Submitted by धनि on 7 April, 2026 - 09:25
२००० होऊन गेले म्हणून नवीन धागा.
मागच्या धाग्याची लिंक
https://www.maayboli.com/node/87006?page=66
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
न्वारच आहे उच्चार. "नटरंगी
न्वारच आहे उच्चार. "नटरंगी न्वार, उडवी पेसिमिझमचा बार" असं लक्षात ठेवू.
नु आ र म्हणजे फ्रेंचात काळा.
नु आ र म्हणजे फ्रेंचात काळा. न्वार नक्कीच नाही
आता र = रर् असा सोडायचा आहे.
https://dictionary.cambridge
https://dictionary.cambridge.org/dictionary/english/noir?__cf_chl_f_tk=n...
इंग्लिश माझी मातृ भाषा नाहीये. तेव्हा पाहिजे तसा उच्चार करतो.
मी वाचलं तेथे न्वार होते. पण
मी वाचलं तेथे न्वार होते. पण ते जॉन्राचे स्पेलिंग genre असं होतं तसं काही असेल. शेवटी तोंडातल्या तोंडात लाडीक होतात फ्रेंच. नुआर हे सुद्धा लाडीक होत गेले असेल.
"न् वार" असं ऐकू आलं. म्हणजे दीर्घ उच्चार करत न्यायचे. न पूर्णही नाही आणि अर्धही नाही.
अस्मिता.
अस्मिता.
तुमच्या रिव्यू मुळे मला ओडिसी दोमदा बघावा लागला. त्याच मुळे तिसऱ्याडा बघावा लागणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=WCxx_OVOVUw
हे ऐकत बसतो.
अत्यंत haunting आहे. मनात काय भाव येतात ते सांगणे कठीण आहे.
हे काहीतरी lyre नावाचे
हे काहीतरी lyre नावाचे प्राचीन ग्रीक वाद्य आहे असे मी वाचले पण त्याचा आवाज असा नाहीये, कुणाळा काही कल्पना आहेका?
आक्का ही एक क्लिप ऐका
आक्का ही एक क्लिप ऐका युट्यूबवर l'histoire du flim noir hollywoodien, लिंक नाही देता येत मला. ह्यात बरेच वेळा आलाय उच्चार. आमच्या शिक्षनाला कायतरी किंमत द्याकी व माय

अरे केकु मला इथे हे लिहायचे आहे की मी ओडिसी दोनदा बघितला, पण माझ्या आधी तुम्ही पाहिलात. मी पण बघणार आहे दुसऱ्यांदा
I am glad you enjoyed it,
केकु- I am glad you enjoyed it, twice!
लुडविग गोरॅन्सन ( आता ह्याचा उच्चारही वेगळा असेल, हाही फ्रेंच/ जर्मन आहे.) आणि हॅन्स झिमर यांचेच संगीत नोलानच्या सिनेमात पाहिलं आहे. काही तरी गूढ, melancholic तरीही पुन्हा पुन्हा ऐकत राहावे असे काही तरी आहे त्यात. हे मर्मेडचे सायरन तसेच आहे. तुमच्या अंतरीचा ठाव घेते. मला इंटरस्टेलरचे आणि ऑपनहायमरचे सुद्धा फार आवडले होते. मी पण असंच नुसतंच ऐकत बसते.
लंपन, हो हो
आज शिक्षक दिन आहे त्यात! माझं तर इंटरनेटवरचं आहे, तुमचं तर खरं आहे.
हाही फ्रेंच/ जर्मन आहे>>>
हाही फ्रेंच/ जर्मन आहे>>>
नाही. मला वाटतय की स्वीडिश आहे.
मी पण आज इंटरस्टेलर चे म्युझीक ऐकत बसलो होतो.
काय ग्रेट माणस आहेत ही!
btw
ओडिसी वरून मला का कुणास ठाऊक "सिदाबाद ड सेलर" आठवला.
वो छोडो,
"ए होम कंमिंग ऑफ द वारीअर" ची कथा आहे. पण पुन्हा तो घरी पोहोचला का आणि "घर" म्हणजे नक्की काय? असे प्रश्न पडतात.
Peter Jackson is the director of The Lord of the Rings. जर समजा त्याने हा सिनेमा केला असता तर?
