Submitted by भरत. on 9 March, 2026 - 11:57


Watch this space for तळजाई तत्काल गटग वृत्तान्त
गटगला आलेल्या मायबोलीकरांसाठी सूचना
मराठी टीव्ही मालिकांचं एकमेव ध्येय एपिसोड्सची संख्या वाढवणं . बघणारे सुज्ञ प्रेक्षक असल्याने, पुढे काय होणार हे माहीत असूनही ,काहीतरी वेगळं होईल ; कधीतरी संपेल या आशेने बघतात . तोच फंडा आपल्याला वृत्तान्त लिहिताना वापरायचा आहे. प्रतिसादांची मालिका लावायची. प्रत्येक प्रतिसादाचा शेवट उत्कंठावर्धक करायचा.
टीव्ही मालिकांपेक्षा मायबोली आणि त्यातही गटग हे अधिक अॅडिक्टिव्ह आहे , याची पुन्हा एकवार जाणीव करून द्यायची आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज अचानक अजून एका जुन्या
आज अचानक अजून एका जुन्या मायबोलीकर आयडी ची भेट घडली. सोनाली मालवणकर, म्हणजे मायबोलीवरची 'इन्ना' आज एका इव्हेंट ला अचानक भेटली. पहिली दोन-पाच मिनिटं आम्ही दोघीही एकमेकींकडे संशयानं डोळ्यांच्या कडे-कडेनं पहात होतो. मग नावं समजली आणि डोक्यात उजेड पडला! अरे ही तर इन्ना! तिलाही त्याच क्षणी ओळख पटली. आम्ही शेवटचं भेटलो त्याला किमान साताठ वर्षं झाली. पण ती भेट अजूनही लख्ख लक्षात आहे. एकेकाळी मला आर्किटेक्चर विषयात अचानक कुतुहल निर्माण झालं होतं त्याचं मुख्य कारण इन्ना! काय आनंद झाला आज तिला भेटून!
तर हे असं होतं. कुठेही मायबोलीकर भेटला की गजबजलेल्या परक्या शहरात आपल्या गावचं, आपल्या भाषेचं कुणीतरी भेटल्याचा आनंद होतो.
इन्ना ला म्हटलेय पुन्हा मायबोलीवर यायला आणि लिहू लागायला. रॉबिनहूड सरांकडनं बर्याच जुन्या मायबोलीकरांनी प्रेरणा घ्यायला हवी. काय म्हणता सर?
पुढल्या वेळी एकाच ठिकाणी
पुढल्या वेळी एकाच ठिकाणी एक दीवान - ए- आम आणि अनेक दीवान -ए-खास अशी गटग होऊ द्या, यात आम आणि खास हे कोणा व्यक्तीबद्दल नाही तर त्यांच्याशी आपलं किती आणि कसलं कनेक्शन आहे, त्यावरून. तशी ती मोठ्या गटगमध्ये होतातच, हे पुण्यातल्या गटगंचे वृत्तान्त वाचून कळलंच आहे.
म्हणजे खरंच झालं होय गटग?
म्हणजे खरंच झालं होय गटग? परवा नुसतं हेडर वाचलं होतं. तेव्हा वाटलं की काही तरी (कुणाची तरी) चेष्टा आहे!
(मी दिवा दिलेला नाही याची नोंद घ्यावी).
वृत्तांत आवडले! वाचायला मजा आली.
भरत, त्या जोकची दखल काल
भरत, त्या जोकची दखल काल घेण्यात आली आहे.
इथेच लिहायला हवं होतं पण गप्पांचा वाहत्या धाग्यात, वाड्यावर काल लिहिलं. ती पण एक मायबोली परंपराच की!
तिकडे भरतनी ' टेकडीच्या' नावात 'तळ' आहे असा जोक केल्यावर माझा माणूसकी वरचा विश्वास उडता उडता राहिला. भरत ना असं वाण लागेल वाटलं न्हवतं. Lol
Submitted by अमितव on 10 March, 2026 - 16:24 >>
तर वाड्याची थोडी जाहिरात आणि निमंत्रण इथेच देतो.
अय्या सिंबा आलेले, मला
अय्या सिंबा आलेले, मला त्यांना भेटायचे होते.
ते सहा आयडीवाले कोण ?
काल टिव्हीवर बातम्या पाहिल्या
काल टिव्हीवर बातम्या पाहिल्या गटगच्या. मायकेल जॅक्सन नंतर चर्चेत असलेले हे पहिलेच गटग असे सांगितले.
