पुणे तळजाई तत्काल गटग

Submitted by भरत. on 9 March, 2026 - 11:57

sajira1.jpgsajira2.jpg

Watch this space for तळजाई तत्काल गटग वृत्तान्त

गटगला आलेल्या मायबोलीकरांसाठी सूचना

मराठी टीव्ही मालिकांचं एकमेव ध्येय एपिसोड्सची संख्या वाढवणं . बघणारे सुज्ञ प्रेक्षक असल्याने, पुढे काय होणार हे माहीत असूनही ,काहीतरी वेगळं होईल ; कधीतरी संपेल या आशेने बघतात . तोच फंडा आपल्याला वृत्तान्त लिहिताना वापरायचा आहे. प्रतिसादांची मालिका लावायची. प्रत्येक प्रतिसादाचा शेवट उत्कंठावर्धक करायचा.
टीव्ही मालिकांपेक्षा मायबोली आणि त्यातही गटग हे अधिक अ‍ॅडिक्टिव्ह आहे , याची पुन्हा एकवार जाणीव करून द्यायची आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी अनुचे पुण्याच्या वाहतुकीबद्दलचे लेख आठवल्याने त धीर एकवटून बाहेर पडलो. माझ्या त्या माजी सहकर्मी शनिवार पेठ भागात राहतात. तिथे जाताना शनिवारवाडा दिसला. पण त्यापेक्षा बँक ऑफ महाराष्ट्रचं हेड ऑफिस असलेलं लोकमंगल जास्त जवळचं वाटलं. सांगितलेल्या ठिकाणी वाहन सोडून घर शोधायला सुरुवात केली. आता त्यांचा इमारतीचा क्रमांक ४२०. आपण तो सांगू नये, इतर काही नेमकी खूण सांगावी हे त्यांना सुचलं नाही. मी रस्त्याच्या ज्या बाजूने चालत होतो, तिथे ओळीने ४०३- ४०४ ....आणि दुसर्‍या बाजूने ५०० च्या पुढचे नंबर दिसत होते. पण तो रस्ताच संपला. पुढल्या वळणानंतर ४०० ची मालिकाही संपली. मग त्यांना फोन केला. त्यांनी मला माघारी बोलवलं आणि स्वतः खाली येऊन थांबल्या. तर त्यांचं घर असलेली इमारत त्या दुसर्‍या बाजूच्या ५०० च्या पुढचे क्रमांक असलेल्या बाजूला होती. हे असे यादृच्छिक क्रमांक द्यायची पद्धत पाहून इम्प्रेस झालो.
मग त्यांच्या घरी पाहुणचार, जुन्या आठवणींत रमणं सुरू असताना - २२+ वर्षांनी भेटत होतो आम्ही- साजिर्‍याचे मेसेजेस येऊन पडले होते. ते मी पाहत नाही म्हटल्यावर त्याने फोन केला. आणि आताच भेटूया. सिम्बा आणि मुग्धमानसी येत आहेत. तुम्ही स्वारगेट परिसरात या, तिथून तुम्हांला उचलू असं सांगितलं.

सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. कित्येक वर्षांनंतर पुन्हा मायबोलीवर यायला आनंद तर होतो आहे .साजिरयाच्या पाठ्यपुराव्यामुळे मायबोलीवर परतण्याचे मन झाले. दु: खाची गोष्ट अशी की मायबोलीचे प्रशासन अथवा टेक्निकल टीम अजूनही सुधारलेली नाही . नवीन आय डि घेउन यायला भयन्कर त्रास होत आहे. अनेक फ्रेश इमेल घेतले तरि पुन्हा तोच मेसेज कि हा इमेल आधीच घेतलेला आहे रजिस्टर न झालेला आय डी देखिल already registred आहे असा shock देखिल असतोच . शेवटी अनेक ईमेल आणि आय डी ची कोम्बि नेशन झाल्यावर इमेल मधलि लिन्क ओपेन केल्यावर अन्धकार पसरन्या ऐवजि पान्ढरा शुभ्र अन्धार स्क्रीन वर पसरु लागला.blank screen . सर्व अडथळे पार करुन येथे यावे तर सम्पूर्न ओळिची अक्शरे एकमेकात घुसन्याची आनि सर्व ओळ एडिट करन्याचीदशका पूर्वीची गम्मत अजुनही चालू असल्याचे दिसुन आले. त्यामुले जुने ट्री व्यु वगैरे मायबोलीच्या आवाक्यातील गोष्टी नाहीत हेहि पुन्हाळ्लक्शात पुन्हा लक्शात आले. असो. दशकापूर्वीच्या तान्त्रिक अडचनी अद्यापही तशाच असल्याने इथे पोस्ती करन्यात काही अर्थ नाही . एवधे टाइप करन्यासाथी पन्नासेक वेला एडिट करुन अक्शराचा गुन्ता सोडवला आहे. अस्खलित पने टन्कन करणार्या इथल्या महात्म्याना वन्दन करुन मी माझे दोन शब्द (कायमचे) सम्पवतो .ताक. भरत यान्च्या गटग ला मला न बोलावल्याबद्दल सजिरा याना शम्भर फटक्यान्ची शिक्शा मी सुनावीत आहे . इसकि तामिल तुरन्त की जाय