नोलान ने आता Macbeth करावा ही एक आस मनी.
https://youtu.be/si2h1IiAdis
https://youtu.be/si2h1IiAdis?si=El56ikPS9D37ZikE
केकू हे सापडले आता. यात काही आवडते का बघा. Lyre मला थोडं "हार्प" सारखं वाटतं. तंतुवाद्यच आहेत. हार्प बसून वाजवावं लागतं आणि हे हातात घेता येतं. Lyric हा शब्द सुद्धा lyre पासून झाला आहे, expression. हे आता वाचलेले, मलाही विशेष माहिती नाही.
संतूर!!
संतूर!!
पर्फेक्ट!
पर्फेक्ट!
ओडिसीयस त्या सायक्लॉप्सला स्वतःचे नाव सांगताना माझं नाव nobody आहे म्हणतो. मग तो सायक्लॉप्स त्याच्या बाबाला म्हणजे पसायडनला नोबडीने माझा डोळा फोडला म्हणतो, तेव्हा पसायडनला कळत नाही नेमकं कोण! तेव्हा पासून ओडिसीयस खरंच nobody व्हायला लागतो. हे संगीत ती शून्यता देते.
घर म्हणजे जेथे तुम्हाला वाटतं तुमची जीवाभावाची तुम्हाला समजून घेणारी माणसं आहेत ते. रक्ताची असलीच पाहिजेत असेही नाही. माबो सुद्धा म्हणूनच कुटुंब आहे.
घर म्हणजे चार भिंती नाहीत. घर म्हणजे माणसं! कधीकधी परत जायलाही घरच नसतं. तेही माहिती आहे. एक longing आणि एक होमसिकनेस घर आणि माणसं असणाऱ्यांनाही असू शकतो. त्यामुळे हे "घर" फार ट्रिकी आहे. 
-----
ओडिसी बद्दल धन्यवाद योगी!
लंपन तिसऱ्यांदा ना?
लंपन
तिसऱ्यांदा ना?
आता मी लिहित बसलो तर...
आता मी लिहित बसलो तर...
त्याचा डोळा फोडल्यावर सायक्लॉप्स तो ओरडतो. त्याचे भाऊ त्याला विचारतात काय झाले. तेव्हा तो सांगतो की nobody ने माझा डोळा फोडला. ते ऐकून भाऊ म्हणतात मग ठीक आहे.
नंतर ओडीसिअस जेव्हा आपल्या जहाजावर सुरक्षित पोचतो तेव्हा तो ओरडून सायक्लॉप्सळा गर्वाने सांगतो.
"कुणी विचारले की तुझा डोळा कुणी फोडला तर त्याना सांग की मी ओडीसिअस त्याने माझा डोळा
फोडला. "
ह्याला hubris म्हणतात. ह्या गर्विष्ठ पणामुळे पुढचे "रामायण" होते.
ग्युसचा नियम इथे तोडला गेला व त्याची फळे त्याला भोगावी लागली.
केकु नाही दुसऱ्यांदा बघायचा
केकु नाही दुसऱ्यांदा बघायचा (च) आहे.
केकुंचे वाक्य मी इंग्लिश ही
केकुंचे वाक्य मी इंग्लिश ही माझी मातृभाषा नाही. त्यामुळे या फ्रेंच शब्दाचा उच्चार पाहिजे तसा करतो असे वाचले
माहितीत भर घातल्याबद्दल आभार
माहितीत भर घातल्याबद्दल आभार सर्वांचे.
गेल्या वेळी मी याचा उच्चार गुगल मधे ऐकला होता हे आठवतं. नोआर म्हणजे काय याची डेफिनेशन पण समजली. थँक्स.
आधी पाहिले त्यात नुसती हिंसा होती. एण्डलेस हा शब्द चुकला असेल. अनावश्यक या अर्थाने काही तरी असं म्हणायचं होतं.
भावना समजून घ्या म्हटलं असतं पण बापट आठवले.
फा
फा
मी वर केम्ब्रिज डिक्शनरी चि लिंक दिली आहे. त्यात ब्रिटीश आणि अमेरिकन उच्चार दिले आहेत.
त्या अनुषंगाने मी लिहिले होते.
एक शेवटचे.. प्रतिसाद film noir वरून सुरु झाले. film noir मध्ये सर्व साधारण पणे एक femme fatale म्हणजे An alluring and seductive woman, especially one who leads men into compromising and dangerous situations.
असते.
Iliad आणि odyssey मध्ये हेलन ही femme fatale आहे. थोडक्यात ही ओरिजिनल film noir कथा आहे. हे माझे मत.
