पाकिस्तानशी "आवर्जून आणि ठरवून" क्रिकेट खेळणे गरजेचे आहे का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 September, 2025 - 05:33

गेले कित्येक वर्षे आपण भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यांची मालिका खेळणे बंद केले आहे. पण याच काळात आपण वनडे वर्ल्डकप, ट्वेंटी वर्ल्डकप, अशियाकप, चॅम्पियन ट्रॉफी या जागतिक स्पर्धात आवर्जून आणि ठरवून पाकिस्तानशी खेळतो.

हो आवर्जून आणि ठरवून खेळतो. नाईलाजाने नाही. असे मुद्दाम म्हटले आहे कारण या स्पर्धेत आता दरवेळी हे दोन संघ ठरवून एकाच ग्रुप मध्ये ठेवतात आणि यांचे जास्तीत जास्त सामने कसे होतील हे बघितले जाते.

उदाहरणार्थ, आशिया कपमध्ये सहा संघ असल्यास तीन तीन संघांचे दोन ग्रुप बनवले जातात. ज्यात भारत पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असतात तर उर्वरित तिसरा संघ दुबळा असतो. दुसर्‍या गटात लंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान असतात. परीणामी पुन्हा हे दोघे भाऊ पुढच्या राऊंडला जाऊन पुन्हा सुपर फोर मध्ये अजून एक सामना आपसात खेळतात. दोघे फायनलला पोहोचले तर दोघांना आपसात खेळायची तिसरी संधी मिळते. यावेळी आठ संघ आहेत त्यामुळे दोन्ही गटात अजून एक दुबळा संघ वाढला आहे. पण भारत-पाकिस्तान जोडी कायम आहे.

ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कपला १६ संघ असल्यास त्यांचे चार ग्रूप बनवतात. त्यात ८ प्रमुख संघांपैकी २-२ संघाच्या चार जोड्या बनवून त्यांना एकेका ग्रुपमध्ये टाकतात. भारताची जोडी नेहमी पाकिस्तानसोबतच असते. वनडे वर्ल्डकपमध्ये देखील काही वेगळे चित्र नसते. स्पर्धेत आठ संघ असो किंवा सोळा, त्यांचे दोन ग्रूप बनवा किंवा चार, पण भारत-पाक जोडी फुटणार नाही याची काळजी घेतली जाते.

नुकतेच चॅम्पियन ट्रॉफी झाली ती पाकिस्तानमध्ये खेळवली गेली. पण आपण पाकिस्तानमध्ये खेळायला जाणार नव्हतो म्हणून आपले सामने दुबईला ठेवले होते. निदान तिथे तरी दोघांना वेगळ्या ग्रुपमध्ये ठेवावे. पण नाही, तत्व म्हणजे तत्व!. तिथेही भारत पाकिस्तान एकाच ग्रुप मध्ये ठेवले आणि यजमान पाकिस्तान आपला देश सोडून भारताशी खेळायला दुबईला आला. सोशल मीडियावर कौतुकाच्या पोस्ट फिरत होत्या की बघा आम्ही किती शक्तिशाली आहोत जे यजमान संघाला आपला देश सोडून यायला भाग पाडले. पण प्रत्यक्षात ही आपली देखील लाचारी आहे असेच वाटत होते. आपल्याला सुद्धा त्यांच्याशीच खेळायचे असते. कारण हे सारे सामने नेहमी वीकेंडला प्राईम टाईमवर ठेवून, आणि यांची भरमसाठ जाहिरात करून बक्कळ पैसा कमावला जातो.

जगात सर्वात श्रीमंत असलेल्या भारतीय क्रिकेट बोर्डाला पैश्याची तितकी निकड असावी असे वाटत नाही. कारण माझ्या वाचनात आले त्यानुसार, "भारतीय कायद्यानुसार बीसीसीआय ही एक धर्मादाय संस्था मानली जाते, त्यामुळे आयपीएलमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर बीसीसीआयला आयकर भरावा लागत नाही." - चुकत असेल तर कर्रेक्ट करा.

पण मग काय ती अशी लाचारी असावी जे देशप्रेम, देशाभिमान आणि राष्ट्रीय अस्मितेला दुय्यम लेखत अगदी ठरवून पाकिस्तानसोबत सामने खेळले जातात. कि असे काही आहे जे कितीही पैसा का असेना, हाव काही सुटत नाही.

आणि असे असल्यास मग स्वतःचे पोट भरणार्‍या कलाकारांनाच तेवढे टार्गेट का करायचे?
त्यांना वेगळा नियम आणि क्रिकेट बोर्डाला वेगळा नियम कश्याला? तिथे कोण असे सरकारचे जावई बसले आहेत?

