Submitted by भरत. on 9 March, 2026 - 11:57


Watch this space for तळजाई तत्काल गटग वृत्तान्त
गटगला आलेल्या मायबोलीकरांसाठी सूचना
मराठी टीव्ही मालिकांचं एकमेव ध्येय एपिसोड्सची संख्या वाढवणं . बघणारे सुज्ञ प्रेक्षक असल्याने, पुढे काय होणार हे माहीत असूनही ,काहीतरी वेगळं होईल ; कधीतरी संपेल या आशेने बघतात . तोच फंडा आपल्याला वृत्तान्त लिहिताना वापरायचा आहे. प्रतिसादांची मालिका लावायची. प्रत्येक प्रतिसादाचा शेवट उत्कंठावर्धक करायचा.
टीव्ही मालिकांपेक्षा मायबोली आणि त्यातही गटग हे अधिक अॅडिक्टिव्ह आहे , याची पुन्हा एकवार जाणीव करून द्यायची आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाममार्गाला नाही लागला. एका
वाममार्गाला नाही लागला. एका दक्षिणपंथीयाने त्याच्या पायांना पळायची सवय लावली आणि त्याच्या हातातला कीबोर्ड सुटला. म्हणूनच मी त्याला त्यावरून टोचलं होतं. मग वाईट वाटलं असेल म्हणून शुभेच्छाही दिल्या.
आता तिकडे उचक्या लागतील बघा.
अरे यार, इकडे मी 100 गोष्टी
अरे यार, इकडे मी 100 गोष्टी करून माझी अगदी bull terrier ची नाही तरी आल्सेशियन ची इमेज सेट करायचा प्रयत्न करतोय, आणि तुम्ही लोकांनी माझी इमेज साफ Labrador ची करून टाकलीत .
कुफेहेपा!!
मस्त वृत्तान्त साजिरा!
मस्त वृत्तान्त साजिरा!
सिम्बा, ताबडतोब लिहायला सुरुवात कर.
आता या इमेजेस काय असतात ते एआय ला विचारणं आलं, कुठली चांगली कुठली वाईट ते काही समजलं नाही.

एआयला विचारलं तर त्याने लिटरल अर्थ घेऊन या दोघातला फरक स्पष्ट करा चे मुद्दे दिले! :डोक्याला हात: आता एआयचा प्रॉम्प्ट बदलत मिटिंग मधली पुढची १० मिनिटे मजेत जातील.
ताक: एआय हुषार आहे. मीच ढ आहे. एआयने इमेज म्हटल्यावर पब्लिक इमेज काय असते ती पण दिलेली. मीच ते आधी वाचलं नाही.
इथे भरतनी त्यांची असलेली अल्सेशिअन इमेज खड्ड्यात घालून प्रेमळ आणि धर्मपरायण इमेज असल्यागत प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आहे. फाको करुन त्यावर आम्ही आदरापोटी हसावं का नको करत, हसलो नाही तर त्यावरुन पण आमची खरडपट्टी काढायला लागले आहेत. माणूस प्रत्यक्ष भेटलं की असंच होतं. किती अल्सेशिअनगिरी करायचं म्हटलं तरी लॅब्रेडॉरच डोकं बाहेर काढतो
अरे व्वा हे ही वाचलं. मला
अरे व्वा, हे ही वाचलं. मला वाटलं दोन मेंब्रांना पथ्य आहे तर काहीच खाल्ले नाही की काय! मस्तच वृत्तान्त साजिरा.


गुरूचरित्र , इंटरेस्टिंग. वाचून बघा. सगळे वाचावं, कशालाच नाही म्हणू नये क्वचित काही तरी आपल्या कामाचं सापडतं.
गोलमालचा संदर्भ -
लॅब्राडॉर -
असामान्य बुद्धी लाभलेल्या पण लाईमलाईटपासून कटाक्षाने दूर राहणार्या थोर डुप्लिकेट आयड्यांच्या >>>>
पण भेटायच्या आधीपासूनच त्याच्या खुणा ओळखीच्या असतात.>>>
खरंच!
तुम्ही तुम्हा चौघांचे फोटो नाही का काढले? सगळे फोटो येऊ द्या.
मानसीची गुरुचरित्र पोस्ट/ लेख
मानसीची गुरुचरित्र पोस्ट/ लेख कुठे वाचता येईल? मला पुसट काही चर्चा झालेली आता आठवते, पण ते माझ्या मनाचे खेळ ही असू शकतात.