गडकिल्ल्याचं नाव असलेली बस
गडकिल्ल्याचं नाव असलेली बस
>>>हो ते आलं होतं डोक्यात. पण प्रतिसाद वृत्तान्तापेक्षा जास्त मोठा असू नये म्हणून गप बसले.
धन्यवाद.
धन्यवाद.
भरत, निषेधाची आदरपूर्वक नोंद!
भरत, निषेधाची आदरपूर्वक नोंद!
पण काल वरवर वाचले. पुन्हा नीट वाचायचे आहे. (सध्या माबोवर बरेच काय काय "नीट" वाचायचे रिअलायझेशन येत आहे)
पुढल्या वेळी एकाच ठिकाणी एक दीवान - ए- आम आणि अनेक दीवान -ए-खास अशी गटग होऊ द्या, यात आम आणि खास हे कोणा व्यक्तीबद्दल नाही तर त्यांच्याशी आपलं किती आणि कसलं कनेक्शन आहे, त्यावरून. >>>
किंवा तळजाई तत्काल गटग हे दीवान-ए-खास व आम्रचर्चा गटग हे दीवान-ए-आम
पार्ल्यात गटग झालं तर दीवान -
पार्ल्यात गटग झालं तर दीवान - ए - खाष्ट नाव ठेवा.
हो
पण प्रतिसाद वृत्तान्तापेक्षा जास्त मोठा असू नये म्हणून गप बसले. >>> असे काही नाही
ती जबाबदारी वृ वाल्यांची आहे. प्रतिसादवाल्यांची नाही
बिरबलाच्या रेघेसारखे.
मयेकरांचा फोन आल्यापासून
मयेकरांचा फोन आल्यापासून भेटावं लागेल, असं माहिती होतं. कारण अनेकदा संपर्क होऊनही अजून एकदाही भेट झाली नव्हती. आदर, भिती किंवा दरारा वाटण्यापेक्षा त्यांच्या सगळ्याच विषयातल्या लिखाणात मला काहीतरी कनेक्ट सापडत आला आहे आणि तरीही हेवा वाटत आला आहे- लिखाणाचा बाज-शैली, अस्वस्थ करणारा विनोद, आधी आणि आता घडत असलेल्या घटनांवर ससाण्यासारखी नजर ठेवून, स्मृतीत ठेऊन ते योग्य वेळी उध्दृत करणं; शिवाय त्यांच्यासारखं 'अभ्यासपूर्ण' आणि 'इन्फॉर्म्ड' मला कधीही लिहिता न आल्याने एक प्रकारची सुक्ष्म असूयाही- अशा अनेक गोष्टी. याव्यतिरिक्तही असतील. पण लोक बोअर होतील. डुआयडी जास्त
त्यांची काळजी आहे, हे नमूद करतो.
*
मयेकर मुळात मयुरेशकडे आले आहेत, हे कळल्यावर मी थेट हिंजवडीला जायचं ठरवलं. कारण ही जोडी मस्त आहे, हे कुठुनतरी जाणवलं. (ते कसं ते विचारु नका. मायबोलीवरची अशा अनेक दुक्कली, त्रिकुटं, चौकड्या मी मनात अनेक वर्षं जुळवत आलो आहे- त्यांना समजलं तर आश्चर्यही वाटेल कदाचित). मयुरेशच्या कविता मला आवडतात. त्याच्या एका दीर्घ कवितेची मी आमच्या खाजगी गटगंमध्ये वाचनं केली आहेत, घसा दाटवून घेतला आहे, आणि ऐकणार्यांचे डोळेही पाणावलेले बघितले आहेत. मी त्याला एकदाच भेटलो आहे, आणि तेही एका छोट्या औपचारिक भेटीत. तरीही तो एक function at() { [native code] }यंत संवेदनशील मनाचा माणूस म्हणून मला नीट माहिती आहे.
सिंबा, म्हणजे अतुलचाही प्लॅन तोच होता. हाही एक भारी आयटम माणूस आहे. या गोड माणसाला काय कडू अनुभव आले, म्हणून त्याने इथं लिहिणं सोडलं- असं नेहेमी वाटतं. या निमित्ताने जरा त्याचीही हजेरी घेता येईल असा विचार केला. आणि त्या निमित्ताने हिंजवडीची सध्याची हालहवाल बघता येईल- असाही. पुर्वी एकदा हिंजवडीला निघालो असताना रॉहूंचा फोन आला, तेव्हा म्हणे- त्यापेक्षा थायलंडला का जात नाहीस? लवकर पोचशील.