सिनेसंगीतावर चर्चा आहे म्हणून
सिनेसंगीतावर चर्चा आहे म्हणून आमची शेपूट -
https://youtu.be/MVnSFj6XQZY?si=ERb3AZpR932QpC7V
Hereditary ह्या सिनेमात शेवटी येणारे संगीत. दरवेळी ऐकताना विचित्र भावना येते. कोणीतरी कमेंटमध्ये छान लिहिले आहे - This feels like the victory of something that shouldn't have won
अस्मिता कॉमी
अस्मिता कॉमी
तुम्ही दिलेल्या क्लिप्स ऐकल्या.
अनेक धन्यवाद.
कॉमी
मी तो सिनेमा बघितला नाहीये.
पण तुम्ही म्हणता तो इफेक्ट सिनेमा बघत असताना येईल असे वाटते.
Mirzapur the movie बघितला.
Mirzapur the movie बघितला. Timepass आहे. Serial आवडली असेल तर हा ही आवडेल. जास्त intellectual नाहीये. आठवडा भर कामाने डोक्याचा भुगा झाला होता. त्यामुळे पण मला काहीतरी बिनडोक entertainment पाहिजे होती ती मिळाली. गुड्डू भैय्या मुन्ना भैय्या यांनी मजा आणली. रवी किशन ची addition आहे. बबलू च्या role मध्ये जितेंद्र कुमार आहे. तो विक्रांत मेसी पेक्षा चांगला वाटला.
मी आत्ताच तिकिटं काढली,
मी आत्ताच तिकिटं काढली, तासाभरात शो आहे! थँक्स!
"हेरेडेटरी" मी पाहिला आहे. ती
"हेरेडेटरी" मी पाहिला आहे. ती लिंकही पाहिली. हॉरर फारसे पाहात नाही पण मी पाहिलेला हा सगळ्यात अभद्र आणि भितीदायक सिनेमा आहे. त्यामुळे ती कमेंटही चपखल आहे. त्यातली लहान मुलगी जी जीभ टाळ्याला लावून टॉक टॉक आवाज करत असते ते सुद्धा भयंकर वाटलं होतं. ज्यांना हॉरर आवडतात त्यांना फुल रेको. यातील मंत्र सुद्धा खरे म्हणजे occult आवाहन करतात तेच ओरिजनल वापरले आहेत असे ऐकले होते. माझ्या डोक्यातून जातच नव्हता हा सिनेमा इतका भयानक आहे.
द ग्रीन बुक - नेटफ्लिक्सवर
द ग्रीन बुक - नेटफ्लिक्सवर पाहिला. खूप आवडला.
येथे फा ने आणि बहुतेक सुनिधीने रेको दिला होता.
Viggo Mortensen व Mahershala Ali या दोघांच्या मुख्य भूमिका आहेत.
यात व्हिगो - टोनी नावाचा एक इटालियन ड्रायव्हर आणि अली - एक डॉक्टर शर्ली नावाचा कृष्णवर्णीय पियानोवादक आहे. सगळी कथा सेग्रेगेशनच्या काळातील आहे. ग्रीन बुकचा संदर्भ - असं गाईडबुक जे तुम्हाला अमेरिकेतील दक्षिण भागात जेथे वर्णभेद अजूनही तीव्र आहे आणि ज्या कृष्णवर्णीय लोकांना प्रवासात आपापल्या वाहनाने साऊथला जायचे आहे त्यांना कमीतकमी अपमानाला तोंड देऊन प्रवास करता यावा. जेथे कलर्ड लोकांना जेवू देतील अशी रेस्टॉरंट्स आणि राहू देतील अशी हॉटेल्स आहेत. जेणे करून प्रवास या सगळ्या अन्यायाला तोंड देत पण सुखकर व्हावा.
तोपर्यंत हा इटालियन ड्रायव्हर टोनी स्वतःही वर्णद्वेषी असतो. पण ह्या श्रीमंत पियानोवादकाच्या टूर व कार्यक्रमांसाठी जाण्यास पैशासाठी तयार होतो. डॉ शर्ली अतिशय श्रीमंत व मोठा कलाकार पण सर्वांपासून दूर आणि एकाकी असतो. अक्षरशः कुणातच न मिसळणारा. त्या विरुद्ध टोनीला बायको मुलं आणि मोठं कुटुंब असतं.