ते प्रेमळ, धर्मपरायण रूप
ते प्रेमळ, धर्मपरायण रूप टिकणारे नाही, काळजी नसावी. गटग मुळे काही दिवस बाधा झाल्यासारखे प्रेमळ, गोड, मिश्किल वगैरे होतात. हे writing under influence आहे. पुन्हा सरळ होतीलच!
मी तर म्हणेन (wui आहे तोवर ) आताच टोमणे मारून घ्या.
हो, पुढच्या सिझनला जाईन बिग बॉसमधे. आणि जिंकून दाखवेन.
जोड्यांवरून आठवलं.
जोड्यांवरून आठवलं. मयुरेशसोबतच शशांक प्रतापवार मायबोलीवर आला होता. जोडी यांची होती. त्याच्या कवितांत मला आरती प्रभूंच्या सावल्या दिसायच्या.
आता तो जगप्रसिद्ध मीमर आहे. त्याला भेटायचं राहून गेलं.
आमची ओळख झाली तेव्हा तो फक्त मला भेटायला पुण्याहून मुंबईला येणार होता. मयुरेश तेव्हा डोंबिवलीतच असे. तेव्हा माझे ते माणसांना प्रत्यक्ष भेटायचे जीन्स अगदीच डॉर्मंट होते, त्यामुळे मी गोड बोलून टाळलं.
ते धर्मपरायण वगैरे काही नाही
ते धर्मपरायण वगैरे काही नाही. शिंग फुटल्यापासून त्या पोथ्या गोष्टीची पुस्तकं म्हणून वाचल्यात. बाबांना झेपेनासं झाल्यावर देव्हार्याची आणि त्या खणांची स्वच्छता करणं माझ्याकडे आलं. तीही पिरियॉडिकच होते. तसं ड्रॉवर्स , बुकशेल्फ रिकामे करून धूळ बिळ पुसून पुन्हा लावणं हे आवडतं काम आहे. कारण कागद कसलेही असले तरी आवडतात.
>>>>कारण कागद कसलेही असले तरी
>>>>कारण कागद कसलेही असले तरी आवडतात.
येह हुइ ना बात! हे खरे आहे.
आता दोन्ही डोळ्यांत मोतीबिंदू वगैरे आहेत, चष्मा तर गेली १० वर्षे आहेच तरी किंडलवर वाचत बसते. रीडींग इज सॅक्रिड.
धर्मपरायण >> नाही नाही. ते
धर्मपरायण >> नाही नाही. ते लिटरली न्हवतं म्हटलं.
तुम्ही तसे धार्मिक कदापि होणार नाही याची तुमच्यापेक्षा जास्त मला खात्री आहे!
... दामू नेन्या चचला तेव्हा केसरीत छापुन आलेलं- मनमिळावू, प्रेमळ आणि धर्मपरायण! पेपरवाले काय काय देतील ते छापतील...
त्या किंवा थोड्याफार त्या चालीत..
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
>>> माझे ते माणसांना
>>> माझे ते माणसांना प्रत्यक्ष भेटायचे जीन्स अगदीच डॉर्मंट होते, त्यामुळे मी गोड बोलून टाळलं.
टाळायला तरी गोड बोललास हे काय कमी आहे!
< मग भरत गाडीत बसले तेंव्हा
< मग भरत गाडीत बसले तेंव्हा वाटलं चला मी एकटी तर नाही. पण मग नंतर सिम्बा गाडीत बसला आणि शंका आली की साजिरा ही एकटा नाही की काय? Uhoh>
मानसी, मला तू आणि साजिर्याची गँग आहे आणि तुम्ही आम्हांला किडनॅप करताय असं वाटलं कारण सिम्बाशी जुनी ओळख आहे.
>> मी माझं माझ्या गाडीसकट
>> मी माझं माझ्या गाडीसकट अपहरण तर होत नाहीये ना? >> ह्याला जाम हसलो. गाडीचं ड्रायव्हर सहीत, ड्रायव्हर कडूनच अपहरण! आता या 'स्वत:च स्वत:चे अपहरण' वर कविता गझल वगैरे जमेल चांगली.
मला तर क्राईम पेट्रोलशी
तू टेकर आहेस आणि पेपर स्प्रे!