*
आता तीन कारणं घडली. रॉहूंचा हा थायलंड पीजे आठवला, रविवार संध्याकाळ खायला उठते (कारण दुपारचं अभक्ष्य खाणं-पिणं, मग झोप, आणि मग उठल्यावर पुढे भलंमोठं शुन्य. घरात रविवारी फक्त मलाच सुटी असते) आणि तिसरं कारण म्हणजे हाऊ अबाऊट रवि-संध्या? असं विचारल्यावर भरत म्हणे- मीच शन्वारात आलोय.
आता शन्वार हे डीम्ड नेशन आहे. इतकंच नव्हे तर तिथल्या प्रत्येक घराचा अधिकृत ध्वजही वेगळा असू शकतो. त्या दृष्टीने म्हणाल तर प्रत्येक वाडा नि घर म्हणजे स्वतंत्र राष्ट्र. मी जरा विचारात पडलो. मग ट्युब पेटली. म्हणलं अरे हे आमचं सहकारनगर हे तर सदाशिव-शन्वार-नारायणाचे आल्टर इगो. (डुआयडी म्हणू नका, त्यांना आवडत नाही.) मग म्हणलं हॉटेलांतली गर्दी, गडबड सहन करण्यापेक्षा मोकळ्या हवेत भेटू जरा. सहकारनगरात 'तळ' नाव असलेल्या टेकडीवर, पुण्यातल्या सगळ्यात मोठ्या उद्यानात भेटू.
तळजाई देवीमंदिरामुळे या टेकडीचं तसं नाव आहे. शेकडो एकर राखीव जंगल आणि सुंदर पायवाटा आहेत. मंदिराचे मी काही सुंदर, रोमँटिक, काव्यात्म वगैरे फोटो काढले आहेत. टाकतो थांबा.
*
एकमेकांचे आल्टर इगो असलेले देश-प्रदेश-समुह-व्यक्ती सापडल्या की पुढचं सोपं होतं. (मी ते वरती उल्लेख केलेल्या दुक्कली, त्रिकुटं, चौकड्या अशाच जुळवल्या आहेत. करून बघा तुम्हीही, लय मजा येती.) शन्वारातनं सहकारनगरात बोलावणं सोपं आहे. दोघं सेमच आहेत तसे. तरीही मयेकरांना जेटलॅग जाणवला असणारच. पण ते ठीक आहे. तो तसा जेटलॅगतर शनवारातनं नारायणात किंवा शन्वार/ नारायणातल्याच एका वाड्यातून शेजारच्या अपार्ट्मेंटात / वाड्यात गेल्यावरही जाणवतो. मयेकरांचा जेटलॅग तसा पटकन उतरला असणार कारण मध्ये स्वारगेट लागतं. आणि आता आजकाल तिथं मेट्रो स्टेशनही लागतं.
*
थांबा जरा, लिवतोय अजून..
रवि-संध्या? असं विचारल्यावर
रवि-संध्या? असं विचारल्यावर भरत म्हणे- मीच शन्वारात आलोय. >> इथे येड्यासारखा हसतोय!
इंटेन्डेड जोक आहे का काय कल्पना नाही. 
बाकी मंदिराचे सुंदर रोमँटिक वगैरे ठीक आहे, खरंतर सद्यपरिस्थितीत मंदिराला रोमँटिक, रादर कशालाच रोमँटिक कसं काय म्हणू शकतोस तू! पण ते सोड.. तर काव्यात्म फोटो नक्की टाक. काव्य करायला लावू आपण.
पुढच्या गटगला या दुकली त्रिकुटं कोण आहेत त्याचं गॉसिप ऐकायचं आहे. जून एंड जुलै मुंबईत येण्याचा सध्या प्लॅन आहे. पुण्याचं माहित नाही, मुंबईत नक्की, तर तेव्हा गटग करू.
>>मयेकरांचा जेटलॅग तसा पटकन उतरला असणार कारण मध्ये स्वारगेट लागतं. >> स्वारगेटला ट्रॅफुक असेल तर गेट-लॅग मध्ये अडकलोय असं म्हणता येईल. कामं असुन दुपारच्याला कॉफी नाही मिळाली की असं होतं.
बरं अस्मिता आणि अमित स्कूल ऑफ
बरं अस्मिता आणि अमित स्कूल ऑफ ह्युमरमध्ये एकलव्याच्या निष्ठेने शिकून मी नावात तळ असलेली टेकडी आणि गडकिल्ल्याचं नाव असलेली बस असे किमान दोन विनोद (!) केलेत, त्याची दखल घेण्यात आलेली नाही. या कंपुशाहीचा निषेध. आता तुम्ही चिकवावर असे विनोद करून बघाच. >>> तुम्ही चिकवावर दरवेळी दाद देत नाही, आता थंब इमोजी द्या एकलव्यासारखा गुरूदक्षिणा म्हणून.