चला भारत-पाक क्रिकेटवर बहिष्कार घालू नका. आयसीसी स्पर्धांमध्ये ते आपल्या ग्रूपमध्ये बिलकुल नको असाही हट्ट धरू नका. पण किमान रँकिंगनुसार जर दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये येत असतील तर खेळा, आणि शेड्युलनुसार कुठल्याही वीकडेला खेळा. असे ठरवून एका ग्रूपमध्ये राहून, आणि या भारत-पाक सामन्याची जाहिरात करून, त्याला प्राईम स्लॉट आणि महत्त्व देऊन त्यातून पैसा तरी कमावू नका. हि सरळ सरळ आपल्या स्वार्थासाठी केलेली सामन्यांची फिक्सिंग आहे.

एकीकडे संपूर्ण जगाने पाकिस्तानवर बहिष्कार टाकून आपल्याला साथ द्यावी अशी अपेक्षा असणारा भारत, स्वतः मात्र साधे क्रिकेट सामन्यावर बहिष्कार घालू शकत नाही? किंबहुना दोघे जास्तीत जास्त कसे खेळले जाईल हेच उलट बघतो. त्यासाठी सेटींग करतो आणि पैसे कमावतो. मग कोण सिरियसली घेणार आपल्याला?

पेहेलगाम नंतर आजही सीमाभागात चकमक होत आहेत. समोरील बाजूने हल्ले होत आहेत. आपला विरोध पाकिस्तानी जनतेला नाही. परंतु क्रिकेटचे निर्णय घेणारे पाकिस्तानी सैन्य अधिकारी सीमेवर गोळीबार करण्याचे आदेश देतात. त्यामुळे अशा लोकांना विरोध व्हायला हवा जो देशहिताच्या भावनेतून योग्यच आहे. आपल्या देशातील सरकार जर बीसीसीआय वर दबाव न आणता केवळ पैशाकडे पाहत असेल तर त्यांचे पण कान टोचावे लागतील. कि त्यांचा वाटा त्यांना पोहोचतो म्हणून शांत आहेत?

राजकीय दृष्ट्या जरी विचार केला तरी यातून आर्थिक फायदा दोन्ही देशांना होत असेल. पैश्याची गरज आपल्यापेक्षा जास्त त्यांना आहे. आपण हे सामने खेळून त्यांनाच आर्थिक मदत करत आहोत. म्हणजे फिरून आपणच दहशतवाला पैसे पुरवत आहोत आणि पोसत आहोत. सामान्य जनतेला वेगळे भावनिक आवाहन करायचे आणि आपण मात्र आपला स्वार्थ बघायचा हे धोरण चुकीचेच नाही तर कमालीचे दुटप्पी वाटते.

मध्यंतरी निव्रुत्त क्रिकेटरच्या एका स्पर्धेत आपला भारतीय संघ पाकिस्तान सोबत खेळला नाहीत. चक्क सेमीफायनल सोडून स्पर्धेतून बाहेर पडला. तेव्हा आफ्रिदीसारखे काही पाकिस्तानी क्रिकेटर वल्गना करत म्हणालेले की अश्या बिनमहत्वाच्या स्पर्धाना तुम्ही देशप्रेमाचे नाटक कराल, पण नंतर आयसीसी ट्रॉफीमध्ये तुम्ही झक मारत आमच्याशीच खेळायला याल. त्यांचे ते विधान कितीही उद्दामपणाचे वाटले तरी ते बोचरे सत्य होते आणि हे लपलेले नाही.

ईतरांचे माहीत नाही. पुढचे माहीत नाही. पण या स्पर्धेपुरते तरी मी या दोन देशातील सध्याची परीस्थिती पाहता या ठरवून खेळले जाणार्‍या भारत-पाक सामन्यावर बहिष्कार टाकून न बघायचा निर्णय घेतला आहे. ज्या दिवशी असा निर्णय भारतीय क्रिकेट बोर्ड आणि आपले सरकार घेईल तो सुदिन!

धन्यवाद,
- एक सामान्य भारतीय क्रिकेटप्रेमी नागरीक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुसती धुलाई सुरू आहे. फोर सिक्सच्या सोबतीला शिव्या पण खाताहेत उद्यापासून गरबा सुरू आणि आज या पाकिस्तानी राक्षसांचा वध मजाच मजा.

जे पाकिस्तान जिंकण्याची वाट बघत होते ते बरे आहेत ना आज. ऑफिसला गेलाय ना? ज्यादा दुःख तो नही हुआ ना? भारताचा राग करता इतपत ठीक आहे पण त्या भिकार पाकिस्तान्यांच्या सुखात सुख शोधताय म्हंजे काय बोलू मी और कितना निचे गिरोगे.