तू टेकर आहेस आणि पेपर स्प्रे!!! अगदीच शोनाहो!
>>नाही तर माझा अपमान होईल >> मी आधी याच लाईन वर लिहिणार होतो. पण टेकर जोकने जास्त मजा येईल आणि तो थोडा वर्मावर घाव ही बसेल म्हणून तो निवडला.
आम्ही पेपर स्प्रे घेतला नाही,
पेपर स्प्रे! अहो कशाला
पेपर स्प्रे! अहो कशाला पुण्याच्या गटग ड्रायव्हरांना नको त्या आयडिया देता!!
असंच एका गटगला झक्कींचं मी सारथ्य केलेलं तेव्हा हे महाशय तुच्छतेने म्हणे- अख्खा भारत खणून ठेवलाय वाटतं.
तेव्हा खणण्यावरनं लय डेंजर निर्वाणीचं तोंडावर आलेलं, पण त्यावेळचा त्यांचा चष्मेवाला भोळा गोल सालस मवाळ इम्मॅच्युअर चेहेरा बघून आवरलं. पेपर स्प्रे त्यापुढे काहीच नाही!!
वृत्तांत आणि प्रतिसाद
वृत्तांत आणि प्रतिसाद
एकसे बढकर एक आहेत
मजा येतेय
दामू नेन्या चचला तेव्हा
दामू नेन्या चचला तेव्हा केसरीत छापुन आलेलं- मनमिळावू, प्रेमळ आणि धर्मपरायण! पेपरवाले काय काय देतील ते छापतील...
त्या किंवा थोड्याफार त्या चालीत >>>
तुम्हाला गटगची बाधा होते नंतर काही दिवस खूप हसवता, पण मग समाजकल्याण विभाग उघडून बसता. >>
हे काल वाचले तेव्हा "समाजकल्याण" वर फुटलो होतो. लिहायचे राहिले.
एले - साहित्यिक लिखाण व ममव लिखाणकरता वापरलेली उपमा चपखल
मला काही टोटल लागेना. कट्टा
मला काही टोटल लागेना. कट्टा झाला आहे की सगळे काल्पनिक आहे? पोस्ट मधे वेगळेच आवाहन आहे. मुख्य म्हणजे एम एफ हुसेन सारख्या टुकार दर्जाच्या चित्रकाराचे तेवढेच टुकार पेंटिंग का आहेत पोस्ट मधे? कोण आहे जो वृतांतापुरता उरला आहे? कुणी कुणाला गाडीत घातले, कुणी कुणाचे अपहरण केले? सिंबुल्या कोण आहे आणि कट्टा नेमका कुठे झाला आहे? भरत मयेकर मध्येच तळजाईवर कुठून आले? आणि भरत मयेकर अमितव सारखे 'तळ असलेल्या टेकडीवर' सारखे लेम जोक्स का मारत आहेत? आतापर्यंत तर आदमी कुछ काम का था असे वाटत होते. मध्येच लोक एकमेकांना कुत्र्यांच्या जातींशी आइडेंटिफाई का करत आहेत? एरव्ही सुसंबद्ध विनोदसरस्वती अस्मिता अशी नुसतीच का असंबद्ध हसत आहे? हे जग अस्ताला चालले आहे की काय?
तुमच्या सगळ्या प्रश्नांची
तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मयेकरांनी आधीच हेडर मध्ये लिहिली आहेत
माझा या आठवड्याचा हसण्याचा
माझा या आठवड्याचा हसण्याचा quota संपला आहे.
--
साजिर्या, पुढच्या गटगला हे रॉय हवेत.
हो ते ठीक. पण त्यांना किडनॅप
हो ते ठीक. पण त्यांना किडनॅप करायची नवीन आईडिया काय ते तुम्हीच शोधून ठेवा
>>> त्यांना किडनॅप करायची
>>> त्यांना किडनॅप करायची नवीन आईडिया

तुम्हाला लोकप्रिय पुस्तकं, सिनेमे, पदार्थ, टूरिस्ट स्पॉट्स वगैरे कसे आवडतात आणि ते लोकप्रिय असणं कसं रास्तच आहे हे हिरिरीने बोलत चालत राहा - येतील आपोआप मागे.
(No subject)
मला वाटतं ते पण किडनॅप
मला वाटतं ते पण किडनॅप व्हायला उत्सुक असतील.
Pages