आदरयुक्त दराऱ्याबद्दल आधी कळाले असते तरी मी काही दाद दिली नसती म्हणा.
धमाल लिहिले आहे भरत. तुम्हाला गटगची बाधा होते नंतर काही दिवस खूप हसवता, पण मग समाजकल्याण विभाग उघडून बसता.
साजिराने सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलावले व फक्त कोण- कुठे त्यालाच माहिती असल्याने बळी देण्याच्या योजनेची शंका येऊन गेली, क्राईम पेट्रोल मधे असेच करतात.
सिम्बा, मुग्ध मानसी छान लिहिलेय. मुग्धमानसी डॉन आहेत ??? नवीनच कळाले.
सिम्बा, परत लिहायला लागा. मी तुम्हाला अमितच्या गटगत व्हिडिओ कॉलमधे पाहिलेय बहुतेक.
मंदिराचे फोटो येऊ द्या, आणि माबोवरील सायकॉलॉजीला अनुमोदन. येथे ऑब्झर्व करण्यात सुद्धा खूप मजा आहे.
स्वारगेटला ट्रॅफुक असेल तर गेट-लॅग मध्ये अडकलोय असं म्हणता येईल >>>>
गेट-लॅग
गेट-लॅग
नाही अस्मिता, ती अमित आला तेव्हा नव्हती. ती कुठेच नसते. भरतच्या निमित्ताने ती बाहेर पडली हे नशीब..
संपादनः अच्छा, तु सिंबाला पाहिलंस, असं म्हणतेयस. तोही नव्हता. (की होता?)
सिम्बा , सिम्बा ! ते होते ना
सिम्बा , सिम्बा ! ते होते ना अमितच्या पुणे गटगत ?
ओह, ओके.
अमित, मंदिराला सुंदर म्हणलो.
अमित, मंदिराला सुंदर म्हणलो. म्हणजे ती वास्तु आणि परिसर. ते लोक ज्यासाठी वापरतात, त्याच्या आत कोण असतं, नि काय काय चालतं- याशी काहीही देणं-घेणं राहिलं नाही.
आता मघाशी अख्खा एक मोठा प्रतिसाद उडाला. रॉहु म्हणताहेत ते खरंच आहे यार.
पुन्हा लिहा, पुन्हा लिहा. मी
पुन्हा लिहा, पुन्हा लिहा. मी वाचतेय. कुठेतरी सेव्ह करून ठेवायला काय होते, उगी आप्लं!
हा धागा सक्रिय राहू द्या नाहीतर मला बिग बॉसचा वाचावा लागेल, आणि त्यातलं मला काही माहिती नाही.
सिम्बा आलेला. थोडावेळच होता.
सिम्बा आलेला. थोडावेळच होता. तू यायच्या आधी लिटरली पळून गेलेला मला वाटतं.
मंदिराला सुंदर म्हणलो. >> ओह्ह ओक! मग रोमँटिक कशाला म्हणाला असशील ते तळ्यातल्या गणपतीला येणार्या क्राऊडवरुन समजुन घेतलं तरी काव्यात्म फोटो कसे काही कळेना. तू टाक फोटो. आधी तो उडालेला प्रतिसाद परत पकडून टाक.
आता पुण्यातच भेटायचं आहे तर
आता पुण्यातच भेटायचं आहे तर कुणाला संपर्क करू असं म्हणल्यावर मयेकर चिनुक्स, मुग्धमानसी वगैरे म्हणाले. चिन्मयला विचारल्यावर कळलं, तो आपलं परराष्ट्र मंत्रालय अस्तित्त्वात आहे का, नि नक्की काय करतंय हे बघायला दिल्लीत आहे. हे सारं करायला दोनेक महिने लागतील, तोवर तुम्ही गटग उरकून घ्या आणि मयेकरांना मलाही भेटायचं असल्याचा मेसेज दे. म्हणलं बरं. मानसी येते म्हणाली, आणि लगेच निघालीही. सिंबा म्हणाला, सोमवार मरुदे आता, मीही आताच येतो तिकडे. म्हटलं हे बेस्ट.