भारताचा राग कदाचित करत नसावेत पण मोदीना विरोध करता करता कुठं थांबायचं हे विसरले असतील. हा माझा अंदाज आहे.
ह्या धाग्याचा विषय नाही पण ऑपेरेशन सिंदूर दरम्यान पण काहीसे असेच प्रतिसाद तिथं आले होते.
भारतीय संघ मात्र खरंच चांगला खेळतोय.

आपली टीम चांगली खेळते आहे. त्यांना उर्वरीत सामन्यांसाठी शुभेच्छा!

वरील राजकीय चर्चा वाचून उगा एक म्हण आठवली. सगळ्याच राजकारण्यांची हीच विचारसरणी असते.

'नवरा मेला तरी चालेल पण सवत विधवा व्हायला पाहिजे'

सीमेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या एका पाक खेळाडूने विमाने पडण्याची अ‍ॅक्शन करून दाखवली. अर्थात याची सुरुवात क्रिकेटमध्ये राजकारण आणून भारतीय संघानेच केली आहे.

सीमेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या एका पाक खेळाडूने विमाने पडण्याची अ‍ॅक्शन करून दाखवली
>>>>>

ॲक्शन काय घेऊन बसला आहात
दहशतवादी हल्ले करून ते प्रत्यक्षात देखील भारतीयांना मारतात.
म्हणूनच तर खेळायचे नाहीये.

सीमेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या एका पाक खेळाडूने विमाने पडण्याची अ‍ॅक्शन करून दाखवली
>>>>>

ॲक्शन काय घेऊन बसला आहात
दहशतवादी हल्ले करून ते प्रत्यक्षात देखील भारतीयांना मारतात.
म्हणूनच तर खेळायचे नाहीये.

सामने खेळायचे नाहीत असे तोंडाने म्हणत लोक टिवीवर सामने बघत बसतात.

लोक बघणार हे माहित असल्यामुळे टिवीवर सामने दिसतात.

आणि इतका पैसा हातचा घालवायचा का या लालसेने सामने लावले जातात.

बघताना लोक सामने लावणार्‍यांना शिव्या घालतात, खेळाडुंना शिव्या घालतात, देशांना शिव्या घालतात. तरी बघतात आणि कोणी काय अ‍ॅक्शन केली, कोणी हात मिळवला, कोणी नाकारला याची चर्चा करतात.

उद्या सामने लावलेच नाही तर हेच लोक खेळ आणि देश्/धर्म्/राजकारण वेगळे ठेवा म्हणुन गळे काढणार…

सामने लावणार्‍यांना हे माहित आहे. ह्या असल्या लोकांसाठी त्यांनी का हातचा पैसा सोडावा? उद्या ते असतील
नसतील, आज संधी आहे तर कमावणारे कमावताहेत.

आणि टिवीवर फुकट आहे म्हणुन सामने का लावायचे असा गळा काढत पाहणारे पाहताहेत.

तुम्हाला निषेध म्हणुन साधे सामने पाहणे बंद करता येत नाही. इतरांकडुन कसल्या अपेक्षा ठेवता????

माझ्यासारख्या बरेच जणांनी भारत पाकिस्तान दोन्ही सामने बघितले नाहीयेत. अशी जनता सुद्धा आहे. सुरुवात झाली आहे.

बीसीसीआयला धडा शिकवायचा, तर भारताच्या सगळ्या सामन्यांवर बहिष्कार घालायला हवा.
एशिया कपचे यजमान बीसीसीआय आहेत. म्हणून स्पर्धेवरच बहिष्कार घालायला हवा.

तसे केल्यास आपला बहिष्कार उठून दिसणार नाही.
त्या केसमध्ये मालिकेलाच टीआरपी कमी आहे असे वाटेल.
बाकीच्यांसोबतचे सामने बघून जर आपण पाकिस्तान सोबतचे नाही बघितले तर फरक जाणवेल.
म्हणून पाकिस्तानचे सामने न बघतानाच ईतर संघासोबतचे सामने वेळात वेळ काढून बघा

<<म्हणून पाकिस्तानचे सामने न बघतानाच ईतर संघासोबतचे सामने वेळात वेळ काढून बघा>>

------ नापाक ( पाक नसलेले) सामने पाहून थांबू नका, इथे आणि इतरत्रही या सामन्यांबद्दल भरपूर चर्चा करा. पण मग आपल्याला सिंदूर४ चा आँखो देखा हाल कळणार नाही आणि
आपण काही स्वर्गीय आनंदाचे क्षण गमावू.