रिक्षावाल्याने स्वारगेट परिसरात त्याला सोयीच्या जागी मला उतरवलं. तिथून रस्त्यापलीकडे स्वारगेट दुचाकी वाहनतळ असा मोठा बोर्ड दिसला. म्हणजे दुचाकी स्वारांसाठीचा वाहनतळ हे कळलं. पण स्वार आणि गेट यांचा समास कसा सोडवायचा हा प्रश्न मला आता वृत्तान्त लिहिताना पडलाय. आमच्या चर्चगेटला चर्च नाही आणि गेटपण नाही असं निरीक्षण किशोरकुमारने नोंदवलं असलं , तरी स्वारगेट परिसरात गेटच गेट दिसत होते. आता साजिर्‍याने स्वारगेट मेट्रो स्टेशन असं सांगितलं. तर त्या नावाचेही दोन गेट होते. दोन्ही रस्त्याच्या विरुद्ध बाजूंना. मुख्य गेट असं कळलं. एवढ्यात माझा तो रस्ता दोनदा ओलांडून झाला होता. आंणि रिक्षावाल्याने जिथे उतरवलं तिथेच पुन्हा पोचलो. साजिर्‍याला पुन्हा फोन केला तर तिथल्या उद्घोषणा आणि वाहतुकीच्या आवाजात काहीच ऐकू येईना. (मायबोली गटग तिथे झालं तर मेट्रोचे प्रवासी यांच्या गदारोळात उद्घोषणा ऐकू येत नाहीत अशी तक्रार करतील, असा विनोद आता सुचलाय. तेव्हा न चिडता हसून घ्या ) तरीही जे काही कळलं त्यावरून तो तिहे स्वारगेट मेट्रो स्टेशनच्या मुख्य गेटच्या समोर फुटपाथवर की पायर्‍यांवर उभा आहे असं म्हणाला. तिथे रिक्षाची किंवा आणखी कोणाकोणाची वाट बघणार्‍या लोकांना तुम्हांला एवढ्यात इथे अक्षय खन्ना दिसला का असं विचारावं का ? असा विचार करत असतानाच साजिरा दिसला. मी त्याच्याकडे गेल्यावर त्याने मोदींसारखी गळामिठी न घेता सुरक्षित अंतर ठेवून शेकहँड केला आणि मला त्याच्या मागे यायला सांगितलं आणि रस्त्याने वाहनांच्या गर्दीतून भराभर चालत सुटला. मध्ये मध्ये मागे वळून मी येतोय ना याची खात्री तो करत होता.
पण गर्दीतल्या कोणी पाहिलं असतं तर मी साजिर्‍याचा पाठलाग करतोय आणि तो माझ्यापासून पळतोय असं दिसलं असतं.
मग त्या रणभूमीत त्याने एक रथ मला दाखवला. तिथे सारथ्याच्या जागी मुग्धमानसी आहे हे मला लगेच कळलं. तिने आयडी मुग्धमानसी घेतला असला तरी तिच्या लिखाणातून तिची प्रतिमा लेडी डॉनची झाली होती आणि ती तशीच वाटली.