*
इतके तरी सुभेदार जमले हे बरं झालं असा विचार करत असतानाच मिर्झाराजे शनवारातुन स्वारगेटास पोचलेही होते. इथल्या या कुरुक्षेत्री त्यांचं कसं होईल, काय होईल असा विचार करत असतानाच लक्षात आलं- मुंबईस असे अनेक भडभुंजे, तडकत्या लाह्या नि विद्युल्ल्तापात त्यांनी आयुष्यभर बघितले असतील. तो ये भी ठीक है. त्यांना तिथून शोधून काढून गाडीकडे नेताना मी त्यांचं पाकिट मारून पुढे पळ काढतोय, अधुनमधून मागे वळवळून पाहतोय आणि ते माझ्यावर बरोबर नजर ठेवीत माग काढत माझ्या मागे नजर न हलवता येताहेत असा भास मला झाला. आमचा एक हलकट मित्र एकदा मला म्हणालेलाच- तुझा चेहेरा सेम टू सेम स्ट्यांडवरच्या पाकिटमारासारखा आहे. तरी बरं मी मयेकर भेटल्या भेटल्या सभ्यपणे माफक स्मित करत शेकहॅंड फक्त केलेला.
तोवर मानसीचा रथ चक्रव्युहात अडकलेला. तीनचार बाजूंनी बसेस आणि उरलेल्या सहासात बाजूंनी रिक्षा, यांमध्ये फिलर्स म्हणून दुचाकीस्वार लढवय्ये अशात तिची गाडी अडकली. मी दिग्दर्शक होतो म्हणून ती कशीबशी बाहेर पडली. मी, ती आणि तिची गाडी यांचा संवाद भरत शांतपणे ऐकत समजावून घेत असतानाच सारसबागेजवळ सिंबा दिसला.
आणि आता गटग होणार हे नक्की झालं.
*
तर मुळातच सुभेदार कमी असल्याने, आणि हॉटेलमध्ये जाण्याचा फार कुणी हट्ट, आग्रह न धरल्याने मी तळजाई टेकडीकडे मोर्चा वळवला. चोहीबाजूला भरगच्च शहर असलेली ही जागा आधी फार सुंदर होती. आता गेल्या काही वर्षांत बेसुमार गाड्या, वाटेल त्या जागा, आणि मग नंतर रस्ते नि फुटपाथ धरून बसलेली असंख्य जोडपी, प्रिवेडिंग शुटसचा धडाका, बाईकर्सचे क्लब्स नि त्यांच्या सततच्या ग्रुपचे ग्रुप घेऊन फेर्या, वेडगळ फोटोग्राफर्स, मॅड पोलिसिंग, हजारो आरोग्यप्रेमी आणि आरोग्यवर्धन झालेले लब्धप्रतिष्ठित पुणेकर आणि हे सारं दिसतंय यासकट आयुष्यभराची असंख्य ओझी वाहत चाललेले ज्येना. आजकाल इथं आलं की वाटतं- जिथं आपण फुलं वेचिली, तिथं... असो.
*
आता झोपतो. उद्या जाऊ तळजाईवर
म्हणजे माझं बरोबर होतं,
म्हणजे माझं बरोबर होतं, सिम्बा होते तेथे!
माझेमन आणि फाच्या सारा जमाना पोस्टीसाठी>>>
निजले वाटतं सगळे, आपणही जावं झालं!
धागा वाचून काय करत्येस. तू
धागा वाचून काय करत्येस. तू स्वतः बिग बॉसमध्ये जायला हवं खरं तर.
अरे हो, आधीच गेलेला, की मी आल्याआल्या तेही आठवेना. हे लोक किती गोंधळवून टाकतात ना आपल्याला. खाण्याकडे मात्र बरोबर लक्ष. मागच्या गटगला मला शेवटपर्यंत भुकेला ठेवला यांनी, पुन्हा सांगतो
आणि तुला आवडत नसेल तर काव्यात्म शब्द उडवून टाक. तसंही फार काही सख्य नाही आपलं त्याच्याशी
गडबडीत आहे. आल्यानंतर
गडबडीत आहे. आल्यानंतर साजिराचे सर्व वृत्तान्त वाचून काढणार आहे. साजिरा हे नाव फक्त वृत्तान्तासाठीच प्रसिद्ध व्हावे का ?
खरंच कुणाला दम देऊन कुणी लिहीतं होत असेल तर या इसमाला लिहीतं करा. शैली, शब्दसौंदर्य आणि मांडणी हे शिकून घेतोय.
आला आला. साजिर्याच्या
आला आला. साजिर्याच्या वृत्तान्ताचा पहिला हफ्ता आला.
याच साठी केलं होतं गटग.
साजिर्याने सिंबाबद्दल नेमका शब्द वापरला आहे. गोड माणूस. हे त्याला ऐकताना जाणवतं, वाचताना - माझाच वारसा चालवतोय असं वाटतं.
