Submitted by भरत. on 9 March, 2026 - 11:57


Watch this space for तळजाई तत्काल गटग वृत्तान्त
गटगला आलेल्या मायबोलीकरांसाठी सूचना
मराठी टीव्ही मालिकांचं एकमेव ध्येय एपिसोड्सची संख्या वाढवणं . बघणारे सुज्ञ प्रेक्षक असल्याने, पुढे काय होणार हे माहीत असूनही ,काहीतरी वेगळं होईल ; कधीतरी संपेल या आशेने बघतात . तोच फंडा आपल्याला वृत्तान्त लिहिताना वापरायचा आहे. प्रतिसादांची मालिका लावायची. प्रत्येक प्रतिसादाचा शेवट उत्कंठावर्धक करायचा.
टीव्ही मालिकांपेक्षा मायबोली आणि त्यातही गटग हे अधिक अॅडिक्टिव्ह आहे , याची पुन्हा एकवार जाणीव करून द्यायची आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गुड वन स्वाती..
गुड वन स्वाती..
Honestly मला फक्त अस्मिताला
Honestly मला फक्त अस्मिताला भेटायला आवडेल. (फॅन मोमेन्ट) बाकीचे लोक मला बोअरिंग वाटतात. खूप सालस, सद्गुणी लोकांचा मला जरा लवकर कंटाळा येतो. गुलाबजामून दिडच्या वर मला उतरत नाहीत. शिवाय काही लोक पुस्तकं वगैरे वाचून अभिप्राय लिहितात त्यांची मला आता थोडी ऍलर्जी पण झाली आहे.
ठीक आहे. अस्मिताला तुम्हांला
ठीक आहे. अस्मिताला तुम्हांला किडनॅप करायला सांगू.
लोक सालस वगैरे अजिबात नाहीत.
लोक सालस वगैरे अजिबात नाहीत. तुम्हाला काय बोअर होतं नि आवडत नाही, हे सांगत बसू नका. लोक बरोबर नेम धरून तेच करतील. आणि त्यासाठी खास बळजबरीने भेटायलाही येतील.
वृत्तान्त आणि प्रतिसाद
वृत्तान्त आणि प्रतिसाद जबरदस्त.
स्वारगेट ते तळजाई हे अपहरण नाट्य मस्त लिहिले आहे.
मायबोलीवरची गँगवॉर्स, एनकाउंटर्स , अंडरवर्ल्ड >>>>> यासाठी एखादं स्पेशल गटग/ व्याख्यानमाला आयोजित करा.
ठाणे गटगनंतर पुढचं गटग आता वेस्टर्न लाइनवर असं लिहिलं होतं. त्याची आठवण करून देतो.>>>>> लक्षात आहे.
भ्रमर, जाई,
आता लवकरच भरतभेट घडेल. बोरिवली गटग... लवकरच.
वृत्तान्त हे पुन्हा पुन्हा लिहितो आहे, हे सुज्ञ मायबोलीकरांच्या लक्षात आलंच असेल.>>>>> कळतंय पण अजून वळत नाहीये.
रॉबिनहूड तुम्ही मायबोलीवर नवीन आयडीने लिहिते झाला हे पाहून छान वाटले.
स्वारगेटला ट्रॅफुक असेल तर गेट-लॅग मध्ये अडकलोय असं म्हणता येईल. >>> कसं सुचतं ...
साजिरा, भारीच वृत्तान्त. तुमची शैली आवडते.
तिकडे "दादाचा वादा" अजून राहिलाय, त्याकडे पण बघा जरा.
वृत्तान्त वाचताना "लाघवी" शब्दाची अनुपस्थिती जाणवली.
एवढं वाचून त्या पुस्तकांचं नक्की काय झालं ते मात्र कळलं नाही.
Honestly मला फक्त अस्मिताला
Honestly मला फक्त अस्मिताला भेटायला आवडेल. (फॅन मोमेन्ट) >> नमस्कार गोटे मोस्वामी सर .
<त्या पुस्तकांचं नक्की काय
<त्या पुस्तकांचं नक्की काय झालं ते मात्र कळलं नाही.> मला आणि मयुरेशलाही आता ते आठवत नाही. मयुरेश ने ती पुस्तकं कलेक्ट केल्यावर बर्याच काळाने आम्ही पहिल्यांदा भेटलो. तोवर ती पुस्तकं विसरूनही गेलो होतो. ती गेली फिरायला.
धमाल येते आहे हा उत्कंठावर्धक
धमाल येते आहे हा उत्कंठावर्धक वृत्तान्त वाचायला!
हो, मी उचलून गाडीत टाकेन
है भले शाब्बास अस्मिता...
है भले शाब्बास अस्मिता...
हीच अपेक्षा होती तुझ्याकडून..
अगदीच वाटले तर कोकोनटला घेऊन जा, पार्टनर इन क्राइम म्हणून.... तेवढेच बरे... एक से भले दो....
हाहाहा - वोह स्त्री है, कुछ
हाहाहा - वोह स्त्री है, कुछ भी कर सकती है .... लोलच लोल!!!