आमच्या कौटुंबिक (मायबोली कुटुंब ना? म्हणून) जिव्हाळ्याच्या मालिकेचे रूपांतर सस्पेन्स थ्रिलर मध्ये झालं होतं. साजिर्‍याने तिघांना तीन जागा सांगितल्या आणि कोण कुठे आहे, हे फक्त त्यालाच माहीत होते. त्याने मानसीला कुठे जायचे हे न सांगता -रथ आधी मागे मागे घे, मग अचानक हं काढ पुढे , हाक तिथून, इथे वळ, आता भरधाव चल, आता थांब असं सांगितलं. तिथे सिम्बा होता. माझी या दोघांपेक्षा सिम्बाशी जास्त ओळख असल्याने हायसं वाटलं. पण तरीही सस्पेन्स संपतच नव्हता. मध्येच एका ठिकाणी रथ थांबवून साजिरा उतरला. थोड्या वेळाने मानसी उतरली. या लोकांनी आणखी कोणाला बोलवलंय की काय असा विचार करत असतानाच साजिरा चित्रांच्या दोन प्रिंट्स घेऊन आला.

हे मात्र मला अपेक्षित होतं. खरं सांगायचं तर त्यासाठीच मी साजिराला भेटायला बोलावलं होतं. काही मायबोलीकरांना मात्र त्याचं अजिबात कौतुक नाही. त्याबद्दल इथे आणि आधीच्या गटगच्या धाग्यांवर कसे पीजे मारलेत बघा.

अजूनही नक्की कुठे जायचं ते ठरत नव्हतं. साजिरा नावात तळ असलेल्या टेकडीच्या ठिकाणी घेऊन जात होता. सिम्बाने म्हटलं - पण आता अंधार पडल्यावर तिथले गेट बंद झाले असतील. पुन्हा नवा सस्पेन्स. मी कुठे जातोय ते फक्त माझ्या त्या एक्स कलीगना माहीत होतं. ते सुद्धा स्वारगेट. पण शेवटी साजिराला मनासारखी किंवा त्याने आधीच ठरवलेली जागा आली. ती काय ते ही मंडळीच सांगतील.

रॉबीनहुड यांचा प्रतिसाद आलाच आहे. तर साजिर्‍याने त्यांची आठवण काढलीच होती. मुग्धमानसीला भेटायचे असलेल्या मायबोलीकर लेखकांच्या यादीत त्यांचंही नाव आहे. माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदरयुक्त दरारा आहे. ते आले असते तर मी गप्प बसून फक्त ऐकलं असतं असं मी म्हटल्याला हे तिघे साक्ष आहेत. या हो रॉबिनहूड परत. म्हणजे आला आहातच. येत रहा, असं गटगलाच आलेल्या आणि मायबोलीवर न येणार्‍यांना सांगायची पद्धत आहे. सिम्बा आणि मानसीलाही तसं सांगितलंय किंवा त्यांनाच परत इथे लिहावंसं वाटतंय.

खादाडीची जागा आल्यावर गटगच्या कार्यक्रमाला अधिकृत सुरुवात झाली. आधी आम्ही लगेच एकमेकांचं कौतुक - प्रशंसा करून घेतले. माझ्या गळ्यात पुन्हा आदराचे हार पडले. त्यात या वेळी भीतीचे काटे नव्हते. माझ्याबद्दल लोकांना अनादर वाटावा असं वागावं की आदराच्या फुलांऐवजी प्रेमच्या कळ्या मिळतील असं , याचा विचार करतोय. तर आम्ही एकमेकांचं कौतुक केलं.मी साजिराला तोंडी दिलेली त्याच्या मभागौदि लेखनाबद्दलची कॉम्प्लिमेंट मी तिथेही लिहिली होती, असं साजिर्‍याने सांगितल्यावर, गटगच्या निमित्ताने त्याच्या लेखणीला कशी बहार येते हे आधी एका गटगच्या धाग्यावर लिहिलं होतं, तेच जरा वेगळ्या शब्दांत आणि संदर्भ वाढवून आणि सध्याच्या मायबोलीवरच्या हॅपनिंग अशा वसंतावरच्या लेखाला स्मरून सांगितलं. त्यामुळे ही जुनीच कॉम्प्लिमेंट आहे, हे त्याला कळलं नाही. त्याने वृत्तान्त लिहिला की द्यायला अगदी आधी कुठेही न वापरलेली कॉम्प्लिमेंट तयार ठेवली आहे.

