaper फुकटच आहे. भडक बातम्या देत नाहीत.
इंग्रजीच हवे असेल तर Hindustan times उत्तम आहे.
[परदेशांत ईपेपर सर्विस देतात का माहीत नाही.]
>> लोकसत्ताचे premium
>> लोकसत्ताचे premium subscription घेतले आहे का? <<
देशाबाहेरून लोकसत्ता वाचत असाल तर हे माथी मारायचा उद्योग दिसतो. अजिबात घेऊ नका. काही घंटा नसते त्यात.
PressReader अॅप वर लायब्ररी
PressReader अॅप वर लायब्ररी कार्ड असेल तर फुकट वाचता येते.
एस आर डी, शोधपत्रिकारिता आणि
एस आर डी, शोधपत्रिकारिता आणि पत्रकार असे सांगितलेय वर. ती कथा नाही.
ओळखीतल्या एकाच्या नात्यातल्या एकाने या घटनेवर कथा लिहायला घेतली आहे. तेव्हा मी ही शंका विचारली होती. कथाच लिहायला पाहीजे असं नाही. शोधपत्रिकारेतेसाठी एकाने मेहनत घ्यायची आणि कुणीतरी त्यावर कथा लिहायची. जर तो रिपोर्ताज प्रसिद्ध झालेला आहे ( प्रिंट किंवा व्हिडीओ) तर त्या पत्रकाराकडे त्याचे कॉपीराईट नसतील का? त्याची परवानगी न घेता असे कसे करता येईल?
निव्वळ पॅटर्न हा विषय पब्लीक डोमेन मधे असला तरी ही घटना घडण्यात त्या पत्रकाराचे सक्रीय योगदान आहे.
पॅटर्न वरून त्याचे संंशोधन बरोबर कि चूक असा दुसरा रिपोर्ताज बनवता येईल. यासाठी कॉपीराईटची गरज लागणार नाही.
बरं.
बरं.
बरं.
बरं.
मनन प्रताप सिंग या लेखकाची
मनन प्रताप सिंग या लेखकाची 'The Stillness Within' ही कादंबरी किंडलवर वाचली. उत्कृष्ट आहे. लेखक फक्त पंचवीस वर्षे वयाचा आहे. एवढ्या कमी वयात या माणसानं असली खतरनाक कारागिरी केलीय, याचं आश्चर्य वाटलं.
अभिनव नरूला नावाच्या मुख्य पात्राची ही गोष्ट. पेशानं यशस्वी डेटा-ॲनालिस्ट. व्यक्तिमत्त्वात अबोल, गंभीर, इंट्रोवर्ट, सेन्सिटिव्ह, मृदू, भयभीत, स्ट्रेंजनेस असे वेगवेगळे लेयर्स. एक चूक घडलेली असते, त्याचा पश्चातबोध असतो, त्याला फेस करण्याचं धाडस नसतं, तर ते टाळण्यासाठी कुटुंबापासून स्वतःला पूर्ण तोडून न्यूयॉर्कला निघून जातो. चारेक वर्षांनी वडिलांच्या आजारपणाच्या बातमीवर विश्वास ठेवून घरी येतो मनालीला. हा कोव्हिडच्या पहिल्या लॉकडाऊनचा, जग स्तब्ध झाल्याचा काळ. या काळाचं इतकं जिवंत चित्रण इतक्याततरी कुणी केलं असेल, असं वाटत नाही. कादंबरीचा मुख्य भाग मनालीत घडतो. न्यूयॉर्क, लेह आणि चंदिगड ही शहरं पार्श्वभूमी म्हणून येतात.
ही फॅमिली टिपीकल भारतीय मिडलक्लास फॅमिली आहे. मेलोड्रॅमॅटिक. इमोशनल ब्लॅकमेलिंग करून मॅनिप्युलेट करणारा, खवट सेन्स ऑफ ह्युमरची देणगी लाभलेला बाप. डोकं सदैव शांत ठेवणारी समजंस आई. आणि बापापेक्षा जास्त तिखट सेन्स ऑफ ह्युमर असलेली विद्या नावाची बहिण, असं सगळं आहे. हे विद्या नावाचं पात्र फारच जॉली, लाईव्हली आहे. असल्या भावाला असली बहिण असणं, हा सरळसरळ दैवी हस्तक्षेप वाटतो. सामान्य लेखकाच्या आवाक्यातली ही गोष्ट नाही.