थोडं रॉय सारखंच माझंही "क्या
थोडं रॉय सारखंच माझंही "क्या बोल रे की क्या की!" झालंय. पण त्याचे कारण चिकवा अथवा एकंदरीतच माबोचा अभ्यास नसणे आहे.
गटगकरांपैकी सिम्बा, रॉबिनहुड व मुग्धमानसी यांना हाय म्हणुन घेतो. उत्सवमूर्ती व आयोजकांसोबत कुठल्यातरी धाग्यात इंटरॅक्शन होतच असते.
स्वारगेटला ट्रॅफुक असेल तर
स्वारगेटला ट्रॅफुक असेल तर गेट-लॅग मध्ये अडकलोय असं म्हणता येईल >>>
ही ट्यूब उशीरा पेटली माझी.
अस्मिता
हे अफलातून किडनॅपिंग आहे. ज्यांना भेटायचे आहे त्यांनीच किडनॅप करून ज्यांना भेटायची इच्छा नाही त्यांच्याकडे नेणे.
मी स्त्री आहे म्हणून मी किडनॅप करू शकत नाही असे समजू नकोस >>> यालाही वरची मीम लागू पडेल.
आता भरत आणि साजिरा करता इतके दिवस डोक्यात येउनही विचारायचा राहिलेला प्रश्न - या सगळ्या वॄ मधे ज्याचा उल्लेख आहे तो मयुरेश म्हणजे पूर्वी पुपुवर असायचा तोच, की दुसरा कोणी?
असंच एका गटगला झक्कींचं मी सारथ्य केलेलं तेव्हा हे महाशय तुच्छतेने म्हणे- अख्खा भारत खणून ठेवलाय वाटतं. >>>
साजिरा हे हुकलंच होतं. बहुतेक हे त्या वैशाली गटग च्या वेळेस असावे. त्यावेळेस वाडेश्वरहून वैशाली कडे जाताना जेमतेम त्या शंभर का दीडशे मीटर्समधे कचर्याच्या गाडी पासून ते खणलेल्या रस्त्या पर्यंत इमर्सिव्ह अनुभव मिळाला होता झक्कींना.
रॉबिनहूड सरांकडनं बर्याच जुन्या मायबोलीकरांनी प्रेरणा घ्यायला हवी. >> रॉहूकडे दहा-बारा प्रेरणा असतील. त्यातली सर्वात भारी म्हणजे लढाईची उपमा वापरून लिहीलेल्या व माबोवर घडलेल्या वादाबद्दलच्या पोस्ट्स. संयमी लोक क्षीण आवाजात आवरा म्हणत असतानाही भांडताना वाट्टेल ते लिहील्याने कड्यावरून मंडळी पडली, पण लगेच दुसर्या बाजूने टीशर्ट बदलून आली सुद्धा वगैरे अफलातून वर्णने.
फा, हा मयुरेश वेगळा. पुपुवाला
फा, हा मयुरेश वेगळा. पुपुवाला मयुरेश कंटक (ज्याने ववि, गटग, बुधवार वगैरेंचं कार्यध्यक्षपद अनेक वर्षं सांभाळलं) सध्या कुठे गायब आहे, काय की.
मानव, अभ्यास वगैरे काही नाही. हेडरमध्ये लिहिलंय ते पाळत राहायचं फक्त
तळजाई मंदिराचा मी काढलेला एक
तळजाई मंदिराचा मी काढलेला एक फोटो सापडला तो टाकतो. आणखी सापडले की टाकेन (प्रतिसाद वाढवण्यासाठी)
त्याच्या समोरच आपण बसलो होतो
त्याच्या समोरच आपण बसलो होतो ना? बाकी सगळ्यांना माहीत होतं. मलाच काही पत्ता नव्हता. अजूनही जुन्या पद्धतीचंच आहे की जीर्णोद्धार करून ऑइल पेंट आणि टाइल्स आल्यात?
हो समोरच बसलेलो.
हो समोरच बसलेलो.
हा फोटो आपण बसलो त्याच्या विरुद्ध बाजूने काढलेला आहे.
रंगरंगोटी केलीय तशी, पण तीही जुन्या पद्धतीचीच आहे. फरशा केल्यात का ते जाऊन बघायला पाहिजे. सभोवती बसायला भरपूर ओटे, कठडे नि जागा आहे. दुपारच्या वेळी फार शांत निवांत असतं.
नवरात्रात मात्र या सार्याला हिडीस रूप प्राप्त होतं. मंदिर परिसरच काय, पण सगळ्या टेकडीला जत्रेचं स्वरूप येतं. गदारोळ, आवाज, अडाणीपणा, फेरीवाल्यांची आक्रमणं आणि गाड्यांची अंदाधुंदी. ती तर आपली परंपराच आहे.
सुंदर फोटो आहे रे साजिरा.
सुंदर फोटो आहे रे साजिरा.
'विकास' होण्या अगोदर खरंच खूप शांत आणि सुंदर होता तळजाई परिसर.
https://www.youtube.com
@ भरत साजीरा सिम्बा
https://www.youtube.com/shorts/vxsooPhA4WY
Pages