तर चार मराठी माणसं. त्यातून मायबोलीकर. किती वेळ इतरांबद्दल चांगलं बोलतील? तेव्हा मायबोलीवरची गँगवॉर्स, एनकाउंटर्स , अंडरवर्ल्ड यांच्याकडे गाडी वळली आणि बर्‍याच स्टेशन्सवर थांबत फिरली. ही माहिती गोपनीय आहे. फक्त गटगला येणार्‍या लोकांना, तेही त्यांची परीक्षा घेऊन ती सांगितली जाईल.
साजिरा, त्या गप्पांत मी तुझी काही मतं खोडून काढली , काहींवर "नाही नाही " म्हणून जोरात मान हलवली. पण मुंबईत आल्यावर मला त्यातला काही भाग पटला. तेव्हा तिथे ती मतं पटली नाहीत, याला कारण पुण्याचं हवापाणी. तसंच अशा गटगमध्ये होतं तसं , ऐकण्यापेक्षा बोलण्यावर आपसूक जोर आल्याने ( माझा दोष नाही, गटग या कल्पनेचाच) तुझ्या काही गोष्टी अर्धवट राहिल्या. तेव्हा और गटग बनते हैं.
गळाभेटी होऊन हे तत्काळ आणि अत्यल्पकालीन गटग संपलं. याच्या आठवणी बराच काळ पुरतील. मी आभार मानायची औपचारिकता करणार नाही. पुन्हा भेटू असंच म्हणेन. तेव्हा आणखी काही शिटा वाढवू. आतापासून बुकिंगला लागा.

साजिराने मुंबई गटग हवं , आम्हां पुणेकरांना बोलवा असं म्हटलं.

मुंबईतले एक मायबोलीकर ठाणे, हैद्राबाद, पुणे अशा ठिकाणी गटगला फक्त जात नाहीत, तर ती आयोजित करून दणकून यशस्वी करून दाखवतात. त्यांनी ठाणे गटगनंतर पुढचं गटग आता वेस्टर्न लाइनवर असं लिहिलं होतं. त्याची आठवण करून देतो.

भ्रमर आणि जाई, कोणाची कॉलर पकडायची हे तुम्हांला कळलंच असेल.

आता त्या चित्रांच्या प्रिंट्सबद्दल. दोन प्रिंट्समधलं एक माझ्यासाठी हे उघड होतं. दुसरं कोणासाठी हे कळत किंवा ठरत नव्हतं. ते मयुरेशला द्यायचं असं ठरलं किंवा कळलं. इथेही तो वर आलेला प्रश्न आलाच. त्याच्या आईला गणपतीचं आवडलं होतं. पण मुलाची बंडखोर वृत्ती लक्षात घेऊन सासूसुनेने दुसरं चित्र निवडलं. त्यामुळे झालं काय , की कुठेही गेलं की तिथून गणपतीची मूर्ती आणायची माझ्या बाबांची रीत अशी पाळली गेली. हे लिहिताना मला काय वाटतंय ते शब्दांत पकडता येणार नाही.
नात्यातल्या काही लोकांच्या " हे चित्र आम्हांला यांनी यांनी भेट दिलंय " या ब्रॅगिंगला माझ्याकडे उत्तरही झालं.
साजिर्‍या , त्या प्रिंटसची तुला काळजी होती ते दिसलं. मुंबईला परत येताना कुठल्या तरी गडकिल्याच्या नावाच्या बसने ये असं मला सुचवल गेलं . पण प्रिंटला सांभाळून आणायचं म्हणून उबर इंटरसिटी केली आणि माझ्या कडे आधीच दोन जड बॅगा आहेत असं सांगून त्या ड्रायव्हरलाच ते चित्र दोन मजले चढून वर आणून द्यायची विनंती केली. आणि ते सुखरूप एकही ओरखडा न पडता पोचलं. माझ्या घरातल्या भिंतीवर आणखी एका चित्राला जागा आहे बर्का.

अरे वा, भारीच!
खाण्यासाठी, पिण्यासाठी, पुस्तकांसाठी, रोपं-बियांसाठी गटग आम्ही इथे बर्‍यापैकी वारंवार करतो, चित्रांसाठी हे निमित्त नवीन आहे. Happy
तत्काल म्हणजे मराठीत impromptu का? Proud

ऋतुराज Lol
फा, मला अगदी हीच लिंक असेल असं वाटलंच होतं!! Biggrin

तुमच्या बाबांची आठवण ज्या पद्धतीने आली ते बघून माझ्या बाबांची आठवण आली आणि जरा दाटून आलं. सावरलो लगेच पटकन.