साऊथ मधे मारामारीची गरज पडली तर टोनी एकदम योग्य वाटून त्याला कामावर घेतलेलं असतं. तेथे हा जरा अरेरावी, सतत सिगारेट फुंकणारा, रफ भाषा वापरणारा लगेच हमरीतुमरीवर येणारा आणि अगदी पॉलिश्ड उच्चभ्रू वर्गातील कलाकार डॉ शर्ली या दोघांची मैत्री कशी वाढत जाते याची कथा आहे.
या प्रवासात वर्णभेदामुळे डॉ शर्ली वर अनेक संकटं येतात, शिवाय बाथरूम न वापरू देणं, जेवू न देणं असे अनेक अपमानास्पद प्रसंगही येतात. ते सर्व दोघं आपापल्या परीने आणि आपापल्या पद्धतीने कसं हॅंडल करतात हे फार मस्त दाखवलं आहे. सगळ्यात गोड म्हणजे - शर्ली टोनीला त्याच्या बायकोला गोड रोमॅन्टिक पत्रं कशी लिहायची शिकवतो व टोनी फ्राईड चिकन खाणं किती छान आहे हे शर्लीला! भरपूर छोटे छोटे निरागस आणि विनोदी प्रसंगही येतात. त्यातून त्यांचे नाते फुलत जाते व पूर्वग्रह सुद्धा हळूहळू दूर होत जातात. खूप गोड काहीतरी पाहिल्याचे समाधान मिळावे असा सिनेमा आहे. माझाही रेको.
मिर्झापूर जरा कायच्या काय आहे
मिर्झापूर जरा कायच्या काय आहे. सिरियल मध्ये बऱ्याच गोष्टी आणि लेयर्स होते, इथे सगळ्यांची कॅरेकेचर्स करून टाकली आहेत. एक फ्रांचायझी मिळाली आहे तर छापा पैसे असा आहे. पण ठीकच आहे!
हेरेडेटरी पहाते आता. मला हॉरर
हेरेडेटरी पहाते आता. मला हॉरर सिनेमा भयंकर आवडतात. हा का कुणास ठाऊक, लहान मुलीचे चित्र पाहुन खास भितीदायक नसेल वाटुन पाहिला नव्हता.
बबिता सिंग कसला मस्त आहे सिनेमा! या मुलीचे आता अजुन २ , मलिक (प्राईम) आणि नायत्तु (नेटफ्लिक्स) वॉचलिस्ट मधे टाकले. इंडिअन किचन तर पाहिला आहेच. तिचा अजुन एक Thondimuthalum Driksakshiyum पण फार मस्त आहे म्हणे पण तो ने, प्रा वर नाही.
फॉल-२ आलेला दिसतोय थेटरमधे. पहावा झालं.
वेलकम टू द जंगल
वेलकम टू द जंगल
एका उद्योगपतीला काळ्या पैशावरचा कर वाचवायला भरमसाठ बजेट मधे एक फ्लॉप सिनेमा प्रोड्यूस करायचा असतो म्हणून वेलकम टू द जंगल नामक मल्टी स्टारर सिनेमा बनण्याची गोष्ट म्हणजेच हा सिनेमा.
इथेही प्रोड्यूसर लोकं पैसा उडवायच्या मागे असावेत असं वाटतं.
टिपिकल मल्टी स्टारर सिनेमात जे कोण असतात ते सगळे इथे आहेत. ते सगळे तेच करतात जे ते अन्यत्र करतात.
आता धमाल 4 किती ब्रेक नंतर पहावा हे ठरवणं अवघड झालंय.
एकदा वाटतं की फ्लो मधे बघून टाकू, पण दुसरीकडे सलग इतका बकवास झेपेल का नाही ते नक्की नाही.
अल्फाच्या आधी सुरू केलेला कॉकटेल 2 अजूनही अर्धवट ठेवला आहे. तो मात्र लगेच पूर्ण होण्यातला नाही...