अशा या चौकोनी कुटुंबात अजून एका विलक्षण व्यक्तीरेखेची एंट्री होते. जिया. व्हीलॉगर, यूट्यूबर, इन्स्टा स्टार. गर्भश्रीमंत.
एस्केपिजमचा, डिटॅचमेंटचा स्वयंघोषित प्रेषित असलेल्या अभिनवची आणि जियाची एकूणच ही लवस्टोरी आणि तिचा एंड मात्र अजिबातच टिपीकल नाही. आपल्याकडच्या खानोलकरांची, किंवा अज्ञेय नावाच्या हिंदी लेखकानं 'नदी के द्वीप' या महान कादंबरीत रचलेल्या अतिशय तरल मानवी प्रेमसंबंधांची आठवण व्हावी, अशी आहे. बाकी सगळं सोडून, लव्हस्टोरीच्याच प्रेमात पडावं अशी लव्हस्टोरी.
लेखकाचं वैशिष्ट्य म्हणजे याला शब्द वाया घालवायला आवडत नाही. मांसालाही खोलवर स्पर्श करतील असे शब्द कसे लिहायचे, हे याला माहिती आहे असं दिसतं. हा एक ओळही खराब किंवा बिनवजनाची किंवा बिनकामाची लिहित नाही. वर्णनं तर कशाचीच करत बसत नाही. याच्या डोक्यात कॅमेरा फिट केलेला असावा. हा प्रसंगांची, संवांदांची, दृश्यांची चित्रं लिहितो. उदाहरणार्थ दोन व्यक्ती समोरासमोर आहेत, विशेषत: कपल, तर त्यांच्या दरम्यान जे काही subtle घडायला लागलेलं असतं, ते हा परफेक्ट लिहितो.
याची गोष्ट सांगण्याची पद्धत मला आवडली. कॅब ड्रायव्हर, किराणा दुकानदार, डॉक्टर, पोलिस हवालदार, लॉज मॅनेजर अशी साधीसाधी पात्रंही यानं एवढी ठाशीव, दीर्घकाळ लक्षात राहण्याजोगी उभी केलेलीयत; मग मुख्य पात्रांबद्दल तर क्या कहने!
तर एकूण अशी ही एका ह्युमन कंडिशन ची कहाणी आहे. बऱ्याच दिवसांनी अनपेक्षितरीत्या अद्भुत काहीतरी वाचायला मिळालं, याचा आनंद आहे. हे जे वाचतोय ती एक कादंबरी आहे, हे इल्युजन आहे हे माहिती असतं, तरीही हे जे सरकतंय नजरेसमोरून ते असंच अनंत काळ चालू रहावं, संपू नये, यातून बाहेर पडू नये, असं जे वाटत असतं चांगली कादंबरी वाचताना, त्या आनंदाबद्दल बोलत होतो. हे नशेसारखंच आहे. त्यामुळे ह्याचे विथड्रॉअल सिंप्टम्स पुढचे काही अस्वस्थ करत राहणार. आणि काही दिवसांनंतर पुन्हा एकदा या कादंबरीच्या अवकाशात प्रवास करून येण्याची गरज भासणार, अशी लक्षणं दिसत आहेत.
खूप छान परिचय करून दिलाय
खूप छान परिचय करून दिलाय संप्रति१. वाचेन ही कदंबरी.
काही वर्षांपूर्वी फिलीप के
काही वर्षांपूर्वी फिलीप के डिक ह्यांच्या निवडक कथांवर बेतलेली "Electric Dreams" नावाची एक मालिका tv वर आली होती.
काल परवा ओरिसा मध्ये एक मानवी जीवनाला काळीमा फासणारी रक घटना घडली. दुसऱ्या ठिकाणी ४०० अश्रू ढाळणारया माबो करांनी या घटनेला अजिबात महत्व दिले नाही.
Why so silective ? असे का झाले असावे? असा जर प्रश्न आपल्याला पडला असेल तर त्याचे उत्तर कदाचित ह्या कथेत मिळेल.
The Hanging Stranger
https://americanliterature.com/author/philip-k-dick/short-story/the-hang...
आणि ह्या कथेची चित्रफीत
https://www.youtube.com/watch?v=HFWFKTUBa9E
येथे पहा.
मुल कथा आणि चित्रफीत मध्ये काही फरक आढळेल. त्याचे कारण असे आहे कि ह्या सेरीज मधील कथा काही प्रसिद्ध लेखकांनी पुनर्लिखित केलया आहेत.