मोबदला म्हणून तुमच्या भिंतीवरच्या जागेसाठी याबद्द्ल माझ्याकडून खास भेट घेऊन येईन.

^^मायबोलीकरांना मात्र त्याचं अजिबात कौतुक नाही. त्याबद्दल इथे आणि आधीच्या गटगच्या धाग्यांवर कसे पीजे मारलेत बघा.^^^

पुण्याचा वाण नाही पण गुण लागला हो तुम्हाला....

बाकी गटग गुपचूप केले तरी वृतांत बाकी ढोल ताशांच्या गजरात येतो आहे..
पुढच्या पोस्टच्या प्रतीक्षेत...
पु पो प्र...

मला आहे साजिरांचे कौतुक, पण ते स्वदेसमधे मकरंद देशपांडे कसा जिप्सी सारखा येऊन "युहीं चला चला राही" म्हणून आपल्याच नादात पण चांगले बोलून जातात याने नीट कनेक्ट होता येत नाही. Lol

वाचतेय, धमाल लिहिले आहे भरत. Happy

धनवन्ती, अगदी. Lol आपल्याला खिजवायला असेल.

>>> तत्काल हा शब्द भारतीय रेल्वेच्या तत्काल तिकीट व्यवस्थेवरून
ओह बरं बरं. Happy

>>> कुठेही गेलं की तिथून गणपतीची मूर्ती आणायची माझ्या बाबांची रीत अशी पाळली गेली. हे लिहिताना मला काय वाटतंय ते शब्दांत पकडता येणार नाही.
Happy

माझा वृत्तान्त लिहून झालाय.
गटग करायचं आणखी एक कारण साजिर्‍याने लिहिलेले वृत्तान्त वाचायला मिळावेत हे आहे.
मानसी, तू प्रथितयश कथालेखिका आहेस. तुझ्याकडून वृत्तान्तासारखा वृत्तान्त अपेक्षित नव्हता.
सिम्बाला इथला पत्ता दिला आहे. तो कधी वृत्तान्त लिहितो पाहू.

( मी वृत्तान्त हे पुन्हा पुन्हा लिहितो आहे, हे सुज्ञ मायबोलीकरांच्या लक्षात आलंच असेल. )

सर्वांना बोलवणे शक्यच नव्हतं, कारण ही गुप्त मीटींग होती. मोदींना सत्तेतून खाली खेचण्याची योजना आखायची असल्याने फक्त विश्वासू ड्युआयडीज आणि त्यांचे मालक जमले होते. माबोवरचे विशिष्ट आयडीज, काही ड्युआयडीज यांना नामोहरम करण्याची रणनीती आखली गेली. माबोवरची मोहीम फत्ते झाली कि मोदी राजीनामा देणार आणि मग सरकार बदलले कि माहिती तंत्रज्ञान खाते कुणातरी एकाला मिळणार आहे असे आतल्य गोटातून समजले.

खुसखुशीत वृत्तान्त

तिथे रिक्षाची किंवा आणखी कोणाकोणाची वाट बघणार्‍या लोकांना तुम्हांला एवढ्यात इथे अक्षय खन्ना दिसला का असं विचारावं का ? असा विचार करत असतानाच साजिरा दिसला. मी त्याच्याकडे गेल्यावर त्याने मोदींसारखी गळामिठी न घेता सुरक्षित अंतर ठेवून शेकहँड केला<<<< हाहाहा

अरे बापरे! भरत! काय वृत्तांन्त लिहिलाय राव! प्रत्यक्ष गटग अनुभवल्यानंतरही तेवढीच... किंवा त्याहीपेक्षा जास्त मजा गटग चा धागा वाचताना येते हा अनुभव पहिल्यांदाच घेतेय. आता एवढ्यासाठी यापुढे गटगंना येत जाईन. (इच्छुकांनी नोंद घ्यावी. रांगेचा फायदा सर्वांना.)

बाय द वे भरत... तुम्ही मला वर ’लेडी डॉन’ जे म्हणालाय ते प्रचंड आवडून घेण्यात आलेय. आजवर ज्या फार खर्‍याखुर्‍या प्रतिक्रिया आल्या आहेत माझ्या लिखाणावर त्यांपैकी ही माझी सगळ्यात जास्त आवडती प्रतिक्रीया आहे याची कृपया (इतिहासात) कायमची नोंद घेतली जावी. भेटीदरम्यान भरत नी माझ्या गुरुचरित्रावरच्या थोपू पोस्ट चा उल्लेख केला. मला वाटतं त्यांच्या मतीतली माझी ’लेडी डॉन’ वाली प्रतिमा त्यातूनच जन्माला आली असावी. पण ती खरी आहे. कारण ती मानसी खरी आहे.