त्याचा आवाज आणि बोलणं ऐकल्यापासून त्याला सिंबुल्या म्हणावंसं वाटलं. पण इतकी जवळीक सोसेल का नाही म्हणून कधी म्हटलं नाही.
मानसी, तुझ्या चाबूक कविता वाचून लेडी डॉन अशी प्रतिमा निर्माण झाली होती. ती गुरुचरित्र प्रकरणात पक्की झाली. पण हा शब्द मात्र तुला पाहिल्यावरच आठवला किंवा सुचला.
आता गुरुचरित्रा वरून मी तिथे काय बोललो ते लिहून टाकतो. आमच्याकडे नवनाथ कथासार, गणेशपुराण, हरिविजय, शिवलीलामृत अशा अनेक पोथ्या आहेत. त्या मी लहानपणा पासून गोष्टीची पुस्तके म्हणून वाचत आलोय. देव्हार्याखालच्या त्याच खणात लाल कापडात गुंडाळलेला आणखी एक ग्रंथ आहे. गेली अनेक वर्षे देव्हारा आणि त्या खणांची साफसफाई मीच करतोय. मानसीची फेसबुक पोस्ट वाचल्यावर लाल कापडात गुंडाळलेला तो ग्रंथ गुरुचरित्र असेल अशी शंका आली आणि ती खरी निघाली. या पुस्तकांना योग्य जागी पोचवण्याआधी मी ती पुन्हा वाचणार आहे. गुरुचरित्र अर्थात पहिल्यांदाच, पण वाचेनच. ज्ञान मिळेल तिथून घ्यावं.
लेखक, तुम्ही म्हणताय तसं
लेखक, तुम्ही म्हणताय तसं 'लेखन' केलं की कुणीच प्रतिसाद देत नाहीत, त्यामुळे वाचतात की नाही तेही कळत नाही. (मी कुणाच्याच लेखनावर प्रतिक्रिया न देता फक्त वाचनमात्र असतो, हेही कारण असावं. इट्स ह्युमन). वेडेवाकडे विस्कळित कसेही वृ लिहिले तरी काहीतरी गॉसिप किंवा किमान काही मनोरंजक कळेल अशा आशेने चार लोक वाचतात
*
नॉर्मली गटगची जागा ठरते, आणि मग तिथं एकेकाचं आगमन होतं. पण एकेकाला पिकप करत सगळे तळजाईच्या दिशेने निघालो तेव्हा आमदारे किडनॅप करून गुवाहाटीला निघालो असल्याचं फिलिंग आलं. (तसे ते बरेच, म्हणजे ४० होते, नि आम्ही ४. पण ठीकच आहे, एक आकडा तरी कॉमन आहे). रविवार असल्याने सार्या टेकडीवर उधाण आलेलं. काही जोडपी तर हा आता शेवटचाच रविवार अशा निकराने जगून घेत होती. मंदिराच्या शेजारी छोटीशी खाऊगल्ली आहे, तिथे बरी जागा आणि चार खुर्च्या बघून बसलो. मी पटकन तळजाई मंदिर दिसेल अशी जागा आणि खुर्ची पकडली. इथूनच पुढे आत जंगलावाटांत जायचा रस्ता आहे. हॉटेलांच्या गर्दीत आजकाल अस्वस्थ व्हायला होतं, आणि नको ते कलकलाटातलं खाणंपिणं असं होऊन जातं. तरीही कुणाच्या मनात कुठं हॉटेलला बसायचं आहे का, असं विचारून घेतलं होतं. आता आधीच ठरलंय म्हणल्यावर कोण हो म्हणेल. असं कुणी करत नाहीत. बरेच मायबोलीकरही करत नाहीत. यांनीही केलं नाही. बसल्यावर मात्र बरं वाटलं. मोकळी हवा होती. कानाजवळ कुणी किंचाळत नव्हतं, शेजारून जाताना हॉटेलातल्यागत कुणी धक्के मारत नव्हतं, खायला येताना सोबत आणलेल्या आपापल्या हाफ नि पाव तिकिटांचा हैदोस नव्हता, तुसडे वेटर नव्हते. शेजारी स्टॉलवाल्या मावशींना 'खायला काय' विचारल्यावर 'काय तुम्हाला जे काय पाहिजे ते सग्गळं आहे बघा!' असं म्हणून दोन-तीनच पदार्थांची नावं सांगितली. हरकत नव्हतीच, कारण त्यातलेही एक-दोनच आम्हाला पुरले.