ही कथा Dee Rees नावाच्या दिग्दर्शिकेने लिहिलेली आहे. त्या सेरीज मध्ये कथेचे नाव आहे. Kill All Others.
Dee Rees ला ही कथा का आवडली?
‘Going home—with their minds dead.’ ह्या एका वाक्याने.
In this story, the spectre is literal and physical—a hanging body from the square. But in principal, Philip K. Dick illustrates that in real life, the spectre can be much darker, much more insidious. It could be words, it could be an attitude, it could be an idea. And obliviousness is the real alien that destroys . . .‘Going home—with their minds dead.’
पहा तुम्हाला आवडते का.
dee rees ला ही कथा आवडली. तेव्हा ट्रंप च्या पहिल्या निवडनुकीची धूळवड चालू होती.
तिच्याच शब्दात ऐका
"I adapted this story into the screenplay for Kill All Others during the throes of the 2016 US presidential campaign. There was blind, chanting jingoism. Many dangerous ideas were declared, nurtured, and allowed to propagate. There were many debates about ‘literalism’ vs. hyperbole; there were many debates about freedom of speech; there were many debates about nationalism. This is not really happening, they said. What you are seeing is not what you are really seeing, they said. What you are hearing is not really what is meant, they said. There were many debates about the wrong thing altogether. We didn’t see it.
There was a body hanging in the square.
American literature site
American literature site bookmark केली आहे. कथा डाऊनलोड केली इपबमध्ये. बघतो.
संप्रति, परिचय आवडला.
संप्रति, परिचय आवडला.
किंडलवर पुस्तक विकत घेतलं. ९९/- रुपयांना उपलब्ध आहे.
मेघना पेठे आमच्या ऑफिस मध्ये
मेघना पेठे आमच्या ऑफिस मध्ये होती. पण तिचं एक ही पुस्तक मी वाचलेलं नाहिये. कथा कादंबऱ्या वाचण्यात मन रमत नाही हल्ली.
फोटोत लिहिलंय तोच हेअर कट कायम होता तिचा. बोलकी, स्पष्टवक्ती वगैरे होती.
भारतीय संस्कृती आणि अहिंसा हे
भारतीय संस्कृती और अहिंसा ( डी डी कोसंबी) हे पुस्तक सध्या वाचत आहे. अॅमेझॉनवर मिळालं.
A History of Babylon by L W King हे मागवण्यासाठी सांगितले आहे.
अजून दोन दुर्मिळ पुस्तके हातात पडली कि काही प्रश्नांची उत्तरं मिळण्यास मदत होईल.
शाहू पाटोळेंची 'अन्न हे.. '
शाहू पाटोळेंची 'अन्न हे.. ' आणी 'उसवलेले दिवस' मला वाचायची आहेत. भारतातून हार्ड कॉपी मागवावी लागेल, इथे कुणी वाचली आहेत का ?
शाहू पाटोळेंची 'अन्न हे.. '
शाहू पाटोळेंची 'अन्न हे.. ' आणी 'उसवलेले दिवस' मला वाचायची आहेत. भारतातून हार्ड कॉपी मागवावी लागेल, इथे कुणी वाचली आहेत का ?
>>>
अन्न हे अपूर्णब्रह्म माझ्याकडे आहे. नक्कीच वाचायला हवे असे याप्रकारातले आहे. हे पाककृतींचे पुस्तक नाही. महार व मांग या दोन जातीन्च्या रोजच्या व सणासुदीच्या स्वयंपाकाचे व वापरल्या जाणार्या घटकान्चे दस्तावेजीकरण आहे.
शाकाहार, मराठी चौरस आहार, केवळ ब्राह्मण सारस्वत आणि मराठा समाजाचा आहार म्हणजे आपली संस्कृती ही समज असणार्यांनी हे पुस्तक वाचले पाहिजे. तुम्ही वाचून तुमच्या मतांना पुष्टिच मिळेल. ज्यांनी वाचले पाहिजे ते वाचणार नाहीत हा दैवदुर्विलास आहे.
पुस्तकात पाटोळेंनी संतसाहित्यात या दोन जातीन्च्या आहाराबद्दल येणार्या संदर्भांचा मोठा शोध / धांडोळा घेतला आहे. अपेक्षेप्रमाणे संतसाहित्यात फारसे उल्लेख नाहीतच. संस्कृत वाङमयात अस्ण्याचा प्रश्नच येत नाही. पण मला संतसाहित्याचा अभ्यास करून त्यात हे संदर्भ शोधण्याच्या मागची भुमिका काही समजली नाही.