बाकी एवढा तपशीलवार वृत्तांत लिहायचा सराव करायला हवा.

भरत - छान आहे वृ!

वर मला चिनूक्सला भेटायला आवडेल , पण त्याला मला भेटायला आवडेल की नाही हे माहीत नाही ; >>> उठा मोड? Happy

तत्काल हे हिंदीत असल्याने रेल्वे आरक्षणासंबंधीच वाटले होते.

भरत, मुग्धमानसी आणि साजिरा यांना भेटून आणि माबोच्या गप्पा ऐकून इकडे परत एकदा चक्कर मारायचा मोह झालाच.

भरत यांना जवळजवळ 11 वर्षे ओळखतो आहे , भेटीचा योग परवा आला आणि तो योग निश्चितच आनंददायी होता.जवळजवळ 5 वर्षे mabo पासून दूर असताना भरत भेटायचे आहे म्हणाले हाच माझ्यासाठी आनंदाचा धक्का होता Happy
सोबत साजिरा (हा काय, नेहमीचाच आहे) आणि मुग्धमानसी असल्याने दुधात साखर होती.
माझे उलटे रोजे चालू असल्याने आणि स्वतः भरत यांना थोडी restriction असल्याने माबो गटग चे व्यवच्छेदक लक्षण असणारे "खाणे" हा भाग थोडा बॅक बर्नर वर होता. पण "गॉसिप " item स्वतंत्र चुल ठेवण्या इतका होता.
मला एक मायबोली रिफ्रेशर कोर्स मिळाला,
गेलेले id, कोणी कोणाचा एन्काउंटर घडवला, कोणीतरी कसे multiple id ने स्वतःच स्वतःशी भांडायचे, कोणीतरी कसे वृत्तबद्ध गद्य लिहायचे, कोण कोणाच्या विपु मध्ये गुळ पाडायचे, वगैरे गोष्टींच्या विस्मरणात गेलेल्या सुरस आणि चमत्कारिक गोष्टींची उजळणी झाली.
Enjoyed the evening.
आमच्या खाण्याचे बिल आयोजकांनी चटकन भरून टाकले, त्यामुळे पुढच्या GTG ला त्यांना थोडा डिस्काउंट देण्यात यावा. Happy

पुण्याचा वाण नाही पण गुण लागला हो तुम्हाला
>>>
अगदी अगदी धनवंती. मी त्यांना प्रत्यक्षच म्हणणार होतो की तुमचं सगळं इथलंच दिसतंय. तिकडे काय करताय! Proud

त्यांचं घर असलेली इमारत त्या दुसर्‍या बाजूच्या ५०० च्या पुढचे क्रमांक असलेल्या बाजूला होती. हे असे यादृच्छिक क्रमांक द्यायची पद्धत
>>>
ये तो हमारा रोज का है भाई. पुन्यांदा करून बघा. लय मजा येती Proud

ते आले असते तर मी गप्प बसून फक्त ऐकलं असतं
>>>
तुम्हाला पर्यायच नसतो दुसरा. त्यांच्या घराबाहेरच वॉटर टँकर भरायचा मोठा नळवजा पाईप आहे. तो सतत चालू असतो. बंद असतो तेव्हा अर्थातच त्याचे कानही बंद असतात. आणखी एक निरर्थक निरुपद्रवी बिनकामाची गोष्ट म्हणजे हे महाशय श्यामाप्रसाद मुखर्जींचं नाव असलेल्या उद्यानासमोर राहतात. त्यात विशेष काही नाही, सहज सांगितलं.

रॉबिनहूड, तुम्ही खरंच परत आलाहात का? असाल तर ओटीपी पाठवा.

तुझ्या काही गोष्टी अर्धवट राहिल्या. तेव्हा और गटग बनते हैं
>>>
खूप राहिल्या. दोन-अडीच तासांनंतरही त्या तशाच राहिल्या. खूप मुद्दे आणि संदर्भ बोलण्याच्या ओघात वाहून गेले. थोडक्यात काय, तर स्वारगेट मेट्रो स्टेशनला पुन्हा या.