*
आणि मग कुणाला खोटं वाटेल, पण दोनच मिनिटांत 'व्हाईब सेट' सेट झाली. गप्पा येतानाच सुरू झालेल्या, त्यामुळे इथं त्या लगेच सेट्ल झाल्या. भरत (की कुणीतरी) म्हणाले तसं दिवाण-इ-आम आणि खासचा हाच तो फरक. आम मध्येही आपापले खास करून लोक बसतातच. नंतर, काही वेळाने ते आपापल्या 'खास'मध्ये एक्चेंज होतातही.
परंपरेप्रमाणे मायबोलीच्या, आयडींच्या, त्यांच्या जोड्यांच्या, त्यांमधल्या गॉसिप्सच्या, त्यांच्या असण्या-नसण्याच्या, उडवले जाण्याच्या, विपुतल्या रांगोळ्या आणि बखरींच्या, लिखाण थांबवल्याच्या, लिखाण थांबवा म्हणून तक्रारी करूनही न थांबवण्याच्या, एखाद्या अभ्यासा-विषया-कामाला वाहून घेतलेल्या कर्मयोगी आयड्यांच्या, चिडून पाय आपटत निघून गेलेल्या आयडींच्या, उडालेला आयडी परत मागणार्या आयडींच्या, सुसाट कारनामे करणार्या ड्युआयडींच्या, तसेच नाव घेताच कानाच्या पाळीला हात लावावा अशा व्यासंगी आणि असामान्य बुद्धी लाभलेल्या पण लाईमलाईटपासून कटाक्षाने दूर राहणार्या थोर डुप्लिकेट आयड्यांच्या गप्पा- अशी गप्पांची गाडी सुसाट सुटली. अनेक विषयांवर सगळे इतके मनसोक्त बोलत होते, की काही विषय सुटून गेले, याची खंत राहिलीच.
यासोबत राजकारणाचे विषय, त्यावरचे बाफ आणि त्यांवर बागडणारे, आणि काही तळहातावर शिर घेऊन लढणारे, काही वर्षांनंतर दल बदललेले, छोडेगा नई जी मोडात सतत असलेले, या गदारोळात नर्मविनोदी कारंजं फुलवून हलकेच हसवणारे आयडी- हेही सगळंच तोंडी लावायला होतंच. हे कमी होतं म्हणून की काय त्यातच मसाप, फेसबुक, गुरुचरित्र असेही जोडविषय निघाले. बोलून तोंड दुखलं तरी गप्पा थांबायचं नाव नव्हतं.
*
-पण शेवटी आवरावं लागणारच होतं. जड मनाने उठलो. परतीच्या वाटेवर सिंबा, भरत यांना कॅबस्थळापर्यंत पोचेस्तोवरही गप्पा झाल्या. जाताना भरतभेटीच्या निमित्ताने चित्रभेटीचा छोटा कार्यक्रम उरकला. ज्यांना दिल्या, त्यांना अप्रूप आहे, शिवाय त्यांच्या वेगळ्याच आठवणींशी त्या असोसिएट झाल्या हेही नंतर कळलं. अशा वेळी बरं वाटणारच ना..
एरवी तासचेतास आपण रुटीन जगत असतो. खातो-पितो, वाचतो, गप्पा नि वॉक करतो, गाणी नि पॉडकास्टस ऐकतो, भांडतो वगैरे. हे असे दोन-तीनच तास, पण लक्षात राहतील अशा आठवणी देऊन जातात. हा 'क्वालिटी टाईम' असतो. या आठवणींचं त्या दृष्टीने मोठं ऋण असतं, आणि त्या देणार्या मायबोलीकर मित्रांचंही. थँक्यु फ्रेंड्स!!
*
सुंदर वृतांत साजिरा
सुंदर वृतांत साजिरा
तुमचे वृ लेखन नेहमीच भावनिक स्तरावर genuine वाटते आणि आपण ह्या संस्थेचा एक भाग आहोत म्हणून आत्मविश्वासाची वेगळीच उंची गाठली जाते
मस्त वृत्तांत लिहिलायस हो
मस्त वृत्तांत लिहिलायस हो साजिर्या. - असं म्हणणं म्हणजे, मस्त चित्र काढलंय हो तुम्ही असं हुसेन किंवा जिम्नी रॉय ना म्हटल्यासारखं आहे.
पण खरंच मजा आली सगळा तपशीलवार वृत्तांत वाचताना.
मग भरत गाडीत बसले तेंव्हा वाटलं चला मी एकटी तर नाही. पण मग नंतर सिम्बा गाडीत बसला आणि शंका आली की साजिरा ही एकटा नाही की काय? 