पुस्तक हवे असेल तर मी पाठवतो
>>>>>>>हे पाककृतींचे पुस्तक
>>>>>>>हे पाककृतींचे पुस्तक नाही. महार व मांग या दोन जातीन्च्या रोजच्या व सणासुदीच्या स्वयंपाकाचे व वापरल्या जाणार्या घटकान्चे दस्तावेजीकरण आहे.
सुंदर!! लढवय्यी व शूर जमात. त्यांच्या खाण्यापीण्याच्या पद्धती वाचायाला आवडतील. लहानपणी मित्र होते. बरेच जण परदेशात आहेत. एक जण मॉडेलिंगमध्ये आहे. एकजण पायलट आहे. लहानपणी मला उत्तम मैत्र लाभले. अठरापगड जाती होत्या - कासार, शिंपी, गुजराथी, मारवाडी, ख्रिश्चन , मुसलमान, ब्राह्मण, सीकेपी व माळी (इतकेच आठवतायत) मित्र मैत्रिणी होते. बालपण समृद्ध गेले.
टवणे सर, पुस्तक मला पाठवाल का
टवणे सर, पुस्तक मला पाठवाल का? त्यानिमित्ताने मी तुम्हाला 'शशी भागवत' यांचे 'मर्मभेद' पाठवेन. व्यनिमध्ये माझा पत्ता व फोन नंबर देइन. मला व्यनि मिळत नाहीत. पण मी तुम्हाला माझी ईमेल विपूत देऊ शकेन. आग्रह नाही. युअर कॉल. धन्यवाद.
-----------
>>>>>भारतीय संस्कृती और अहिंसा
रोचक विषय आहे.
अवांतर : परदेशातून पुस्तक
अवांतर : परदेशातून पुस्तक पाठवायचा खर्च किती येतो?
संतसाहीत्यात कांदा मुळा भाजी
संतसाहीत्यात कांदा मुळा भाजी असे श्लोक येतात. त्यामुळं आणखी असे उल्लेख आहेत का हे शोधावेसे वाटणे साहजिक आहे.
ती एक चांगली पुराव्यासारखी जोड झाली असती.
गावाबाहेरची खाद्य संस्कृती ही नाईलाजाची असल्याने त्याला संस्कृती म्हणावं का हा विचार पहिल्यांदा मनात आला. चिनूक्सचा लेख वाचल्याने यातून इतिहासाचे आणखी काही कंगोरे आढळू शकतात. आता लिहीते झाल्याने हे एक प्रकारचे डॉक्युमेंटेशन आहे. भविष्यात कुणाला उपयोगी पडू शकेल.
>> अन्न हे अपूर्ण ब्रह्म <<
>> अन्न हे अपूर्ण ब्रह्म <<
आमच्या आज्ज्याने २०२३ साली दोन बंदुका सरकारजमा केल्या.
त्या आणि त्यापूर्वी दोन अशा बंदुकांनी त्याने अगणित ससे, हरणं, रानडुकरं आणि कांडेकरकोचे मारले. (माझे लहानपण या शिकारी आणि मासेमारी या आज्ज्याच्या छंदांभोवती गुंफलेले आहे.) त्याने प्रसंगी मोर व त्यांची अंडी, होले, तितरे ते क्वचित घोरपडी असा प्रचंड वैविध्याने नटलेला मांसाहार केला. (निसर्गाच्या दुर्दैवाने). परंतु एक आठवण आहे की घरासमोरच्या (म्हणजे मधे एक मोठा डांबरी राज्यरस्ता आहे) मांगांच्या वस्तीत एकदा लग्न लागले होते. आमचा आज्जा लग्नाला मला घेऊन गेला. मी तिसरीत वगैरे असेन. अत्यंत जबरदस्त सुवास येत होता जेवणाचा. नंतर अक्षता टाकून आम्ही न जेवताच परत आलो (म्हणजे व्हेज देखील खाल्ले नाही). मी विचारले तर मला उत्तर मिळाले की रेडकू शिजत होते. आणि आपण ते खात नाही!! ( आल्यावर अंघोळ वगैरे करायला लावली.) आमच्या आज्ज्याला रेडकाचाच काय प्रॉब्लम होता कुणास ठाऊक. म्हणजे आम्ही मुसलमान किंवा महार, नवबौद्ध यांना घरे भाड्याने दिली आहेत, अगदी सध्याही आहेत. दोन लिंगायत, एक मुस्लीम, एक नवबौद्ध, एक नंदीवाले. म्हणजे आज्जा एकदमच कडक जातपात न करणारा असूनही तो जेवला नाही.