मला आहे साजिरांचे कौतुक, पण ते स्वदेसमधे मकरंद देशपांडे कसा जिप्सी सारखा येऊन "युहीं चला चला राही" म्हणून आपल्याच नादात पण चांगले बोलून जातात याने नीट कनेक्ट होता येत नाही.
>>>
कौतुक आहे एवढं पुरलं. आधी गटगला भेटा. त्याशिवाय कनेक्ट कसं होणार? अहो जाहो करणार्‍यांचे गुणतक्त्यात पॉईंट मायनस करणं चालू आहे, लक्षात ठेवा.

आणि केवढे केस आहेत त्या मकरंद देशपांडेला! शोभतं का ते Proud

गेलेले id, कोणी कोणाचा एन्काउंटर घडवला, कोणीतरी कसे multiple id ने स्वतःच स्वतःशी भांडायचे, कोणीतरी कसे वृत्तबद्ध गद्य लिहायचे, कोण कोणाच्या विपु मध्ये गुळ पाडायचे, वगैरे गोष्टीं
>>>
हा विषय कधीच बंद पडणार नाही, आणि कितीही तास गटग केलं तरी पुर्णही होणार नाही. ही खरं तर कंटिन्युअसली ऑनगोईंग बखर आहे. हा ह्युमन रिलेशन्स, इकोसिस्झ्ट्म आणि सायकॉलॉजीचा संपूर्ण सिलॅबस आहे. या बखरीला मायबोलीकर सतत इंधन पुरवत असतात. अँड दॅट्स द ब्युटी ऑफ इट.. Happy

अनेक वेळा 'काय बोलतोय आपण! मरुदे त्यांना करायचं ते करू दे, आपल्याला काय.." असंही होतं. पण मग लगेच समोरचा नवीन किंवा अर्धवट राहिलेला विषय, गॉसिप किंवा कुठचं जुनं प्रकरण काढतो. मग पुन्हा छाने छाने वाटू लागतं.. Lol

म्हटलं ना, न आवडणार्‍या आयडींच्या ड्युआयडींबद्दल गुप्त चर्चा झाली. त्यांचा एण्काऊंटर करण्यासाठी असलेले राखीव आयडी (त्यांना ड्युआयडी म्हणू नये) कसे वापरले, आणि पुढच्या युद्धात कसे वापरायचे याची ब्ल्यूप्रिंट बनवण्यात आली आहे.

पहाटेच्या सॉरी सकाळच्या शपथविधीपूर्वीही एवढ्या गुप्त भेटीगाठी झाल्या नसतील. माबोवर लोकशाही उरली नाही. आयोजकांचा तीव्र णिषेद. याबाबत पुढच्या गटगमध्ये या आयोजकांनी प्रत्येकाला त्यांच्या आवडीची चित्रं आणून द्यावी अशी सजा सुनावता येईल का?

भरत यांचा वृत्तान्त (नीट लिहीलाय बरं) वाचून ते पूर्वजन्मीचे पूणेकर आहेत याबद्दल खात्री पटली. बाकी तुम्ही कितीही थाळ्या, टाळ्या वाजवल्या असतात तरी माबोकरांपुढे त्या (आम्हा वगळता गतःप्रभ झणी होतील तारांगणे च्या चालीवर) निष्प्रभ ठरल्या असत्या हे मी खात्रीपूर्वक सांगू इच्छिते. यादृच्छिक शब्द बऱ्याच वर्षांनी व योग्य कॉंटेक्स्टमधे वाचून आनंद झाला.
गणपतीच्या तसबिरीबद्दल वाचून एकदम They are watching over us वाटायला लागलं.

@भ्रमर >>> भरतभेटीपूर्वी वनवासात जावं लागतं असं ऐकून आहे. आम्ही बहुतेक आजोळचे असल्याने आधीच भेट झाली हे नम्रपणे नमुद करू इच्छिते.

बाय द वे, माझ्यासारखे कित्येक आयडी एन्काऊंटर्स, गॅंगवॉर वगैरे सूवर्णकाळात माबोवर नव्हते. दर वेळी याचा उल्लेख करून आमच्या काळजांना घरं पाडू नका. नाहीतर माबो धुरंधर वगैरे नावाचं सेपरेट गटग आयोजित करावं लागेल.

आता बाकीच्यांचेही रसभरीत वृत्तान्त येऊ द्या.