सामना बघितला नाही तरी नंतर असे व्हिडिओ बघायला मिळतात ज्यात कोणी पाकिस्तानी फलंदाज अर्धशतकाचे सेलिब्रेशन करताना बंदूक चालवण्याची अक्टिंग करतेय, तर सीमारेषेवर असलेला त्यांचा क्षेत्ररक्षक प्रेक्षकांना विमाने पाडल्याची ॲक्टिंग करून दाखवत आहे.
दहशतवाद एक थट्टेचा विषय बनून राहिलेला दिसतो आणि सामना न बघण्याचा निर्णय योग्य वाटतो.

फुल टाईम अतिरेकी पार्ट टाईम क्रिकेटर लवकर का आऊट होताहेत. मॅचनंतर यांचा झूम कॉल नाही ना पुढचा हमला कुठे करायचा ते.

आज भारत जिंकल्यावरचा नेहमी इतकाच आनंद आहे!
पाकिस्तान सोबत जिंकल्यावर जो अतिरिक्त आनंद होतो तो सुद्धा झाला.

पण पहेलगाम श्रद्धांजली वगैरे यात न आणलेलीच बरे..
ज्यांच्या घरचे कोणी त्यात गेले असेल त्यांना सांगून बघा, आम्ही तुमचा बदला घेतला म्हणून, मग लगेच यातील फोलपणा समजेल.

त्यामुळे यापुढे पाकिस्तानसोबत फार संबंध न ठेवायचा स्टँड क्रिकेटबाबत सुद्धा पाळला जावा अशीच इच्छा राहील.

पण पहेलगाम श्रद्धांजली वगैरे यात न आणलेलीच बरे
सहमत, पण मोदींनी स्वतः तस ट्विट केलंय. आनंद व्यक्त करणं हिथं पर्यंत ठीक आहे.

मोदींचे ते ट्वीट पाहून सखेद आश्चर्य वाटले. (किंवा खरे तर आश्चर्य नाही).

आधी तर मला ते आय टी सेल च्या नेहेमिच्याच यशस्वी ट्रोल ने किंवा श्याम रंगिला वगैरेने केले असेच वाटले, पण नाही, अधिकृत हॅंडल वरूनच आले आहे.
हे आता केविलवाणे होत आहे. एक तर हा सामना भारत पाकिस्तान नसून BCCI 11 v PCB असा होता, आम्ही BCCI 11 अहोत आमचा भारताशी संबंध नाही असे त्यांंनी कोर्टातच सांगितले आहे. दहशतवादी हल्ल्याचा बदला जर क्रिकेट सामने जिंकून होत असेल तर मग एन आय ए वगैरे हवेतच कशाला ? दहशतवादी हल्ला झाला की लग्गेच मालिका ठेवायची, पाकिस्तान ला व्हाईटवॉश द्यायचा ! शिवाय खेळाडूना विमानाची अ‍ॅक्शन वगैरे करायचे रितसर ट्रेनिंगच द्यायचे !

१५०० अतिरेकी मेले, कराची उध्वस्त , इस्लामाबाद वर तिरंगा ई ई बातम्या खोट्या आहेत हे विनम्रपणे लक्षात आणून दिल्याने काहींना राग आलेला असावा ! Happy

विकु मनातले लिहिलेत. जगातील फक्त ते १५ देशांत जो खेळ खेळला जातो त्या खेळातील एक फुटकळ सामना इतका महत्वाचा आहे की भारतीय जनतेचा बळी गेला हे तो सामना जिंकल्याने compensate व्हावे ? एखाद्या थर्ड क्लास ट्रील कडून असे झाले असते तर ठीक होते पण खुद्द पीएम कडून ?

सगळे पैसे आर्मीला देणे, पुरस्कार न घेण्याचे, हस्तांदोलन न करण्याचे नाटके... पण पाकसोबत खेळ तर व्हायलाच हवा.

<< एखाद्या थर्ड क्लास ट्रील कडून असे झाले असते तर ठीक होते पण खुद्द पीएम कडून ? >>
------ यात आष्चर्य वाटण्यासारखे काय आहे ?

विकु, मोदीजी ने किया है तो कुछ सोच समझ के ही किया होगा. मोदीजींनी पण पाहिला का सामना?

काल स्टेडियम फुल भरलेलं होतं आणि भारतीय प्रेक्षकही भरपूर होते.

PVRINOX वाल्यांनी आपल्या शंभरेक हॉल्समध्ये मॅचचं लाइव्ह प्रक्षेपण ठेवलं होतं. ते शोज हाउस फुल गेले असावेत. फक्त महाराष्ट्रात ठाकरे सेनेच्या आक्षेपामुळे हे शोज रद्द झाले. जय महाराष्ट्र! ठाकरे सेनाच खरी देशभक्त निघाली.

Pages