'अन्न हे..', 'Dalit Kitchens.
'अन्न हे..', 'Dalit Kitchens..' >>
हे पुस्तकच माहिती नव्हतं. माहिती असतं तरीही, 'पाककलेसंबंधी काहीतरी दिसतंय, आपल्या काय कामाचं नाय', म्हणून वाचलं नसतं. नंतर या पुस्तकाच्या निमित्तानं राहुल गांधी आणि शाहू पाटोळेंचा एक व्हिडिओ पाहण्यात आला.
https://youtu.be/sfSOKyMtlms?si=hARAtWhINVYDjcJz
मग वाचलं.
टवणे सर, पुस्तक मला पाठवाल का
टवणे सर, पुस्तक मला पाठवाल का?
>>
नक्की. मला इमेल पाठवा.
मी माझ्या कडच्या सगळ्या पुस्तकान्ची यादी पाठवतो म्हणजे तुम्हाला अजून कुठली हवी असतील ती पण देता येतील एकदमच. चारशे च्या आसपास पुस्तके झाली आहेत आता. कविता सन्ग्रहही बरेच आहेत - तुम्ही कविता वाचता असे दिसते म्हणून सुचविले.
खूप आभारी आहे. मला इंग्रजी
खूप आभारी आहे. मला इंग्रजी आणि हिंदी कविता जास्त आवडतात. मराठी मुक्तछंदातीलच फक्त आवडतात (सहसा!)
मी आपल्याला ईमेल पाठवेन. ईमेलमध्ये बोलू.
धन्यवाद.
----------
माझ्याकडे २० एक मराठी पुस्तके आहेत. ती मी महावल्लभ गणपती स्थानातील 'चॅरिटी टेबल' वरती ठेउन येणार आहे. शशी भागवत फक्त जपेन कारण त्यांची शैली भयानकच आवडते. हां आपल्याला शशी भागवत हवे असतील तर मात्र नक्की पाठवेन.
'अकबर' ही अकबर बादशहा वरची
'अकबर' ही अकबर बादशहा वरची शाजी जमॉं यांची २०१६ मध्ये आलेली हिंदी कादंबरी किंडल अनलिमिटेड वर फ्री दिसली. वाचायला सुरुवात केली आणि एवढी आवडत गेली की चाटून पुसून फस्त केली. एकदम 'क्लास' काम आहे हे.
टवणे सर हल्ली गपचूप पुस्तक
टवणे सर हल्ली गपचूप पुस्तक वाचून गपचूप ठेवून देतात. त्याबद्दल इथे लिहीत नाहीत. याबद्दल निषेध.
पुस्तक नाही पण हे दोन सणसणीत
पुस्तक नाही पण हे दोन सणसणीत लेख वाचले.
तुमची भाषा तुमची जात दाखवते काय?
हे वाचा. पुणेरी ब्राह्मणाना आरसा दाखवणारा हा लेख आणि त्याला उत्तर.
https://scroll.in/article/1092462/how-the-nasal-na-insists-on-marathis-…
How the hard ‘na’ insists on Marathi’s caste hierarchy
https://scroll.in/article/1092616/rejoinder-the-retroflex-like-the-mara…
Rejoinder: The retroflex, like the Marathi ‘na’, has little do with caste
दोन्ही लेख वाचले केशव्कूल.
दोन्ही लेख वाचले केशव्कूल. आलोक ठक्करच्या लेखातले सगळे मुद्दे बरोबर आहेत - प्रमाण भाषेची गरज, ण ट हे दक्षिण आशियायी भाषेत आहेत वगैरे. पण मराठीत ते जातीदर्शक आहेत हे ही खरे आहे आणि शैलजा पाईकांचा मुख्य मुद्दा तोच आहे.
“काय आनि पानि बोलतात” हे मी अनेकदा माझ्या आजुबाजुला ऐकले आहे. जसे “काय गू घाण खातात” हे मांसाहाराला उद्देशून म्हणणे, मांसाहार हा अपवित्र मानणे (अगदी मांसाहार करणारे पण देवाच्या जवळ मांसाहार न करणे, सणाला मांसाहार न करणे) हे पण जात्यादर्शक आहे. अनेकदा त्यामुळे अ-ब्राह्मण ण ला न आणि न ला ण म्हणतात - आपण चुकीचे बोलतो या न्युनगंडातून ओव्हर करेक्शन.
Pages