कुठेही गेलं की तिथून गणपतीची मूर्ती आणायची माझ्या बाबांची रीत अशी पाळली गेली. हे लिहिताना मला काय वाटतंय ते शब्दांत पकडता येणार नाही.>>> __/\__

बाकीच्यांचे वृत्तांत पण येऊ द्या.

आता प्रतिसादांकडे बघतो.

ऋतुराजचे शिवकालीन भाषेतले काव्य आवडले.
अरेरे अरेरे हाय हन्त हन्त असे अजिबात नाही लिहिणार ll हे जास्तच आवडलं.

आपापली दिव्यांची माळ - ही मी गटगसाठी खास बनवून घेतली आहे. एरवी नाही घालत.

प्रज्ञा९ , आम्ही तळजाईवर चालायला नाही, फक्त बसायला गेलो होतो.

प्रचारसभेसाठी उचलून आणलेले लोक हा खरंच महान होता.

झकासराव, same here.

मला पुण्याचा वाण लागला, गेल्या जन्मीचा पुणेकर की ते माझे मालवणी आणि कोकणी जीन्स? कॉलेज पार्ल्यातलं - म्हणजे तेव्हा तरी मुंबईतलं पुणे वाटायचं. तिथे ५ वर्षांत जीन्स पॉलिश केले असतील. आता पुणेकर मला पुणेकर म्हणताहेत ही कॉम्प्लिमेंटच धरायला हवी. दुसर्‍या कोणी म्हटलं असतं, तर प्रश्न पडला असता.

फारेण्ड ने फक्त एक वाक्य quote करून प्रतिसाद दिल्याबद्दल निषेध.

सिम्बा, माबोपासून दूर असलो तरी संपर्काची अन्य साधने होतीच की. अपडेट्सही मिळतच होते. मूळ शिक्का मायबोलीचा हे खरं.

टवणे सर. तुम्हांला रविवारी भारतातल्या दुपारी साडेतीनच्या जरा आधी उचक्या लागल्या नाहीत का?

माझेमन, साजिरा आम्हांला गोळा करून अज्ञात ठिकाणी घेऊन जात होता हे लिहिताना पहाटेच्या शपथविधीचीच आठवण झाली.

साजिर्‍याने पुढलं मुंबई पुणे संयुक्त गटग मुंबईत हवं अशी मागणी केली आहे. तुम्ही आणि ऋतुराज , मनावर घ्या आणि आदर्श आयोजक कसा असतो, तेही दाखवून द्या.

यावेळी मला गटगला अगदीच रिकाम्या हाताने जावं लागलं. आनंदनिधी थोडा आणखी वाढला असता.

मोजून चारच डोकी होती. त्यात सिम्बा आणि मानसी यांनी एकेका परिच्छेदात आटपलंय. मी वृत्तान्ताच्या बेडकीचा बैल केलाय. हत्ती करायची जबाबदारी साजिर्‍याची.

मी हेडरमध्ये गटगला आलेल्या लोकांसाठी सूचना लिहिली होती. पण वाचणारेही टाइम ट्रॅव्हल करून मनाने गटगमध्ये पोचले आणि त्यांनी भर घातली. यही है मायबोली.

बरं अस्मिता आणि अमित स्कूल ऑफ ह्युमरमध्ये एकलव्याच्या निष्ठेने शिकून मी नावात तळ असलेली टेकडी आणि गडकिल्ल्याचं नाव असलेली बस असे किमान दोन विनोद (!) केलेत, त्याची दखल घेण्यात आलेली नाही. या कंपुशाहीचा निषेध. आता तुम्ही चिकवावर असे विनोद करून बघाच. अ‍ॅडमिनच्या विपुत इथे लोक विषयाला सोडून बोलताहेत, अशी रांगोळी काढलीच म्हणून समजा.

माझेमन, मायबोलीचा सगळा इतिहास अ‍ॅडमिनच्या विपुत आहे. गँगवॉर्स जिथे झाली ते वेगळे रंगमंचही आहेत. तेवढा स्वाभ्यास पुरला नाही तर मग कोणीतरी गुरू करा.

भ्रमर आणि जाई यांच्याशीही शेजारच्या किंवा त्याच जिल्ह्यात आजोळ हे कनेक्शन आहे. बहुतेक शुक्रवारी मी गोरेगाव पूर्व सन्मित्र मंडळ शाळेच्या जवळपास असेन. बघा जमवायचं का ते.

Pages