साजिराने सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलावले व फक्त कोण- कुठे त्यालाच माहिती असल्याने बळी देण्याच्या योजनेची शंका येऊन गेली, क्राईम पेट्रोल मधे असेच करतात. >>>> खरंतर ज्या गोंधळात टाकणार्या आत्मविश्वासाने साजिरा मला गाडीचे सारथ्य करण्यासंबंधी सूचना देत होता तेंव्हा मला खरोखर शंका येत होती मी माझं माझ्या गाडीसकट अपहरण तर होत नाहीये ना?
मग म्हटलं जाउदेत. देखते हैं क्या होता है. ही सगळी मंडळी तशी बरियेत असं ऐकून होतेच. बरीच बरी निघाली. म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा भेटूनही मी त्यांच्याशी इतक्या गप्पा मारू शकले हे माझं मलाच खरं वाटत नव्हतं.
मानसी, तुझ्या चाबूक कविता वाचून लेडी डॉन अशी प्रतिमा निर्माण झाली होती. >>> थॅंक्यू थॅंक्यू भरत.
(लाजणार्या डॉन चा स्माईली/ मिम मिळेल का कुठे?) 
स्वारगेटला ट्रॅफुक असेल तर गेट-लॅग मध्ये अडकलोय असं म्हणता येईल. >>> भारिच
'लेखन' केलं की कुणीच प्रतिसाद
'लेखन' केलं की कुणीच प्रतिसाद देत नाहीत, त्यामुळे वाचतात की नाही तेही कळत नाही. >>> हे बरोबर आहे. हल्ली फेसबुकवर पण लोक फक्त पोस्टीच वाचतात. साहीत्यिक टच असलेलं लिखाण "सपने मे देखा इक सपना " गाण्यातल्या कुबड्या घेऊन बसलेल्या अमिताभसारखं कोपच्यात पडलेलं असतं आणि मध्यमवर्गीय पालेकर टाईप लिखाण खुर्चीत बसून ऑटोग्राफ देत असतं. तरी पण म्हणेन एक, दोन प्रतिसाद चालत असतील तर लिहा.
( तुमच्या एखाद्या माहीत नसलेल्या ड्युआयडीशी गल्फ वॉर झालं तरी या आयडीने मित्रत्वपूर्ण भूराजकीय संबंध असू द्यात ).
अस्मिता, हो. माबो गटग हा
अस्मिता, हो. माबो गटग हा एनर्जीचा बूस्टर डोस असतो असं दोन गटगंच्या अनुभवाने म्हणू शकेन.
<असे दोन-तीनच तास, पण लक्षात राहतील अशा आठवणी देऊन जातात. हा 'क्वालिटी टाईम' असतो. या आठवणींचं त्या दृष्टीने मोठं ऋण असतं, आणि त्या देणार्या मायबोलीकर मित्रांचंही. थँक्यु फ्रेंड्स!!>
अगदी. तेही पहिल्या प्रत्यक्ष भेटीतच फ्रेंड म्हणता येतं. पण भेटायच्या आधीपासूनच त्याच्या खुणा ओळखीच्या असतात.
साजिर्याने पुण्याबद्दल ते ऑल्टर इगो इ. काय काय लिहिलं ते काही कळलं नाही.
बरं. वृत्तान्त लेखन हा लेखनाचा रियाझ समज. आणि जेव्हा काही सुचेल तेव्हा लिहीत जा. वाचणारे वाचतीलच.
स्वारगेट ते तळजाई या प्रवासात एका रहस्यकथेची बीजं आहेत. राजकारणात रस असणार्यांना पहाटेचा शपथविधी, गौहाटी व्हाया सूरत आठवलं. नसणार्यांना क्राइम पेट्रोल.
सिम्बा गाडीत बसला आणि शंका
सिम्बा गाडीत बसला आणि शंका आली की साजिरा ही एकटा नाही की काय >>
किल्ले, थँक्यु बॉस!
भरत मयेकर हे आठवणी, तपशील, ओपिनियन्स आणि ती बदलण्याची कारणे- यांबद्दल फारच पर्टिक्युलर आहेत, हे लिहायचं राहिलं. मला हेवा वाटतो अशा लोकांचा.
(आता लिहित नाही म्हणल्यावर असाच संशय येणार)
त्यांचा सिंबुला पण असाच नेमकं, तपशीलांना योग्य ते महत्व देत लिहायचा एकेकाळी. नंतर तो वाममार्गाला लागला
Pages