सध्या या हिट विनोदी
सध्या या हिट विनोदी चित्रपटांच्या सिक्वेल चं लिखाण अतिशय आळशी झालं आहे.आधी ते मेहनत घ्यायचे, वेगवेगळ्या हॉलिवूड चित्रपटातले योग्य मजेशीर भाग कॉपी करायचे, त्याभोवती भारतीय वाटेल अशी कथा विणायचे. आता ते नुसतेच 'हे बघ, याला घेऊ, त्याला घेऊ, जरा हिट गाणी टाकू, रायटर वगैरे ला पैसे द्यायला नको, आपणच गप्पा मारत मारत दोस्ती खात्यात काहीतरी स्किट लिहून टाकू, लोक नक्की काय आहे बघायला येतीलच.' आहे.धमाल 4 मध्ये सर्वत्र फक्त फॅट शेम जोक्स आहेत.'नही दबाना था' आणि 'अय्यर' सारखी मजा कुठेय? उपेंद्र लिमये ला आणि रवी किशन ला पण वाया घालवलंय. लिमये ने मडगाव एक्स्प्रेस मध्ये मजा आणलीय.वेलकम टू जंगल मध्ये फरीदा जलाल, अक्षय कुमारचा सुरुवातीला असलेला भोजपुरी स्वॅग, आणि मध्ये मध्ये रविना अक्षय च्या खऱ्या पूर्व हिस्टरी मुळे होणारे जोक्स सोडून विशेष काहीही नाही.2 तंगकपडिय मुली (पटणी आणि जॅकलीन)उगीच घेतल्या आहेत.जॅकलीन चे ब्लॉन्ड केस बघून किमान पुढचा 1 आठवडा वाईट स्वप्नं पडावी.दलेर मेहंदी ला का घेतलंय त्यांचं त्यांना माहीत.काहीतरी जुनी उधारी असेल.अर्षद वारसी सुनील शेट्टी अक्षय कुमार सवयीने जरा चांगलं काही करायला जातात पण कथाच नाही तिथे ते काय करणार?सर्वात राग स्वतःचा येतो की हे सर्व होणार माहीत असून पण पूर्व पुण्याई ने ते पाहिले जातात.
आता हेराफेरी3 वाईट निघाला तर मी आयुष्यात कोणताही सिक्वेल बघणार नाहीये.
ग्रीन बुक बद्दल लिहीलेले
ग्रीन बुक बद्दल लिहीलेले आवडले अस्मिता. मी आधी लिहीले होतेच पण ऑस्कर चेकमार्क्स आणि लोकांचे पूर्वग्रह झटक्यात गळून पडणे इतका भाग सोडला तर बाकी पिक्चर मस्त आहे. मस्त एंगेज करतो. तू लिहीले आहेसच पण ते पत्र लिहीणे आणि सदर्न फूड आवडू लागणे, दोन्ही छान आहे. सुरूवातीला काळ्या लोकांबद्दल तिरस्कार असणारा आणि त्यामुळे याच्याबद्दलही एक तुच्छता असणारा टोनी याच्या सहवासात येतो तसा बदलत जातो, इतका की यालाच वाचवू लागतो. तो बदल फार छान आहे. बाय द वे शर्लीचे ही एक जुने तुटलेले नाते तो जुळवायला निदान संपर्क करतो असेही काहीतरी आहे ना? नीट लक्षात नाही.
काळी व्यक्ती क्लासी असणे आणि गोरी व्यक्ती ब्लू कॉलर टाइप हे स्टीरीओटाइप उलटा करणारे चित्रणही वेगळे वाटले.
मी वरती झटक्यात गळून पडणारे पूर्वग्रह म्हणालो ते टोनीबद्दल नाही. त्याच्या मित्रमंडळी वगैरे सर्कलबद्दल. लगान मधे जसे कचरा बद्दल आमिरच्या एका भाषणात गावकरी बदलतात तसेच ते वाटते.
शर्ली पियानो वाजवताना ते बाहेरून बघत असलेला टोनी हा एक माझा आवडता सीन आहे. जे चालले आहे ते आपल्याला नीट कळत नाही पण ऐकायला मस्त आहे असे काहीतरी भाव दिसले त्याच्या चेहर्यावर. ते रिलेट झाले
Submitted by mi_anu on 6
Submitted by mi_anu on 6 September, 2026 - 11:18 >> धमाल पोस्ट आहे. मनातलं लिहीलंय.
नवे सिनेमे नको वाटतात बघायला. सिक्वेल तर अजिबात नाही. एम आय ५ कि ६ पाहिला. साऊथचे चांगले असतात. किती ते ताणलेले थरार सीन्स. जुरासिक पार्क मधे बसचा सीन पाहिल्यानंतर यात फक्त ट्रेन घेतलीय. एकदा अनुभव घेतल्यावर पुन्हा वेगळ्या वाहनात एक्स्टेण्डेड अनुभव घ्या असा आग्रह वाटला.
Pages